IEC Health ZP Ratnagiri

IEC Health ZP Ratnagiri Social Awareness about health program & information under Zilla Parishad Ratnagiri Health Department...

नेत्रदान... सर्वश्रेष्ठ दान....मृत्युंनंतरही जग पहा..
10/06/2025

नेत्रदान... सर्वश्रेष्ठ दान....मृत्युंनंतरही जग पहा..

मा. ना.डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते कर्करोग व्हॅन द्वारे कर्करोग तपासणी मोहिमे चे उदघाट्न...
26/05/2025

मा. ना.डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते कर्करोग व्हॅन द्वारे कर्करोग तपासणी मोहिमे चे उदघाट्न...

20/05/2025

ॲनिमिया नियंत्रणासाठी श्रीमद राजचंद्र हॉस्पिटल गुजरात, स्वयंपूर्तता फाउंडेशन रत्नागिरी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यामाने दि.20 मे 2025 रोजी पंचायत समिती देवरुख ( संगमेश्वर) येथे ॲनिमिया नियंत्रण प्रकल्पाचे उद्‌घाटन मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांचे शुभहस्ते व मा. गटविकास अधिकारी भरत चौगुले,सहा. गट विकास अधिकारी शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद मोरे, स्वयंपूर्ण फांडेशन सेक्रेटरी युयूत्सु आर्ते व त्यांची टिम यांचे प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी तालुक्यातील वैदयकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी मोठया संख्येने उपस्थितीत होते.

25 एप्रिल, "जागतिक हिवताप दिन "
25/04/2025

25 एप्रिल, "जागतिक हिवताप दिन "

हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) : एक आवश्यक जीवनरक्षक कौशल्य....            सिपीआर प्रशिक्षण ही काळाची गरज आहे व सी...
12/04/2025

हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) : एक आवश्यक जीवनरक्षक कौशल्य....
सिपीआर प्रशिक्षण ही काळाची गरज आहे व सी पी आर कसा द्यायचा व कुणाला द्यायचा याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप,अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र गावडे , जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार कुंभार,रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ वसीम सय्यद,सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सीपीआर प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. याकामी विभागीय स्तरावरून प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केद्र, कोल्हापूर चे डॉ योगेश साळे ,उप प्राचार्य डॉ विनीत फाळके यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यामध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण अंतर्गत सर्व जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण झाले आहे. तसेच पुढील टप्प्यात तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सर्व आशा कार्यकर्ती ,अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण होणार आहे.त्याचप्रमाणे महाविद्यालयीन स्तरावर सर्व विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच ग्रामस्तरावर ग्रामसभेद्वारे गावातील सर्व नागरिकांचे प्रशिक्षण हे जून २०२५ या कालावधी पर्यँत टप्याटप्याने आयोजित केले जाणार आहे.
 काय आहे - हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) एक आवश्यक जीवनरक्षक कौशल्य प्रशिक्षण
हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) हे एक अत्यावश्यक जीवनरक्षक कौशल्य आहे, जे अचानक हृदयविकार (Cardiac Arrest) किंवा श्वासोच्छ्वास थांबल्यास एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकते.बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि अयोग्य आहार यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत, सिपीआर( CPR) चे महत्त्व अनमोल आहे. अचानक हृदयविकार झाल्यास, वेळेवर सिपिआर केल्यास व्यक्तीचे जीवन वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.आरोग्य सेवा सुविधांमध्ये सुधारणा होत असली, तरी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत, सिपिआर चे ज्ञान आणि कौशल्य सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे, प्रत्येक नागरिकाने सीपीआर (CPR) चे महत्त्व जाणून घेणे आणि त्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ते एखाद्याचे जीवन वाचवू शकतील.
 आवश्यकता : हृदय व फुफ्फुसांच्या पुनरुज्जीवनाचे (CPR) महत्त्व आणि गरज
हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) हे एक अत्यंत महत्त्वाचे जीवनरक्षक कौशल्य आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक थांबते किंवा श्वास घेणे बंद होते, तेव्हा CPR हे त्या व्यक्तीला वाचवण्याची संधी देते.
 महत्त्वः जीवन वाचवतेः CPR रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनचा प्रवाह पुन्हा सुरू करून मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना होणारे नुकसान टाळण्यास मदत करते.
 मेंदूचे नुकसान टाळतेः हृदयाचे ठोके थांबल्यानंतर काही मिनिटांतच मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो, ज्यामुळे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. त्वरित CPR केल्याने हे नुकसान कमी करता येते.
 रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मदतः रुग्णवाहिका येईपर्यंत CPR केल्याने रुग्णाला वाचण्याची शक्यता वाढते.
 सामुदायिक प्रतिसादः CPR चे ज्ञान समाजात पसरल्यास, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळू शकते.यामध्ये अर्भकापासून ते मोठया व्यक्तीला सिपीआर ची गरज पडते व तो कसा द्यायचा,याबाबत सर्वांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
 सीपीआर ची गरज केव्हा पडते : अचानक हृदयविकार, बुडणे, गुदमरल्यामुळे, विजेचा धक्का, औषधांचा अतिवापर

“सीपीआर चे घेऊ प्रशिक्षण ,करूया प्राणांचे रक्षण”
सर्वांनी सीपीआर चे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.जेणेकरून वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी आपत्कालीन परिस्थितीत आपण एखाद्याचे जीवन वाचवू शकतो.


आरोग्य विभाग, जि. प. रत्नागिरी...

7 एप्रिल,जागतिक आरोग्य दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे  सर्व अधिकारी व कर्मचा...
09/04/2025

7 एप्रिल,जागतिक आरोग्य दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे मॅडम (भा.प्र.से.)....
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी चे मनसोपचार तज्ञ् डॉ. संतोषकुमार कलगुटगी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी मा. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र गावडे,वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके, जिल्हा माध्यम अधिकारी एन जी बेंडकुळे आदी उपस्थित होते.

Today's news...
09/04/2025

Today's news...

उष्माघात टाळण्यासाठी....
08/04/2025

उष्माघात टाळण्यासाठी....

राष्ट्रीय अंधत्व प्रतिबंध सप्ताह.. 1ते 7 एप्रिल...
04/04/2025

राष्ट्रीय अंधत्व प्रतिबंध सप्ताह.. 1ते 7 एप्रिल...

27/03/2025
रत्नागिरी येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा...               दरवर्षी २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन  म्हणून साजरा केला जातो....
26/03/2025

रत्नागिरी येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा...
दरवर्षी २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.”होय आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो : प्रतिज्ञा करा,तरतूद करा ,सेवा द्या” हे या वर्षाचे घोषवाक्य आहे. दि. 24/03/2025 रोजी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये,मा. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांचे प्रमुख उपस्थितीत जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी मा. मुख्य वैदयकिय अधिकारी (ART) डॉ. रश्मी आठल्ये,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, वैदयकिय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना वाघमारे, जिल्हा क्षयरोग विभागाचे व जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून क्षयरोगाबद्दल माहिती दिली.
यावेळी क्षयरोग जनजागृती बाबत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, निबंधस्पर्धा, चित्रकला स्पर्धा यामध्ये एकूण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात प्रविण्य मिळवलेल्या विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सन २०२४ मधील टी.बी. मुक्त ग्रामपंचायत मधील निवड झालेल्या प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामपंचायत कापडगाव, झरेवाडी, पावस, टिके, टेंभ्ये यांच्या सरपंचांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह/ पदक देवून गौरविण्यात आले. तसेच जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग कक्ष व बालरुग्ण कक्षात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.यानंतर परिचारिका महाविद्यालय व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत रत्नागिरी शहरात क्षयरोग जनजागृती पर प्रभात फेरी काढण्यात आली.या प्रभातफेरीत सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होते .जिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात क्षयरोग जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.

प्रधानमंत्री योग पुरस्कार 2025... प्रसिद्धी पत्र...
26/03/2025

प्रधानमंत्री योग पुरस्कार 2025... प्रसिद्धी पत्र...

Address

Dr Babasheb Ambedkar Bhavan, Zilla Parishad
Ratnagiri
415612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when IEC Health ZP Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram