Maske Clinical Pathology Lab

Maske Clinical Pathology Lab Bood Tests
Clinical Pathology
Serology
Biochemistry
Hematology
Covid Compressive Parameters
Hormone Waiting Hall
Test Procedure Room
Consultion Room

Body Profile Check up  Maske Clinical Pathology Lab Mt Pitambar Maske
13/03/2024

Body Profile Check up
Maske Clinical Pathology Lab Mt Pitambar Maske

Maske Clinical Pathology Lab     Mt Pitambar Maske *शीतपित्त म्हणजे काय व अंगावर पित्त उठणे याची कारणे, लक्षणे आणि उपचार...
07/01/2023

Maske Clinical Pathology Lab Mt Pitambar Maske

*शीतपित्त म्हणजे काय व अंगावर पित्त उठणे याची कारणे, लक्षणे आणि उपचार*

शीतपित्ताचा त्रास अनेकजणांना असतो. यामध्ये अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या गांधी काहीवेळाने कमी होतात. मात्र परत परत हा त्रास होत असतो. या त्रासाला शीतपित्त ह्या नावानेसुध्दा ओळखले जाते. ऍलर्जीमुळे अंगावर असे पित्त उठत असते. अंगावर पित्त का येते व अंगावर पित्त उठणे यावरील उपाय याची माहिती सांगितली आहे.

*शीतपित्त म्हणजे काय?*

अंगावर पित्त उठणे या समस्येला
‘शीतपित्त’ असे म्हणतात. प्रामुख्याने थंड हवामानात जास्त प्रमाणात अंगाला पित्त उठत असल्याने या समस्येला 'शीतपित्त' असे नाव दिलेले आहे. शीतपित्ताला आधुनिक वैद्यकीय भाषेत अर्टिकेरिया (Urticaria) किंवा Hives असे म्हणतात तर बोलीभाषेत 'अंगावर पित्त उठणे' असे म्हंटले जाते.

*अंगावर पित्त उठण्याची कारणे*

प्रामुख्याने ऍलर्जीमुळे अंगावर पित्त येते. ज्या पदार्थाची ऍलर्जी (वावडे) आहे, अशा पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेतील विशिष्ट पेशींमधून हिस्टामाइन नावाचा पदार्थ स्रवतो. त्याचा परिणाम म्हणून त्वचेला खाज येते व त्वचेवर लालसर पित्ताच्या लहानलहान सुजयुक्त चकते उठतात.

*कशामुळे अंगावर पित्त येते ?*
कोणकोणत्या पदार्थांमुळे ऍलर्जी होऊन अंगावर पित्त उठू शकते याची माहिती खाली दिली आहे.

◼️काही जणांना विशिष्ट पदार्थ खाल्यानंतर असा त्रास होऊ लागतो. यामध्ये अंडी, शेंगदाणा, काजू, मासे, शेलफिश, मांसाहार, स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा डाळ, तूर डाळ वैगेरे खाद्यपदार्थ यापैकी कशाचीही ऍलर्जी असू शकते. असा पदार्थ खाण्यात आल्यास त्यांच्या अंगावर पित्त उठते.

◼️विशिष्ट औषधे घेत असल्यासही असा त्रास होऊ शकतो. यामध्ये अँटीबायोटिक्स किंवा वेदनाशामक औषधे यांची ऍलर्जी असू शकते. घरातील कुत्री, मांजरी, घोडे इत्यादी पाळीव प्राण्यांच्या केसांची ऍलर्जी असल्यास त्यामुळे अंगावर पित्त उठू शकते.

◼️थंड वातावरण, थंड पदार्थ यामुळे अंगावर पित्त उठू शकते.

◼️सूर्यप्रकाश, उष्ण वातावरण, उष्ण पदार्थ यांची ऍलर्जी असल्यास त्यामुळेही अंगावर पित्त येते.

◼️धूळ, धूर, हवेतील प्रदूषण, परागकण, केमिकल्स यांच्या संपर्कात आल्यामुळे, टेरेलीन, टेरीकाट अशा कपडांची ऍलर्जी असल्यास शितपित्त होऊ शकते.

◼️तसेच पोटामध्ये कृमी व जंत झाल्याने, कीटक चावल्याने किंवा सर्दीसारखे इन्फेक्शन झाल्यामुळेही अंगावर पित्त उठू शकते.

*शीतपित्ताची लक्षणे -*

अंगावर खाज येणे, अंगावर पित्त उठणे, त्वचेवर सूज असणाऱ्या लालसर गांधी किंवा चकते उठणे अशी लक्षणे शीतपित्तामध्ये
असतात.

या त्रासात आलेल्या पिताच्या गांधी व अंगाला होणारी खाज काहीवेळात आपोआप कमी होत असतात. मात्र पुन्हा ऍलर्जी असणाऱ्या पदार्थाच्या संपर्कात आल्यास पुन्हा अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्त उठते.

शीतपित्त किंवा अंगावर पित्त येणे हा त्रास एखाद्या पदार्थाच्या ऍलर्जीमुळे होत असतो. त्यामुळे नेमक्या ऍलर्जीचा ट्रिगर ओळखून त्यापासून दूर राहिल्यास हा त्रास दूर होत असतो. म्हणजे जर एखाद्यास शेंगदाणे खाल्ल्यानंतर असा त्रास होत असल्यास, त्याने शेंगदाणे खाणे बंद केल्यास हा त्रास होणे थांबते. यासाठी नेमकी कशाची ऍलर्जी आहे ते ओळखणे शीतपित्तामध्ये आवश्यक असते.
यासाठी तुम्ही एक लिस्ट बनवू शकता. त्यामध्ये तुम्ही रोज घेत असलेल्या सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची नावे लिस्टमध्ये लिहा. त्यानंतर कोणता पदार्थ खाल्यावर त्रास होतो हे
आपल्या निरीक्षणातून ओळखणे सोपे जाईल. खाद्यपदार्थांची ऍलर्जी नसल्यास ऊन, उष्ण किंवा थंड वातावरण, कपडे, घरातील पाळीव प्राणी यापैकी कशाची ऍलर्जी आहे ते ही निरीक्षणातून ओळखू शकता.

काही जणांना हा त्रास अनेक महिने ते अनेक वर्षेही होऊ शकतो. अनेकजण शीतपित्त उपचारासाठी अँटी-हिसटामीन औषधे घेतात. अशा औषधामुळे खाज तात्पुरती कमी होते मात्र पुन्हा शीतपित्ताचा त्रास उदभवतो. बहुतांशी लोक अंगावर गांधी उठून खाज सुरू झाली की सेट्रीझिन किंवा Ebastine अशा गोळ्या घेतात. याने खाज थांबते आणि तात्पुरते बरे वाटते; पण या औषधांचे दीर्घकालीन दुष्परिणामही अधिक आहेत. कारण या औषधांच्या अधिक सेवनामुळे शरीरातील सर्व स्राव अचानक शोषल्यासारखे होतात. तोंड, घसा कोरडा पडतो. झोप जास्त
लागते. किडनीचे आजार उदभवतात म्हणून या आजारावर अशा गोळ्या घेऊन तात्पुरता उपचार करण्याऐवजी याला मुळापासून बरे केले पाहिजे.

सादर लेख सोशियल मीडिया मधून घेतला आहे. लेखात आपणांस काही अडचण आल्यास आपण आपल्या जवडील फॅमिली डॉक्टर किंवा आयुर्वेदिक डॉक्टर ना भेटून सल्ला घेऊ शकता.👏 ......
लेख आवडल्यास लाइक व शेयर करा माझा पेज ला fallow करायला विसरू नका maske clinical pathology lab

Maske Clinical Pathology Lab       *रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केला तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळ...
06/01/2023

Maske Clinical Pathology Lab

*रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केला तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते !!*

आवळा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आवळा अनेक औषधांमध्ये वापरला जातो. आवळ्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहेत.

त्यात व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नसारखे मिनरल्स असतात, जे अनेक रोगांवर फायदेशीर असतात. जर तुम्ही रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केला तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. पचन, रोगप्रतिकारशक्ती आणि इंफेक्शनसारख्या समस्यांमध्ये आवळा फायदेशीर ठरतो.

*आवळा खाण्याचे फायदे :-*

*पचन समस्या :*
आवळ्याचा आहारात समावेश केल्यास पचनाच्या समस्या दूर होतात. पचन, बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसची समस्या आवळ्याच्या सेवनाने दूर होते. जर तुम्हाला अन्न पचनास त्रास होत असेल, आतड्याची हालचाल नीट होत नसेल तर आवळ्यानं बनवलेल्या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करा.

*प्रतिकारशक्ती वाढवणे :*
आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहे. आवळ्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. आजारांच्या हंगामात आवळ्याचा आहारात समावेश केल्यास सर्दी सारखे संसर्ग होत नाहीत.

*हाडे मजबूत होतात :*
आवळा हाडांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. आवळ्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते ज्याचा उपयोग हाडे मजबूत करण्यासाठी होतो. आवळा खाल्ल्यानं ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि सांधेदुखी यांसारख्या हाडांशी संबंधित समस्यांमध्ये त्रास कमी होतो. हाडांचे दुखणे दूर करण्यासाठी आवळ्याचा ज्युस हा रोज सकाळी घ्या.

*हृदयासाठी फायदेशीर :*
आवळा हृदयाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आवळ्यातील क्रोमियम बीटा हृदयाच्या मज्जातंतूंना ब्लॉकेजपासून वाचवते, ज्यामुळे हृदय चांगले कार्य करते आणि निरोगी राहते.

*डोळ्यासाठी फायदेशीर :*
आवळा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आपली नजर चांगली करण्यास मदत करते. आवळ्यापासून बनवलेला मुरंबा, चटणी यासारख्या गोष्टी खाल्ल्यानं चवीसोबतच दृष्टीही वाढते.

*मधुमेह :*
आवळ्यामध्ये असलेले पोषक तत्व मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

*संसर्ग होण्यापासून होतो बचाव :*
आवळ्यामध्ये असलेले पोषक घटक संसर्ग दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. आवळा बॅक्टेरियाशी लढण्याचे काम करतो. हे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. याच्या सेवनाने सर्दी आणि पोटाच्या संसर्गापासून मुक्ती मिळते.

सादर पोस्ट सोशियल मीडिया मधून घेतला आहे आपणास काही तक्रार असल्यास आपण आपल्या जवडील आयुर्वेदिक डॉक्टर कडून सल्ला घेण्यात यावा ही विनंती...
सादर पोस्ट आवडल्यास लाईक, शेयर, करा व माझा maske clinical pathology lab la या पेज ला fallow करायला विसरू नका 💐👏👏

     Maske Clinical Pathology Lab हिवाळ्यात त्वचेला पोषण देणारे " आमसूल तेल( कोकम तैल):-हिवाळा आला की टीव्हीवर ‘व्यासलीन...
05/01/2023


Maske Clinical Pathology Lab

हिवाळ्यात त्वचेला पोषण देणारे " आमसूल तेल( कोकम तैल):-

हिवाळा आला की टीव्हीवर ‘व्यासलीन’, ‘बॉडीलोशन’ च्या जाहिरातींचा मारा होतो. कारण हिवाळ्यात आपली त्वचा रूक्ष होऊ लागते.

परिणामी कोरड्या आणि पांढ-या पडणा-या त्वचेला पोषण मिळावे म्हणून आपण बॉडीला स्निग्धाचे गुणधर्म मिळवण्यासाठी बॉडी लोशन किंवा व्यासलीन लावतो. मात्र, तुम्हाला माहित आहे जेव्हा व्यासलीनची निर्मिती होण्याआधी लोक आपल्या त्वचेला कशाने पोषण द्यायचे. अनेक जण यावर खोबरेल तेल किंवा तिळाचं तेलं असं उत्तर देतील. जे बरोबर आहे. मात्र, थंडीत त्वचेला रुक्षपणामुळे पडणा-या भेगा, किंवा त्वचेला तडे जाणे हे भरून येण्यासाठी आपल्याकडे एक खास आणि विशेष तेल होते. ते ‘आमसूल तेल’.

आमसूल तेल याला आताच्या भाषेत ‘कोकम बटर’ किंवा ‘कोकम तेल’

आमसूल तेल हे अत्यंत औषधी आणि त्वचेसाठी पोषक असे नॅचरल मॉइस्चराइजर आहे. तुम्हाला कदाचित हे नाव नवीन वाटत असेल मात्र, कोकणात आणि त्याला लागून प्रदेशात हे अजूनही वापरले जाते. थंडीत होट फाटणे, त्वचा तडकणे, पायांना भेगा पडणे इत्यादींवर हे एक रामबाण उपाय आहे. याला आताच्या भाषेत ‘कोकम बटर’ असेही म्हणू शकतो. अमेझॉनवर ‘Kokam Butter’ असे शोधल्यास तिथे ते मिळू शकते. मात्र, कालौघात आपल्याला याचे विस्मरण पडल्यामुळे याचे उत्पादन कमी-कमी होत चालले आहे. परिणामी हे थोडे महाग मिळते.

*आमसूल तेल कसे बनते?*

आमसूल ही कोकणात आढळणारी वनस्पती असते. तिला कोकम असेही म्हणतात. कोकमाच्या फळांपासून विविध पदार्थ केले जाते. त्यापैकीच ‘आमसूल तेल’ हे एक.

कोकम तेल तयार करण्यासाठी कोकमाच्या बियांचा वापर केला जातो. त्यासाठी कोकम बिया सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रामध्ये खणखणीत वाळवाव्यात. नंतर बियांवरील आवरण काढावे. आवरण काढलेल्या बिया दळणी यंत्रात दळून त्यांची भुकटी तयार करावी. अशी भुकटी उकळत्या पाण्यामध्ये दोन-तीन तास ठेवली जाते. नंतर हे द्रावण थंड केले जाते. द्रावण थंड झाल्यानंतर पाण्याच्या वर तवंग येतो. तो तवंग व्यवस्थित काढून त्याला उष्णता देऊन नको असलेले घटक बाजूला केले जातात. पुन्हा ते थंड केले जाते. यालाच कोकम तेल आमसूल तेल किंवा बटर म्हणतात. तेल काढण्याचे काम बहुतेक कुटीरोद्योग म्हणूनच केले जाते.

*आमसूल तेल कसे दिसते ?*

या तेलाचा रंग फिकट करडा किंवा पिवळसर असतो. ते वंगणासारखे गुळगुळीत व चवीला किंचित सौम्य असते. शुद्ध व वासरहित केलेले तेल रंगाने पांढरे आणि उत्तम प्रतीच्या हायड्रोजनीकृत (हायड्रोजनाचा समावेश केलेल्या) तेलासारखे (वनस्पतीसारखे) दिसते. गार्सीनियाच्या इतर जातींतील बियांमधील तेलाप्रमाणेच कोकम तेलात स्टिअरिक आणि ओलेइक अम्ले पुष्कळ प्रमाणात असतात. तेलाचा द्रवांक ४०० – ४३० से. असतो. हे तेल इतर स्निग्ध पदार्थ मिसळून मिठाईच्या धंद्यात लोण्याऐवजी वापरता येते.

नव्या संशोधन पद्धतीने या तेलामधून ४५ टक्केपर्यंत स्टिअरिक आम्ल मिळू शकते. हे तेल अंडाकृती गोळे किंवा वड्यांच्या स्वरूपात बाजारात विकले जाते.

*गुणधर्म*

स्निग्धता हा याचा गुणधर्म आहे तसेच हा जळजळशामक असतो. अंगाला खाज सूटत असेल किंवा त्वचेला खवले पडले असतील तरी आमसूलचे तेल लावले जाते. होट फाटणे, पाय फुटणे यासाठी ते वापरतात. याशिवाय इतर अनेक मलमांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. या व्यतिरिक्त थंडीत पायांवर तसेच हाताचे कोपरे गुडघे अशा ठिकाणी त्वचा काळवंडते. आमसूलच्या तेलाच्या उपयोगाने काळवंडलेल्या त्वचेवरील मळ साफ होऊन त्वचा मऊ आणि सूंदर बनते.

*कसे वापरावे*

आमसूल तेल खड्याच्या स्वरुपात भेटते. त्यामुळे हे घट्ट असते. रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या कटोरीत घ्यावे. त्याला दोन मिनिटे गॅसवर उकळावे. ते लगेच पातळ होते. हे तेल रात्री झोपताना होट, चेहरा, मान, हात आणि पाय किंवा तडकलेल्या त्वचेवर चोळावे. सकाळी आंघोळ करावी.

सादर लेख इलेक्ट्रॉनिक सोशियल मीडिया मधून घेतला आहे. आयुर्वेदिक डॉक्टर कडून सल्ला घ्यावा व लेख आवडला असेल तर लाइक व शेयर करावे....💐👏💐

Maske Clinical Pathology Lab *हिवाळयात डिंकाचे लाडू आवर्जून सेवन करा !!* हिवाळयात डिंकाचे लाडू खाण्याचे अनेक फायदे आहेत....
04/01/2023

Maske Clinical Pathology Lab
*हिवाळयात डिंकाचे लाडू आवर्जून सेवन करा !!*

हिवाळयात डिंकाचे लाडू खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच डिंकाचे लाडू गरोदर महिल्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. गरोदर स्त्रियांनी डिंकाचे लाडू आवर्जून सेवन करणे. डिंक म्हणजे झाडाचा चिक होय.

डिंक झाडांच्या खोडातून काढला जातो, आणि डिंक तयार केला जातो. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली आहे. थंडी म्हंटल्यावर डिंकाचे लाडू आले. हिवाळयात जास्त प्रमाणात डिंकाचे लाडू बनवले जाते. डिंक, गव्हाचं पीठ, तुप, खोबरं, गुळ आणि भरपुर सुका मेवा हे मिश्रण वापरून लाडू बनवले जातात. थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून डिंकाचे लाडू दिले जातात.

हिवाळयात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होते, आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत देखील राहते. म्हणून डिंकाचे लाडू आवर्जून सेवन करणे. त्यामुळे शरीराला अनेक फायदे देखील होतील. डिंकामुळे शरीराला उब देखील मिळते. आणि हिवाळयात शरीराला उबची खूप गरज असते. तसेच ऊर्जा देखील मिळते. तसेच गरोदर महिल्यांसाठी देखील डिंकाचे लाडू खूप फायदेशीर आहे. गरोदर पणात बाळंतिणीला दूध येण्यासाठी डिंकाचे लाडू दिले जाते.

हिवाळयात पचनक्रिया चांगली राहण्यासाठी तुम्ही डिंकाचे लाडू सेवन करू शकता. डिंकाचे लाडू सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, मात्र डिंकाच्या लाडू मध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असते, त्यासाठी कमी प्रमाणात आणि गरज असेल तेवढेच सेवन करावे. रोज २ डिंकाचे लाडू सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पण २ पेक्षा जास्त लाडू खाऊ नये. डिंकाची चिक्कीसुध्दा खायाला चांगली असते. त्यामुळे शरीरात शक्ती देखील राहते. जर तुम्हाला पाठदुखीची समस्या असेक तर तुम्ही डिंकाचे लाडू सेवन करू शकता. डिंकाच्या लाडू मध्ये फॅट्सचे आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. म्हणून हिवाळयात डिंकाचे लाडू आवर्जून सेवन करणे.

   Maske Clinical Pathology Lab
13/08/2022

Maske Clinical Pathology Lab

Maske Clinical Pathology Lab
12/08/2022

Maske Clinical Pathology Lab

12/08/2022
  Thank you so much All of you 💐☺️😊👏🎊
22/07/2022


Thank you so much All of you 💐☺️😊👏🎊

21/07/2022

💐💉 Happy Doctors Day 💉💐    Mt Pitambar Maske
01/07/2022

💐💉 Happy Doctors Day 💉💐
Mt Pitambar Maske

Dear Friend this is the my  Clinical Pathology Lab  logo         Maske Clinical Pathology Lab
30/06/2022

Dear Friend this is the my Clinical Pathology Lab logo
Maske Clinical Pathology Lab

Address

Maske Clinical Pathology Lab, Room No. 2, Hatwar Complex, Lakhandur Road, Deaiganj Wadsa Dist. Gadchiroli
Warsa
441207

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maske Clinical Pathology Lab posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Maske Clinical Pathology Lab:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category