
11/05/2025
एक्झिमा (विचर्चिका) –
आयुर्वेदिक दृष्टिकोन
१. कारणे (निदान):
पित्त व कफदोषाचा असंतुलन
प्रदूषित अन्न, तणाव, अलर्जीक पदार्थ
जास्त तेलकट व मसालेदार खाणं
झोपेचं अपूर्णत्व व असंयमित जीवनशैली
चर्मविकारांची पूर्व इतिहास
---
२. लक्षणे:
-त्वचेवर खूप खाज येणे
-लालसर चट्टे व सुज
-ओलसर किंवा कोरडी त्वचा
-थरथराट व जळजळ
-फोड उठणे, ते फुटून रक्त निघणे
--
३. आयुर्वेदिक पथ्य:
-ताजं, सात्त्विक, हलकं अन्न घ्या
-उकळून थंड केलेलं पाणी प्या
-सकस पण पचायला सोपा आहार (उदा. मूगाची खिचडी, तांदळाचा पेज)
-लोणचं, मिरची, मसाले, फ्राय पदार्थ टाळा
-गरम पाणी व उकळलेले दूध प्या
-शरीर व मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा (ध्यान, प्राणायाम)
४. घरगुती उपाय:
कोरफडीचा गर – रोज सकाळी व रात्री त्वचेला लावा
हळद + नारळ तेलाचा लेप – जळजळ कमी करतो
नीमाच्या पानांचा रस/काढा – रक्तशुद्धीसाठी सकाळी उपाशीपोटी
चंदन + गुलाबजलाचा लेप – थंडावा देतो
५. विशेष सूचना:
-कपडे नेहमी सॉफ्ट कॉटनचे वापरा
-साबण, डिटर्जंट, कॉस्मेटिक हे सौम्य वापरा
-खाज आल्यावर नखांनी ओरखडू नका
-मन शांत ठेवण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान नियमित करा
वैद्य मयूर कांबळे
आयुर्वेदाचार्य