Ayurved kosh

Ayurved kosh कोश म्हणजे गाभा . . आयुर्वेदाचा जो गाभा आहे . सत्व आहे . सार आहे . तो मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न

आयुर्वेद शाश्वत आहे .. कालातीत आहे . निर्माण होऊन शेकडो वर्षे उलटली तरी त्याची तत्वे , उपस्तंभ , नियम , चिकित्सा आजही मार्गदर्शक आहे . . हेच आयुर्वेदाचे यश आहे . . अनेक ‘शोध ‘ किंवा ‘पद्धती ‘ ज्या नव्या वाटतात त्याची सुरुवात आयुर्वेदात आहे .. आयुर्वेदास आरोग्याचा विश्वकोश म्हणायला हवे . .

आयुर्वेद प्रामुख्याने संस्कृत भाषेत लिहिण्यात आला . ज्याचे वाचन करणे , अभ्यास करणे , अर्थ लावणे प्रत्येकास शक

्य नाही . संस्कृत मधून बोली भाषेत ‘भाषांतर ‘ केल्याने अनेकदा त्याच्या अर्थात गल्लत होते . केली जाते . दिशाभूल केली जाते . .सदर ब्लॉग , आयुर्वेदाचा प्रचार ,प्रसार , शंकांचे निरसन आणि आरोपांचे खंडन करण्यास निर्मिला आहे . सध्या आयुर्वेदाचा स्वीकार सर्वत्र होत आहे . भारतीयच नाही तर परदेशी लोक सुद्धा आयुर्वेद आपलासा करत आहेत . . सदर प्रक्रिया होत असताना , व्यावसायिक हित जपण्याच्या उद्देशातून काही अशास्त्रीय मजकूर आयुर्वेदाच्या नावावर खपवण्याचा उद्योग सुरु आहे ..

आयुर्वेद कोश प्रामुख्याने आयुर्वेद लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे . इथे मला ‘अपेक्षित ‘ आयुर्वेद सांगितला जाणार नाही .आयुर्वेद हा ‘संस्कृत ‘ मध्ये लिहिला आहे . त्यामुळे त्याचे वाचन करून , अभ्यास करून समोर आलेला मजकूर सत्याच्या कसोटीवर उतरवणे प्रत्येकास शक्य होत नाही . . संहितेत वर्णन केलेला आयुर्वेद साध्या , सोप्या , सुलभ भाषेत सांगितला जाईल . प्रत्येक वेळेस श्लोक देणे किंवा संदर्भ देणे शक्य होणार नाही . तसे केले तर लेखन ‘किचकट ‘ होईल . ठराविक वर्गापुरते ‘मर्यादित ‘ राहील . ते तसे होऊ देणे म्हणजे लेखनाच्या मूळ उद्देशाशी फारकत घेण्या सारखे आहे . .

कोश म्हणजे गाभा . . आयुर्वेदाचा जो गाभा आहे . सत्व आहे . सार आहे . तो मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे . . आयुर्वेदाच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट केल्या जातील . . साध्या आयुर्वेदिक म्हणून जे काही बाजारात उपलब्ध आहे त्यात कितपत ‘आयुर्वेद ‘ आहे हे तपासण्याची दृष्टी तुम्हास देणे हाच आयुर्वेद कोश याचा हेतू आहे . .. .

या कोशात तुम्हाला आयुर्वेद भेटेल .. . आरोग्य मिळेल . आयुर्वेदाकडे पहायचा एक नवा दृष्टीकोन मिळेल . . . माझे विचार ,तुमच्या प्रतिक्रिया ,चर्चा यातून जो ‘आयुर्वेद कोश ‘ तयार होईल . . . तो समस्त मानवाच्या कल्याणासाठी असेल यात शंकाच नाही !!

अनेक किचकट त्वचा रोगांची चिकित्सा आरोग्य मंदीर मध्ये होत असते . त्वचा रोग आणि केस रोग याबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज ...
25/04/2025

अनेक किचकट त्वचा रोगांची चिकित्सा आरोग्य मंदीर मध्ये होत असते .
त्वचा रोग आणि केस रोग याबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात .

टीव्ही वरची जाहिरात पाहून , एक फेस वॉश लाऊन चेहरा धुतला की थेट आलिया भट .. असे होत नाही . त्वचा रोग म्हणजे ट्यूब , जेल, वॉश, साबण, क्रीम वगैरे जंजाळ आपण करत नाही .
त्वचा रोग याबाबत जेव्हा रुग्ण येतात तेव्हा आपल्याला अग्नि किंवा पचनावर सुद्धा काम करावे लागेल असे जेव्हा मी सांगतो तेव्हा रुग्ण संभ्रमात पडतात .
अपेक्षित असते ती चकचकीत स्टिकर लावलेली अनेक उत्पादने .. मी काम करतो अग्नि वर ... वैद्य काही चुकत नाही ना ?

वैद्य चुकू शकतो .. अंकुर रविकांत देशपांडे शेवटी माणूस आहे पण शास्त्र चुकत नाही . आचार्य चरक प्राकृत अग्नीची लक्षणे सांगताना "आयु वर्ण बल... " असे स्पष्ट सांगतात .
म्हणजे प्राकृत वर्ण हा प्राकृत अग्नि वर अवलंबून आहे .

शरीरात अनेक व्याधी जसे अपचनातून निर्माण होतात तसेच संसर्गजन्य त्वचा विकार सोडले तर इतर आजार सुद्धा अपचन यातूनच निर्माण होतात .
अगदी सोपे सांगायचे तर ,
*वाताने दुष्ट अग्नि* असेल तर काळसर पण , कोरडे पण, खरखरीत त्वचा .
*पित्ताने दुष्ट अग्नि* असेल तर लालसर पण, पू निर्मित , आग , उष्ण स्पर्श
*कफाने दुष्ट अग्नि* असेल तर सूज , गाठी, चिकटपणा

असे त्वचा रोगात दिसून येतात .
अशा वेळी फक्त क्रीम लावणे स्थानिक चिकित्सा झाली .
सर्वदेहिक चिकित्सा करायची असेल तर आधी अग्नि प्राकृत केला की त्वचा सुद्धा प्राकृत होते .

त्वचा सौंदर्य प्रसाधने वापरून उत्तम होते हा गैरसमज आहे .
प्राकृत पचन हा उत्तम त्वचेचा आत्मा आहे हे कायम लक्षात ठेवावे !!


—————-ॐ——————-
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्य मंदीर -( सांगली - पुणे )
7276338585

‎Follow the Aarogya Mandir Sangli channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9F3IHI7Be70Jwqwn1K

घरचे अन्न खा यावर अनेकांचे अनेक आक्षेप असतात .🌱 आम्हाला वेळ नसतो .🌱सकाळी गडबड होते .🌱बाहेर घरच्या सारखे मिळते .🌱आम्ही घर...
23/04/2025

घरचे अन्न खा यावर अनेकांचे अनेक आक्षेप असतात .
🌱 आम्हाला वेळ नसतो .
🌱सकाळी गडबड होते .
🌱बाहेर घरच्या सारखे मिळते .
🌱आम्ही घरगुती मेस मधून आणतो.
🌱 दोघं वर्किंग असताना कसे शक्य आहे .
इत्यादी ...

याचा लसावि असा आहे की
*अन्न हे अन्न आहे , कोठूनही घेतले तर काय फरक पडतो?*

एक सोपे उदाहरण देऊन सांगतो ..

*स्पर्श* म्हणजे इंग्रजी मधे touch... स्पर्श हा स्पर्शच असतो ना ?
मग
१. सामान्य (general ) कोणीही केलेला स्पर्श
2. आवडत्या व्यक्तीने केलेला स्पर्श
3. नावडत्या व्यक्तीने केलेला स्पर्श
यात फरक का असावा?
वरील तीन वर्गातील व्यक्तींनी आळीपाळीने फक्त मनगटावर बोट लावले तर मनात , शरीरात येणारी स्पंदने वेगळी असतात , भाव भावना वेगळ्या असतात , आपल्या परक्या , आवडत्या नावडत्या ची गणिते असतात . आवश्यक अनावश्यक चे हिशोब असतात .

शरीराच्या केवळ बाह्य भागावर लागलेल्या एक बोटाने भावनांचे इतके प्रकार निर्माण होतात तर
जे अन्न ज्याला आपण पूर्णब्रह्म म्हणतो ते *कोणीही* बनवले तर आपलेपणाचे अपेक्षित गुणधर्म कसे दाखवेल ?

अगदीच इमर्जन्सी नसेल तर घरी केलेलेच जेवण घ्यावे !

—————-ॐ——————-
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्य मंदीर -( सांगली - पुणे )
7276338585

‎Follow the Aarogya Mandir Sangli channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9F3IHI7Be70Jwqwn1K

बऱ्याच जणांच्या दुःखाचे कारण सध्या *भावकी* दिसत आहे . अरे कोणाशी भांडता ? बहीण , भाऊ , चुलता , दीर, नणंद, भावजय , जावई ,...
18/03/2025

बऱ्याच जणांच्या दुःखाचे कारण सध्या
*भावकी* दिसत आहे .
अरे कोणाशी भांडता ? बहीण , भाऊ , चुलता , दीर, नणंद, भावजय , जावई , चुलत चुलता , आई , वडील , काका , काकू , आजी , आजोबा यांच्याशी ?
आणि कशासाठी ?
जमीन , सोने , प्रॉपर्टी यासाठी ?

ज्या नात्यांनी एका ताटात जेवायला हवे ती नाती शेजार पेक्षा माझ्या ताटात जास्त कसे पडेल यासाठी स्पर्धा करत आहेत .
काय कलियुग आहे .
मी हे केले की त्याच्या पोटात दुखेल ..
मी हे आणले की त्याची जळेल..
माझ्या मुलाला IIT मिळाले तर यांना बघवणार नाही ...
माझ्या मुलीला मेडिकल मिळाले तर हे २ दिवस जेवणार नाहीत..

कसली आणि कशाला ही स्पर्धा माऊली ? याची आडवा आणि याची जिरवा याने कोण पुढे गेले आहे ?
जमिनीच्या एका तुकड्यासाठी किंवा काही लक्ष रुपयांसाठी , चार सह्या साठी नाती जाळू नका रे...

गेल्या १० वर्षात stress , anxiety , depression वाढायचे एक प्रमुख कारण म्हणजे धनेशणा .. मला भरपूर पैसा मिळेल ही इच्छा .. आमचे चरक त्यांच्या ११ व्या अध्यायात लिहितात .
आपल्या कष्टाने धन गोळा करा . धनप्राप्ती किंवा धन प्राप्ती इच्छा चूक नाही पण कोणत्या मार्गाने ? शेती, पशुपालन, वाणिज्य व्यापार , राजाची सेवा (सध्याच्या काळात सरकारी / खाजगी नोकरी इत्यादी ) … प्रॉपर्टी मधे वाटणी हा धनप्राप्ती चा मार्ग आचार्यांनी सांगितला नाही . बर हे केल्यावर काय मिळेल?
नंबर एक - दीर्घायु
नंबर दोन - तिरस्कार रहित जीवन .
वडिलोपार्जित धन विनकष्ट मिळेल त्यासाठी कोर्टाचे उंबरे झिझवून
एक दोन गुंठे जागा भावकी च्या मोबदल्यात पदरी पडून घेऊन,
भावकीत चर्चा काय असते ? मार त्याच्या मड्यावर… मेला तरी तोंड बघणार नाही , एकदा सह्या झाल्या की गार पाण्याची बदली डोक्यावर घेईन इत्यादी ….. काय मिळाले ?

स्पर्धा कायम मोठ्या माणसांशी करा ..
करा ना अंबानी अदानी शी पैसा बाबत
करा ना टाटा सी आदर्श बाबत
करा ना apple शी technology बाबत
करा ना बफे शी गुंतवणुकी बाबत ..

आपल्याला स्पर्धा करायची आहे फक्त भावकी शी... बंद करा .
त्यांना कमी दाखवायला काहीतरी करत राहणे , स्टेटस टाकत राहणे , चुगल्या करणे बंद करा ... आयुर्वेदाच्या *चांगल्या वागण्यात* हे बसत नाही .

दिवसभर भांडभांड करून रात्री अश्वगंधा gummy खाणे हा आयुर्वेद नाही !
दिवसभर आदर्श वागणे हा आयुर्वेद आहे !!

—————-ॐ——————-
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्य मंदीर -( सांगली - पुणे )
7276338585

‎Follow the Aarogya Mandir Sangli channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9F3IHI7Be70Jwqwn1K

चिनी गोष्टी टिकत नाहीत पण चिनी व्हायरस मात्र टिकतात . हा कोव्हीड नंतर सर्वाना आलेला कटू अनुभव आहे . बरेचसे आप्त गिळून को...
10/01/2025

चिनी गोष्टी टिकत नाहीत पण चिनी व्हायरस मात्र टिकतात .
हा कोव्हीड नंतर सर्वाना आलेला कटू अनुभव आहे .
बरेचसे आप्त गिळून कोव्हीड शांत झाला .
सध्या नवीन व्हायरस ने डोके वर काढल्याने जग पुन्हा चिंतेत आहे .

एक गोष्ट लक्षात घ्या . . पुढील शतक व्हायरस चे आहे .
जगाला नियंत्रित किंवा अनियंत्रित करण्यासाठी व्हायरस चे नव नवीन प्रकार किंवा त्यांची संहारक क्षमता अमुक आहे अशी भीती घातली जाणार .
सध्याच्या व्हायरस च्या भीतीने शेअर मार्केट मधून काही लाख कोटी रुपये स्वाहा झाले .
जागतिक राजकारणात आपण जायला नको . . अशा व्हायरस ची भीती कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहू -

१. आहारात मसाल्याच्या पदार्थांचे प्रमाण योग्य ठेवणे .
सध्या मसाला मॅजिक किंवा रेडी मसाले वापरायचा नवीन ट्रेंड आहे . खरं पाहायचे तर लवंग , दालचिनी , वेलची , सुंठ , हळद , जिरे , मिरे वगैरे ही अमूल्य औषधे आहेत . प्रत्येकाची उपयुक्तता आणि शरीरावर होणारा प्रभाव वेगळा आहे . स्वयंपाकाच्या गरजेप्रमाणे त्यांचा वापर होणे आणि पानात आलेले मसाले चावून खाणे गरजेचे आहे . फक्त कोणती साथ आल्यावर हळद दूध पिणे किंवा तुळस काढा घेणे योग्य नाही .

२. आहारात रेडिमेड फूड , प्रोसेस्ड फूड याचा वापर लिमिटेड किंवा शक्य असेल तर शून्य ठेवणे .
फ्रोजन फूड ही मुळात हिंदुस्तानची गरज आणि आहारीय संस्कृतीचा भाग नाही . पिझा पासून पोळी पर्यंत , सामोसा ते मोमोज सगळे फ्रोजन किंवा रेडी टू इट मिळते त्याचा वापर बंद करायला हवा . याचे कारण आहाराची प्राथमिक गरज लघु - सुपाच्य आहार ही आहे . आहार किती काळ चांगला राहील याचे काही नियम आहेत . सहा महिने फ्रिज मध्ये पडलेला थंड आहार , गरम करून खाणे हे किमान हिंदुस्तानात तरी अनावश्यक आहे . असा आहार पचायला जड असतो . शरीरात अजीर्ण आम सोडून काहीही करत नाही . हे नित्य होणारे अजीर्ण आयुर्वेदाचे व्याधीक्षमत्व आणि तुमची इम्युनिटी कायम खाली आणायचे काम शांततेत करत राहतो .

३. नित्य व्यायाम -
व्यायाम हा अभ्यास आहे . तो रोज व्हायला हवा . आदान काळ आणि विसर्ग काळाचे नियम पाळून व्हायला हवा .
शरीराची शक्ती काही रोगानंतर किंवा अपघात झाल्या नंतर क्षणात जाते पण मिळवायला अनेक वर्षांची मेहनत लागते .
इथे फुगलेले स्नायू म्हणजे उत्तम स्वास्थ्य असा गैरसमज कोणी करून घेऊ नये . माझी आजी म्हणायची , आपण वाकून पाहिल्यावर नाकाच्या सरळ रेषेत पायाचा अंगठा दिसायला हवा . जाणत्या लोकांची स्वास्थ्याची व्याख्या किती उत्तम होती . जोर मारणे , बैठक काढणे , सूर्यनमस्कार घालणे यासारख्या देशी व्यायाम प्रकाराने शरीरा सोबत फुफ्फुस याचे आरोग्य सुद्धा जपले जाते .

४. अँटिबायोटिक चा आवश्यक असेल तरच वापर -
लवकर बरे व्हायचे या गरजेने अँटिबायोटिक ना जेम्स च्या गोळ्या करून टाकले आहे . ताप आलेला माणूस क्रोसीन सोबत अझिथ्रोमायसिन घेऊनच येतो . ज्याची मनानेच घ्यायची काही आवश्यकता नसते . एका ने फरक पडत नाही म्हणून दुसरी या सवयीने मल्टी ड्रग रेझिस्टन्स ची फेज येते . गरजेला कोणतेच अँटी बायोटिक शिल्लक रहात नाही . इथे आयुर्वेदाला प्राधान्य देणे फार महत्वाचे आहे . सर्दी ताप खोकला पोट बिघडणे डोके दुखणे चिकन गुनिया नंतर ची सांधेदुखी वगैरे वगैरे अनेक अवस्थांवर आयुर्वेद उत्तम काम करतो . आरोग्य मंदिर मधे कित्येक रुग्ण काहीही झाले तरी आपले औषध घेऊन जातात बरे होतात . विशेषतः काही रोगात इतर औषधांसोबत स्टिरॉइड पण दिली जातात . अस्थमा ते त्वचा रोग व्हाया सांधे दुखी वगैरे . असे काही सुरु असेल तर त्याचे लॉन्ग टर्म साईड इफेक्ट टाळायला आयुर्वेदाचे सेकंड ओपिनियन घ्यायला काहीच हरकत नाही .

५. आयुर्वेदात गुंतवणूक करा -
दर महिन्याला जसे आपण SIP , RD मधे पैसे गुंतवतो , तसे आयुर्वेदात पण गुंतवायला हवे .
तुमचा विश्वास असेल त्या वैद्याकडून त्या ऋतू ला आवश्यक असलेली दिनचर्या , आहार , रसायन घ्यायला काहीच हरकत नाही .
मला काही झाले नाही पण मला काही होऊ नये यासाठी वैद्याकडे जायला काय हरकत आहे ? वर्षातून एकदा शरीर शुद्धी करायला काय हरकत आहे ?
आपल्या बाळाला सुवर्ण प्राशन , वयात येणाऱ्या तरुण तरुणींना शरीरात होणारे बदल स्विकरायला साहाय्य करणारी औषधे , मध्यम वयात डोक्याला असणारा ताण कमी करणारी औषधे - शिरोधारा वगैरे करून घ्यायला काय हरकत आहे ? खरे तर काहीच नाही . . पण दुर्दैवाने आपण करत नाही .
डी मार्ट ला गेल्यावर चार उत्पादने खरेदी करणे म्हणजे आयुर्वेद घरी आणणे नाही हे पक्के लक्षात घ्या !

तहान लागल्यावर विहीर खणण्यात काही हशील नाही .
भविष्यात पाणी लागणार आहे हे ओळखून वेळीच थोडी थोडी तरतूद करणे आवश्यक आहे .
म्हणून हा लेखन प्रपंच !!

—————-🌱—————-

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्य मंदीर -( सांगली - पुणे )
7276338585

‎Follow the Aarogya Mandir Sangli channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9F3IHI7Be70Jwqwn1K

जवान सिनेमात एक संवाद खूप गाजला होता . .बेटे को हात लगाने से पहले , बाप से बात कर . त्यामुळे *अभ्यंगाला* हात लावायचा आधी...
10/10/2024

जवान सिनेमात एक संवाद खूप गाजला होता . .
बेटे को हात लगाने से पहले , बाप से बात कर .
त्यामुळे *अभ्यंगाला* हात लावायचा आधी त्याचे पप्पा *स्नेहन* यांच्याशी / यांच्या बद्दल बोलू !

आयुर्वेदाने जगातील सर्वात सुंदर संकल्पना मांडली आहे ती म्हणजे कार्य कारण भाव .
काय केल्याने काय होते . आहे का नाही लॉजिकल ?
पंचकर्म करण्यास अत्यावश्यक म्हणून स्नेहन सांगितले आहे . पहिली पायरी स्नेहन , दुसरी स्वेदन मग पुढील कर्म .. .
इतके महत्त्व का आहे स्नेहन याला ?

स्नेहन नक्की काय करते ? तर स्नेहन , विष्यंदन, मार्दव , कलेद.
आता हे सगळे आयुर्वेदिक शब्द झाले .. आम्हाला कसे समजणार ?
सोपे करून सांगतो ...

शरीरात त्रिदोष असले तरी त्यांचा स्वामी वात दोष .
त्रिगुण यांचा स्वामी सत्व . असे !
शरीराला चल असा एकमेव दोष म्हणजे वात दोष . सगळ्यांचा ड्रायव्हर..
वाढलेल्या पित्ताला डोक्यात जायचं असेल किंवा वाढलेल्या कफाला पायाला सूज द्यायची असेल तर त्यांना वात दोषाला "अहो आम्हाला सोडता का जरा तिकडे ? " म्हणून रिक्वेस्ट करावीच लागते .
चल हा गुण शरीरात फक्त वाताचा आणि मनाचा .
स्वास्थ्य उत्तम हवे असेल तर वात संतुलित हवा !

वात वाढल्यामुळे जे रुक्षण , खरत्त्व , विषद उत्पन्न होते ते जाणार कसे ? यामुळे शरीरात ग्रथित ज्याला इंग्रजी मधे स्टक म्हणतात अशी अवस्था येते त्याचे काय करायचे ?
याला उत्तर स्नेहन ...
रुक्षता कमी करून भाव पदार्थ , मल, मूत्र यांचे योग्य प्रवाहण करायचे काम स्नेहन करून देते .

यासाठी कधी पोटात घ्यायला तेल , तूप दिले जाते याला अभ्यांतर स्नेह म्हणतात .
अंगाला जे तेल लावले जाते त्याला अभ्यंग किंवा बाह्य स्नेहन म्हणतात .

एखादी गोष्ट सहज निघत नसेल तर आपण काय करतो ? तेल टाकतो .. त्याने मृदु पणा वाढतो , घर्षण कमी होते , नुकसान न होता ती गोष्ट बाहेर पडते ...
शरीरात आपल्याला हेच करायचे असते..

स्नेहन केल्याने पृथ्वी आणि जल महाभुत शरीरात समाविष्ट होतात वात संतुलित होतो आणि आरोग्य टिकते.

बाप स्नेहन से बात करली
कल बेटा अभ्यंग को हात लगायेंगे! 🤭

—————-ॐ——————-
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्य मंदीर -( सांगली - पुणे )
7276338585

‎Follow the Aarogya Mandir Sangli channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9F3IHI7Be70Jwqwn1K

मी बिझी आहे . मी बीझी आहे . मी बिझी आहे . याचा सतत जप सर्वांचा सुरू असतो . सगळ्यांपासून दूर रहायचा मी बीझी आहे हा कानमंत...
08/08/2024

मी बिझी आहे .
मी बीझी आहे .
मी बिझी आहे .

याचा सतत जप सर्वांचा सुरू असतो .
सगळ्यांपासून दूर रहायचा मी बीझी आहे हा कानमंत्र घटोत्कचाने द्रुष्टद्यूमन याला व्हॉट्स ऍप केला होता असे सुत्र सांगतात 😂
खर पाहायला गेलं तर बिझी हे कारण आहे . अनेक गोष्टी न करण्याचं … तुम्ही पुढील पैकी कशात आणि किती वेळ बिझी असता त्याचा विचार करा -
१. मी धर्मपालन करण्यात बिझी आहे .
२. ⁠मी आई वडिलांची सेवा करण्यात बीजी आहे .
३. ⁠मी माझी मुलं कशी खेळतात ते ऐकण्यात बिझी आहे .
४. ⁠मी माझी बायको कसा उत्तम स्वयंपाक करते , करिअर करते , सगळं उत्तम संभाळते ते पाहण्यात - कौतुक करण्यात बिझी आहे .
५. ⁠मी पूजा करण्यात बिझी आहे .
६. ⁠मी मित्रांसोबत मैत्रिणींसोबत हास्य विनोद करण्यात बिझी आहे .
७. ⁠मी कोणाची अडचण काढण्यात बीजी आहे .
८. ⁠मी कोणाच्या आनंदात सहभागी होण्यात बीझी आहे .
९. ⁠मी कोणाचे दुःख हलके करण्यात बीझी आहे .
१०. ⁠मी माझ्या आरोग्याची काळजी घेण्यात बीझी आहे .
११. ⁠मी माझे मन आत्मा काय म्हणतो ते ऐकण्यात त्यावर विचार करण्यात बिझी आहे .
१२. ⁠मी घर सजवण्यात बीझी आहे .
१३. ⁠मी माझी आवड छंद जपण्यात बीझी आहे .
१४. ⁠मी सकारात्मक विचार करण्यात बिझी आहे .
१५. ⁠मी , मला ओळखण्यात बीझी आहे !

अनेक मुद्दे अजून जोडता येतील .
सध्या माणसाच्या सर्व भावना व्हॉट्सअप वर एक congratulations किंवा RIP 🙏 टाकून संपतात .
आपण इतके कशात बिझी असतो की आपल्याला जगायला सुद्धा वेळ नाही ??

काम धंदा करिअर पैसा सोडून काहीच करायचं नाही आहे पण या सगळ्या गडबडीत थोडा जी लो यारो !!

—————-ॐ——————-
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्य मंदीर -( सांगली - पुणे )
7276338585

‎Follow the Aarogya Mandir Sangli channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9F3IHI7Be70Jwqwn1K

31/05/2024

विधिवत आहार म्हणजे काय ?
त्यासाठी आपण काय करायला हवे ?
शास्त्रात त्यासंदर्भात काय निर्देश आहेत ?
आपण कोठे चुकतो ?
आपण काय करायला हवे ?
इत्यादी अत्यावश्यक बाबींवर १ जून २०२४ पासून या चेनेल वर मार्गदर्शन होईल .
लेखन तसेच audio मेसेज याचा जरुरीप्रमाणे वापर होईल .

अन्न हे पूर्णब्रह्म कसे करावे याबाबत आयुर्वेदीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन करायचा मानस आहे .

नियमित चॅनल पहात रहा .
आपल्या आप्त जनांशी चॅनल शेअर करून त्यांना सहभागी करून घ्या !

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
एम डी आयुर्वेद

Click link to follow - ‎Follow the Aarogya Mandir Sangli channel on WhatsApp:

उत्तम आरोग्य हवे असेल तर पाकीट बंद पदार्थ तातडीने बंद करावेत . वेफर्स , चिप्स , फरसाण, स्टीक्स इत्यादी पदार्थांचा आहारात...
24/05/2024

उत्तम आरोग्य हवे असेल तर पाकीट बंद पदार्थ तातडीने बंद करावेत .

वेफर्स , चिप्स , फरसाण, स्टीक्स इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश व्हायचे प्रमाण वाढत आहे . किंबहुना तो एक स्टेटस सिम्बॉल होत आहे .
चिप्स चे पाकीट आणि सॉफ्ट ड्रिंक ची बॉटल घेऊन फिरणे आपण कुल असल्याचा सिम्बॉल अनेकांना वाटत आहे .

कितीही मनोहर पॅकिंग असले तरी पाकीट बंद पदार्थ हे आयुर्वेद प्रमाणे *पर्युशित अन्न* आहे . म्हणजे शिळे अन्न .
*मुद्दा दोन* - हे सर्व पदार्थ लवण रस प्रधान असतात . खायला चटपटीत असतात . त्यामुळे धातूंचा पाक लवकर होतो . धातूंची शक्ती कमी होते . शरीराची शक्ती कमी होते.
*मुद्दा तीन*- हे सगळे पदार्थ रुक्ष , लघु अशा गुणांचे असल्याने वात दोष वाढवण्यास मदत करतात .

यात आरोग्य आहे कोठे ? ट्रान्स फॅट्स , शुगर , कर्सिनोजेनिक एजेंट याबाबत काही बोलत नाही. ते सर्वांना माहीत आहे . तरीही खायचा मोह आहेच .

सहा महिने हे वाळके कोरडे शिळे खाणे बंद करा. झालेला फरक अनुभवा . स्वतःला ५ वर्षाचे आरोग्यपूर्ण आयुष्य भेट द्या !!

———-ॐ—————
वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्यमंदीर
सांगली -पुणे
7276338585

👉 Follow the Aarogya Mandir Sangli channel on https://whatsapp.com/channel/0029Va9F3IHI7Be70Jwqwn1K

माणसाच्या दुःखाची नोंद कोणी घेत नाही . माणसाच्या चुकीची नोंद मात्र ज्याचा काडीमात्र संबंध नाही असे लोक सुद्धा घेतात . दू...
25/04/2024

माणसाच्या दुःखाची नोंद कोणी घेत नाही .
माणसाच्या चुकीची नोंद मात्र ज्याचा काडीमात्र संबंध नाही असे लोक सुद्धा घेतात .

दूध तूप साखर हे या घुसमटी वरचे उत्तम रसायन आहे .
आपण लोक बदलू शकत नाही .
नातेवाईक टाळू शकत नाही .
आपल्या बद्दल आदर प्रेम माया वाटायला हवी याची सक्ती करू शकत नाही .
आपण काय करू शकतो ?
स्वतःची काळजी घेऊ शकतो .
तेच करायचे …

गायीचे दूध हे *जीवनीय* सांगितले आहे .
भारतीयांनी दूध तुपापासून ब्रेक अप केल्या पासून , अनारोग्यासोबत लिव्ह इन सुरु आहे असे माझे स्पष्ट मत आहे .
दूध तूप साखर परस्परांचे गुण वाढवतात .
ओज वाढवतात .
(साखर चिमूटभर घातली तरी पुरे )
या उपायाने लोकांचे वागणे बदलणार नाही .
त्या वागण्याचा स्वतःच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची तीव्रता नक्की कमी होईल !
करुन पहा ….

———-ॐ—————
वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्यमंदीर
सांगली -पुणे
7276338585

👉 Follow the Aarogya Mandir Sangli channel on https://whatsapp.com/channel/0029Va9F3IHI7Be70Jwqwn1K

डोकेदुखी ही रुग्णापेक्षा वैद्याला जास्त त्रास देते . डोके रुमालाने बांधून , डोक्यावर बुक्क्या मारणारे , हाताने डोके दाबण...
10/04/2024

डोकेदुखी ही रुग्णापेक्षा वैद्याला जास्त त्रास देते .
डोके रुमालाने बांधून , डोक्यावर बुक्क्या मारणारे , हाताने डोके दाबणारे अनेक प्रकारचे लोक असतात .
काही डिस्प्रिन चे गुलाम असतात तर काही व्हेसोग्रेन चे होलसेल बायर . .
डोके दुखी मात्र तिथेच असते . .

आयुर्वेदाने शिर:शूल अंतर्गत त्याचे प्रकार , निदान आणि उपचार वर्णन केले आहेत .
त्यामुळे आयुर्वेदात डोकेदुखी आहे का ? असा प्रश्न कोणाला पडायला नको .
साधारण साडे आठ महिन्यांपूर्वी एक डोकेदुखी माझ्या क्लिनिक मधे आली . .
रेस्टलेस . . आतला रुग्ण होई पर्यंत सवड नाही . वेटिंग रूम मधले आधीचे रुग्ण संपे पर्यंत थांबायची तयारी नाही .
नुसत्या येरझाऱ्या . . आमच्या प्रतापसिंह उद्यानात कधी काळी तरस होते ते आठवले . . असो !

आत आल्यावर एका मिनिटात ३८ शब्द माझ्यावर शूट केले .
तुमच्याच्यानं होतंय का सांगा . . नसेल तर माझा गिनिपिग करू नका हे अजून पावशेर . .
हिस्ट्री घेताना लक्षात आले की मॅडम ना सूतशेखर , लघु सूतशेखर , पथ्यादी काढा -घनवटी , शिरशूल वज्रादी , शंख वटी याचे अजीर्ण झाले होते . सुवर्ण सूत सात्म्य झाले होते . . आता तेच तिला दिले किंवा लिहून दिले तर माझा फोटो भिंतीवर हे निश्चित होते .

आत्ता तुमचं डोकं किती दुखतंय ?
रुग्ण - फुटतंय आतून . .
१० मिनिटं थांबू शकता ?
फारतर . .

शिरोधारा कक्षात तिला नेले .
७ मिनिटात एक मिश्रण उकळले . थंड केले आणि नस्य दिले .
१५ मिनिटे असेच झोपून रहायचे हा सल्ला दिला . . मी माझ्या इतर रुग्ण तपासणी ला मोकळा . .
तासाभराने पाहायला गेलो तर ती शांतपणे झोपली होती .
दीड तासाने शांतपणे उठली . . . डॉक्टर डोकं थांबल . . उद्या दुखेल का ?
त्याची काळजी औषधावर सोडा . . .

नस्य आणि शांत झोप हे वाचून लगेच ''मानस हेतू '' असेल त्यामुळे बरं वाटलं असेल असा निष्कर्ष काढू नका .
वातज शिरशूलात जर पित्ताचा अनुबंध असेल तर रुग्ण वेदना काळात व्हॉयलेन्ट होतो असे माझे निरीक्षण आहे .
शब्द , कृती आणि कृतीचा परिणाम यात परस्पर संबंध नसतो . वेदना कमी झाली की सगळे शांत .
अशा परिस्थितीत मी दिलेले नस्य म्हणजे दूध तुपात सिद्ध केलेले खडीसाखर आणि केशर याचे नस्य .
ब्राह्मी जटामांसी वगैरे नाही !
पुढे काही दिवस हे नस्य कसे करायचे आणि घरी कसे घ्यायचे ते सांगितले . . .

डॉक्टर तुम्ही माझी डोकेदुखी थांबवली म्हणजे खरंच तुम्हाला डोकं आहे ! 🏆😇
हे सर्टिफिकेट घेऊन केस बंद केली !!

———-ॐ—————
वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्यमंदीर
सांगली -पुणे
7276338585
👉 Follow the Aarogya Mandir Sangli channel on https://whatsapp.com/channel/0029Va9F3IHI7Be70Jwqwn1K

'' शेवटी तुम्हालाही ऍलोपथी ची गरज लागलीच '' रुग्णाने संधी मिळाल्यावर चौकार मारायचा प्रयत्न केला . समोर असलेला रिपोर्ट्स ...
05/04/2024

'' शेवटी तुम्हालाही ऍलोपथी ची गरज लागलीच ''

रुग्णाने संधी मिळाल्यावर चौकार मारायचा प्रयत्न केला . समोर असलेला रिपोर्ट्स चा गठ्ठा आणि रुग्णाची मानसिकता पाहून मी मिसफिल्ड करून चेंडू सोडून दिला . ''तकलीफ हुई है उसको '' त्यामुळे एक चौकार मारल्याचा आनंद घेउदे . . शुगर ऍलोपथी च्या औषधाने कंट्रोल मधे पण अंग सुकलंय (रुग्णाची तक्रार ) या अडचणी साठी रुग्ण सांगली ओपीडी मधे आला होता . सगळे रिपोर्ट नॉर्मल मग मी नॉर्मल का नाही ? हा रुग्णाचा योग्य प्रश्न . . .
'' युरीन रुटीन करून या . . उत्तर देतो '' या माझ्या उत्तरावर रुग्णाने वरील चौकार मारला !

शुगर चे मी आजपर्यंत जितके रुग्ण पहिले , पाहतो आहे त्यावरून मी नमूद करतो - हे रुग्ण हतबल असतात . निर्बल असतात . कोपिष्ट झालेले असतात .
मला शुगर झालीच कशी ? या प्रश्नातून ५-१० वर्ष झाली तरी पुढे सरकत नाहीत . नेमका उपाय सोडून इतर सगळं करायला तत्पर असतात . काही वेळा आयुर्वेदाने शुगर मॅनेजमेंट कशी होते ते तुमच्यापेक्षा मला जास्त माहित आहे अशी माहिती सांगत असतात . . त्याला इलाज नाही . तक्रार ऐकून घेणे हे आपले काम . करत रहायचे . .

अनेक वर्ष शुगर असताना रुग्ण आकसायला लागतो . हाताच्या काड्या , पायाची चिपाडं , स्फीक प्रदेशी सपाट अगदी सांगाडा . मांस दाखवा ५० रुपये मिळवा अशी परिस्थिती असते . वातज प्रमेहात हे प्रकर्षाने दिसते . लघवी मधून प्रोटीन , अल्ब्युमिन अधिक जात असेल तर मांसाचा अजून संकोच होतो . ते थांबवणे आवश्यक असते . झालेली झीज भरून काढणे त्याहून आवश्यक असते . त्याचे निदान युरीन रुटीन मधून होते . आणि आपण नक्की काय केले याचा पुरावा रुग्णाच्या हातात राहतो . सध्याच्या काळात ते महत्वाचे आहे . आपण आयुर्वेदाने काय केले ते सिद्ध करायला आधुनिक तपासण्या काही वेळेस लागतात .

चरफडत रिपोर्ट समोर ठेवला . मी शांतपणे औषधे दिली . . साधारण १ महिन्याने अपेक्षित बदल दिसायला लागले .
दुसऱ्या महिन्यात अंगावर मांस दिसायला लागले . वगैरे . . .
रिपोर्ट मधले बदल समोर दिसत होते . रिझल्ट रुग्णात दिसत होता .
ऍलोपथी ची मदत कशी आणि का घेतली होती ते रुग्णाला पटलेले होते .

क्लेदवहन मर्यादेच्या पुढे होत असेल , धातूंचा पाक अधिक होत असेल शरीर क्रिया आणि व्यापारात मांद्य येऊन रस मूत्रावाटे बाहेर पडत असतील तर तिथे फुल स्टॉप लावणे महत्वाचे . . तो व्यवस्थित लागला की तापलेला रुग्ण शांत होतो . आधीच शांत असलेला वैद्य समाधानी होतो !!

••••••••••••••••••••••••••••••
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्य मंदीर -( सांगली - पुणे )
7276338585

‎Follow the Aarogya Mandir Sangli channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9F3IHI7Be70Jwqwn1K

तुम्ही दिलेल्या औषधाने काही फरकच पडला नाही . . इतक्याश्या औषधाने बरे होणार नाही मी आधीच बोललो होतो . . ऑनलाईन कन्सल्टिंग...
22/03/2024

तुम्ही दिलेल्या औषधाने काही फरकच पडला नाही . . इतक्याश्या औषधाने बरे होणार नाही मी आधीच बोललो होतो . .

ऑनलाईन कन्सल्टिंग चा रुग्ण . . मी ९९. ९९ % औषधे 'प्रिस्क्राइब ' का करत नाही त्याचे एक उदाहरण .
आयबीएस हे डायग्नोसिस घेऊन रुग्ण यातून मला बरे करा अशी आशा घेऊन आला .
कन्स्लटिंग झाले . . आजाराचे स्वरूप पुढे होऊ शकणारे उपद्रव , आजाराचा किचकटपणा , बरे होण्यास लागणार संभाव्य कालावधी आणि टप्पे याची माहिती दिली .
औषध केस पेपर च्या पत्त्यावर पाठवायचे का ?
रुग्ण - नाही . . लिहून द्या माझी मी घेतो !

कोणत्याही रुग्णाला कोणत्याच कारणासाठी 'कन्व्हिन्स ' करायचे नाही हे माझे एक तत्व .
औषधे मी पाठवली तर फरक चांगला पडेल . . बाकी तुमची मर्जी म्हणून प्रिस्क्रिप्शन पाठवले . .
बरोबर २१ व्या दिवशी रुग्णाचा फोन . . फरक न पडल्याची तक्रार . .
सगळं शांतपणे ऐकून घेतले . . विकत घेतलेल्या औषधांचे फोटो पाठवायला सांगितले . .
तेथेच ' बरे न होण्याचे कारण सापडले ' . . . ''मला सगळं कळतं '' या मानसिकतेचे ०. १ % रुग्ण घेतलेली औषधे बरोबर आहेत का ? हे विचारायची तसदी घेत नाहीत .

मजा अशी . . महालक्ष्मीविलास हा रुग्णाने सुवर्णयुक्त न घेता ''साधा '' घेतलेला होता .
परस्पर केलेले अल्ट्रेशन थेट वैद्याच्या हाताला गुण नाही इथं पर्यंत पोहोचते .
सध्या असलेले औषध सुरु ठेवा . . सोबत मी १ औषध पाठवतो ते सुरु करा . . आणि कळवा !

काही दिवसांनी पुन्हा फोन - '' डॉक्टर आता मला बरं वाटतंय . . औषधात स्टिरॉइड नवते ना ? ''
आयुर्वेदिक औषधांनी फरक पडला की लोकांना थेट स्टिरॉइड का आठवते यात गम्मत आहे . . .

महालक्ष्मीविलास हे रेस्पिरेटरी सिस्टीम वरच वापरायचे असे नसते .
मी प्रमेह ते वाजीकरण सर्वत्र अवस्थानुरूप वापरतो . . त्याचा फरक उत्तम दिसतो .
साधा महालक्ष्मी विलास म्हणजे नखे दात काढलेला सिंव्ह . . त्यात सुवर्ण नाही , रौप्य नाही , ताम्र नाही , त्रिवंग नाही , मौक्तिक नाही . .

महालक्ष्मी मुळात अन्नवह आणि पुरीषवह स्रोतासानं उत्तेजना देऊन मनोवह स्रोतासाला प्रसादन करणारा आहे .
सायोसोमॅटीक डिसऑर्डर असेल तर मिश्रणात रौप्य आणि अभ्रक याचे प्रमाण अवस्थानुरूप वाढवले की गुण उत्तम दिसतात .
अपेक्षित असलेला महालक्ष्मी विलास अपेक्षित मात्रेत पोटात गेल्याने अपेक्षित गुणधर्म दिसले . .
क्रेडिट महालक्ष्मी चे . . अपयश रुग्णाने परस्पर अल्ट्रेशन केल्याचा . .

कोणत्याही वैद्याने तुम्हाला दिलेले किंवा घ्यायला सांगितलेले औषध त्याच मात्रेत आणि अपेक्षित गुणधर्माचे घ्यायला हवे .
महालक्ष्मी , पूर्णचंद्र , सूतशेखर , वसंत कुसुमाकर , रसराज , बृहतवात , श्वास कास वगैरे यात 'साधे ' असे काहीच नाही .
हे कल्प आणि त्यांची रचना हीच विशेष आहे . . त्यात साधे कसे असेल . .
आरोग्य वर्धिनी ताम्रशिवाय , चंद्रप्रभा शिलाजीत शिवाय काम कशी करेल ??

माझं मी घेतो / घेते यात हीच अडचण असते .
वैद्याकडून घेतलेल्या औषधाचा हाच फायदा असतो .
बस्स . . इतकेच !!

••••••••••••••••••••••••••••••
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्य मंदीर -( सांगली - पुणे )
7276338585

‎Follow the Aarogya Mandir Sangli channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9F3IHI7Be70Jwqwn1K

Address

Arogya Mandir Haripur Road
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurved kosh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share