26/06/2022
*आज 25 june( World Vitiligo day) त्या निमित्ताने-*
' *श्वित्र किंवा पांढरे डाग* ' या रोगाने जगातील *0.5-1%* लोक ग्रस्त आहेत.भारतात याचे प्रमाण *8.8%* इतके आहे.म्हणजे दुसर्या देशांपेक्षा आपल्या देशात श्वित्राचे प्रमाण खुपच आहे आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे.आपल्या शरीरात त्वचेला प्राकृत रंग त्या ठिकाणी असणार्या *melanin* या घटकामुळे प्राप्त झालेला असतो.श्वित्र या आजारात काही कारणामुळे शरीराच्या काही भागात *melanin* हे द्रव्य निर्माण होत नाही म्हणुन त्या ठिकाणची त्वचा पांढरी दिसते.हा रोग संसर्गजन्य नाही म्हणजे एकत्र जेवल्याने,स्पर्शाने,शरीर संबंधाने किंवा दुसर्या कोणत्याही कारणाने हा रोग दुसर्यांना होत नाही,परंतु असा रोग असणार्या लोकांमध्ये cosmetic दृष्टीकोणातुन न्युनगंड निर्माण होतो.स्त्री व पुरुष यांच्यामध्ये समान प्रमाणात व कोणत्याही वयात दिसणारा असा हा रोग आहे.हा रोग त्वचे पुरताच मर्यादित राहतो व त्यापासुन दुसरा कोणताही आजार होत नाही.मानसिक कारणे उदा चिंता,रग इ मुळे हा रोग वाढतो.आपल्या देशात याचे प्रमाण जास्त का? याचे उत्तर आपल्याला आयुर्वेदात मिळते.आयुर्वेदात " *विरुध्दाहार* " हा श्वित्राचा महत्वाचा कारण सांगितलेला आहे.आयुर्वेदात विरूध्दाहाराचे *१८ प्रकार* सांगितले आहेत.आपल्याला व्यवहारामध्ये दुध+मासे हे विरूध्द आहेत एवढेच माहीत असते परंतु आयुर्वेदात विरूध्दाहाराचा एवढा संकुचीत विचार नाही.भाकरी/चपाती दुधाबरोबर सेवन करणे *(संयोग विरुध्द)* मध गरम पाण्याबरोबर घेणे *(संयोग* *विरुध्द)* ,दुध व फळे एकत्र करुन खाणे उदा. फ्रुड सलाड *(संयोग विरुध्द)* ,मध गरम करुन घेणे *(संस्कार विरुध्द)*, जेवणानंतर लगेच व्यायाम करणे/ झोपणे *(परिहार विरुध्द)* , चायनिज़,पिझ्झा,बर्गर,इडली,डोसा इत्यादि फास्ट फुड सेवन करणे *(देश विरुध्द)*, उन्हाळ्यात अतिचहापान/ थंडीच्या दिवसात आईसक्रिम वगैरे थंड पदार्थ सेवन करणे *(काल विरुध्द)*, गरम गरम जेवणा सोबत cold drinks घेणे *(संयोग विरुध्द)* , शिळं अन्न सेवन करणे *(संपद् विरुध्द)* जेवण करतानाचे नियम न पाळता जेवणे उदा. सावकाश व एकाग्र मनाने जेवावे इत्यादि जेवणाचे नियम न पाळता जेवणे *(विधी विरुध्द)* अशी विरुध्दाहाराची काही व्यवहारीत उदाहरणे आहेत.ही सर्व श्वित्राची महत्वाची कारणे आहेत.आयुर्वेदिक दृष्टीकोणातुन श्वित्राचे योग्य कारण,प्रकार यांचा विचार करुन चिकित्सा केली असता रुग्णास लक्षणीय उपशय देता येतो.
शरीरावर कुठेही श्वित्रा सारखा पांढरा चट्टा दिसला असता लवकरात लवकर डिग्री असणार्या registerd आयुर्वेदिक डॉक्टराकडुन उपचार करुन घ्यावा.आयुर्वेद हे एक शास्त्र आहे आणि शास्त्रीय पध्दतीने जर उपचार झाला तरच श्वित्रा मध्ये उपशय मिळवता येत
डॉ ज्योती मोहन -सुर्यवंशी
स्त्री रोग त्वचा रोग व केसविकार तज्ञ