
07/08/2025
पावसाळा सुरू झाला की उष्णतेपासून होणार त्रास कमी होऊन दिलासा मिळतो. मात्र, पाऊस विषाणूजन्य आजारांसाठी पोषक वातावरणातही निर्माण करतो. यामध्ये अनेक रोगांचा समावेश असला तरी डोळ्यांच्या संसर्गाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. विशेषत: ॲडिनो व्हायरसमुळे डोळे येणे हा प्रमुख त्रासदायक आजार बळावतो.
#ॲडिनो व्हायरस (डोळे येणे) संसर्ग कसा होतो?
- संक्रमित व्यक्ती डोळ्यांना हात लावून पुन्हा विविध ठिकाणी स्पर्श करते आणि अशा ठिकाणी दुसऱ्या संक्रमित न झालेल्या व्यक्तीचा संपर्क आला आणि त्या व्यक्तीने तो तसाच हात डोळ्यांना लावला गेल्यामुळे इतरांपर्यंत हा विषाणू पसरतो.
या संसर्गात ही लक्षणे दिसतात.?
- या संसर्गात डोळ्यांमध्ये खाज येणे.
- पाण्यासारखा स्राव किंवा डोळ्यातून चिकट स्त्राव / घाण येणे.
- लालसरपणा
- पापण्या सुजणे ही लक्षणे दिसतात.
- काही रुग्णांमध्ये सर्दी-तापानंतर साधारण सातव्या दिवशी डोळ्यांची लक्षणे दिसून येतात.