02/04/2025
#रेकी #ऊर्जा #वैश्विकऊर्जा #हिलींग #डिस्टन्स_रेकी
काही दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचलं , त्यात लेखकाने आतंकवादी रेकी करतात अश्या आशयाच्या बातम्या येतात त्याचं खंडन असं केलं की 'आतंकवादी , गुन्हेगार रेकीचा दुरुपयोग करतात त्याला आपण काही करू शकत नाही.' इथेच त्या रेकी तज्ञांची विदवत्ता कळली. मलाही अनेकदा अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे की बातम्यां मध्ये जे सांगतात की अमुक अमुक आतांकवाद्याने त्या जागेची आधी रेकी केली होती. तर ती रेकी आणि तुम्ही शिकवता ती रेकी एकच आहे का??
मुळात गुन्हेगार जी रेकी करतात त्याला टेहाळणी , त्या जागेवर किंवा व्यक्तीवर सतत पहारा ठेवून , पाठलाग करून त्याच्यावर नजर ठेवणे हा प्रकार असतो म्हणजे त्यांना त्या व्यक्तीची/जागेची पूर्वकल्पना घेणे नंतर त्याचा घातपात घडवून आणणे.
तर गुन्हेगार जे करतात ती रेकी आणि मी ज्या रेकी बद्दल बोलणार आहे त्या रेकीचा कोणताही संबंध नाही. रेकीचा गैरवापर जवळपास अशक्य आहे.
#रेकी_म्हणजे_काय?
रेकी म्हणजे ‘वैश्विक ऊर्जा’ तीच ऊर्जा जी सर्वत्र विराजमान आहे. जी ह्या सृष्टीचं संतुलन आणि पालन करीत आहे. पुरातन काळात अनेक ऋषी मुनी संवादाने, दृष्टीने , स्पर्शाने कधीकधी त्या व्यक्तीचं समरण करून सुद्धा त्याला व्याधीमुक्त , विकारमुक्त करायचे. आपल्या भारतभूमीत ही विद्या जवळपास सर्वांना आधीपासून अवगत होती. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे?? तर त्याचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे आपण ‘दृष्ट’ काढतो तो प्रकार सुद्धा रेकीचाच आहे. एखाद्या व्यक्तीसाठी मनापासून प्रार्थना करणे , चांगलं चिंतन करणे हा सुद्धा रेकीचा च प्रकार आहे.
#रेकीचा_उगम
ही दैवी शक्ती आहे ती स्वयंसिद्धा आहे. ती त्या परमेश्वराची शक्ती आहे. तिचा उगम शोधणे म्हणजे समुद्रात फेकलेली टाचणी शोधणे होय. पण तरीही लोकांना नाव लागतंच म्हणून हा उहापोह. ही विद्या सर्वत्र पसरलेली होती मात्र जापान मधील एका व्यक्तीच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की नेमकी जगातील सर्व महान लोकांच्या कडे असं कोणतं सामर्थ्य होतं की जेणेकरून ते लोकांची दुःख , व्याधी साधा स्पर्श करून , लोकांकडे बघून दूर करायचेत. भगवान गौतम बुध्द , महावीर , जिझस , भारतात तर असंख्य ऋषी होऊन गेले जे अश्या विद्येत निपुण होते. ही उत्सुकता निर्माण झालेली व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून 'डॉ मिकाऊ उसुई' होते . जग ह्यांनाच रेकीचा शोधकरता मानतो.
डॉ मिकाऊ उसुईना जापान मधील अनेक भिक्खुंना भेटले पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही. एका मठाच्या अधिपतींनी त्यांना सांगितलं की तुम्ही भारतात जाऊन ‘अथर्ववेदाचा’ अभ्यास करा. ,ते भारतात आले. अथर्ववेदाचा अभ्यास मकेला. अथर्ववेद म्हणजे अश्या असंख्य विद्यांचा समुद्र आहे. काही ऋषीमुनीचं मार्गदर्शन घेतलं. काहींच्या मते ते हिमालयात सुद्धा गेले. तेथे त्यांना अनेक ज्ञात अज्ञात ऋषी मुनी भेटले.
भारतात असे असंख्य ऋषी मुनी साधू संत होऊन गेले ज्यांच्याकडे ही ऊर्जा सहज होती. त्यातील काहीं नावं म्हणजे संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत एकनाथ , साईबाबा. ह्या सर्वांनी जे काही चमत्कार केले ते त्या वैश्विक ऊर्जेच्या बळावरच.
उदाहरण देतो त्यात बरंच काही कळेल. संत ज्ञानेश्वरांनी एकदा एका रेड्यावर वर हात ठेवला आणि तो रेडा वेद बोलायला लागला , जड भिंत चालवणे , पाठीवर मुक्ताबाई ला मांडे भाजायला लावणे. थोडक्यात रेकी ही सुद्धा योग विद्याच आहे. त्यासाठी मात्र तुमचं मन सकारात्मक , करुणेने भरलेलं आणि साधनेची तयारी असलेलं असावं लागतं.
डॉ मिकाऊ उसुई भारतातुन परत पायदेशी गेले. आणि ते एका जंगलात जाऊन 21 दिवस एकांतात राहिले. त्या काळात ते निराहर राहिले. परंतु त्यांना साधारण 15 दिवसांनी सुद्धा काहीच जाणीव झाली नाही म्हणून थोडे निराश झाले. आणखी 2 3 दिवस गेल्यावर त्यांना वाटायला लागलं की जावं निघून माघारी. पण 3 दिवसांसाठी का बरं साधना भंग करावी ? म्हणून ते 21 दिवस पूर्ण होईपर्यंत थांबले. तरीही काहीच जाणीव झाली नाही. जंगलातून बाहेर पडताना त्यांना भूक लागली होती. म्हणून का खेडेगावात एका घरी त्यांनी ‘जेवायला काही मिळेल का?’ अशी विचारणा केली. त्याकाळी कुणीही जेवायला मागितलं तर सहज द्यायचे. त्या गृहिणीने सांगितलं बसा थोडावेळ मी काहीतरी शिजवून देते. ती स्त्री घरात निघून गेली. डॉ मिकाऊ उसुई अंगणात बसलेले होते. त्यावेळी त्या घरातील लहानगी अंगणात खेळत होती. तिच्या पायाला ठेच लागली. ती रडायला लागली. डॉ मिकाऊ उसुईंनी तिला विचारलं ‘काय झालं?’ तिने रडत रडत पायाच्या अंगठयाकडे बोट दाखवलं. रक्त येत होतं आणि तिला वेदना सुद्धा होत होत्या. डॉ मिकाऊ उसुईंनी तिच्या त्या अंगठ्याला स्पर्श केला, तत्क्षणी तिच्या अंगठयातील रक्त येणं थांबलं आणि वेदना सुद्धा थांबल्या.
ती रडायची थांबली आणि म्हणाली , ‘तुम्ही हात लावता बरोबर रक्त येणं थांबलं आणि दुखणं सुद्धा’ त्यावेळी डॉ मिकाऊ उसुईंच्या लक्षात आलं की आपल्या नकळत निसर्गाने आपल्या पदरी किती मोठं दान टाकलं.
असाच अनुभव जगद्गुरू तुकाराम महाराजांचा सुद्धा आहे. गाथा इंद्रायणीच्या डोहात सोडल्या नंतर त्यांनी अन्नत्याग केला होता. कितीतरी दिवस ते तसेच इंद्रायणीच्या काठी बसलेले होते. रामेश्वरसशास्त्रीच्या अंगाची लाही लाही होत होती , त्यांना इंद्रायणीच्या काठावर स्नानासाठी आणलेलं असताना संत तुकोबारायांनी फक्त करुणामय हृदयाने मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्यांच्या अंगावरून हात फिरवला. आणि रामेश्वर शास्त्री ठणठणीत झाले. नंतर रामेश्वर शास्त्रींनी तुकोबांना गुरू केलं.
थोडक्यात ही विद्या सनातन आहे. सनातन म्हणजे ना आदी आहे ना अंत. ती फक्त वेगवेगळ्या स्वरूपात प्रगट होत राहते.
डॉ मिकाऊ उसुई आणि त्यांच्या शिष्यांनी रेकीचा जगभर प्रचार आणि प्रसार केला. ही विद्या भारतात सुद्धा आली. गुरू शिष्य ह्या परंपरे नुसार ही विद्या शिकविली जाते. ह्यालाच पूर्वी आणि आजही दीक्षा देणे म्हणतात.
#रेकी_लेव्हल
डॉ मिकाऊ उसुई आणि त्यांच्या नंतरच्या अनेक चांगल्या साधकांनी रेकीच्या लेव्हल शोधल्या.
#फर्स्ट_लेव्हल
ही लेव्हल खरं तर फक्त स्वतःसाठी आहे. ह्या पहिल्या लेव्हल ला स्पर्शचिकित्सा सुद्धा म्हणू शकता.
ही लेव्हल म्हणजे रेकी मधील abcd आहे. ह्याची 21 दिवस रोज न चुकता साधना करावी लागते.
ह्यात मनातील नकारात्मक भाव दूर करणे.
सतत सकारात्मक विचार करणे।
आसनसिद्धी.
उर्जेशी एकरूपता.
शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकणे आणि शरीर शुद्ध करणे
इत्यादी गोष्टी शिकता येतात.
ह्या लेव्हल मध्ये इतरांना रेकी देता येते , मात्र मर्यादा आहेत. इतरांना रेकी देताना स्वतःला सुरक्षा द्यावी लागते , ती ह्या लेव्हल मध्ये स्वतःला घेता येत नाही. सुरक्षा तुमच्या रेकी मास्टर कडून अथवा परिचता कडून घ्यावी लागते. तसेच ज्या व्यक्तीला रेकी द्यायची आहे ती व्यक्ती समोर असावी लागते. स्पर्श करून रेकी द्यावी लागते.
#सेकंड_लेव्हल #डिस्टन्स_लेव्हल
ही लेव्हल फर्स्ट पेक्षा खुप सहज आहे. परंतु ही लेव्हल शिकायला फर्स्ट लेव्हल पूर्ण झालेली अनिवार्य आहे.
ह्या लेव्हल मध्ये सिम्बल (चिन्ह) शिकवली जातात. ह्या लेव्हल ची सुद्धा 21 दिवसांची साधना पूर्ण करावी लागते.
स्वतःला तसेच इतरांना रेकी देता येते.
व्यक्ती , वस्तू समोर नसली तरी चालते.
स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. ह्यालाच डिस्टन्स लेव्हल म्हणतात.
स्वतःला सुरक्षा घेणे , परिवाराला देणे , आपल्यावर जबाबदारी असणाऱ्या व्यक्तींना सुरक्षा देणे.
तुमच्या ध्येयप्राप्तीला रेकी देऊशकता. असेच अनेक फायदे आहेत.
ह्या दोन लेव्हल कमीत कमी शिकाव्या. ह्यापुढील लेव्हल मात्र प्रोफेशनल लेव्हलला जायचं असेल तरच शिकाव्यात.
#थर्ड_लेव्हल , #सायकीक_सर्जरी. ह्या लेव्हल्स ला #मास्टर_हिलर म्हणतात.
काहींनी रेकीचे अनेक रूप शोधून काढलीत. त्यात नारायण रेकी , करुणा रेकी इत्यादी आहेत. अनेकांनी अनेक सिम्बल्स शोधून काढलेत. ती सुद्धा ह्यापुढील लेव्हल मध्ये शिकवली जातात.
#रेकी_मास्टर ही फोर्थ लेव्हल असून तुम्ही ह्या लेव्हल नन्तर इतरांना दीक्षा देऊ शकता. अर्थात पहिल्या तीन लेव्हल साठी.
#रेकी_ग्रँड_मास्टर ही पाचवी लेव्हल असून ह्या लेव्हल मध्ये तुम्ही इतरांना पाचही लेव्हलची दीक्षा देऊ शकता.
#रेकीची_फायदे
रेकीने तुम्ही स्वतःला उर्जावान ठेवू शकता.
आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी.
इतरांना ऊर्जा देता येते.
स्वतःचे व इतरांचे आजार बरे करण्यास मदत करू शकता.
रेकी आयुष्य वाढवत नाही मात्र आयुष्यात उत्तम जीवन जगण्यास नक्कीच मदत करते.
तुमचे ध्येय , तुमच्या इच्छा पूर्ती होण्यासाठी रेकी देऊ शकता.
कधी कोणतं संकट आलं तर त्यातून मार्ग सुचण्यासाठी रेकी देऊ शकता.
अगदी ट्रॅफिक लागलं तर रेकी द्या , तुमचा मार्ग नक्कीच मोकळा होईल.
घरात मुलं अभ्यास करत नसतील त्यांना द्या.
कुणी आजारी असेल त्या व्यक्तीला द्या.
कुठे अपघात झाला तर त्या अपघात ग्रस्त व्यक्तीला द्या , मोठा अपघात असेल तर त्या संकटात मदत करणाऱ्या लोकांना सुद्धा रेकी द्या.
#रेकीचे_नियम
रेकी शिकताना काही नियम कटाक्षाने पाळावे लागतात , त्यातील काही नियम शिकताना सांगितली जातात. काही नियम हे इथेही सांगता येतात.
रेकी काहीतरी मोबदला घेऊन द्यावी. तो आपापला ठरवावा.
रेकी परवानगी घेऊन द्यावी.
मुकप्राण्यांना रेकी देताना अनुमती आणि मोबदल्याशिवाय द्यावी.
कुणाच्या विषयी द्वेषभावना , पूर्वग्रह मनात न ठेवता रेकी द्यावी.
रेकीचा गैरवापर जवळपास अशक्य आहे. त्यामुळे तो विचार मनात असेल तर त्यागावा.
रेकी ही कल्याणकारी , गुणकारी आणि करुणामय ऊर्जा आहे. तिचा सदुपयोग करून जीवन नितांत सुंदर करता येतं.
#रेकी_मास्टर , #पास्टलाईफ_रिग्रेटर , #मेडिटेशन_मास्टर #स्पिरिच्युअल_हिलर