Himalaya natural care

  • Home
  • Himalaya natural care

Himalaya natural care Aayurvedik medicin chandrakant Wagh 9882560800 himalaya natural care 9882560800

22/08/2024

ओरिजिनल शिलाजीत कुणाला पाहिजे असेल तर फोन करा 9882560800 चंद्रकांत वाघ

23/07/2022

Jai bajrang bali tirthyatra company Tours And Travels Shimla, Shimla, kullu, manali, dharmshala, dalhousie, katra, amritsar, kashmir tour package available m...

11/02/2022
15/09/2021
13/09/2021

#मूळव्याध घरगुती उपचार :

मूलव्याधी सह रक्त पडत असल्यास एक चमचा घरचे ताजे लोणी खडीसाखर बरोबर दिवसातून तीन वेळा घ्यावे..
मूलवशी सह शौचासकडक होत असल्यास रात्री गरम पाण्यासह एक चमचा ज्येष्ठ मधाचे चूर्ण घ्यावे.
जेवणापूर्वी अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण गुळासह घेतल्यास वेदना कमी होतात.
अतिशय आग होत असल्यास खोबरेल तेलाची घडी किंवा कोरफड चा गर गुदभागी ठेवावा.
मूळव्याधीच्या मोडांना खाज येत असल्यास डिगामनी पाण्यात उगाळून लेप द्यावा याने खाज येणे कमी होईल.
मोड सुजून दुखत असल्यास तीळ बारीक वाटून त्याचा लेप करावा किंवा ओवा व जेष्ठ मधाच्या पुरचुंडीने शेकावे या उपायाने दुखणे थांबेल व आराम मिडेल.
मूळव्याधीचा मोड सुजल्यामुडे दुखत आल्यास तूप किंवा खजुराच्या बियांच चूर्ण विस्तवावर टाकून गुदद्वारी धुरी घ्यावी असे केल्यास सूज कमी होऊन दुखण थांबेल.
सायकल चालवणे, कडक भागावर बसने, याप्रमाणे गुदभागी दाब येईल अशा गोष्टी टाळाव्या चमचमीत पदार्थ खाने टाळावे रात्री जात जागु नये.
रोज दुपारी जेवणानंतर किंवा सकाळ संध्याकाळ ताज्या ताकात चिमूटभर हिंग, सैंधव, जिरे, सुंठ, व ओव्याची पूड टाकून घ्यावे याने त्रास कमी होईल.
सुरण वाफवून तयार केली भाजी मूळव्याधीचा फायद्याची ठरते त्रास कमी होतो.
याशिवाय तुम्ही दुसरी औषधी घेऊ शकतात. सॅन कुल, संतुलन अर्शना, संतुलन व्रणरोपक तेल, कांकायन गुटी इत्यादी औषधी घेतल्यास आराम मिडेल.

#मुळव्याध✍
गुदद्वाराच्या आतील बाजूस अगर काठावर असणाऱ्या शिरा फुगतात. त्यास मोडा सारखा आकार येतो.यालाच मुळव्याध म्हणतात. व मोडातून क्वचित प्रसंगी रक्त स्त्राव होऊन प्रचंड वेदना होतात. मोडामध्ये दाह व ठणका येतो.अनेक वेळा शौचास साफ न झाल्याने कुथावे लागते.व ही शिर अथवा चुंबळच बाहेर येऊन लोंबकळत.

#उपाय-

१)नारळाच्या शेंडीची राख व्हँसलिन मध्ये कालवून आतील भागास बोटाने लावणे.

२)नारळाच्या शेंडीची राख एक चमचा व साखर दिवसातून ३वेळा रक्त थांबते.

३)लिंबा वर खायचा सोडा व सेंधव टाकून पुर्ण लिंबू चोखणे रक्त पुर्णपणे थांबतेच.

४)१/२चमचा जीरे,१/२ओवा पावडर रोज गरमपाण्यात.

५)अक्रोडाच्या तेलात बारीक कापडाचा काकडा भिजवून गुदद्वाराच्या आत सरकवावा रोज ऐक महीने करा मोड गळून पडेल.

६)डिकेमली व पिंपळीची मुळी उगाळून रोज मोडास लावली असता मोड गळून पडतो.

७)सुरण सुकवून चुर्ण करावे व रोज गाईच्या दुधात घ्यावे.

८)गुदद्वाराच्या आत गाईचे जुनाट तुप लावावे.

९)रोज मुळा खावा दहादिवस रिलिफ मिळतो.

१०)अर्शकुठार १गोळी,गंधक रसायन एक गोळी ,आरोग्यवर्धिनी गोळी १गोळी रोज घेणे.

११)कण्हेरीचे मुळ मोडावर उगाळून लेप द्या.

१२)रोज सकाळ संध्याकाळ गरम पाणी घ्या.रात्री झोपताना त्रिफळा चुर्ण लावा.

१३)सकाळी उठल्यावर तोंडातील लाळ व गोमूत्र दुखर्या भागास लावावे त्रास बरा होईल.
वरील उपाय करून मुळव्याधीतून कायमस्वरूपी मुक्त व्हा.

मुळव्याध वर काय कराल उपाय

रुग्णाच्या मुळावर उठणारा रोग म्हणजे मूळव्याध. प्राणाला जाचत राहणारा हा रोग आहे. मूळव्याध गुदभागी होत असली तरी तिचे मूळ अपचनात असते. विशेषतः अग्नी मंद झाला, नियम न सांभाळता कधीही कसाही आहार घेतला, की मूळव्याधीची सुरवात होते. म्हणजेच मूळव्याधीला दूर ठेवायचे असेल, तर आधी आपल्या आहाराकडे व नियमितपणाकडे लक्ष पुरवायला हवे.

शरीराच्या गुदभागी आग होत असली, दुखत असले, मोड जाणवत असला, शौचावाटे रक्त पडत असले, कंड सुटत असली की आपल्याला मूळव्याध झाली आहे असे रुग्णाला वाटत राहते; पण प्रत्यक्षात मात्र ही लक्षणे परिकर्तिका (गुदभागी भेगा पडणे), मूळव्याध, भगंदर, रेक्टल प्रोलॅप्स (गुदाचा भाग बाहेर येणे) यांपैकी कोणत्या रोगाची आहेत हे निश्चित करणे आवश्यक असते.

यासाठी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष तपासणी करून घेणेही आवश्यक ठरू शकते.
आयुर्वेदात मूळव्याधीला अर्श म्हटले जाते.

म्हणजे शत्रूप्रमाणे जो रोग प्राणाला जाचत राहतो, त्रास देतो तो अर्श होय. आयुर्वेदाने ज्या आठ मुख्य महाव्याधी सांगितल्या, त्यांत मूळव्याधीचा अंतर्भाव केला आहे, यावरूनच त्याचे गांभीर्य लक्षात येऊ शकते. प्रत्येक मूळव्याधीमध्ये गुदावाटे रक्त पडतेच असे नाही. वाताचा मुख्य सहभाग असणाऱ्या मूळव्याधीमध्ये वेदना खूप असतात. कफामुळे होणाऱ्या मूळव्याधीमध्ये कंड अधिक असते, तर पित्त आणि रक्तदोषामुळे झालेल्या मूळव्याधीमध्ये आग होते, तसेच रक्तही पडते.

मूळव्याध गुदभागी होत असली तरी तिचे मूळ अपचनात असते. विशेषतः अग्नी मंद झाला, नियम न सांभाळता कधीही कसाही आहार घेतला की मूळव्याधीची सुरवात होते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. सुश्रुतसंहितेत यासंबंधात म्हटले आहे, असंयमी व्यक्ती जेव्हा वात-पित्त-कफदोषांना प्रकुपित करणारे अन्न सेवन करते किंवा तशा प्रकारचे आचरण करते, तेव्हा हे बिघडलेले त्रिदोष एकेकटे, दोघे मिळून किंवा तिघे मिळून रक्तासह गुदप्रदेशात मोड तयार करतात. यालाच मूळव्याध असे म्हणतात.

#व्याधीची कारणे

•पचायला जड, जळजळ करणाऱ्या पदार्थांचे सेवन.

•अर्धवट शिजलेल्या अन्नाचे सेवन.

•गाय, डुक्कर, बकरी वगैरे प्राण्यांचे मांससेवन.

•मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे अति सेवन.

•अति मद्यपान, जड पाण्याचे सेवन.

•वेळच्या वेळी शरीरशुद्धी न करणे.

•अनुचित व्यायाम व मैथुनकर्म.

•दिवसा झोपणे.

•कडक वा विषम आसनावर अधिक काळ बसणे.

•अति वेगवान गाडीत बसून वारंवार प्रवास करणे.

•प्रवर्तन होताना कुंथावे लागणे.

•बाळंतपणाच्या वेळेस फार जोर लावावा लागणे.

•गर्भारपणाच्या शेवटी शेवटी गुदप्रदेशावर दाब पडणे.

याखेरीज अगोदर खाल्लेले अन्न पचण्यापूर्वीच पुन्हा अन्न खाणे, परस्परविरोधी गुणाचे पदार्थ एकत्र मिसळून खाणे, मल-मूत्र-वायू वगैरे नैसर्गिक आवेगांना बळेच धरून ठेवणे, अधिक प्रमाणात मैथुन करणे वगैरे कारणांनीही मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो.

#भगंदराची जखम चिघळते

परिकर्तिका म्हणजे फिशर. यात गुदभागी भेगा, चिरा पडलेल्या असतात व त्यामुळे कात्रीने कापल्याप्रमाणे तीव्र वेदना होत असतात. यामध्ये वेदना तर असतातच, पण आगही खूप होते आणि मलाबरोबर रक्तही पडते.

भगंदरामध्ये गुदाच्या जवळ जखम, गळू झाल्याचा इतिहास असतो. ही जखम सहसा लगेच बरी होत नाही आणि बाहेरून बरी झाली तरी ती आतमध्ये गुदाच्या आतल्या बाजूपर्यंत वाढत जाते. जखमेतून पुन्हा पुन्हा रक्त येणे, पू येणे वगैरे तक्रारी दिसतात. काही व्यक्तींमध्ये एकाच वेळी तीन-चार जखमा असल्याचेही आढळते.

रेक्टल प्रोलॅप्स हा त्रास जास्त करून लहान मुलांमध्ये आढळतो. मलप्रवृत्तीनंतर गुदद्वारातून मांसल भाग बाहेर येणे आणि नंतर तो आपोआप आत जाणे किंवा तसाच बाहेर राहणे असे याचे स्वरूप असते. यातही कुंथावे लागणे, शौचाला कडक होणे, गुदभागी वेदना, दाह होणे वगैरे लक्षणे असतात.

#तूप किंवा #एरंडेल लावा

परिकर्तिकेवर गुदभागी तूप किंवा एरंडेल तेलासारखे स्निग्ध द्रव्य लावण्याचा उपयोग होतो. सॅन हील मलमसारखे जखम भरून आणण्यास मदत करणारे मलम लावण्याचाही उपयोग होतो. आहारात लोणी, तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे, आतड्यांतील कोरडेपणा कमी करणारे सॅनकूलसारखे औषध घेणे, फार तिखट तसेच कोरडे पदार्थ न खाणे, हेही उत्तम ठरते.

भगंदर हा अतिशय चिवट रोग असे म्हणायला हरकत नाही. जखम भरून येईल, त्या ठिकाणचा जंतुसंसर्ग बरा होईल अशा पद्धतीची औषधे, उपचार यात घ्यावे लागतात. औषधे सेवन करण्याबरोबरच यात धूपन उपचाराचाही उपयोग होतो.

रेक्टल प्रोलॅप्सचा त्रास असणाऱ्यांना मलावष्टंभ होणार नाही म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. धायटीच्या किंवा डाळिंबाच्या सालीच्या काढ्यात कटिस्नान घेण्यानेही गुदाचा बाहेर आलेला भाग पुन्हा आत जायला मदत मिळते. फारच त्रास असला तर हाताला तूप-तेल लावून गुदाचा भाग आत ढकलून लंगोट बांधून ठेवण्याचीही कधी कधी गरज भासू शकते.

#सर्वसाधारण उपचार

•मूळव्याधीवर सुद्धा त्रिदोष, व्यक्तीची प्रकृती, रोगाची तीव्रता वगैरे अनेक गोष्टींचा विचार करून नेमक्या औषधांची योजना करावी लागते, तरीही यावर सर्वसाधारणतः केले जाणारे उपचार याप्रमाणे-

•रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यावे.

•मोडाच्या ठिकाणी वेदना असल्यास बेलफळाचा गर व पाठाचूर्ण मिसळून घ्यावे किंवा सुंठ व पाठाचूर्ण एकत्र करून घ्यावे.

•सुरण ही भाजी मूळव्याधीत औषधच होय. सुरण वाफवून केलेली भाजी, फुलका, तूप व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो.

•रक्त पडत असल्यास घरचे ताजे लोणी व नागकेशर हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे.

•मोडाच्या ठिकाणी आग होत असल्यास दूर्वांच्या रसात भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी ठेवावी.

•मोड सुजला असून दुखत असल्यास गोवरीच्या विस्तवावर तूप टाकून त्याची धुरी घ्यावी किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची धुरी घ्यावी.

•कफज मूळव्याध असून मोडाला खाज येत असल्यास जेवणापूर्वी तसेच जेवणानंतर सुंठ व ओव्याची पूड टाकून ताक प्यावे.

•मोडाच्या ठिकाणी वेदना व आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा गर ठेवावा.

•तीळ वाटून गरम करून शेकल्यास मोडाच्या ठिकाणची वेदना कमी व्हायला मदत होते.

•व्याधीवर शस्त्रकर्म किंवा क्षारकर्म केले तरी मुळातल्या मंद अग्नीवर योग्य उपचार करून मूळव्याधीवर खरे उपचार करणे व पथ्य पाळणे आवश्यक असते; अन्यथा पुन्हा त्रास उद्भवू शकतो.

मूळव्याध असो किंवा फिशर, भगंदर असो, एक तर या सर्व रोगांचा त्रास फार भयानक असतो. शिवाय संकोचापायी यांचे वेळेवर योग्य निदान केले जात नाही, परिणामतः उपचारही मिळत नाहीत. त्रास फारच असह्य झाला तर पटकन गुण यावा म्हणून शस्त्रकर्माकडे झुकण्याचा कल वाढतो. क्वचित एखाद्या व्यक्तीमध्ये शस्त्रकर्म, क्षारसूत्र वगैरे उपचारांची आवश्यकता असली तरी केवळ बाह्योपचार रोगाला बरे करण्यास असमर्थ असतात याचेही भान ठेवायला हवे. मंद अग्नी, अपचनाची प्रवृत्ती आणि आतड्यांमधला कोरडेपणा, उष्णता हे सर्व बरे केल्याशिवाय या त्रासापासून कायमची सुटका होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे या प्रकारचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून पहिल्यापासूनच आहार-आचरणात काळजी घ्यायला हवी. तरीही त्रास झालाच तर वेळेवर योग्य उपचार घेऊन तो मुळापासून बरा करण्यावर भर द्यायला हवा.

#पथ्याच्या_गोष्टी
तांदूळ, गहू, यव, ज्वारी, दुधी, पडवळ, तोंडली, सुरण, परवर, आंबट चुका, घोसाळी, मूग, तूर, लोणी, तूप, ताक, आले, सुंठ, मनुका, आवळा.

#अपथ्याच्या_गोष्टी
नाचणी, मका, उडीद, वाल, पावटा, चवळी, शेंगदाणे, रताळे, तळलेले तिखट पदार्थ, शेंगदाणे, लोणची, पापड वगैरेंचा अतिरिक्त वापर.

*पोस्ट फक्त माहितीसाठी

05/09/2021
22/08/2021

*गिलोय चे आरोग्यदायी फायदे*

अनेकदा लोक डेंग्यू किंवा शरीरातील पेशी कमी झाल्यावर ती संतुलित करण्यासाठी गिलोय वापरतात. परंतु या सर्वांव्यतिरिक्त, गिलोयचे सेवन केल्याने आपल्याला आणखी बरेच फायदे मिळतात. या आयुर्वेद औषधामध्ये फॉस्फरस , तांबे, कॅल्शियम, जस्त यासारखे अनेक आवश्यक पदार्थ आढळतात. ज्यामुळे बऱ्याच रोगांपासून आपले संरक्षण होते. गिलोय सेवनाने शरीराला कोणत्या पद्धतीने फायदा होईल हे जाणून घ्या.

✅ *साखरेसाठी फायदेशीर*
गिलोय आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्य करते. जर आपण दररोज गीलोय पिले तर ते आपल्यासाठी वरदान ठरेल. गिलोयच ज्युस तयार करण्यासाठी, गिलोयची मुळी आणि बेल पाण्यात उकळा. दिवसातून दोनदा हा तयार केलेला ज्युस दोन-दोन चमचे घ्या. मधुमेह रूग्ण ज्यांच्या शरीरावर मुरुम आहे त्यांना या ज्यूसच्या सेवनामुळे आराम मिळेल.

✅ *पचन चांगले होईल*
बऱ्याच लोकांना पोटात गॅस, अपचन, बद्धकोष्ठता छातीत जळजळ होते. जर आपण हा रस घेतला तर आपल्या पोटातील समस्या लवकरच दूर होतील. गिलोय आपल्या पाचन शक्तीस बळकट करून आपली भुक वाढवण्याचे कार्य करतो.

✅ *डोळ्यांसाठी फायदेशीर*
ज्या लोकांचे डोळे कमजोर होत आहेत त्यांनी आवळा रस गिलोयच्या रसात प्यावा. हे आपल्या डोळ्यांचा कमकुवतपणा दूर करुन डोळ्यांचे आरोग्य चांगले करेल.

✅ *लठ्ठपणा*
शरीरात अतिरिक्त चरबी ग्रस्त लोकांनी हा रस प्यावा. आपण इच्छित असल्यास, या रसात थोडा लिंबाचा रस आणि 1 चमचे मध मिसळा. चरबी बरोबर गिलोय पोटातील किड्यांचा नाश देखील करतो

✅ *सर्दी आणि खोकला*
गिलोयचा रस सर्दी-खोकला दरम्यान सेवन करावा. आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत करेल, आपल्याला खोकला आणि छातीत घरघरपासून आराम मिळेल. सर्दी आणि खोकला वगळता डेंग्यूमध्ये फायदे फायदेशीर आहे. डेंग्यू मध्ये गिलोयचा रस सकाळी लवकर रुग्णाला दिल्यास डेंग्यु लवकर बरा होतो. तसेच अन्य विषाणू संसर्गामध्येही फायदेशीर.

Address


Telephone

+919882560800

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Himalaya natural care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Himalaya natural care:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram