27/07/2024
*सासवड चे खरं अस्तित्व................*........................................*तहानलेल्या पुरंदरचे मृगजळी मनोहर जलवैभव!*
सासवडकर आणि पुरंदरकर ..म्हणून जे जे आहेत अश्या अनेकांनी त्यांच्या स्टेटसला क-हा , चांबळी नद्यांचे दुथडी भरून वहाणारे व्हिडिओ लावले आहेत, सिध्देश्वर मंदिराचे पाण्याने भरलेले वैभव दिसणारे अनेक कोनातले व्हिडिओ लावले आहेत! ड्रोनने चित्रीत केलेले पुरंदर, सासवड पंचक्रोशीत असलेले हे वहाते जलवैभवाचे निसर्ग रम्य व्हिडिओ कौतुकाने अनेक ग्रुपवर फाॅरवर्ड होत आहेत! जरी हे पूर म्हणावे असे असले तरीही सारे जण सुखावले आहेत! गराडे, नाझरे , वीर , सिध्देश्वर इ. धरणे भरून वहायला लागली आहेत... नद्या भरल्या आहेत ,वहात आहेत! ऐरवी कोरड्या ठक्क असणारी नद्यांची पात्रे भरली आहेत!!!
सारे छान दिसत आहे!!!
पण मला खुप मनापासून वाटते आहे.. हे सगळे पाणी फक्त याच वर्षी नाही तर, अनेक वर्षात पावसाळ्यात दिसते... मग हे सगळे कुठे गायब होते बरे?
सासवड/ पुरंदर मधे चार चार, पाच पाच दिवसांनी पाणी येते अर्धा , पाऊण तास, ते पण मोटारी लावून खेचाखेची करून घ्यावे लागते.. मग ते चार दिवस पुरवायचे, जास्त लोकसंख्या घरात असतील तर, ज्यांना शक्य असते ते तीन तीन कनेक्शन घेतात.. काही लोक टँकर मागवतात.. काही सामाईकात मागवतात..आणि इतर कसे तरी भागवतात..जे काही असेल ते ..पण
पाणी समस्या लहानपणापासून ते आज पर्यंत बघत आले आहे ! आमच्या आधीच्या पिढीला देखील हेच माहीत आहे..
जागतिकीकरणानंतर सासवड देखील वाढत गेले , पसरत गेले.. विस्तारत गेले... पण पाणी समस्या काही संपलेली नाही! ऐवढे लोक पुरंदरची काळजी घेण्यासाठी लोकांनी निवडून दिले...पण ...कोणाकडून देखील ही अनेक वर्षांची समस्या सुटली नाही! 😔😔😔😔
सासवडच्या / पुरंदरच्याअनेक माहेरवाशीणी , पाहूणे- रावळे , अनेक जीवलग पुरंदरवर प्रेम करणारे , इथेले जन्माचे पण तिथेच न रहाणारे.. सासवड / पुरंदर मधे येण्याचा, चार दिवस मुक्काम करण्याचा विचार करतात, किंवा टाळतात...पाण्याचा त्रास घरातल्यांना, माहेरला, यजमानांना नको म्हणून टाळतात...
हे साधे उदाहरण आहे पण अशी हजार उदाहरणे पाणी समस्येमुळे देऊ शकतो..
पण ही अनेक वर्षांपासून चालत आलेली समस्या कोणालाही सोडवायची इच्छाच झाली नाही की , नागरिकांकडून आग्रह देखील परिणाम कारक पणे झालेले नाही .. !! ??
ऐवढे पाणी कुठे साठवले जाते? कुठे जिरवले जाते? कुठे कमी पडणा-या धरणांची क्षमता वाढवली जाते? बाहेरून पाणी आणणे तर दूर ;पण आहे ते पाणी नीट नियोजन करून का वापरले जात नाही? ज्यामुळे पाण्यासारख्या मुलभूत गोष्टी साठी पाच पाच दिवस वाट बघावी लागते..?? 😔😔
खरोखर. हे स्टेटसला ,ग्रुपवर फिरणारे व्हिडिओमधले जलवैभव वर्ष भराची तहान भागवणारे कधी ठरणार सासवडकर आणि पुरंदरकरांच्या नशिबी?...😔😔
-*एक दुःखी सासवडची माहेरवाशीण *