16/05/2024
नमस्कार मंडळी!
|| अनुभूती || ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन आणि समुपदेशन, ही सेवा खरंतर वैयक्तिक कुतूहलापोटी घेतलेल्या शिक्षणातून, ज्याला गरज आहे त्याच्या काही प्रश्नांना उत्तरे मिळवीत किंवा काही अडचणीतून मार्ग सापडावा या हेतूने सुरू केली. अर्थात, वैयक्तिक खर्चासाठी अर्थार्जन हे काही त्याचे प्रयोजन नव्हते.
तरीही जातकांच्या समाधानाने जे काही देणगी मूल्य जमा होते, त्याचाही वापर वैयक्तिक किंवा कौटुंबिक खर्चासाठी करायचा नाही या ब्रीदानेच ||अनुभूती|| ची वाटचाल सुरू आहे.
त्याचाच एक भाग म्हणून, जसे जातकाला उद्युक्त करणे ही ज्योतिष वर्तवणाऱ्याची भूमिका असावी तसाच हेतू ठेवून उद्योग करू इच्छिणाऱ्या परंतु शारीरिक दृष्टीने हतबल व्यक्तींना उद्युक्त होता यावे यासाठी सामाजिक भान जपणाऱ्या संस्थांमार्फत गरजूंना मदत व्हावी यासाठी केलेला हा यथाशक्य प्रयास!
|| अनुभूती || ला सहा वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच श्री सुनील यादव यांना व्हीलचेअर देण्यात आली.
रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून माझे सन्मित्र श्री सादिक नाकाडे यांच्या आवाहनास दिलेला हा मैत्रीचा प्रतिसाद!
श्री सुनील यादव यांचे जीवन सुकर होवो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होवोत एवढीच विधात्याकडे प्रार्थना!🙏