Sachin Patil Shirsath

  • Home
  • Sachin Patil Shirsath

Sachin Patil Shirsath Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sachin Patil Shirsath, Medical and health, .

11/02/2023

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज समाधी मंदिर #आजची_महापूजा_दर्शन_११_०२_२०२३
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹 🙏
आपल ग्रामदैवत कुलदैवत, सद्गुरू श्री स्वामी समर्थ 🌹🙏

20/01/2023

🚩⚜️🌹केवळ गुरुकृपेनेच जीवन सुखी होऊ शकते🌹⚜️🚩

🚩गुरुकृपा झाली की भक्त आणि सद्गुरू ह्यांचा अपूर्व संगम होतो. दोन प्रवाह विलीन झाले की जसे संथ जलाशयावरचे फक्त तरंगच दिसतात. तरंगांना जसे जलाशयापासून भिन्न करता येत नाही. तसेच भक्त आणि गुरु ह्यांचे अंतरंग एकरूप होतात. संचित कर्मानी हे दोघेही जन्मत:च ओम - ओम म्हणत आलेले असावेत म्हणून त्यांचा ' ओमकार ' ह्या पृथ्वीवर साकारत होत असावा. हेच खरे ऋणबंध असावेत.

🚩आता भक्ताचं हसणं हे स्मितहास्य होत. तर देहाला होणारे क्लेश , दुखणे त्याचे सौन्दर्य होते. ह्या हास्यात भूतकाळातल्या एकाही क्षणाबद्धल खंत नसल्याचा पुरावा असतो. जाताना अशी ही उत्कट देणगी इस्टेट म्हणून घेऊन जाणार असतो. असा खजिना म्हणजेच भक्ताचे झालेले निर्मळ - निर्भय - नि:शंक झालेले मन !

🚩असे हे प्रफुल्लित मन परंपरेने चालत आलेले नाही तर लाभलेला अवसर साधना करत असता शरणागत होऊन अश्रू आणि आर्तभाव ह्यांचा मिलाफ आहे. स्वयं सिद्धतेने घडवलेले आणि अविरत परिश्रमाने घडलेले.

🚩श्री एकनाथ महाराज जीवनाचे सत्य सांगतात की मनुष्य ज्यांना आपले मानतो ते याच जन्मीचे सोबत आहेत कारण पुढील गती कोणाला कशी प्राप्त होणार हे निश्चित नसल्याने पुन्हा एकत्र कसे येणार हा प्रश्न आहे आणि प्रत्येकाला कोठे जन्म मिळेल हे सुद्धा माहीत नाही.

🚩एखाद्या झाडाखाली जसे काही भिन्न भिन्न लोक एकत्र येतात आणि नंतर वेगळे होतात त्याचप्रमाणे संसार आहे.

🚩श्री नाथ महाराज सांगतात की जरी या जन्मात आपले वाटत असले तरी ते कायम नसल्याने त्यांची आसक्ती सोडावी आपले त्यांच्या प्रती असलेले कर्तव्य तेवढे पार पाडावे परंतु मनात त्यांच्या सहवासाचा मोह नसावा कारण हा मोहच पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवितो.

🚩मनुष्याचा स्वभाव असा आहे की त्याला सर्व कुटुंबीय एकत्र असावे असे कायम वाटते पण आपण समाजात पाहतो की हे शक्य होत नाही. मुले असली की नोकरीसाठी कोठे निघून जातात मुली असल्या तर सासरी निघून जातात मग उतारवयात आपण एकटे पडतो काही ठिकाणी तर कुटुंबीय सोबत असून सुद्धा फारसा संवाद होत नाही. तेव्हा वाटते की आपण आयुष्यभर विनाकारण काळजी करत होतो पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

🚩म्हणून एका विशिष्ट वयानंतर तरी संसाराचा मोह सोडावा आणि ईश्र्वर भजनात रंगून जावे म्हणजे उतारवयात त्रास होणार नाही. श्री नाथ महाराज सांगतात की प्रपंच करून परमार्थ साधणे हेच खरे कौशल्य आहे आणि हे ज्याला शक्य होईल तोच खरा ईश्र्वर भक्त.

🙏🌹🙏🌹🙏

श्री गुरुदेव दत्त

19/01/2023

19-1-2023 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ, आजचे श्री स्वामी समाधी दर्शन...🪷🌹🪷

17/01/2023

*खुप महत्वाचा वाटला या सीरियलचा हा भाग. कारण हल्ली सगळीकडे हेच पाहायला मिळत आहे.*

*काही मतलबी लोक भोळ्या भक्तांचा फायदा घेत आहेत. स्वामी सेवा म्हणून लोकांची दिशाभूल करून स्वतःचा फायदा करून घेत आहेत.*

*आणि स्वामी भक्त एवढे भावनिक असतात की त्यांना स्वामींच्या नावाने कोणी काही सांगितलं की ते बाकीचा काही ही विचार न करता दानधर्म आणि मदत करतात.*

*पण या भागात स्वामी जे बोलले ते अगदी हल्ली लागू पडण्यासारखे आहे. स्वामींनी आपल्याला बुद्धी दिली आहे. त्यांच्या नावातच अक्कलकोट आहे .*

*त्या अक्कलकोट स्वामींचे आपण भक्त आहोत तर भोळेपणा सोडून थोडा विचार करून, अक्कल वापरून पाऊल उचलायला हव कारण हल्ली हा बाजार झाला आहे.*

*आपण केलेलं दान मग भले तो एक रुपया जरी असला तरी तो योग्य ठिकाणी जायला हवा... श्रीपाद श्री वल्लभ चारित्रामध्ये सुद्धा सद्पात्री दान आणि अपात्री दानाची माहिती आहे.*

*आपण केलेले दान हे नेहमी सद्पात्री दान असायला हवे कारण अपात्री दानाचे कोणतेही पुण्य पदरात पडत नाही. तरी या पुढे या गोष्टीचा विचार व्हायला हवा...*

*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻*

16/01/2023

सद्गुरूंची अमृतवाणी... अवधुतचिंतन

*💧विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा, कुठे दुर्लक्ष करायचा, हे ज्याला जमतं... तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो.*

*💧सुर्याच्या आड एखादा ढग आला, म्हणजे सुर्याचं अस्तित्व संपत नसते..! तसेच आपल्या जिवनात येऊन स्वार्थी लोकांनी केलेल्या विश्वासघाताचा विचार करण्यापेक्षा, चांगले कर्म करुन आपले अस्थित्व कायम ठेवायचे असते.*

*💧सृष्टी कितीही बदलली, तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही. पण दृष्टी बदलली, तर नक्कीच सुखी होतो. नियम सोपा असतो, तो अंमलात आणणे कठीण असते.*
💐💐चुकिचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही, कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते.!! एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो. पण धागा सोबतीला आला कि हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो... आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे...*

🌹 : *माणसाचे यश हे कोणाच्या आधारावर नसते. तर ते चांगल्या विचारांवर असते.*
*कारण, आधार नेहमी सोबत नसतो परंतु चांगले विचार नेहमी सोबत असतात.*
💐 पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आणि समाधान मिळत असेल, तर विचार करा जिवंत आई-वडिलांची सेवा आणि काळजी घेतली तर किती चांगल फळ मिळेल.*
💐💐

*पायातून काटा निघाला की,*
*चालायला मजा येते तसा,*
*मनातून अहंकार निघाला की'*
*आयुष्य जगायला मजा येते...*
💐

*निर्णय चुकला तरी हरकत नाही.*
*स्वतःवर विश्वास असला की,*
*जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.*
💐💐
कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते. तुम्ही कधी कधी जास्त स्पष्ट बोलता. त्यामुळे लोक तुमच्या पासून दुरावतात. पण त्यांना तुमच्या बोलण्याचा अर्थ कळेपर्यंत त्याची वेळ निघून गेलेली असते. आयुष्यात दोनच गोष्टी पाहीजेत. कुटूंबाचं प्रेम आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ. अगदी तुमच्यासारखी. आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की, समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे. की, जे आपलाच मार खाऊन, परत आपल्यालाच बिलगतात. नाती जपत चला. कारण, आज माणूस एवढा, एकटा पडत चालला की, कुणी फोटो काढणारा पण नाही. सेल्फी काढावी लागते. ज्याला लोक फॅशन समजतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच येत असतो. कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते. कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते. कोणी वापर करून जाते. तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते. माणसाला घागर भरून सुख दिलं. अन् एक थेंब दुःखाचा दिला. तर माणूस सुखाची नाही, तर दुःखाचीच चव सांगत बसतो. घागर भर सुखाला विसरून जातो. चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही. ते कायम आठवणीतच राहतात. खोटेपणाचे मुखवटे घातलेली माणसं ही कधीच कुणाची नसतात. ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी अन् लोभी वृत्तीची. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत, नकळत काही तरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात. तर काही कसं जगायचं ते शिकवतात. रोजचा उगवणारा नवा दिवस हा आपल्या मनाप्रमाणे रोजच उगवेल असे नाही. मात्र उगवणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसात आपल्या मनासारखं काही ना काही निश्चितच ऊगवलेलं असेल. एखादे वेळेस आपण स्वत: जरी आनंद निर्माण करु शकलो नाही. तरी हरकत नाही. मात्र दुसऱ्यांच्या आनंदात अगदी मनपासुन हसतमुखाने सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करा. तुमचा आनंद आपोआप शतपटीने निर्माण होईल. सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं. जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं. जे क्षणात निघून जावं. आयुष्यात काहीही असो स्वकर्तृत्वावर मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण त्याची किंमत स्वतःलाही राहील, आणि इतरांनाही. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील. पण जी माणसे तुमची वाणी विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील. ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही. आणि संकट आल्या शिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं. तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. आपल्या मागे प्रामाणिक राहणारी लोक, फार कमी असतात. पण जी असतात ती आयुष्यभरासाठी आपली असतात. नुसतंच आपलं म्हणून नाही चालत. आपल्यानी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं. डोळे आणि भावनिक स्पर्श, शब्दांपेक्षा छान बोलतात. अट एकच समोरच्याला ते समजुन घेण्याच्या भावना असल्या पाहीजेत. शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते. ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात. यावरून, कळते की ते शब्द जळणार आहेत, की थंडावा देणार आहेत.
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच, काही लोक तुमचे पाय पकडायला सुरवात करतात. शांततापूर्ण आयुष्याचे दोन नियम आहेत. अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचवु द्यायचे नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही.
💐💐

*एका शिष्याने गुरूंना विचारले की परमेश्वराला खाली वाकून नमस्कार का करायाचा त्यावर गुरूदेव म्हणाले की आपल्या चिंता, काळजी ह्यांचा वास आपल्या कपाळावर असतो आणि आपण जेंव्हा परमेश्वरासमोर वाकतो तेव्हा त्या चिंता आणि काळजी त्याच्या चरणांवर पडतात आणि त्या दडपणातून आपण मुक्त होतो.

💐💐
आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद
या दोन गोष्टीचा त्याग केला पाहिजे...!

*⚜️ जय गुरूदेव ॥ जय भोले 🛐* *🚩  मकर संक्रांत   :   ➡️   रविवार SUNDAY दिनांक 15 जानेवारी 2023* *🤝संकलन गुरूदेव पाटील सर ...
14/01/2023

*⚜️ जय गुरूदेव ॥ जय भोले 🛐*
*🚩 मकर संक्रांत : ➡️ रविवार SUNDAY दिनांक 15 जानेवारी 2023*

*🤝संकलन गुरूदेव पाटील सर मुंबई🙏🏻*

🚩
*संक्रांतीचा पुण्यकाल*
*(( संक्रांतीचा पर्वकाळ )) : ➡️*
रविवार SUNDAY दिनांक 15 जानेवारी 2023 , रोजी सकाळी सूर्योदयापासून from Sunrise 🌅 सायंकाळी सूर्यास्तापर्यंत to Sunset 🌆 आहे .

🚩
*संक्रांती पर्वकालात (( संक्रांतीच्या पुण्यकाळात )) करावयाची दाने : ➡️*
नवे भांडे , गाईला घास , अन्न , तिळपात्र (( तीळ भरलेले भांडे )) , गूळ , तीळ , लोकरी कापड , तूप , सोने , भूमी , घोडा , गाय , वस्त्र (( कपडे )) , इत्यादि यथाशक्ति (( आपापल्या ऐपतीप्रमाणे )) दाने करावीत .

*🚩 सावधानता ➡️*
*दर वर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे , अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा हस्त पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो . अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो , त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये .*

🚩
*या दिवसाचे कर्तव्य : ➡️*
तिलमिश्रित उदकाने स्नान , तिळाचे उटणे अंगास लावणे , तीळहोम , तीळतर्पण , तीळभक्षण व तीळदान असा सहा (( 6 )) प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो .

🚩
*सूर्याचा 🌞 मकर ♑🐐 राशीत प्रवेश : ➡️*
श्री शालिवाहन शके 1944 , पौष मास कृष्ण पक्ष , सप्तमी (7) तिथी , वार शनिवार दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी *रात्री 08 : 44 वाजता* सूर्य 🌞 मकर Capricorn ♑🐐 राशीत प्रवेश करीत आहे .
त्याचा संक्रांती पुण्यकाल रविवार Sunday दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे .

🚩
*काय करु नये : ➡️*
संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासू नये , कठोर बोलू नये , गवत कापू नये , गाई-म्हशी , शेळ्या वगैरेंची धार काढू नये , कामविषय सेवन करू नये .

🚩
*संक्रांतीचे वाहन , उपवाहन , शस्त्र , वारनांव , नाक्षत्रनांव इत्यादी : ➡️*

*बालव करणावर* संक्रमण होत आहे . त्यामुळे वाहनादि प्रकार पुढीलप्रमाणे आहेत . *वाहन* वाघ 🐅 आहे . *उपवाहन* घोडा 🐎 आहे . तिने *पिवळे वस्त्र* परिधान केलेले आहे . हातात *गदा* शस्त्र घेतलेले आहे . तिने केशराचा टिळा (तिलक) लावलेला आहे . वयाने कुमारी असून बसलेली आहे . सुवासाकरिता हातात *जाईचे फूल* घेतलेले आहे . ती पायस भक्षण करीत आहे . तिची जाती सर्प जाति आहे . भूषणार्थ मोती रत्न धारण केलेले आहे . तिचे *वारनांव* राक्षसी आहे . तिचे *नाक्षत्रनांव* मंदाकिनी आहे . सामुदाय मुहूर्त 30 आहेत . दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे . ईशान्य दिशेस पाहत आहे .

🚩
*संक्रांतीचे स्वरुप : ➡️*
साठ योजने विस्तीर्ण लांब नाक , एक तोंड , नऊ हात आहेत . ती पुरुषाच्या आकाराची आहे .

🚩
*जन्म नक्षत्र अनुसार संक्रांतीचे फल : ➡️*

*हस्त , चित्रा , स्वाती : -*
प्रवासयोग , यात्रा , इत्यादी संभव .

*विशाखा , अनुराधा , ज्येष्ठा , मूळ , पूर्वाषाढा , उत्तराषाढा : -*
भोग , अचानक दुर्दैव , अचानक संकट इत्यादी संभव .

*श्रवण, धनिष्ठा, शततारका : -*
व्यथा , शरीरपीडा , शारीरिक कष्ट , त्रास इत्यादी संभव .

*पूर्वा भाद्रपदा , उत्तरा भाद्रपदा , रेवती , अश्विनी , भरणी , कृत्तिका : -*
वस्त्रादिकांची प्राप्ती , नवीन कपडे मिळणे इत्यादी संभव .

*रोहिणी , मृग (मृगशीर्ष) , आर्द्रा : -*
द्रव्यनाश , व्यर्थ खर्च होणे , खर्चाचे प्रसंग येणे , आर्थिक नुकसान , व्यवसायात तोटा इत्यादी संभव .

*पुनर्वसु , पुष्य , आश्लेषा , मघा , पूर्वा (पूर्वा फाल्गुनी) , उत्तरा (उत्तरा फाल्गुनी) : -*
विपुल धन , धन प्राप्तीचे योग , धन लाभ होणे , आर्थिक लाभ , व्यवसायात नफा , पदोन्नती , राहीलेले पैसे येणे , इतरांना दिलेले पैसे परत मिळणे इत्यादी संभव .

🚩
⚜️ जय गुरूदेव ॥ जय भोले 🛐
🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

🚩⚜️🌹💎कर्मफल💎🌹⚜️🚩🚩 ‘मी अशी काय पापे केली होती, म्हणून माझ्या नशिबी हे भोग आले?’ असे वाक्य आपल्याला अनेकदा ऐकायला मिळते. स...
13/01/2023

🚩⚜️🌹💎कर्मफल💎🌹⚜️🚩

🚩 ‘मी अशी काय पापे केली होती, म्हणून माझ्या नशिबी हे भोग आले?’ असे वाक्य आपल्याला अनेकदा ऐकायला मिळते. समोर उभ्या ठाकलेल्या अवघड प्रसंगाने गांगरून गेलेली अगर परिस्थितीसमोर हताश झालेली व्यक्ती आपल्या नातलगांना, मित्र-मैत्रिणींनी किंवा वेळप्रसंगी देवाला हा प्रश्न विचारून मोकळी होते. अशा प्रश्नाद्वारे ती व्यक्ती एका प्रकारे कर्मसिद्धांतास मान्यता देत असते.

🚩 आपण केलेले कर्म आणि आपल्याला मिळणारे फळ यातील संबंध कर्मसिद्धांत स्पष्ट करतो. हा सिद्धांत असे सांगतो, की मनुष्याला त्याच्या चांगल्या कर्माचे (पुण्याचे) चांगले आणि वाईट कर्माचे (पापाचे) वाईट फळ मिळते.

🚩 हा कार्यकारणभाव केवळ एका जन्मापुरता नसून जन्मोजन्मी चालू राहणारा असतो. एका जन्मात केलेल्या कर्माचे फळ भोगून संपले नाही, तर पुढील जन्मात ते फळ भोगावे लागते. म्हणजेच, मृत्यूही कर्मफलातून आत्म्याची सुटका करू शकत नाही.

🚩 गतजन्मातील स्मृती सर्वसाधारण माणसाला नसल्यामुळे, वाईट प्रसंगास सामोरे जावे लागले, की हे पूर्वीच्या वाईट कर्माचे फळ असले पाहिजे, असा समज तो करून घेतो. मग कारण तर माहीत नाही; परंतु कार्य तर अनुभवाला येत आहे, अशी त्याची विचित्र परिस्थिती होते.

🚩 कधी कधी समाजामध्ये असेही पहायला मिळते, की वाईट कर्मे करणारी माणसे सुखात आहेत आणि सत्कर्मे करणारी माणसे मात्र दुःखात दिवस कंठत आहेत. यामुळे मग कर्मसिद्धांत खरा नसावा, असेही वाटू लागते. नक्की चांगले काय आणि नक्की वाईट काय, याविषयी देखील संभ्रम उत्पन्न होतो.

🚩 वास्तविक, माणसात अशी ताकद आहे, की तो आपल्या कर्मानेच या पृथ्वीवरच स्वर्ग किंवा नरक उभा करू शकतो. त्याकरिता मृत्यूनंतर प्राप्त होणाऱ्या वेगळ्या स्वर्गलोकाची आणि नरकलोकाची गरज नाही.

🚩 कर्मफलाच्या सिद्धांतातून पाप-पुण्य, त्यातून नरक आणि स्वर्गाची कल्पना केल्यावर पुढे येणारा विचार धर्म आणि अधर्माचा होय. अधर्माचा मार्ग पुनर्जन्माकडे, तर धर्माचा मार्ग मोक्षाकडे नेणारा असतो. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी काय करावे, हा प्रश्न माणसाला कायम पडत आला आहे.
‘ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा।।’
असे भगवद्गीता सांगते.

🚩 फलाची अपेक्षा न करता कर्म करण्याच्या गीतेच्या उपदेशास अनुसरून
‘आलिया भोगासी असावे सादर।
देवावरी भार घालोनीया।।’
असे तुकाराम महाराज म्हणतात.

🚩 सर्व कर्मे देवाला स्मरून आणि त्याच्यावरच सर्व भार घालून केल्यास त्याच्या फळाची जबाबदारी ही देखील माणसावर न राहता देवावर जाते.

🚩 ज्ञानी पुरुषाने मात्र या सर्वांच्या पलीकडे जाऊन आत्मतत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. ते जाणल्यावर पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, धर्माधर्म हे सर्व निरर्थक ठरतात. संत ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे, तर

‘तैसे स्वर्ग नरकसूचक। अज्ञान व्याले धर्मादिक।
तें सांडोनी घाली अशेख। ज्ञाने येणे।।
हाती घेऊनी तो दोरू। सांडिजे जैसा सर्पाकारू।
कां निद्रात्यागे धराचारू। स्वप्नींता जैसा।।
तैसे धर्माचे टवाळ। दावी अज्ञान जे कां मूळ।
तें त्यजुनी सकळ त्यजी सकळ। धर्मजात।।
मग अज्ञान निमालिया। मीच एकू असे अपैसया।
सनिद्रस्वप्न गेलिया। आपण पैं जैसा।।
तैसा मी वांचुनी काही। मग भिन्नाभिन्न आन नाही।
सोहं बोधे तो याचे ठायी। अनन्यु होय।।’

🚩 पाप-पुण्याच्या कल्पनेची आणि कर्मसिद्धांताची सत्यासत्यता व्यक्तिगत श्रद्धेचा विषय मानला, तरी एक मात्र निश्चित, की पाप आणि पुण्य नावाची काहीतरी गोष्ट असते, याची जाणीव असल्यामुळे समाजातील काही लोक तरी पापकर्म करण्यास प्रवृत्त होत नाहीत. या कल्पनाच नसत्या, तर कदाचित समाजात मोठ्या प्रमाणावर अनाचार बोकाळला असता.

साभार.....🙏🌹😊

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Patil Shirsath posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share