02/01/2025
लेख २
दोष, धातू, मल म्हणजे नक्की काय ?? (१)
आपल्या नेहमी ऐकिवात असलेली पुढील काही वाक्य :
" अरे मला पित्त झालंय..." ; " आजीला वाताचा त्रास होतोय..."; " दीड महिन्याच्या सोनूला सारखा कफ होतो..." ई. अशा प्रकारची वाक्य आपल्या नेहमी कानावर पडत असतात...मग प्रश्न पडतो की हे वात पित्त कफ नेमके आहेत तरी काय ??
ग्रंथात एक श्लोक आला आहे - ' दोषधातुमलामूलं हि शरीरम् । ' म्हणजे काय तर दोष धातू मला पासूनच शरीर बनले आहे. हे शरीराचे Basic constituents आहेत. They are structural and functional units of human body. जसे झाडाच्या मुळांवर पूर्ण झाड उभे असते तसेच ही शरीराची मूळं आहेत. यांच्या संतुलनावर शरीराचे पूर्ण संतुलन अवलंबून आहे. वात, पित्त आणि कफ यांना दोष म्हणतात. धातू आणि मलांना दूषित करतात म्हणून दोष. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सात धातू आहेत. शरीराचे मुख्य घटक अवयव म्हणून धातू. आणि पुरीष, मूत्र, स्वेद हे मल ( waste products). दुसऱ्यांना मलिन करतात म्हणून मल.
✓ वात दोष - वायू तत्व + आकाश तत्व यापासून बनलेला.
(It is that constituent which brings about movement in our body. Every movement in our body right from micro to macro level is governed by Vaat dosh.)
✓ पित्त दोष - अग्नि तत्व+ जल तत्व.
[ It is that constituent which brings about digestion, transformation and change in our body. Heat in our body is a property of pitta dosh]
✓ कफ दोष - जल तत्व+ पृथ्वी तत्व.
( It is that constituent which brings union, stability and strength to our body.)
या तीनही दोषांचे गुण (Quality /Properties) आणि कर्म (Action) सांगितले आहेत ज्या आधारावर ते शरीर कार्य चालवतात. त्यांच्या स्थान आणि कर्मानुसार प्रत्येकाचे पाच प्रकार आहेत.
वाताचे प्रकार - प्राण,व्यान,उदान,समान,अपान.
पित्ताचे प्रकार - भ्राजक, रंजक,आलोचक,साधक,पाचक.
कफाचे प्रकार - अवलंबक, श्लेषक, बोधक, तर्पक, क्लेदक.
वाताचे गुण - रुक्ष, शीत, लघु, सूक्ष्म, चल, विशद (निर्मळ), खर( rough).
पित्ताचे गुण - सस्नेह, उष्ण, तीक्ष्ण, द्रव, अम्ल, सर, कटु ( तिखट ).
कफाचे गुण - गुरू,शीत, मृदु,स्निग्ध,मधुर,स्थिर, पिच्छिल(बुळबुळीत).
वाताचे कार्य - चालणे, बोलणे, श्वास आत घेणे, सोडणे, कुठलीही क्रिया करणे ई.
पित्ताचे कार्य - बघणे ( दृष्टी), मानस भाव ( emotions वर control), अन्नाचे पचन, त्वचेवरील लेपांचे शोषण (Absorption) ई.
कफाचे कार्य - शरीराला आणि मनाला स्थैर्य आणणे, जीभेला रसांचे ज्ञान करवणे ( Taste sensation), अन्नाला ओलसरपणा आणणे ई.
अशा प्रकारे आपण दोषांबद्दल सविस्तर बघितले. पुढील लेखात आपण धातू आणि मलांबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
वैद्य. सानिका गाडगीळ.
B.A.M.S. MD.
अरुला आयुर्वेदीय चिकित्सालय, कोल्हापूर.