
25/07/2025
1️⃣ भीतीचं मूळ कुठं असतं?
1. बालपणातल्या आठवणी
लहानपणी झालेले अपमान, शिक्षा किंवा पालकांन कडुन झालेले दुर्लक्ष. सतत अपमान होण्याचे अनुभव मनात खोलवर घर करून जातात. त्यातून “मी पुरेसा नाही” ही भावना निर्माण होते.
2. सामाजिक दबाव
‘लोक मला काय म्हणतील?’ ही सर्वात मोठी भीती प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते . वेगळ टाकले जाण्याची भीती असते ती. त्यामुळेच काम करण्याची जबाबदारी घेताना इतराना जस हव आहे तस करण्याचा अट्टहास असतो. आपलं खरं स्व स्वतः लपवून ठेवण्यामागचं हे एक मोठं कारण असतं.
3. अपयशाचं स्मरण
पूर्वीचा एखादा अपयश अनुभव मनात खोल रुतलेला असतो. त्याच्या आठवणींच्या सावलीतच आपण नवीन संधी टाळतो. नवीन काही करण्याची भीती वाटते.
■ भीतीचं रूपांतर हे अनेकवेळा अपयशा कडे जाण्यात होत.
●जसे की निर्णय घेण टाळणं.
“ आता जरा थांबुया. नंतर पाहू, वेळ येऊ दे.” असं म्हणत आपण निर्णयच घेत नाही.
● राग, चिडचिड
बरेचदा भीतीची भावना थेट न दाखवता, चिडचिडे पणात, रागाच्या रूपात बाहेर पडते.ह्यातुन बरेचदा भांडण, आरडाओरड, सामानाची आदळआपट अशा वर्तना मधुनही भीती बाहेर पडत असते .
●सततची चिंता
भविष्यातील काळजी ,पुढे काय होईल? याचा अति विचार म्हणजे disguised fear.