Dr. Amol Durande

  • Home
  • Dr. Amol Durande

Dr. Amol Durande वैद्यकीय सेवा, सामाजिक कार्य

परिवर्तन प्रतिष्ठान आयोजित राजेश्वर हॉस्पिटलच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर  #स्थळ: राजुरी, ता. करमा...
02/11/2024

परिवर्तन प्रतिष्ठान आयोजित
राजेश्वर हॉस्पिटलच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त
भव्य रक्तदान शिबिर

#स्थळ: राजुरी, ता. करमाळा

#शुभहस्ते
पृथ्वीराज भैय्या पाटील
(सरपंच जेऊर)

#प्रमुख_उपस्थिती
शंभूराजे जगताप
(युवा नेते)

'स्वप्ने ते नाही जे आपण झोपेत पाहतो, स्वप्ने ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत'. असे प्रेरणादायी विचार युवा पिढीला देऊन...
15/10/2024

'स्वप्ने ते नाही जे आपण झोपेत पाहतो, स्वप्ने ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत'. असे प्रेरणादायी विचार युवा पिढीला देऊन, आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करणारे, अत्यंत साधी राहणी, परोपकारी वृत्ती आणि देशाच्या प्रगतीचा ध्यास असणारे आदर्श व्यक्तिमत्व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#भारतरत्न #मिसाईल_मॅन
#डॉ_अमोल_दुरंदे

आज जागतिक टपाल दिन. आजच्या समाज माध्यमाच्या जमान्यात पत्र पाठवणे, दुर्मिळ झाले असले तरी आज देखील पोस्ट खाते आपली सेवा अग...
09/10/2024

आज जागतिक टपाल दिन. आजच्या समाज माध्यमाच्या जमान्यात पत्र पाठवणे, दुर्मिळ झाले असले तरी आज देखील पोस्ट खाते आपली सेवा अगदी चोखपणे गाव खेड्यापर्यंत पोहचवत आहे. चालू घडीला भारतीय डाक सेवा करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे. पोस्टाच्या सर्व कर्मचाऱ्यांना जागतिक टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#टपाल #इंडियन_पोस्ट #भारतीय_डाक #करमाळा

 #कौतुकास्पदराजुरी (ता. करमाळा) गावचे सुपुत्र पै. शुभम आजिनाथ शिंदे यांची 'हॅमर थ्रो' या खेळ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निव...
09/10/2024

#कौतुकास्पद

राजुरी (ता. करमाळा) गावचे सुपुत्र पै. शुभम आजिनाथ शिंदे यांची 'हॅमर थ्रो' या खेळ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन! शुभम आपण केलेल्या सुवर्ण कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपणांस आगामी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
#राजुरी #करमाळा #हॅमर_थ्रो #अभिनंदन

आमचे मार्गदर्शक, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, मा. श्री. रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परिवर्तन प्र...
29/09/2024

आमचे मार्गदर्शक, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, मा. श्री. रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परिवर्तन प्रतिष्ठान व राजेश्वर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आमचे मार्गदर्शक, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, मा. श्री. रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परिवर्तन प्रतिष्ठान व राजेश्वर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजेश्वर हॉस्पिटल कोर्टी येथे मोफत आंबा रोप वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे मा. आमदार नारायण आबा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी भूषविले. यावेळी परिसरातील गरजूंना आंबा रोपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी राजेंद्र भोसले( सरपंच, राजुरी), मनोहर कोडलिंगे (सरपंच, पोंधवडी), सतीश शिंदे(उपसरपंच राजुरी), श्रीरंग मेहेर साहेब, भारतशेठ क्षीरसागर, प्रकाश पारखे, मंगेश अभंग सर, आबा अभंग, रुपचंद गावडे, शहाजी हुलगे, दिनकर हुलगे,बाबा महाराज हगारे, नवनाथ आखाडे, आबासाहेब टापरे, विजय महाराज अभंग, बंडू शिंदे, बाळू पारखे, नवनाथ दुरंदे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#परिवर्तन_प्रतिष्ठान #करमाळा #रोहित_दादा_पवार #वाढदिवस #कर्जत #जामखेड #रोप_वाटप #निसर्ग #पर्यावरण #डॉ_अमोल_दुरंदे #कोर्टी #राष्ट्रवादी #नारायण_आबा_पाटील #सुभाष_आबा_गुळवे

आमचे मार्गदर्शक, कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, फायरब्रँड आमदार मा. श्री. रोहित दादा पवार आपणांस वाढदिवसा...
29/09/2024

आमचे मार्गदर्शक, कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, फायरब्रँड आमदार मा. श्री. रोहित दादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!
#कर्जत #जामखेड #वाढदिवस #रोहित_दादा_पवार #डॉ_अमोल_दुरंदे #अभिष्टचिंतन

 #अभिनंदनआमचे मार्गदर्शक, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार लोकनेते मा. श्री. निलेशजी लंके साहेब यां...
27/09/2024

#अभिनंदन

आमचे मार्गदर्शक, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार लोकनेते मा. श्री. निलेशजी लंके साहेब यांची केंद्रीय ऊर्जा खात्याच्या स्थायी समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
#निलेश_लंके #खासदार #अहिल्यानगर #लोकनेते #अभिनंदन #करमाळा #डॉ_अमोल_दुरंदे

निसर्ग आणि पर्यटन ही एकमेकांना पूरक अशी गोष्ट. आज जगभर अनेक पर्यटन स्थळांना विशेष दर्जा आणि महत्व प्राप्त झालेय. हे त्या...
27/09/2024

निसर्ग आणि पर्यटन ही एकमेकांना पूरक अशी गोष्ट. आज जगभर अनेक पर्यटन स्थळांना विशेष दर्जा आणि महत्व प्राप्त झालेय. हे त्यांच्या वैविध्यपूर्ण इतिहासाचे महत्व आणि त्याची रचना यावर ठरले असले तरी आपल्या भागात ही अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत की आपल्या सर्वांच्या नजरेआड आहेत किंवा प्रकाशझोतात नाहीत.

आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने या अशा दडलेल्या पर्यटन स्थळांबद्दल लोकजागृती घडवून आणू त्याचबरोबरच स्थानिक नागरिकांच्या व्यवसायाला ही हातभार लावू. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देत आनंद घेऊ.

धकाधकीच्या जीवनात अडकून राहिलेल्या प्रत्येकाला जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! चला आजचा दिवस पर्यटन ठिकाणी जावून साजरा करू!

#जागतिक_पर्यटन_दिवस #पर्यटन #अमोल_दुरंदे

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, मा. श्री. रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परिवर्तन प्रतिष्ठान व राजेश्व...
26/09/2024

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, मा. श्री. रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परिवर्तन प्रतिष्ठान व राजेश्वर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने #मोफत_आंबा_रोप_वाटप

#शुभहस्ते
मा. श्री. नारायण आबा पाटील
(मा. आमदार करमाळा विधानसभा)

#कार्यक्रमाचे_अध्यक्ष
मा. श्री. सुभाष आबा गुळवे
(उपाध्यक्ष, बारामती ॲग्रो)

#वेळ_दिनांक: रविवार दि, २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता.
#स्थळ: राजेश्वर हॉस्पिटल कोर्टी, ता. करमाळा

: Akshay Akhade & Rangachitra Media
#परिवर्तन_प्रतिष्ठान #करमाळा #रोहित_दादा_पवार #वाढदिवस #कर्जत #जामखेड #रोप_वाटप #निसर्ग #पर्यावरण #डॉ_अमोल_दुरंदे #कोर्टी

24/09/2024

सवलतीच्या दरात उपचार मूळव्याध उपचार शिबीर!

परिवर्तन प्रतिष्ठान कोर्टी व महाराष्ट्रातील प्रसिध्द मुळव्याध तज्ञ डॉ. प्रदिप तुपेरे यांच्या संयुक्त विद्यमाने सवलतीच्या दरात मूळव्याध उपचार शिबीर!

#शिबीर : रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ३ वा. (नाव नोंदणी आवश्यक)

#पत्ता
डॉ. दुरंदे हॉस्पिटल, करमाळा रोड, कोर्टी

#नाव_नोंदणीसाठी_संपर्क
9960455946, 9960868764, 9730320204

#शिबीर #राजेश्वर_हॉस्पिटल #उपचार #कोर्टी #करमाळा

शिक्षणाची ज्ञानगंगा गावोगावी पोहचविणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे खरे जनसेवक आहेत. ज्ञानाचा दिवा महाराष्ट्रातल्या मनामनात ...
22/09/2024

शिक्षणाची ज्ञानगंगा गावोगावी पोहचविणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे खरे जनसेवक आहेत. ज्ञानाचा दिवा महाराष्ट्रातल्या मनामनात पेटविणारे, तसेच लोकांच्या मनात स्वाभिमान रुजवणारे कर्मवीर आण्णा म्हणजे साक्षात देवमाणूस... देव दगडात नसतो तर तो माणसात असतो, हे हेरून माणसामध्ये माणुसकी कर्मवीरांनी रुजवली. 'शिक्षणमहर्षी' भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

Address


Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Saturday 09:00 - 17:00
Sunday 09:00 - 17:00

Telephone

+919960455946

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Amol Durande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Amol Durande:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram