30/05/2018
डॉ. सॅमुएल हानेमन
एक सच्चा वैज्ञानीक
जागतीक होम्योपैथिक दिवसाच्या सगळ्यांना मंगल कामना. आज डॉ. सॅमुएल हानिमन, एम.डी. यांची जयंती आहे. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा, जिव्हाळ्याचा दिवस आहे.
२०१४ साली भारत सरकारने दिल्लीत एक सर्वे केला. त्यात त्यांना असे आढळले की ९० टक्के लोकांची आधुनिक वैद्द्यकशास्त्राच्या डॉक्टरकड़े औषधोपचार घेण्याची पसंती होती. ४ टक्के भारतीय चिकित्सा पद्धतीकड़े आणि ३ टक्के होम्योपैथीक औषधी पद्धतिकड़े लोकांचा कल होता.
फ़क्त ३ टक्के लोकांचा कल हा होम्योपैथिक औषध घेण्याकडे आहे हे वास्तववादी चित्र आहे.
आज होमियोपैथी गेले दोन शतके लोकांच्या सेवेला आहे आणि ती ३ टक्के लोकांची पसंती आहे. हे चित्र काही निराशा करणारे नाही. पण होमियोपैथ साठी जास्त उत्साहाचे सुद्धा कारण होवू शकत नाही. इतर शास्त्राशी तुलनात्मक अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की भारतीय चिकित्सा पद्धति जरी ३ हजार वर्षापासून इथे अस्तित्वात आहे तरी सुद्धा तीची लोकप्रियता ही त्या मानाने म्हणजे ४ टक्के ही चिंतेचीच बाब आहे.
आधुनिक वैद्दक शास्त्र हे रुढ़िवादी पाच्छिमात्य औषध शास्त्राच नविन रूप आहे. ते लोकांना जास्त आकर्षित करते. ९० टक्के लोक त्याचे चाहते आहेत.
भारतातील लोक आजार बरा करण्याकरीता आधुनिक वैद्दकशास्त्रापासून भारतीय चिकित्सापद्धति तसेच होमियोपैथी सुद्धा चालू ठेवतात. म्हणजे ताटात सगळे वाढून ठेवलेले असते फ़क्त खानार्याची इच्छा त्याला त्याच्या गरजेप्रमाणे का्य हवे आहे ते. फ़क्त आधुनिक वैद्दक शास्त्रात नमूद केलेले औषधच घेणार असा म्हणनारा क्वचितच सापडेल. मरता क्या न लेता. अशी अवस्था आहे.
आधुनिक वैद्दक शास्त्राला लोकांच प्राधान्य असण्याचे एक कारण हे ही आहे की लोकांची एक धारणा आहे की ते विज्ञान संगत आहे. आणि विज्ञान आज जगावर राज करत आहे. विज्ञानाने आजच जग बदलवून टाकले आहे आणि त्याला विरोध करने म्हणजे स्वतःला मुर्ख बनवने आहे अस होईल. आधुनिक वैद्दक शास्त्र अनेक नविन तंत्रज्ञानाचा वापर करते. आजाराचे निदान करण्यापासून तर शस्त्रक्रिया आणि औषधि पैकिंग पर्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. अभ्यासात हुशार तल्लख लोक एम.बी.बी.एस. करतात आणि बाकी लोक इतरत्र वळतात. ही असणारी वस्तुस्तिती आहे.
हुशार तल्लख लोकांची ती निवड आहे म्हणून ती असरदार आहेच. अशी ज्यांची धारणा आहे असे लोक त्याचीच निवड करेल यात शंका नाही. असे लोक स्वतःच्या निरिक्षण निरपेक्ष बुद्धीचा वापर करीत नाही आणि डोळे झाकून ते स्वीकार करतात. आज आपल्यासाठी का्य योग्य आणि अयोग्य हे आपण इन्टरनेटवर शोधतो आणि जो काही तो सांगेल (जी माहिती जाणीवपूर्वक लोकांचे मत बदलण्यासाठी पैसे देवून टाकली जाते) त्यावर आपला विश्वास बसतो.
सामान्यतः लोक आजाराविषयी माहिती शोधतात. त्याच्यात लक्षणे का्य असतात, शारीरिक बदल का्य घडतो, शारीरिक कार्य आणि पेशीमधील बदल यावर रोगनिदान आपण समजवून घेतो. ही माहिती खरे पाहता जीवशास्त्रीय असते आणि चिकित्सापद्धतिनुसार ती बदलत नाही, तर ती सर्व औषधशास्त्रासाठी सामान्यज्ञान असते. शरीररचनाशास्त्र (एनाटोमी), शरीरक्रियाशास्त्र (फिजियोलॉजी), विकृतीशास्त्र (पैथोलॉजी) सारखे विषय सर्व डॉक्टरकरीता सारखेच असतात. त्यामध्ये कोणत्याही चिकित्साशास्त्राचे मतभेद नाही. म्हणून ते काही आधुनिक वैद्दक शास्त्राची मक्तेदारी नाही.
डॉक्टर म्हटले की आजार बरे करणारे. म्हणून त्यांची परिणामकारकता त्या त्या वैद्दक शास्त्राच्या सिद्धांत आणि अभ्यासावर अवलंबून असतो. सांगायचा मुद्दा हा की आजारा विषयी माहिती जेव्हा आपण शोधतो ती वेगवेगळ्या संकेतस्थळावर आपल्याला मिळते. ही संकेतस्थळे आजाराच्या माहिती सोबत आधुनिक वैदक शास्त्राचा इलाज सांगतात. मग आपोआपच आपली अशी धारणा होते की यांना हा आजार कळतो तर ते तीथे लिहिल्याप्रमाणे त्यांच्या औषधाने बरे सुद्धा होतील. आणि तसा उपचार आपण घेतो. आता हीच चाल भारतीय चिकित्साशास्त्र आणि होमियोपैथीचे काही डॉक्टर सुद्धा अवलंबत आहेत.
एखादी बाब वारंवार आपल्या मनावर बिंबवली की आपण त्याची चिकित्सा न करता मानतो आणि त्याकडे चारही बाजूने बघण्याची दृष्टी गमावतो ही सुद्धा असणारी वास्तविकता आहे.
माझा सांगण्याचा हा उद्देश नाही की हा मार्ग चुकीचा आहे आणि तो मार्ग योग्य आहे. फ़क्त इतकेच लक्षात घ्यावे की मुंबईला जाण्याचा मार्ग तुम्ही निवडला आणि तसे योग्य मार्गक्रमण केले तर तुम्ही नक्कीच मुंबईला पोहचाल.
जसे एखाद्याची लघवी अडकली असेल, आणि त्याच्या मुत्राशयाच्या थैलित इतकी ताकत नसेल की तो त्याला रिकामी करू शकेल तर त्याचा आजार लक्षात घेवुन त्या मुत्राशयाच्या थैलित पहिलेसारखी ताकत यावी यासाठी औषधे द्यावी लागेल जेणेकरून आजार दूर होवून पाहिलेसारखी लघवी तो करू शकेल. तात्पुरता सुच्या मार्गाने नळी टाकुन लघवी काढता येईल पण त्याने मुत्रशयाची ताकत येणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाने तात्पुरता उपाय अशाप्रकारे आपण करू शकतो पण त्याने काही आजार ठीक होत नाही. आणि अशाच प्रकारे अनेक आजारात आधुनिक वैद्दक शास्त्र आपली निराशा करते. आजार वाढत जातो स्पेशलिस्ट सुपरस्पेशलिस्ट उच्च तंत्रज्ञान वापरतो पण आजार बरे करण्याकरीता त्याकडे औषधे नसतात. शेवटी आपल्या हाती निराशा येते आणि आजार दैवाचा प्रकोप म्हणून आपण स्वीकार करतो.
आपल्या जीवनात होमियोपैथी औषधाने का्य बदल येवू शकतो याची साधी माहिती सुद्धा आपण ठेवित नाही. कारण साध्या शाबुदानासारख्या दिसणार्या गोळ्या आपल्या जीवनात का्य कामाच्या अशीच धारणा आपण मनात ठेवली असते. जस दिसते तस नसते म्हणून जग फसते. ही म्हण आपण विसरतो. आपल्याला त्याविषयी माहिती नसते आणि चुकीची धारणा असते त्यामुळे योग्य जीवन मार्गाला आपण मुकतो.
आज जागतीक होम्योपैथिक दिवसाच्या माध्यमातून मी तुम्हाला इथे आवाहन करतो की तुम्ही होमियोपैथी विषयी योग्य माहिती ठेवा. ती तुम्हाला कामी येईल.
होमियोपैथीचे जनक डॉ. सॅमुएल हानिमन हे एक तल्लख बुद्धीचे त्याकाळचे एम.डी. डॉक्टर होते. वैज्ञानीक दृष्टिकोण व्यापक होता. पैशाचा लोभ त्यांना नव्हता. त्यांच्या निरीक्षक मनाने जानले की त्यावेळच्या प्रचलित औषधिपद्धतीने रुग्णाला लाभापेक्षा दुष्परीनामच जास्त आहेत. नैसर्गिक आजाराने लोक मरायचे तर उलट चिकित्सापध्दतीच्या दुष्परिणामानेच लोक गतप्राण होत होते. डॉ. हानेमनचे मन संवेदनशील होते. त्यांनी उपासमार सहन केली पण चुकीची कृती करण्यास नकार दिला. आजाराची वास्तविक वैधता जाणन्यासाठी अभ्यास सुरु ठेवला. एका सच्च्या वैज्ञानिकाप्रमाणे प्रयोग सुरु ठेवले. आणि शेवटी प्रयत्नाला फळ मिळाले. रस्ता गवसला.
मानवी मूल्यांवर आधारित आजाराचे उच्चाटन करणारी चिकित्सापद्धति निर्माण केली. मानवकल्याणाकरीता अगणित हालअपेष्ता सहन केल्या. पण करुणा एकदा ह्रदयात वसली की मग मानुस मृत्युला सुद्धा घाबरत नाही मग विरोधकला तो कसा थारा देईल. त्याने सच्च्या वैज्ञानिकाप्रमाणे सांगितले की मी सांगितलेले तंतोतंत जसे आहे तसे करून बघा तुम्हालाही आजार समूळ नाहीसे करता येईल. मी सांगितलेल्या मार्गानुसार जर फळ मिळत नसेल तर मग तुम्ही मला बोला. पण आधी अनुभव घ्या नंतरच बोला. असे खुले आव्हान त्यांनी त्यावेळच्या रुढ़िवादी वैद्दक शास्त्राला दिले आणि ते आजही आहे.
मानवी मूल्यांवर आधारित, खुला वैज्ञानीक दृष्टिकोण असलेली एकमेव चिकित्सापद्धति आज त्याच्या कार्यक्षमतेवर टिकून आहे. त्याला राजाश्रय नसला तरी राजयोग घडवून आणन्याची क्षमता त्याच्यात आहे.
इथे मी ही चिकित्सा पद्धति मानवी मूल्यांवर आधारित आहे असे लिहिलेले आहे. याचा थोडक्यात अर्थ समजून घेवुया. मानव हा शांतीप्रीय आहे. त्याला बुद्धी आहे. करुणा तो जागृत करू शकतो. हे गुण त्याला इतर प्राण्यापेक्षा वेगळ बनवते. हा त्याचा उत्क्रांतीचा भाग आहे. हे शरीर सुद्धा अनेक घटकांवर अवलंबून आहे. भौतिक घटक तर आहेच पण जीवजंतु सुद्धा ह्या जीवनाचे महत्वाचे अंग आहेत. चयापचय क्रियापासून अन्नपचन आणि अनेक महत्वाची संप्रेरके बनविण्याकरीता आपल्याला त्यांच्यावर अवलंबून रहावे लागते. अशा जीवजंतूची व्याप्ति हानीकारक जीवजंतुपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. दुसरे हे की आपली स्वतःची एक रोगप्रतिकारक व्यवस्था आहे. हानीकारक जीवजंतुचे उच्चाटन करण्यासाठी ती सक्षम आहे. आजाराने ती कमकुवत झाली तर त्याचे लक्षणे आपल्याला लक्षात येतात. तेव्हा आपण आजाराला बरे केले पाहिजे नाही की प्रतिजैविके (एंटीबायोटिक्स) वापरून तात्पुरते ती प्रक्रिया थांबवली पाहिजे. असे केले तर तात्पुरती ती आजाराची प्रक्रिया थांबेल पण आजार बरा होणार नाही. मग पुन्हा तसेच लक्षणे जाणवले की पुन्हा पहिले पेक्षा जास्त ताकतिचे प्रतिजैविके वापरले जातात आणि पुन्हा त्या प्रक्रियेला थांबवले जाते. काही दिवस लक्षणे पुन्हा कमी होतात आणि अजुन ते तो कालावधी गेला की आजार जाणवतो. असे खुप वेळा झाले की डॉक्टर सांगतात एंटीबायोटिक्स रेजिस्टेंस आलेले आहे. आणि आपण शहाने पण गाफिल लोक ते मुकाट्याने मानतो. आजार बरा होत नाही वाढत जातो आणि शेवटी जीवघेणे रूप धारण करतो.
आधुनिक वैद्दक शास्त्रात पुन्हा एक पद्धत वापरली जाते त्याचे नाव आहे इम्मुनोसप्रेशंत म्हणजे रोगप्रतिकारक क्षमतेला दाबने. ही तर एंटीबायोटिक रेजिस्टेंस पेक्षाही घातक उपचार पद्धति आहे. याच्यात स्टेरॉयडचा वापर केला जातो. त्याचे घातक परिणाम शरीरावर तर होतात त्याशिवाय विचार करण्याची क्षमता सुद्धा मानुस गमावतो आणि भावनिक उद्रेकला बळी पडतो.
आपणा सर्वांना आधुनिक औषध शास्त्राच्या औषधोपचाराचे दुष्परिणाम तर माहितच आहे पण आपण ते कधी गांभीर्याने घेत नाही. औषध लिहून देणारे डॉक्टर तर घेत नाही, सुजान नागरिक सुद्धा आजारी पडला की त्याच्या विचार करणार्या बुद्धीला लकवा मारतो. रुढ़िवादी वैद्दक शास्त्राने जरी कात बदलून आधुनिक वैद्दक शास्त्राचे नाम धारण केले असले तरी ज्या कारणासाठी डॉ. समुएल हानेमन ने एलोपैथीला नाकारले ते अजुनही त्यांच्याकडून बिंधास्तपने सुरु आहे म्हणून त्यांचा आणि आमचा रस्ता हा वेगळाच राहिल यात शंका नाही. एंटीबायोटिक्स आणि स्टेरॉयड यांच्याशिवाय ज्यांची चिट्ठी पूर्ण होत नाही अशा स्वतःला आधुनिक म्हणून घेणार्या फसव्या वैद्दक शास्त्राला डॉ. हानेमन यांनी दिलेले एलोपैथी हे नाव योग्य आहे हे मी विचारांती सांगू इच्छितो.
जंतुसंसर्गाने झालेले आजार (इन्फेक्शस डिजीज) प्रतिजैविकेशिवाय (एंटीबायोटिक्स शिवाय) होमियोपैथीने बरे होतात. याचाच अर्थ होमियोपैथी आजाराला बरे करते, म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तिला वाव दिल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे नाही एंटीबायोटिक्स रेजिस्टेंस होत, नाही अशे जीवजंतु मरत ज्याच्यावर आपले आरोग्य टिकून आहे. हे सर्व होमियोपैथीक औषधे घडवून आणते आरोग्याला इजा न पोहचविता. रोगप्रतिकारक क्षमतेला हानी न पोहचविता. उलट त्याला वावच मिळतो कार्य करायला. यालाच म्हणतात दुष्परिणामरहीत चिकित्सा करने. म्हणून होमियोपैथी ही मानवी मूल्यांवर आधारित आहे. असे माझे म्हनने योग्यच आहे.
होमियोपैथीक औषधाची वैधता स्वतः डॉ. हानेमन यांनी निरोगी माणसांवर तपासून बघितली आहे. त्यानंतर आताही ती होमियोपैथीच्या अनुसंधान केंद्रात वेळोवेळी तपासली जाते. त्याचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. उलट त्याचे अनेक फायदे आहे. होमियोपैथीची परिणामकारकता आणि संवेदनशीलता आजारावर आहे स्वस्थ शरीर आणि मनावर नाही. म्हणून सरळ ते कल्यानाचेच कार्य करते दुष्परिनामाचे नाही. यास्तव ते मानवी मूल्यांवर आधारित आहे.
सुजनहो डॉ. हानेमनची शेवटची खंत ही होती की जरी होमियोपैथीच्या नावावर अभ्यास करणारे आणि औषधे देणारे भरपूर असले तरी काही थोडकेच बोटावर मोजण्याइतके की जे डॉ. हानेमन यांनी दिलेल्या सिद्धांतानुसार उपचार करतात. त्याग, करुणा, सय्यम, सहनशीलता, बुद्धीप्राविन्य, चिंतक, अभ्यासक हे विशेषण त्यांनी सार्थ करून दाखविले. महत्वाचे म्हणजे आज ज्याला आपण खुल्या ह्रदयाचा वैज्ञानीक (साइंटिस्ट) म्हनू असेच ते होते. अश्या महान व्यक्तीला कोटि कोटि नमन.
जय हानेमन जय होमियोपैथी
डॉ. प्रबोधचंद्र भास्करराव मेश्राम, एम. डी. (होमियोपैथी)
मोबाइल / व्हाट्सअप्प नंबर: 9822548418
ईमेल आई.डी.: drpbmeshram@gmail.com
दिनांक: १० एप्रिल २०१८, हानेमन जयंती