Ayurved Vyaspeeth Aurangabad

  • Home
  • Ayurved Vyaspeeth Aurangabad

Ayurved Vyaspeeth Aurangabad आयुर्वेद व्यासपीठ - छत्रपती संभाजीनगर शाखा

04/03/2025



29/12/2024
नववा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस आणि धन्वंतरी जयंती दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद व्यासपीठ, छ संभाजीनगर शाखे द्वारा खूप उत...
29/10/2024

नववा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस आणि धन्वंतरी जयंती

दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद व्यासपीठ, छ संभाजीनगर शाखे द्वारा खूप उत्साहात साजरी झाली.

या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून गोरक्ष आयुर्वेद महाविद्यालयच्या प्रोफ. डॉ शुभदा लोणीकर यांनी ग्लोबल आयुर्वेद आणि शल्यतंत्र या विषयावर अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन केले.

रुग्ण चिकित्सा करताना योग्य निदान होणे किती महत्वाचे असते तसेच वैद्यानी आयुर्वेद ग्रंथाचा अभ्यास करणे किती आवश्यक आहे यावर सखोल चर्चा झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी, आयुर्वेद व्यासपीठ केंद्रीयचे सहकार्यवाहक वैद्य सोहन पाठक होते. तसेच संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष वैद्य संदीप औटे, उपाध्यक्ष वैद्य बोर्डे,वैद्य सौ सोनवतीकर, कार्यवाह वैद्य सौ चमरगोरे, देवगिरी विभागाचे सहकार्यवाहक वैद्य परेश देशमुख यांची देखील उपस्थिती होती.

याप्रसंगी छ संभाजीनगर मधील जवळपास 70 वैद्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्य आरती कुरील यांनी केले. सुरुवातीला वैद्य पंकज मुळे यांनी सुमधुर शैलीत धन्वंतरी स्तवन सादर केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैद्य अमित वैष्णव,वैद्य विनय सेवलीकर, वैद्य देवयानी सदाव्रते, वैद्य अजय देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
शेवटी ज्येष्ठ वैद्य संतोष नेवपूरकर यांनी सर्वाना आशीर्वाद युक्त शुभेच्छा दिल्या.

यापुढे देखील सामान्य जनतेसाठी आणि वैद्यांसाठी नवीन उपक्रम राबवण्यात येतील अशी माहिती धन्वंतरी जयंती प्रमुख वैद्य रितेश संकलेचा यांनी दिली.

📚 *आयुर्वेद व्यासपीठ, छत्रपती संभाजीनगर* 📚*वैद्य समूह नि:संशय करणानाम् श्रेष्ठ:|**Clinical Meeting - 20th October 2024*🎯...
13/10/2024

📚 *आयुर्वेद व्यासपीठ, छत्रपती संभाजीनगर* 📚

*वैद्य समूह नि:संशय करणानाम् श्रेष्ठ:|*

*Clinical Meeting - 20th October 2024*

🎯 विषय : *वृक्क विकार*

📆 *दिनांक* : २० ऑक्टोंबर २०२४, *3 रा रविवार*

⏱️ *वेळ* : सकाळी 10 am ते 12 pm या वेळेत

*📯वक्ते*
*वैद्य. सोहन पाठक*

🗺️ *स्थळ* : गजानन महाराज प्रसादालय VIP हॉल.गजानन महाराज मंदिर समोर.

https://maps.app.goo.gl/Tu8rzAhmfwjfrxHG9

📱 *पूर्वनोंदणी आवश्यक*

त्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरून द्यावा.

https://docs.google.com/forms/d/1Z2Pexb_Q2zMkGoLsUKfghlE7C9vvjtid0U6fkK3MPCA/edit

काही अडचण असल्यास संपर्क करावा.
क्लिनिकल मीटिंग प्रमुख-

वैद्य. अमित वैष्णव
9561333566.

वैद्या. आरती कुरील
9763960256.

NirogStreet Ncism India Vinay Welankar Deerghayu Ayurvedalaya #आयुर्वेदव्यासपीठ

आयुर्वेद व्यासीठ छ संभाजीनगर आयोजित *Clinical meeting - ग्रहणी रुग्णानुभव* हे चर्चासत्रआज *दिनांक २८ सप्टेंबर २०२४* रोजी...
29/09/2024

आयुर्वेद व्यासीठ छ संभाजीनगर आयोजित *Clinical meeting - ग्रहणी रुग्णानुभव* हे चर्चासत्र
आज *दिनांक २८ सप्टेंबर २०२४* रोजी गजानन महाराज प्रसादलय हॉल येथे संपन्न झाली. या चर्चा सत्रासाठी *वै.अमोल देवरे सर* आणि *वै. पंकज मुळे सर* हे वक्ते म्हणून लाभले होते. त्यांचे स्वागत वैद्य विनय सेवलीकर यांनी केले.

चर्चासत्रात वैद्य देवरे सर यांनी आपल्या विविध व्याधींचा चिकित्सेत कशाप्रकारे रुग्णांना ग्रहणी विचार करत यश प्राप्त केले, हे सांगितले त्यामध्ये वारंवार प्रतिश्याय, Glutane intolerance इ. व्याधींविषयी आपले अनुभव सांगितले .
तर वै मुळे सर यांनी ग्रहणी विकार संदर्भातील मूळ जठराग्नि तसेच धात्वग्नी हे कशाप्रकारे दुष्ट होतात तसेच ग्रंथोक्त ग्रहणी व्याधीचा चिकित्सीय दृष्टिकोन त्यांनी नमूद केले.
या चर्चासत्रसाठी ज्येष्ठवैद्य *मा.वैद्य आनंद कट्टी सर*, *मा. वैद्य सोहन पाठक सर*, *वैद्य परेश देशमुख सर* यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या चर्चासत्रात शहरातील ५० वैद्यांची उपस्थिती होती.

#ग्रहणी - रुग्णानुभव*

#क्लिनिकल मीटिंग*
#आयुर्वेदव्यासपीठ

#गजानन महाराज मंदिर सभागृह*

🚨 *जाहीर निषेध* 🚨 #17ऑगस्ट  #बंद #वैद्यकीय सेवा #न्यायकलकत्ता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा नि...
17/08/2024

🚨 *जाहीर निषेध* 🚨
#17ऑगस्ट
#बंद
#वैद्यकीय सेवा
#न्याय

कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा निषेध म्हणून उद्या दिनांक १७ ऑगस्ट रोजी सर्व आत्ययिक चिकित्सा वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे
*आयुर्वेद व्यासपीठ तर्फे देखील सर्व बी ए एम एस पदवीधरांनी उद्या आपापले दवाखाने बंद ठेवून या अमानुष घटनेचा निषेध नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.*
तसेच या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर करून गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे.

#आयुर्वेदव्यासपीठ
शाखा छ.संभाजीनगर

*आयुर्वेद व्यासपीठ* *छत्रपती संभाजीनगर* #क्लिनिकलमीटिंग - जुन 2024🪷🪷🪷🪷🪷🪷🪷*केश आणि आयुर्वेद*🪷🪷🪷🪷🪷🪷🪷> दिनांक 22/6/24 रोजी ...
22/06/2024

*आयुर्वेद व्यासपीठ*
*छत्रपती संभाजीनगर*
#क्लिनिकलमीटिंग - जुन 2024
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
*केश आणि आयुर्वेद*
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
> दिनांक 22/6/24 रोजी आयुर्वेद व्यासपीठ, छत्रपती संभाजीनगर येथे , "केशविकार आणि आयुर्वेद चर्चासत्र" या विषयावर क्लिनिकल मीटिंग वेळ 3: 40 pm ते 5:10 pm या वेळेत, श्रद्धा आयुर्वेद क्लिनिक येथे संपन्न झाली.

आदरणीय ज्येष्ठ वैद्य.सोहन पाठक सर व वैद्य. आनंद कट्टी सर यांचे मार्गदर्शनाने
"केश आणि आयुर्वेद" या विषयावर वैद्यांचे चर्चासत्र संपन्न झाले.

क्लिनिक मीटिंगमध्ये वैद्या चामरगोरे मॅडम यांनी चर्चासतत्राची सुरूवात केश यांचे आधुनिक तसेच आयुर्वेदमधील शारिररचना व क्रिया, तसेच केशविकार, अधूनिक काळातील हेतू सेवन याची माहिती देऊन केली. त्यानंतर वैद्य. संकलेचा सर यांनी"केश"चे पांच भौतिक्त व पांचभौतिक चिकीत्सा याविषयी माहिती दिली, वैद्या परिहार मॅडम यांनी शिरोधारा ,वैद्य अजय देशमुख यांनी केश व स्नेह (शारीरिक व मानसिक) यांचा विचार कसा करता येऊ शकतो, याविषयी माहिती दिली. वैद्य.अमोल देवरे यांनी चिकीत्सा सिद्धांत - ग्रंथाचे महत्व , स्त्रोतस व केश सबंध आणि स्वा:नुभव याविषयी माहिती दिली. इतर वैद्यांनी स्वा:नुभव, अनुभूत औषधी योग, द्रव्य विचार, हेतु व दोष संबंध याविषयी सविस्तर चर्चा केली व ज्येष्ठ वैद्य. आनंद कट्टी यांचे या विषयावर मार्गदर्शन केले.

क्लिनिकल मीटिंगची सांगता वैद्य अमित वैष्णव यांनी क्लिनिक मीटिंगचा सार , नविन वैद्यांची ओळख तसेच आयुर्वेद व्यासपीठ संभाजीनगर शाखेकडून घेतले जाणारे विविध उपक्रम याची माहिती देऊन व पुढील क्लिनिक मीटिंग विषयी माहिती देऊन केली.
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

Namaste/Greetings!!!*Association Ayurveda Academy (AAA) London---UK,* Organizes Webinar *”Management of Spine & Joint Di...
06/01/2024

Namaste/Greetings!!!

*Association Ayurveda Academy (AAA) London---UK,* Organizes Webinar *”Management of Spine & Joint Disorders Through Ayurveda",*
*Eminent Speaker- Dr. Bhairav B. Tawshikar Kulkarni*
*Professor & HOD, Kayachikitsa Department, Dr. Vedprakash Patil Ayurvedic Medical Ccollege & Research Institute, India 🇮🇳*

*Date & Time - 10th January 2024.*
*Requesting everyone to Join by ZOOM at 3:00pm (UK Time), 1600 hrs (CET - Paris Time), 8:30pm IST (Indian Standard Time).*

We warmly invite everyone to participate and enhance one's Ayurvedic & Yogic Wisdom.

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86805857935?pwd=cTBPTE5XSjhMYjNNT05BeHQ3Y0w4UT09

Meeting ID: 868 0585 7935
Passcode: 600859

Kind Regards,
*Team Association Ayurveda Academy(AAA) , London , UK 🇬🇧*

धन्वंतरी जयंती दिनी आयुर्वेद  व्यासपीठ अध्यक्ष छ संभाजीनगर (वैद्य परेश देशमुख) यांचे मनोगतदैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध
10/11/2023

धन्वंतरी जयंती दिनी
आयुर्वेद व्यासपीठ
अध्यक्ष छ संभाजीनगर (वैद्य परेश देशमुख) यांचे मनोगत
दैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध

आयुर्वेद व्यासपीठ च्या वतीने धन्वंतरी जयंती चा कार्यक्रम वैद्यवर्गाच्या उपास्थित छत्रपति संभाजीनग़र येथे पार पडला.सालाबा...
10/11/2023

आयुर्वेद व्यासपीठ च्या वतीने धन्वंतरी जयंती चा कार्यक्रम वैद्यवर्गाच्या उपास्थित छत्रपति संभाजीनग़र येथे पार पडला.

सालाबादप्रमाणे ज्येष्ठांपासून सर्व वैद्यांनी एकत्र येऊन भगवान श्री धन्वंतरी जयंती साजरी केली.

नव वैद्यांचे स्वागत
शहरात नव्याने प्रॅक्टिस सुरू केलेल्या वैद्यांचे स्वागत सन्मान अनुभवी जेष्ठ वैद्यांनी केले.
~ वैद्या प्रतिभा हाळनोर चितळकर
~ वैद्या हर्षिता पाटोदी
~ वैद्य लोंढे
~ वैद्या लोंढे

प्रसाद रुपी व्याख्यान
वैद्य सोहन पाठक यांचे प्रॅक्टिस मध्ये उपयुक्त व्याख्यान झाले.

भिषक चतुष्पाद - परिचारक सन्मान
रुग्णालयात काम करणारे परिचारक कु साक्षी वाघ यांचाही सन्मान करण्यात आला.
मंगलमूर्ती हेल्थकेअर येथे झालेल्या या कार्यक्रमात वैद्य संतोष नेवपूरकर, वैद्य सोहन पाठक, वैद्य आनंद कट्टी, वैद्य वैद्य परेश देशमुख, भैरव कुलकर्णी वैद्य रवींद्र बोर्डे, वैद्य विमलेश सेठिया, वैद्य रितेश संकलेचा, वैद्य माधुरी बोर्डे, वैद्य कमलेश मुथा वैद्य पंकज मुळे, वैद्य अमित वैष्णव वैद्य अजय देशमुख व वैद्य विनय सेवलीकर आदी उपस्थित होते.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
श्री धन्वंतरी चे कृपाछत्र आपणा सर्वांवर राहो, ही प्रार्थना.🙏🏻
☘️🍁☘️☘️🌼🌼☘️☘️🍁☘️☘️

03/04/2023

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurved Vyaspeeth Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayurved Vyaspeeth Aurangabad:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share