RURAL Hospital shrirampur

RURAL Hospital shrirampur SDH SHRIRAMPUR, AHILYANAGAR

24/04/2026
14/01/2026
दिनांक 5-12-2024 रोजी कायाकल्प कार्यक्रम अंतर्गत peer assesment team ची visit उपजिल्हा रुग्णालय येथे झाली, दरम्यान मूल्य...
07/12/2024

दिनांक 5-12-2024 रोजी कायाकल्प कार्यक्रम अंतर्गत peer assesment team ची visit उपजिल्हा रुग्णालय येथे झाली, दरम्यान मूल्यांकनास आलेल्या परीक्षकांनी रुग्णालयीन सेवा तसेच स्वच्छता बघून अधिकारी आणि कर्मचायांचे कौतुक केले.
माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉ श्री, दीपक हरिषचंद्र परदेशी, माननिय डॉ, श्री योगेश बंड (वैद्यकीय अधिकार वर्ग -1)यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी वर्गाने हे कार्य यशस्वी पार पाडले.

🏥ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणारे आगाशे हॉल,आझाद मैदान लसीकरण केंद्र, श्रीरामपूर येथे उद्या दिनांक १३/०५/२०२१ ...
12/05/2021

🏥ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणारे आगाशे हॉल,आझाद मैदान लसीकरण केंद्र, श्रीरामपूर येथे उद्या दिनांक १३/०५/२०२१ रोजी वय ४५ पेक्षा जास्त *COVISHIELD* ह्या लसीच्या *दुसऱ्या डोस चे* लसीकरण सत्र आयोजित आहे.ह्या सत्र साठी २३० डोस उपलब्ध असल्याने रांगेतील फक्त पहिल्या २३० नागरिकांना ह्याचा फायदा होईल.

⏱वेळ:- सकाळी ०९:०० ते लस संपेपर्यंत.

⭕️सूचना:-
१) वरील लसीकरण सत्र साठी फक्त ज्या नागरिकांचे वय ४५ किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि *COVISHIELD* ह्या लसीचा पहिला डोस घेवून ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे अशांनी लसीकरण सत्र साठी यावे.

२)सदर लसीकरण सत्रास वय १८-४४ मधील नागरिकांनी जावू नये.

३)लसीकरण ला येताना पहिल्या डोस साठी दिलेला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड किंवा पहिल्या डोस च्या वेळेस दिलेले ओळखपत्र जवळ बाळगावे. अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही.
ज्यांनी COVAXIN ह्या लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांनी ह्या सत्रास दुसऱ्या डोस साठी येवू नये.

४)लस घ्यायला येताना उपाशी पोटी येवू नये. जेवण अथवा नाश्ता करूनच यावे.सोबत भरलेली पिण्याच्या पाण्याची बाटली बाळगावी. पहिल्या डोस च्या वेळेस ज्यांना कोणाला ॲलर्जीचा त्रास जाणवला असल्यास त्यांनी दुसरा डोस घेताना सत्र अधिकारी ह्यांच्या निदर्शनास आणून देणे.

सदर ग्रुप वर श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना लसीकरण , लस उपलब्धता व कोणत्या ठीकणी चालू आहे ह्याची माहिती भेटेल.

जे कोणी फ्रंट line वर्कर, health care worker vacine घेण्याचे राहिले असतील त्यांनी खाली दाखवलेल्या फॉर्म मधील माहिती विहि...
11/04/2021

जे कोणी फ्रंट line वर्कर, health care worker vacine घेण्याचे राहिले असतील त्यांनी खाली दाखवलेल्या फॉर्म मधील माहिती विहित नमुन्यात भरून ऑफिस सील स्टॅम्प, अधिकारी यांच्या सहीने, हॉस्पिटल staff असतील तर डॉक्टर यांच्या सहीने vacine घेताने vacine केंद्रावर अपलोड करण्याकरिता जमा करणे आवश्यक आहे, कोण front line worker आहेत, कोण health care workar आहेत याचा तक्ता देखील खाली दर्शीवाला आहे.

*कोव्हीड लसीकरणाबद्दल येऊ शकणारा अनुभव* : १) जर समजा तुम्ही दुपारी  २ वाजता लस घेतली तर त्या दिवशी तुम्हाला शक्यतो काहीच...
17/03/2021

*कोव्हीड लसीकरणाबद्दल येऊ शकणारा अनुभव* :
१) जर समजा तुम्ही दुपारी २ वाजता लस घेतली तर त्या दिवशी तुम्हाला शक्यतो काहीच त्रास होणार नाही,
पण रात्री झोपल्यानंतर रात्री थोडीशी *थंडी* आल्यासारखी वाटेल..
२) अंगात *ताप* असल्यासारखे वाटेल परंतु जर तुम्ही thermameter ने ताप चेक केला तर तो बहुधा नॉर्मल म्हणजे *१००*℃ पेक्षा कमीच भरेल....
३) अंगात किंचित,कमी अधिक प्रमाणात *कणकण* जाणवू शकते..
४) बरेच डॉक्टर, सिस्टर,आणि मेडिकोज, तुम्हाला अशा वेळेस
1) T.Crocin500mg/Fepanil500mg/Paracetamol 500mg/Dolo 650mg अशा प्रकारच्या टॅब्लेटस घ्यायला सल्ला देतील, Or T.Zerodol-P..
जर तुम्हाला जास्त डिस्कम्फर्ट Discomfort वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही ती टॅबलेट घेऊ शकता....
अथवा *न घेता सहन करू शकता*
याला *immunogenic response* Of Our Own Body असे संबोधल्या जाते....
तो आला म्हणजे Body is preparing that immunogenic response..
It's natural.. तो नैसर्गिक,आणि नॉर्मल असतो..
त्याला *घाबरायची* गरज नसते..
५) तुमच्यापैकी काही जणांना *हातपाय दुखणे* , *अशक्तपणा*,,
*डोके जड पडणे* *डोकेदुखी*, *जुलाब*, क्वचित *उलट्या* असे पण लक्षणे दिसून येऊ शकतात...
त्यावेळेस पण जनरल मॅनेजमेंट करायची...
जी की आपण नेहमी करतो..

*सर्वात महत्वाचे म्हणजे*
तुम्हाला लसीकरणाच्या अगोदर ,नंतर, तुमचे *Hydration* ( *तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी चांगली गाठणे आवश्यक* आहे.) मेंटेन ठेवणे अतिआवश्यक आहे...
त्यामुळे *भरपूर पाणी,लिक्विड डायट,लिंबू शरबत, ताक, मोसंबी ज्यूस, सफरचंद ज्यूस* आदींचा वापर करावा...
जेणे करून तुमचा येणारा *ताप, ताप-तत्सम कणकण* केवळ तुमच्या पाणी पिण्याने आणि इतर गोष्टींने निघून जाईल..
६) *दुसऱ्या* दिवशी अगदी सकाळी तुम्हाला *अशक्तपणा*, *कमजोरी*, *हातपाय दुखणे*, *पूर्ण बॉडी-पेन ,अंगदुखी* असे किरकोळ त्रास होऊ शकतात...
पण जर तुम्ही व्यवस्थित गोष्टी फॉलो केल्या तर तो त्रास कमी होईल...
एकदा का *२४* तास झाले की त्रास हा *शून्य* होतो म्हणजे संपतो...

७) दुसरा डोस हा *२८* दिवसानंतर घ्यावा, व तो *लक्षात* ठेवावा, *लिहून* ठेवावा...

८) काही जणांना इंजेक्शन च्या जागी किरकोळ *सूज*, *लालसरपणा*, *हाताला जडपणा* *हात हलवताना त्रास,दुखणे* आदी त्रास उद्भवू शकतात...
तो त्रास पण हळूहळू कमी होणारा असतो..
परंतु तुम्हाला कुठल्याही क्षणी जर वाटले की हा त्रास थोडा *नॉर्मल* पेक्षा वेगळा आहे,त्यावेळेस तुम्ही लगेचच *तज्ञ* डॉक्टरांचा *सल्ला* घ्यावा...व *उपचार* करावेत..

९) लसीकरण केल्यानंतर *अर्धा* तासात सहसा असले त्रास होतात,
ते त्रास तिथे थांबून *रुल आऊट* म्हणजे जिथल्या तिथे *देखरेखीखाली* थांबून सोडवावेत.
त्यामुळे *लसीकरण* केल्यानंतर आम्ही तुम्हाला *अर्धा* तास *under-obeservation* ( *देखरेखीखाली*) तिथेच Observation Room मध्ये थांबायला सांगतो....
१०) लसीकरण हे पूर्णपणे *सुरक्षित* आहे, व विश्वास ठेवून घ्यावे..
११) *मनातील भीती* पूर्णपणे काढून टाकावी,जेणे करून *Psychologically* ( *मानसिक दृष्ट्या*) तुम्ही फिट असाल तर बाकीच्या गोष्टी ह्या *सुकर* होतात....
हा मेसेज तुम्ही आपापल्या *नातेवाईकांना* *मित्रमंडळींना* *जवळच्या* लोकांना पाठवू शकता...@ सौजन्य..
अजून कुठली पण शंका असल्यास,
आपण विचारू शकता.
आपला हितचिंतक
*डॉ.अविनाश कि. गोरे*
*वैद्यकीय अधिकारी* ( *बालरोगतज्ञ*)
१) *७९७२४२६५८५*
२) *७५८८०८२८७५*

45ते 59 वयोगटातील लोकांनी जर त्यांना हृदय, किडनी, मेंदू, कॅन्सर, फुफुस, लिव्हर चे आजार असतील तर कॉवीड लसीकरनाकरिता येतान...
15/03/2021

45ते 59 वयोगटातील लोकांनी जर त्यांना हृदय, किडनी, मेंदू, कॅन्सर, फुफुस, लिव्हर चे आजार असतील तर कॉवीड लसीकरनाकरिता येताना खालील फॉरमॅट ची प्रिंट काढून डॉक्टर यांचे सही शिक्याने ग्रामीण रुग्णालयात येताना आणावे.60वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. कृपया गर्दी होणारच नाही याची काळजी घ्यावी, व कोरोना संबधी सर्व नियमांचे पालन करावे

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ वसंतराव जमधडे साहेब,मा. डॉ योगेश बंड, डॉ. कौस्तुभ शेवंते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्र...
18/01/2021

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ वसंतराव जमधडे साहेब,मा. डॉ योगेश बंड, डॉ. कौस्तुभ शेवंते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर येथे अतिशय उत्तमरित्या कोरोना लसी चे लसीकरण करण्यात यश आले. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील उत्तम नियोजन करून लसीकरण उत्तम रित्या पार पाडले. मा. तालुका वैद्यकीय मोहन शिंदे सर देखील या वेळी उपस्थित होते.

आज दिनांक 26-10-2020 रोजी कायाकल्प या शासनाच्या योजनेत सलग तीन वेळा प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केल्याबद्दल तसेच बढती...
26/10/2020

आज दिनांक 26-10-2020 रोजी कायाकल्प या शासनाच्या योजनेत सलग तीन वेळा प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केल्याबद्दल तसेच बढती होऊन जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती झाल्याबद्ल आमचे मार्गदर्शक, आधारस्तंभ डॉ. श्री वसंतराव जमधडे साहेबांचा यथोचित सत्कार करताना माननीय श्री. अशोकराव दिवे सर (अधीक्षक शंभुक वसतिगृह ), माननिय रयत शिक्षण संस्था प्राचार्य खंडाळा.

Address

A/p Haregaon Road
Shrirampur
BEHINDNEWRTOOFFICE

Alerts

Be the first to know and let us send you an email when RURAL Hospital shrirampur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category