17/12/2025
🙏 कृतज्ञतेने नतमस्तक… 🙏
मिती ग्रुपच्या माध्यमातून उत्तरा मोने सादर करीत असलेल्या “गगनाला पंख नवे पुरस्कार २०२५” अंतर्गत
आधार मागासवर्गीय महिला संस्था, सोलापूर यांना
मतिमंद मुलांच्या सेवेसाठी, महिला सक्षमीकरणासाठी व दिव्यांगसाठी ,महिलांसाठी समुपदेशनाच्या पवित्र कार्यासाठी मानपत्र, भेटवस्तू व रोख रक्कम देवून
सन्मानित करण्यात आले, हा क्षण आमच्यासाठी अत्यंत भावूक व अभिमानाचा आहे.
अनेक वर्षांच्या सेवाभावी प्रवासात आलेल्या अडचणी, संघर्ष, अश्रू आणि आशा…
या सन्मानाने त्या सर्व प्रयत्नांना अर्थ मिळाला आहे.
हा पुरस्कार केवळ आमचा नसून,
आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक माता-भगिनींचा,
प्रत्येक मतिमंद मुलाच्या निरागस हास्याचा
आणि समाजासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे.
हा प्रेरणादायी सोहळा
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी कलांगण, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडला.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला प्रेरणा देणाऱ्या मान्यवरांचे आम्ही सदैव ऋणी राहू —
🌸 रोहिणी हटंगडी – ज्येष्ठ अभिनेत्री
🌸 राजीव खांडेकर – संपादक, ABP माझा
🌸 श्री ज्ञानेश गाला -नवनीत फाउंडेशन संचालक
🌸 विजय कुवळेकर – ज्येष्ठ पत्रकार
🌸 श्रीरंग गोडबोले – निर्माता, लेखक, दिग्दर्शक
🌸 मृणाल कुलकर्णी – अभिनेत्री
🌸 श्रीकांत बोजेवार – ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र टाइम्स
🌸वर्षा पवार तावडे – सामाजिक कार्यकर्त्या
🌸 केसरी टूर्स एंड ट्रेव्हलचे संचालिका
या सन्मानामुळे आमच्या सेवाकार्याला नवी उमेद, नवे बळ आणि नवी दिशा मिळाली आहे.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ झाला आहे.
आयोजक, मार्गदर्शक, सहकारी आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे
हृदयापासून आभार… 🙏
हा सन्मान आम्हाला अधिक प्रामाणिकपणे सेवा करण्याची प्रेरणा देत राहो, हीच सदिच्छा. 🌼