Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी

  • Home
  • India
  • Solapur
  • Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी

Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी, Hospital, Bypass Road/Gadegaon Road Chowk, Barshi, Dist. Solapur, Solapur.

प्रभावी आरोग्यसेवेसाठी विश्वसनिय हॉस्पिटल
साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी

कॅन्सर सर्जरी। किमोथेरपी ।कार्डिओलॉजी। युरोलॉजी । जनरल मेडिसीन । बालरोग।
ऑर्थोपेडिक। कॅथलॅब कार्डियाक विभाग । एन्डोस्कोपी ।लॅप्रोस्कोपी।प्लास्टिक सर्जरी

24 तास तत्पर रुग्णसेवा उपलब्ध

15/04/2026
03/04/2026

भारतातील कॅन्सर बरा होण्याचं प्रमाण कमी का ??

प्रसंग १ला
साधारण 31 वर्षाचा तरूण.. तोंडात अल्सर झाला म्हणून दाखवायला येतो .
मी त्याला `आs ' करायला सांगतो जबडा लाॅक झालेला ..जिभेचा अर्धा भाग कॅन्सर ने व्यापलेला.
`कधी पासून आहे ..?'
`झाले एक दोन दिवस ..!
माझा आजवरचा अनुभव मान्य करायला तयार नाही .. मी पुन्हा खोदून खोदून विचारतो..
शक्य नाही म्हणतो ...
मग तो मान्य करतो ..दोन तीन महिने झाले असतील म्हणतो. आधी अर्धा सेंमी होता आता त्यानी चांगलीच तीन चार सेंमी पर्यंत मजल मारलेली .
चेक केल्यावर सरळ सरळ जिभेच्या कॅन्सर चीच शक्यता अधिक. मी त्याला तसं सांगतो ..पण तरीही खात्री करून घेण्यासाठी बायोप्सीचा( बायोप्सी म्हणजे कॅन्सर असण्याची शक्यता असलेल्या ठिकाणचा छोटासा तुकडा काढून तपासायला पाठवणे)सल्ला देतो .दहा वीस वर्ष गुटखा खाणारा म्हणतो..` मी आता सोडलाय..असा कसा कॅन्सर असू शकतो.. ?! '
मी जीवाच्या आकांताने समजावून सांगतो ..
`अरे बाबा .. आत्ता सोडलास पण इतक्या वर्षात त्याने जो परिणाम करायचा तो केलाय !'
तरीही तो मान्य करत नाही.. मी त्याला त्याच्याच हट्टावरून काही वेदनाशामक , एक माऊथ वाॅश वगैरे लिहून देतो. ओरल हायजीन समजाऊन सांगतो. आणि न राहवून परत सांगतो बायोप्सी करावीच लागेल. पण तो ऐकायला तयार नसतो.
मध्ये एक दोन महिन्याचा काळ जातो ..
तोच मुलगा परत माझ्यासमोर. आता तो बायोप्सी साठी तयार असतो. आधीच उशीर झालेला ..मी बायोप्सी करून घेतो .तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर. इंडक्शन केमोथेरपी,रेडिएशन आणि सर्जरी या सगळ्याची एकत्रित गरज. पण रूग्ण आणि नातेवाईक समजून घ्यायला तयार नाहीत. उपचारासाठीचा खर्च मान्य करायला तयार नाहीत.
ते विनाकारण फिरत राहतात..अनावश्यक उपचार करण्यात वेळ घालवतात ..कॅन्सर पूर्णपणे हाताबाहेर गेल्यावर माझ्याकडे येतात ..आणि मला म्हणतात..काही करा पण डाॅक्टर याला बरं करा..
आणि नाईलाजाने मला म्हणावं लागतं ..आता मी काहीच करू शकत नाही.. मी देव नाहीये .

प्रसंग २ रा
अदाजे दोन वर्षापूर्वी ..एक दिवस ओपीडी मध्ये दोघी जणी येतात. त्यातल्या एकीच्या स्तनामध्ये गाठ.
सिस्टरच्या सोबतीनं मी स्तनाचे परिक्षण करतो. माझा दहा वर्षाचा अनुभव..आजवर केलेल्या ब्रेस्ट कॅन्सर च्या यशस्वी शस्त्रक्रिया..या सगळ्या च्या आधारावर मी गाठ बघून सांगतो की ही कॅन्सरचीच गाठ असण्याची शक्यता जास्त आहे. पण घाबरण्यासारखं काही नाही. अगदी सुरवात वाटतेय फारसा कुठेही पसरला नसणार. आपल्याला छोटासा तुकडा काढून तपासायला पाठवावा लागेल. कॅन्सरच आहे हे नक्की झालं तर ऑपरेशन करता येईल. आता पूर्ण स्तन काढण्याची गरज नाही. Breast conservation surgery द्वारे स्तन वाचवून शस्त्रक्रिया करता येते. असं सगळं मी समजावून सांगतो. पण `ती' रूग्ण कॅन्सर ची शक्यताच मानायला तयार नसते बायोप्सीसाठीची तयारी तर नाहीच नाही. तपासणी केली आणि कॅन्सर निघाला तर ही भिती चेहरयावर स्पष्ट दिसत होती.
मी समजावून सांगण्याचा अतोनात प्रयत्न करतो.
पण काहीही न बोलता त्या निघून जातात .
आज पुन्हा तीच रूग्ण माझ्यासमोर. मधल्या दोन वर्षात ते कुठे फिरले माहीत नाही. कुठे आणि कसले अघोरी उपाय करत राहिले माहीत नाही. पण आज दोन वर्षांनी ते माझ्यापुढे बसलेले. स्तनाला अल्सर झालेला. गाठ फुटून वर आलेली. बायोप्सी साठी वेगळं काही करायची गरजच पडत नाही. अगदी सहज तुकडा घेता येतो. पण यावेळी मी पेट स्कॅनही करायला सांगतो.
माझी शंका बरोबर ठरते कॅन्सर नी त्याची पाळंमुळं संपूर्ण शरीरभर पसरवलेली .
आणि तीचे नातेवाईक म्हणतात डाॅक्टर काहीही करा.. कितीही पैसा लागू दे पण बरी झाली पाहिजे.
आणि मी परत तेच म्हणतोय .. आता मी काहीही करू शकत नाही.. उपचार चालू ठेवून फार फार तर काही दिवस... महिने आयुष्य वाढेल पण पूर्ण बरी नाहीच होऊ शकत ..
मी देव नाही..

प्रसंग ३ रा
कावीळ आणि कॅन्सर असा रूग्ण येतो .खोदून खोदून विचारल्यावर दोन तीन महिन्यापासून कावीळ असल्याचे सांगतो. या दोन तीन महिन्यात तात्पुरता इलाज केलेला असतो. अनावश्यक उपचार घेत एक दोन महिने फिरून मग माझ्याकडे आलेले असतात. यामधे सर्जरी हाच एकमेव पर्याय. अशा केस मधे ब्लड रिपोर्ट नाॅर्मल येण्याची शक्यता जवळपास नाहीच. आणि त्यामुळे सर्जरी मध्ये खूप जास्त रिस्क. या रूग्णाच्या बाबतीतही तेच. रक्त गोठण्याच्या सर्वसाधारण कालावधीचा दर हा 1.2 किंवा 1.3 असतो आणि मेडिकल टर्मस् नुसार जास्तीत जास्त 1.5 पर्यंत सर्जरीचा निर्णय घेणं योग्य. पण या रूग्णाच्या केस मध्ये हाच दर 2.3 म्हणजे दुप्पट. अशावेळी जर सर्जरी चा निर्णय घेतला तर अति रक्तस्त्रावाने रूग्ण दगावण्याची शक्यताच जास्त.
पण रूग्णाचे नातेवाईक ऐकायला तयार नाहीत. काहीही करून सर्जरी करा आणि बरं करा हा हट्ट.
एकतर कॅन्सरमुळे होणारी काविळ औषधोपचाराने बरी होतच नाही. त्यासाठी सर्जरी किंवा ERCP stenting(काविळ काढण्यासाठी दुर्बिणीद्वारे पाईप टाकणे) करणे गरजेचे असते पण तेही योग्य वेळेत .
शेवटी काय तर रूग्णाचे नातेवाईक रूग्णाला घेऊन नको तीथे फिरत राहतात ,गरज नसताना खर्च करत राहतात. आणि पूर्णपणे वेळ हाताबाहेर गेल्यावर पुन्हा माझ्याकडे येतात आणि काहीही करून बरं करा असं म्हणतात..
आणि पुन्हा एकदा नाईलाजाने मला हेच म्हणावं लागतं..
साॅरी.. मी देव नाही..

असे प्रसंग वारंवार येतात. कधी कधी एक डाॅक्टर म्हणून मी हरतोय असं वाटावं असेही प्रसंग येतात.
खूप वाईट वाटतं..वयानी लहान..जबाबदारी असणाऱ्या तरूण मुलामुलींच्या बाबतीत असं घडताना पाहून मी हतबल होतो.
कधीकधी नातेवाईकांच्या हट्टापाई रूग्णांचं होणारं नुकसान बघून राग येतो.. लोकांना समजत नाही..सुशिक्षित.. शिकलेले लोक सुध्दा जेंव्हा कॅन्सर असू शकतो किंवा कॅन्सर झालाय हे मान्यच करायला तयार होत नाहीत.. तेव्हा आश्चर्यही वाटतं आणि चिडही येते.
कितीही समजावा.. की थंड पाणी पिल्यावर जसं सर्दी खोकला होऊ शकतो तसंच तंबाखू , गुटखा खाल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो हे लोकांना मान्यच होत नाही.

मुळात भारतात कॅन्सर बरा होण्याचं प्रमाण कमी असण्याची कारणं अनेक आहेत..न राहवून मी याचा आढावा घ्यायचा असं ठरवलं आणि काही विचित्र पण खऱ्या निष्कर्षाला येऊन पोचलो..

1. पॅथी पॅथी पॅथी
मी असं आजीबात म्हणणार नाही की फक्त अॅलोपॅथीमधेच कॅन्सर पूर्णपणे बरा करणारे उपचार आहेत. परंतू अॅलोपॅथी नी वेळोवेळी दिलेले पुरावे..आणि सिध्द केलेल्या अनेक गोष्टींच्या आधारावर संपूर्ण जगासाठी विविध प्रकारच्या कॅन्सर वर उपचार करण्यासाठी एक गाईडलाईन आखून दिलेली आहे. जीचा यशस्वीततेचा दर हा इतर उपचाराच्या तुलनेने खूपच जास्त आहे.
म्हणून मी ठामपणे म्हणेन की अॅलोपॅथी मध्ये कॅन्सर ला रोखण्याची आणि पुन्हा न येऊ देण्याची ताकद आहे .फक्त योग्य वेळी उपचाराला सुरवात आणि उपचारामधे सातत्य असणं गरजेचं. परंतु रूग्ण आणि नातेवाईक सुरवातीला इतर चुकीचे उपचार करण्यात वेळ वाया घालवतात. कंटाळून उपचार अर्धवट सोडून देतात. जरा बरं वाटायला लागलं की उपचार बंद करतात आणि पुन्हा त्रास होईपर्यंत फिरकतही नाहीत . एखाद्या कॅन्सरचा पसरण्याचा वेग ( कॅन्सरचा aggressiveness)किती असू शकतो हे सहज समजून येऊ शकत नाही.
कधीकधी उपचार चालू असताना आटोक्यात असणारा आजार उपचार अर्धवट सोडून दिल्यानंतर तीव्र रूप धारण करून परत येतो.
मुळात कित्येक कॅन्सर च्या केसेस आमच्या हातातच तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमधे येतात.
कॅन्सर ची तिसरी चौथी स्टेज म्हणजे सातत्याने आणि योग्य उपचाराची गरज आणि इतकं करून ही रूग्णाचं फक्त आयुष्य वाढवण्यासाठीचा प्रयत्न.
हे लोकांच्या गळी उतरवणं कठीण होऊन बसतं.
असं का...? या त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना मी अगतिक होतो.

2. मान्यच न करणं
i. मला कॅन्सर होऊच शकत नाही..!
ii. असा कसा मला कॅन्सर झाला ..?!
iii. मी माझ्या एका डाॅक्टर मित्राशी बोललोय किंवा डाॅक्टर नातेवाईकाशी चर्चा केली.. तो तर म्हणत होता की कॅन्सर वगैरे काही नाही.. साधं दुखणय होईल बरं दोन चार दिवसात..
iv. आमच्या आख्ख्या घराण्यात कोणाला नाही असलं काही मग मलाच कसा होईल ..?

आणि कहर म्हणजे..
V. तुमच्या ह्या कॅन्सर च्या हाॅस्पीटल मध्ये तपासायला आलो म्हणूनच मला कॅन्सर निघालाय..

बऱ्याच रूग्णांच्या बाबतीत केवळ कॅन्सर आहे हेच लवकर मान्य न केल्यामुळे आणि इतर चुकीचे उपचार घेत सुरवातीचा बरा होण्याचा गोल्डन पिरीएड घालवल्यामुळे कॅन्सर बरा होण्याची किंवा आहे त्याच अवस्थेत रोखण्याची संधी निघून जाते .
परिणामी रूग्ण वाचण्याची सुद्धा शक्यता रहात नाही.

3. अशिक्षीत किंवा शिक्षित पण अतिहुशार नातेवाईक
i. माझ्या काकाला पण असाच कॅन्सर होता त्या तिकडं कर्नाटकात कसलं तरी पाणी देतात पिऊन बरा होतो कॅन्सर..दोन महिन्यात फक्त..

ii. उगाचच कॅन्सर म्हणून सांगितलंय..तसं काही नाही तुला..आमच्या गावाला अमक्या ला पण असच सांगितलं होतं चांगलं वीस वर्षे जगला तो काही न करता..

या आणि अशा प्रकारच्या सल्याने बाकी काही नाही पण उपचाराचा कालावधी मात्र पुढे पुढे जातो आणि कॅन्सर शरिरात आपली जागा करत जातो .आणि बरा होऊ शकणारा रूग्ण डाॅक्टरांच्या उपचाराच्या फार पुढे निघून जातो. आणि मग हेच नातेवाईक म्हणतात काहीही करा कितीही पैसा लागू दे पण बरा झाला पाहिजे.

कधी कधी.. ना रूग्ण चुकतो ना नातेवाईक ना डाॅक्टर. काही कॅन्सर मुळातच शेवटच्या अवस्थेत आपलं रूप प्रकट करतात. उदाहरणार्थ लिव्हर कॅन्सर ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेत hepato cellular carcinoma असं म्हणतो. मुळातच हा आणि असे काही कॅन्सर अगदी शेवटच्या अवस्थेतच प्रकट होतात. कितीही म्हणलं तरी याची लक्षणं सुरवातीला म्हणजे early stage मध्ये कळतच नाहीत. परिणामी उपचाराचा गोल्डन पिरीएड आपोआप निसटतो . मग अशा रूग्णांना गरज असते ती फक्त palliative care ची म्हणजे घरी किंवा तत्सम एखाद्या ठिकाणी ठेऊन कमीत कमी त्रास व्हावा म्हणून काळजी घेणे. आम्ही तसं सांगतोही. पण कित्येक रूग्णांचे नातेवाईक ऐकायलाच तयार नसतात. कधी नातेवाईक स्वतः आणि कधी रूग्णाला घेऊन सगळीकडे फिरतात. विनाकारण आणि अनावश्यक खर्च करतात या सगळ्यात लाभ होतच नाही पण जोडीला त्या रूग्णाचे हाल मात्र होतात. आणि एवढं करून प्रचंड हाल सोसून रूग्ण शेवटी जातोच.

मुळात कॅन्सर हा आजार केवळ भितीपोटी मान्य न केल्यामुळे,वैद्यकीय क्षेत्रावरील अविश्वास,चुकीचे आणि अनावश्यक उपचार आणि उगाचच नको तिथे फिरत वेळ वाया घालवण्यामुळे वाढत जाणारा आजार आहे.
या सगळ्यात विनाकारण भरडला जातो तो कॅन्सरचा रूग्ण.
आज हा शब्दप्रपंच करण्यामागचा उद्देश केवळ इतकाच ..की लोकांना,आजाराला प्रामाणिकपणे न्याय देऊन उपचारासाठी प्रयत्न करणाऱ्या डाॅक्टरची खरी तळमळ समजावी, त्यांनी वैद्यकीय क्षेत्राकडे व्यवसाय करणारे म्हणून न बघता सेवा करणारे म्हणून बघावं आणि आपल्या रूग्णाला कॅन्सर असण्याची शक्यता आहे किंवा कॅन्सर असू शकतो हे समजून घेऊन कॅन्सर तज्ञांचा सल्ला घ्यावा.
शेवटी एक बरा झालेला रूग्ण आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हास्य हीच माझ्यासारख्या डाॅक्टरची सर्वात मोठी कमाई असते .

डाॅ. राहुल मांजरे
कॅन्सर तज्ञ
साईसंजीवनी हाॅस्पीटल , बार्शी
Mobile No. 9322073305

26/03/2026
🏥 कॅन्सर उपचारांसाठी —-हक्काचे ठिकाण - बार्शीत! 🏥मोठ्या शहरांची धावपळ नको! साईसंजीवनी हॉस्पिटल, बार्शी येथे आहे अत्याधुन...
18/03/2026

🏥 कॅन्सर उपचारांसाठी —-हक्काचे ठिकाण - बार्शीत! 🏥
मोठ्या शहरांची धावपळ नको!
साईसंजीवनी हॉस्पिटल, बार्शी येथे आहे अत्याधुनिक कीमोथेरपी डे-केअर युनिट.
✅ टाटा हॉस्पिटल (मुंबई) तज्ज्ञांचा मोफत ऑनलाईन सल्ला.
✅ आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार उपलब्ध.
✅ इंटरनॅशनल सेफ्टी स्टँडर्ड्स (Bio-Safety Cabinet) द्वारे सुरक्षितता.
✅ तज्ज्ञ डॉ. राहुल मांजरे पाटील यांचे मार्गदर्शन.
पुणे-मुंबईला जाण्यापूर्वी एकदा नक्की सल्ला घ्या. योग्य वेळेत उपचार, हाच कॅन्सरवर विजय!
📍 साईसंजीवनी हॉस्पिटल, बार्शी.
📞 संपर्क: 9322073305
विंनती: ही माहिती शेअर करून गरजूंना मदत करा. 🙏

17/03/2026

बार्शी नगरपरिषद यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेऊन महिलांच्या आरोग्य तपासण्या व मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला आ. राजाभाऊ राऊत, नगराध्यक्ष कथले ताई, मुख्याधिकारी मुलानी साहेब तसेच मान्यवर डॉ बोपलकर मॅडम व डॉ बांगर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी महिला आरोग्य जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

या उपक्रमात डॉ. राहुल मांजरे पाटील यांच्या साईसंजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे डॉ. विजू दादा खुणे यांच्या सहकार्याने विशेष योगदान देण्यात आले. कॅन्सर तपासणी विभागामार्फत अनेक महिलांची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला व पुढील उपचारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरामध्ये रक्त तपासणी, ईसीजी, कॅन्सर तपासणी, स्त्रीरोग, हृदयरोग, नेत्र व दंतरोग अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली.

👉 “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून साईसंजीवनी हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांची सेवा केली.

मा. Devendra Fadnavis साहेबांच्या दूरदृष्टीतून साकारलेली TMS 2.0 प्रणाली ही महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाच...
23/02/2026

मा. Devendra Fadnavis साहेबांच्या दूरदृष्टीतून साकारलेली TMS 2.0 प्रणाली ही महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाची डिजिटल सुधारणा आहे.

आरोग्य सेवेत पारदर्शकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे Dr. Omprakash Shete साहेब यांचे विशेष अभिनंदन.

Ayushman Bharat Yojana व Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana अंतर्गत गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक ठोस पाऊल आहे.
राहुल मांजरे-पाटील
Narendra Modi
CMOMaharashtra
Cancer Surgeon Dr Rahul Manjare
Saisanjivani cancer & surgical Hospital, Barshi
Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी
fans

आरोग्याची शिवजयंती 🙏🏻
20/02/2026

आरोग्याची शिवजयंती 🙏🏻

🧡 आरोग्याची शिवजयंती – शिवजयंतीनिमित्त बार्शी तालुक्यात साईसंजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत मोफत आरोग्य तपासणी व ...
19/02/2026

🧡 आरोग्याची शिवजयंती – शिवजयंतीनिमित्त बार्शी तालुक्यात साईसंजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटपाचा महासंकल्प 🧡

बार्शी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरोग्यदायी, सक्षम व सुदृढ समाजाच्या संकल्पनेला अभिवादन करत, साईसंजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बार्शी यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त “आरोग्याची शिवजयंती” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत बार्शी तालुक्यात विविध ठिकाणी मोफत सर्व रोग निदान शिबिरे, बीपी–शुगर तपासणी तसेच मोफत औषध वाटप करण्यात येत आहे.

कॅन्सर तज्ञ डॉ. राहुल मांजरे-पाटील यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा पोहोचवणे हा आहे. १३ ते २१ फेब्रुवारी दरम्यान अंजनगाव उमाटे, माणकेश्वर, श्रीपत पिंपरी, शेंद्री, यावली, ITI बार्शी व रिधोरे, अमन चौक, बार्शी येथे हे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

याशिवाय, साईसंजीवनी हॉस्पिटलमध्ये हाडांच्या शस्त्रक्रिया, मूतखडा शस्त्रक्रिया, कॅन्सर सर्जरी, केमोथेरपी, हृदयविकार उपचार यांसह गरजू रुग्णांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात येणार आहेत.

सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्ता : साईसंजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बायपास गाडेगाव रोड, बार्शी
संपर्क : 9322073305
ओपीडी वेळ: सोम ते शनीवार सकाळी १०-३

🧡 आरोग्याची शिवजयंती 🧡*मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप*कॅन्सर तज्ञ डॉ राहुल मांजरे पाटील यांचे 🏥 साईसंजीवनी हॉस्पिटल,...
16/02/2026

🧡 आरोग्याची शिवजयंती 🧡

*मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप*

कॅन्सर तज्ञ डॉ राहुल मांजरे पाटील यांचे
🏥 साईसंजीवनी हॉस्पिटल, बार्शी
यांच्या वतीने आयोजित

छत्रपतींच्या प्रेरणेने
सुदृढ समाजाच्या दिशेने एक पाऊल ✨

📍 आरोग्य शिबिर वेळापत्रक

📅 १३ फेब्रुवारी – अंजनगाव उमाटे
📅 १५ फेब्रुवारी – माणकेश्वर
📅 १६ फेब्रुवारी – श्रीपत पिंपरी
📅 १७ फेब्रुवारी – शेंद्री
📅 १९ फेब्रुवारी – यावली
📅 २० फेब्रुवारी – ITI, बार्शी
📅 २१ फेब्रुवारी – रिधोरे ,
अमन चौक, बार्शी

सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.
आपले आरोग्य, आपली जबाबदारी.

साईसंजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, बायपास गाडेगाव रोड बार्शी..*
9322073305

Address

Bypass Road/Gadegaon Road Chowk, Barshi, Dist. Solapur
Solapur
413411

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी:

Share

Category