01/09/2022
व्यसनाधीनता...एक भस्मासूर!!🚫
©डॉ. गणेश रोडे
DrGanesh Ramesh Rode
M.D., Pune.
(Preventive and Social medicine and Yoga
Sch.)
"सोप्या भाषेत 'व्यसन' म्हणजे कोणत्याही गोष्टीची एवढी सवय लावून घेणे कि त्या 'गोष्टीशिवाय' तुमच्या दैनंदिन आयुष्यात अडथळा निर्माण होतो.
अजून सोप्या भाषेत बोलायचं झालंच तर ज्या वाचून (खाणे, पिणे, इ. क्रिया ) तुमचं 'अडतं' ती गोष्ट म्हणजे व्यसन!!
उदाहरणार्थ,
सकाळी तंबाखू इ. खाल्ल्याशिवाय किंवा गरम पाणी पिल्याशिवाय पोट साफ न होणे / शौचाला न होणे.
तंबाखू, सिगारेट, गुटखा,मावा,मद्य (दारू) हे सध्याचे सर्वाधिक घातक दुष्परिणाम असणारे काही व्यसनांचे प्रकार आहेत.
बऱ्याचदा या व्यसनांची सुरुवात
"त्याला काय होतय?",
एकदा घेऊन तर बघू?! आपण थोडीच नेहमी घेणारे?!,
सगळेच घेतात!!
अशा प्रकारे होताना दिसते.
अर्थात ही 'सुरुवात' पुढे 'सवय' बनते आणि या सवयीचे पुढे व्यसनात रूपांतर होते ते ही अगदी नकळत!!
जगात मृत्यूमुखी पडणाऱ्या 6 लोकांमध्ये 1 व्यक्ती हा 'कॅन्सर' नावाच्या आजाराने मरतो आणि तो कॅन्सर होण्यामागे सर्वात मोठे कारण हे वरील व्यसने आहेत.
वरकरणी एकदम च साध्या दिसणाऱ्या / वाटणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या जीवावर बेतणाऱ्या ठरू शकतात याचा विचार होणे जास्त गरजेचे आहे.
क्रमश:...
#व्यसन ***co ***cofreeindia