Health IEC Washim

Health IEC Washim आरोग्य विषयक कार्यक्रमांची प्रचार व प्रसिद्धी करणे. समुदायाच्या वर्तनात आरोग्यदायी सकारात्मक बदल होण्याकरिता प्रयत्न करणे.

19/06/2025

वाशीम (दि.१९, जून): सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य सिकलसेल आजार निर्मूलन कार्यक्रम.
"धरती आबा अभियान" अंतर्गत उपकेंद्र कोळगाव बुद्रुक अंतर्गत गाव सावळद येथे सिकलेसल तपासणी, आरोग्य शिक्षण, साथरोग माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.जागतिक सिकलसेल दीन साजरा करण्यात आला.त्या वेळेला आशा ताई व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

26/01/2025

वाशीम : जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2025

वाशीम : खाजगीपेक्षा भारी, सरकारी दवाखाना घेई भरारी.
दि.२२/०१/२०२५ रोजी कायाकल्प टीमने पियर असेसमेंटसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीमला भेट देवून तपासणी केली असता त्यांनी रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेबद्दलसमाधान व्यक्त केले .
यावेळी आरोग्य सेवा अकोला मंडळाच्या सहायक संचालक डॉ.श्रीम.कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे, डॉ.अविनाश पुरी, डॉ.अविनाश झरे, डॉ.रवी घुगे व इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

26/01/2025

वाशीम : मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द उपकेंद्रात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2025

उपकेंद्र दुबळवेल येथे टीबी मुक्त भारत अभियान रॅली काढून टीबी मुक्तीची शपथ देण्यात आली.
वाशीम : मालेगाव तालुक्यातील उपकेंद्र दुबळवेल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत टीबी मुक्त भारत अभियान रॅली काढण्यात आली, तसेच ग्रामपंचायत मध्ये टीबी मुक्तीची शपथ देण्यात आली.
यावेळेस आरोग्य कर्मचारी, शिक्षक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मंडळी आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

26/01/2025

वाशीम : प्रजासत्ताक दिनी प्रा. आ. केंद्र कुपटा येथे क्षयरोग मुक्त भारताची प्रतिज्ञा आणि तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

26/01/2025

वाशीम : मानोरा तालुक्यातील आयुष आरोग्यवर्धिनी दापूरा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वै.अ. डॉ. ठाकुर यांचेकडून ग्रामस्थांना टी.बी. मुक्त ग्रामची शपथ देण्यात आली

26/01/2025

वाशीम : कारंजा तालुक्यातील ग्राम पोहा येथे प्रधानमंत्री टी.बी. मुक्त ग्राम पंचायत अभियान अंतर्गत जनजागृती करण्यात आली. त्यावेळी आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक आरोग्य सेविका, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

17/01/2025

वाशीम : वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आमखेडा हे गाव येथे मिळणाऱ्या विविध आयुर्वेदिक औषधोपचार तसेच पंचकर्म उपचार पद्धतीमुळे सध्या आयुष ग्राम म्हणून नावारूपाला येत आहे. येथे आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म करून घेण्यासाठी दुर दुर वरून लोक येत आहेत. त्यामुळे ते एक प्रकारची मेडिकल टुरिझम तयार झाले आहे. याठिकाणी योगा, पंचकर्म, मेडिटेशन, निसर्ग सानिध्य, संगीत थेरपी, गर्भसंस्कार यासारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. याचा लाभ घेण्यासाठी तसेच रिसर्च स्टडी साठी देश-विदेशातून लोक येत आहेत. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली देशमुख मोफत आरोग्य सेवा देत आहेत. यामुळे लोकांचे पैसे तर वाचत आहेतच, शिवाय त्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमलत आहेत.

Address

District Extension And Media Officer, Health Department, Zilla Parishad Washim
Washim
444505

Alerts

Be the first to know and let us send you an email when Health IEC Washim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Health IEC Washim:

Share