18/06/2025
मुलांच्या भावना समजून घेणे... काही सोपे उपाय...!
- डॉ. अनिता दौंड
बाल मानसोपचार तज्ञ नाशिक
9763182616
मुलांच्या भावनांना योग्य प्रकारे समजावून घेणे, हे त्यांच्या भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. इथे मी काही सोप्या आणि प्रभावी पद्धती वापरून तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या भावना समजावून घेऊ शकता आणि त्यांना ते सांगू शकता.
या मध्ये पहिली पायरी येते, आधी भावना ओळखायला शिकणे.
१. भावना ओळखायला शिकवा:
- मुलांना वेगवेगळ्या भावना (आनंद, दुःख, राग, भीती, आश्चर्य, लाज) यांची नावे सांगा.
- "तुला राग आला आहे का?", "तुला दुःख वाटतंय का?" असे प्रश्न विचारून त्यांना भावना ओळखायला मदत करा.
२. भावनांची कबुली द्या:
- "हो, मला समजतंय की तुला राग आला आहे." किंवा "तुला अजून थोडं दुःख वाटतंय, बरोबर ना?" अशा प्रकारे त्यांच्या भावना मान्य करा.
- यामुळे त्यांना समजते की त्यांची भावना योग्य आहेत आणि त्यांना कोणी तरी समजत आहे.
३. उदाहरणे वापरा :
- गोष्टी, चित्रपट, किंवा रोजच्या घडामोडी यांचा वापर करून भावना समजावून सांगा.
- "बघ, त्या गोष्टीतला मुलगा रडतोय कारण त्याला खेळायला मिळालं नाही. आपल्यालाही कधी असं वाटतं का?"
४. संवाद साधा :
- मुलांना त्यांच्या भावना बोलून दाखवायला प्रोत्साहित करा.
- "तुला काय वाटतंय?", "तुला असं का वाटलं?" असे प्रश्न विचारून संवाद वाढवा.
५. भावना व्यक्त करण्याचे मार्ग सांगा :
- "राग आल्यावर आपण खोल श्वास घेऊ शकतो.", "दुःख वाटल्यावर आई-बाबांशी बोलू शकतो." असे उपाय सुचवा.
- चित्र काढणे, लिहिणे, खेळणे यासारख्या सर्जनशील मार्गांचा वापर करू द्या.
६. स्वतः वरून उदाहरण द्या :
- तुम्ही स्वतःच्या भावना कशा व्यक्त करता हे मुलांना दाखवा.
- "माझ्या ऑफिसमध्ये आज थोडं टेन्शन आलं होतं, म्हणून मी ताजं पाणी प्यायलं आणि शांत बसले."
७. धीर द्या आणि आधार द्या :
- मुलांनी भावना व्यक्त केल्यावर त्यांना धीर द्या, "ठीक आहे, असं वाटणं साहजिक आहे."
- त्यांना जवळ घ्या, मिठी मारा किंवा हळूच पाठ थोपटून सांगा की तुम्ही त्यांच्यासोबत आहात.
-
मुलांना त्यांच्या भावना ओळखायला, व्यक्त करायला आणि योग्य प्रकारे हाताळायला शिकवणे हे पालक म्हणून तुमचे मोठे योगदान ठरते. हे केल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो, आणि ते मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनतात.
पालकत्व शिकण्याच्या या तयारीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आम्ही पालकत्व शिकवण्याचे एक एक टप्प्यानुसार काही शास्त्रीय दृष्ट्या सेशन किंवा क्लास तयार केले आहेत त्याचा आपणास फायदा व्हावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा.
डॉ. अनिता नागरगोजे दौंड
MBBS, MD, PDF
Child and Adolescent Psychiatrist
9763182616
टीम -लिट्ल माईंड डेव्हलपमेंट सेंटर