10/12/2025
*धक्कादायक माहिती...*
*राज्यातील पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १०० कोटी रुपयांची मदत; शेतकऱ्यांना दिले फक्त ७५ हजार रुपये...*
महाराष्ट्राच्या मराठवाडा भागात महापूर आपत्तीवेळी बऱ्याच दानशूर लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बरेच पैसे जमा केले होते; तसा शासन निर्णय (जीआर) शासनानेही काढला होता. की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी मदत जमा करावी.
तर, आमचे मित्र वैभव कोकाट यांनी माहितीचा अधिकार (RTI) अर्ज टाकला होता की; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत किती पैसे जमा झाले आणि, सरकारने शेतकऱ्यांना त्यातील किती पैसे दिले? तर, त्यातून त्यांना एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.
१०० कोटी रुपये: शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील लोकांनी दिलेले पैसे.
त्यापैकी महाराष्ट्र राज्य शासनाने फक्त ७५ हजार रुपये शेतकऱ्यांना वाटले आहेत.
आपण दिलेली मदत गरजू-पीडित व्यक्तींपर्यंत पोहचेल असे वाटणाऱ्या येथील देणेकऱ्यांचे काय? किती आशेने त्यांनी पैसे दिले असतील; कुणी अगदी आपले लग्न साधे करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे देतात तर, कुणी सेवानिवृत्त व्यक्ती आपले निवृत्तीवेतनाचे पैसे आणून देतात. कारण, त्यांना सरकारवर विश्वास असतो. पण, सरकार काय करते?
RTI मधून असे उत्तर मिळणे इथे फारच खेदजनक आहे. हा त्या सगळ्या दानकर्त्या लोकांच्या विश्वासाला तडा बसण्याचा प्रकार आहे. इथून पुढे कुणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला का पैसे द्यावेत? स्वतःच परस्पर मदत का करू नये? याचे उत्तर प्रशासन देईल का? जर, उत्तर दिलेच तर, त्या उत्तराने संकटासोबत दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही फरक पडू शकेल का?
बाकी, किती वृत्तवाहिन्यांवर याच्या बातम्या लागतील ते पाहण्यासारखे आहे...
आपला
श्री तुषार शुभांगी दशरथ लोगडे
आरोग्यसेवक, समाजसेवक.
ठाणें महानगरपालिका प्रभाग क्रमांक.१९
१४७.कोपरी पाचपाखाडी विधानसभा ठाणें.
📞९९८७०५८४४५