21/11/2025
आज दिनांक 21/11/25 मौलाना आझाद नगर येथे प्रचार फेरी काढण्यात आली. येथील नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर योग्य व जलद गतीने कामे होण्यासंबंधी आश्वासन दिले. एम एस ई बी च्या अंतर्गत काही लोकांच्या पोलचे खंबे दरवाजात असल्याकारणाने त्यांना अडथळा होतो त्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली. रस्ता नाली आणि स्वच्छतेच्या बाबतीत काही गंभीर गोष्टी आढळून आल्या त्या योग्य ठिकाणी सूचना करून तात्काळ मार्गी लावण्या संबंधित आश्वासित केले. तसेच आरोग्य संबंधित रुग्णांना मदत केली. त्याच भागातील एक मूकबधिर छोट्या मुलाचे कोक्लियर इम्प्लांट ची कानाची महागडी मशीन जी कोणत्याही योजनेत बसत नाही ती खा डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत मदत मिळवून देण्याचे आश्वासित केले. तसेच खुबा रोपण शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत मिळण्यासाठी मार्गदर्शन केले.
*विश्वास जुना धनुष्यबाण पुन्हा*
सेलू नगरपरिषद निवडणूक *प्रभाग क्रमांक 2* मध्ये शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार
*(अ) डॉ जोगदंड अनिकेत अशोकराव*
*(ब) शेख तसलीबी शेख कासिम*
निवडणूक निशाणी *धनुष्यबाण*