Youtu.be/od_srajg6lk

  • Home
  • Youtu.be/od_srajg6lk

Youtu.be/od_srajg6lk शिवानंद बोळेगांव 9637497101

26/04/2025

🇮🇳 भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे 🇮🇳

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

🏔 गुजरात.................. सापुतारा

🏔प.बंगाल...............दार्जिलिंग

🏔 राजस्थान............... माउंट अबू

🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश

🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी

🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली

🏔 उत्तराखंड............... अल्मोढा

🏔 उत्तराखंड............... मसुरी

🏔 केरळ..................... मन्नार

🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

🏔 महाराष्ट्र.................. माथेरान

🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा

🏔 तामिळनाडू............. उटी

🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

🏔 तामिळनाडू............. कुन्नुर

🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स
━━━━━━༺༻━━━━━━
Join ✔️
━━━━━━༺༻━━━━━━

28/09/2024
28/09/2024
28/09/2024

*बोधकथा:- भाऊबंदकी, भावावरला राग*

*कोर्ट- कचेरी :-रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण --*

*एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* -

*नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढलेली दाढी. मळलेली कपडे. म्हणाले.., सगळ्याच जमीनीवर, इस्टटीवर स्टे लावायचा आहे. आणखी काय कागदं पाहीजेत? किती खर्च येईल?*

*मी त्यांना बसायला सांगितलं.*

*ते खुर्चीवर बसले. त्यांची सर्व कागदपत्रे तपासली. त्यांच्या कडून माहीती घेतली.*

*अर्धा पाउण तास गेला.*

*मी त्यांना सांगितलं. , मी अजून कागदपत्रे पाहतो. तुमच्या केसचा विचार करू या. तुंम्ही असं करा ४ दिवसांनी परत या.*

*४ दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावा बद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता. मी त्यांना बसायची खूण केली. ते बसले.*

*मग मीच बोलायला सुरूवात केली. मी तुमची कागदपत्रे पाहीली. तुम्ही दोघे भाऊ. एक बहीण. आई वडील लहानपणीच गेले.*

*तुमच शिक्षण ९ वी पास. धाकला भाऊ M.A.B.ed. तुंम्ही भावाच्या शिक्षणा साठी शाळा सोडली. रानात लंगोटी वर राबला. नेवरा दाजीच्या विहीरीवर दगड फोडली. सदाबापूच्या उसात स-या पाडल्या. पण भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही.*

*एकदा बहीण शेतात गुरं चारत होती. तुमचा भाऊ शाळेतून आला होता. कसा तो म्हशीच्या आडवा गेला आणि त्याला शिंग लागली, संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं. तुंम्ही खांद्या वरून त्याला बोरगावला नेलं. खरं म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळतं वय नव्हतं....फक्त कळती माया होती..आई बापाच्या मागं यांचा मीचआई बाप ही भावना होती...*

*तुमचा भाऊ B.A ला गेला. उर भरून आलं. तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट उपसायला लागला. पण अचानक त्याला किडनीचा त्रास सुरू झाला. दवाखानं केल..बाहेरचं केलं. पण, गुण आला नाही..शेवटी डॉक्टरनं किडनी काढायला सांगितली. तुंम्ही तुमची किडनी दिली. ऑफिसर झाल्यावर खुप फिरायचं आहे.. नोकरी करायची आहे..तुला आमच्या पेक्षा लय त्रास.. आंम्ही रानातली माणसं.आंम्हाला एक किडनी असली तरी चालतय. तुम्ही बायकोच सुध्दा न ऐकता किडनी दिली.*

*भाऊ M.A ला गेला. होस्टेल वर रहायला गेला. गावात मटण पडलं..डबा नेवून द्यावा. शेतात कणसं आली..कणस नेवून द्यावी. कुठला सण आला..पोळ्यांचा डबा द्यावा. घरा पासून हॉस्टेलचं अंतर २५ की.मी. पण तुंम्ही सायकलने गेला. घासातला घास घातला. भावाला नोकरी लागली. तुंम्ही गावात साखर वाटली.*

*३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं ..झालं म्हणजे त्यानंच केलं. तुंम्ही फक्त हजर होता. पण तरी अभिमान होता..*

*भावाला नोकरी लागली. भावाच लग्न झालं..आता तुम्हाला आणि बायका पोरांना सुख लागणार होतं; पण झाल उलटंच....लग्न झाल्या पासुन भाऊ घरी येत नाही. बोलावलं तर म्हणतो; मी बायकोला शब्द दिलाय. घरी पैसा देत नाही. विचारलं तर म्हणतो अंगावर कर्ज आहे. गेल्या वर्षी कोल्हापुरात फ्लॅट घेतला. विचारल तर म्हणतो, कर्जकाढून घेतलाय..!!*

*सगळं सांगून झाल्यावर मी थोडा वेळ थांबलो नंतर म्हणालो, आता तुमचं म्हणणं आहे की त्याने घेतलेल्या मिळकती वर स्टे लावायचा ?*

*तो पटकन म्हणाला; हो बरोबर.*

*मी म्हणलं; स्टे लावता येईल. भावाने खरेदी केलेल्या मिळकती मधला हिस्सा पण मिळेल. पण......*

*पण तुंम्ही दिलेली कीडनी परत मिळणार नाही. तुम्ही भावासाठी आटवलेलं रक्त परत मिळणार नाही. तुंम्ही त्याच्या साठी खर्च केलेलं आयुष्य पण परत मिळणार नाही. आणि मला वाटतयं, या गोष्टी पुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची किंमत शुन्य आहे. त्याची नियत बदलली. तो त्याच्या वाटंनं गेला. तुंम्ही त्याच वाटेनं नको जाऊसा. तो भिकारी निघाला, तुंम्ही दिलदार होता, दिलदारच रहा. तुम्हाला काहीएक कमी पडणार नाही.!! उलट मी म्हणेन वडीलो पार्जित मिळकती मधला तुमचा हिस्सा तेवढा पेरा.. त्याचा हिस्सा पडीक राहु द्या. कोर्ट कचेरी करण्या पेक्षा मुलांना शिकवा. शिकुन तुमचा भाऊ बिघडला ; म्हणुन पोरं बिघडणार नाहीत.*

*त्यान १० मिनीटं विचार केला, सगळी कागद पिशवीत कोंबली, डोळं पुसत म्हणाला, चलतो सायेब... !! "*

*या गोष्टीला ५ वषॅ झाली.*

*परवा तो पक्षकार अचानक ऑफीसला आला. बरोबर गोरागोमटा पोरगा. हातात कसली तरी पिशवी.*

*मी म्हटले बसा..*

*तो म्हणाला, बसायला न्हाय आलो सायेब, पेढं द्यायला आलोय, .हा माझा पोरगा. न्युझिलॅंन्डला असतो. कालच आलाय. आता गावात ३ मजली घर हाहे , ८-९ एकर शेत घेतलय. तुंम्ही म्हणाला होता कोर्ट कचेरीच्या वाटला लागू नका. मी पोरांच्या शिक्षणाची वाट धरली.*

*मला भरुन आलं, हातातला पेढा हातातच राहीला.*

*रागाला योग्य दिशा दिली तर, पुन्हा रागवायची वेळ येणार नाही.*

*कितीही कमवा पण, कधी गर्व करू नका कारण, बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर, ऱाजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात,*

*आयुष्य खूप सुंदर आहे, एकमेकांना समजून घ्या व जीव लावा, हाक तुमची साथ आमची असं असाव💐💐💐👌👌👌✌
कथाविश्व - आपले कथांचे अनोखे विश्व 🎉

👆🏻 *सन २०२४-२५ हंगामासाठी रु.४०००/- प्रतिटन ऊस दराची शेतकरी बांधवांची अपेक्षा* *कोणता कारखाना किती जाहीर करतो wait & wat...
17/08/2024

👆🏻 *सन २०२४-२५ हंगामासाठी रु.४०००/- प्रतिटन ऊस दराची शेतकरी बांधवांची अपेक्षा* *कोणता कारखाना किती जाहीर करतो wait & watch policy शेतकऱ्यांची प्रतिक्षा 💐
*अजून बरेच साखर कारखाने मागील वर्षाचे बिल दिले नाहीत*

17/08/2024

नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुमारे १२ हजार २०० कोटी रुपये खर्चाच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे कॉरिडोरला मंजुरी मिळाली आहे. त्याशिवाय २ हजार ९५५ कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला (विस्तारित) देखील मान्यता मिळाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

एकूण २९ कि.मी. लांबीच्या ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा २६ कि.मी. लांबीचा मार्ग हा उन्नत असून ३ कि.मी. लांबीचा मार्ग भूमिगत राहणार आहे. उन्नत मार्गावर २० तर भूमिगत मार्गावर २ अशा २२ स्थानकांचा समावेश आहे.. अंदाजे ६. ४७ लाख प्रवाशांना दररोज या मेट्रो रेल्वे सेवेचा लाभ होणार असून सन २०२९ पर्यंत मेट्रो सेवा कार्यन्वित होणार आहे.

ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदाणी इस्टेट, कोलशेत, साकेत आदी भाग या मेट्रो रेल्वे सेवेने जोडला जाणार असल्याने प्रवाशांना किफायतशीर, जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळावी, निधी उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पाठपुरावा केला असून आज या मेट्रो रेल्वे सेवेला दिलेल्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय शहरे विकास मंत्री मनोहरलाल खट्टर, तत्कालिन केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे आभार मानले आहेत.

17/08/2024

🌠
........ *ULIP मध्ये* ......

A *ज्याना पेन्शन नाही*

(देशात 9️⃣2️⃣% लोकांना कुठल्याही प्रकारची गॅरंटीड पेन्शन नाही)

आपल्या *उतारवयाची सोय* करायची आहे

त्यांनी *न्यू पेन्शन प्लस (867)*

ची *एकरकमी-किमान रू 1,00,000 किंवा दरमहा किमान रू 3,000 प्रीमियम भरावा*

B *ज्याना मोठी मॅच्युरिटी* हवी

त्यांनी *Nivesh Plus (849) मध्ये एकरकमी (किमान रू 1 लाख)* भरावेत

किंवा

*SiiP (852) मध्ये दरमहा किमान रू 4,000/- प्रिमियम* भरावा

आपला विमा सल्लागार,

श्री.शिवानंद पंचप्पा बोळेगांव
विमा सल्लागार, MDRT,करोडपती
एल्आयसी ऑफ इंडिया,
मो 9637497101

03/07/2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 झालेले बदल

अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (mukhyamantri mazi ladki bahin yojana) योजनेच्या लाभार्थी नोंदणीला । जुलैपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली. यातील अटीशर्थीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचं सांगितलं. वयाची मर्यादा वाढ करण्यात आली आहे, त्याशिवाय उत्पन्नाची अटही शिथिल करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच, यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लालकी बहीण योजनेत सात बदल करण्यात आले आहेत. पाहूयात काय बदल करण्यात आले आहे...

1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. 1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मयदित सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.01जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4. जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

३. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

६. रु. 2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?

योजनेच्या लाभासाठी पोर्टल / मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल.

लाभार्थ्यांचं आधार कार्ड

महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला

सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्क (5) बँक खातं

पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)

पासपोर्ट आकाराचा फोटो

रेशनकार्ड

सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र

अटी शिथील करण्यासंबंधी मुलभूत हक्क(रस्ते,विज,पाणी,शिक्षण,आरोग्य)संघर्ष समिती** चे दाखल घेऊन तात्काळ बदल करण्यात आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेबाचे धन्यवाद,
आपले नम्र विश्वासू,
अध्यक्ष,
श्री.महांतेश लक्ष्मण हत्तुरे, बॉर्डर एरिया,
मुलभूतहक्क(रस्ते,विज,पाणी,
शिक्षण,आरोग्य)संघर्ष समिती**
मु -आळगे,ता-अक्कलकोट,
जिल्हा-सोलापूर-
मोबाईल व व्हाट्सअप - 9623473551

मूलभूत हक्क संघर्ष समितीचे सचिव,
श्री.नागनाथ भिमशा शिंदे रा. मुंढेवाडी ता-अक्कलकोट
जि -सोलापूर,
मोबाईल - 9423555656

मूलभूत हक्क रस्ते संघर्ष समितीचे -उपाध्यक्ष-
श्री.शिवानंद पंचप्पा बोळेगांव, केगांव बु
तर्फे निवेदन करण्यात आले होते मोबाईल -9637497101

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Youtu.be/od_srajg6lk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share