14/05/2025
. दर वर्षी १५ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय म्यूकोपोलिसॅकरिडोसेस दिवस म्हणून साजरा केल्या जातो ज्याचा उद्देश लोकांमध्ये या आजाराबद्दल जागृती निर्माण करणे, त्यांच्या निदान व उपचारासाठी सोयी उपलंबद्ध करणे व सरकार, व इतरांना अश्या रूग्णाच्या समस्या सांगणे हा असतो. एम पी एस हा केवळ एकच आजार नसून आठ आजाराचा समूह आहे ज्यात पेशीतील लायासोसम ज्याला सूसाईड बॅग्स असे म्हटल्या जाते कारण त्यात विविध उत्प्रेरके (एनझाईम) असतात ज्या पेशींच्या घटकांचे विघटन करतात. विशिष्ट उत्प्रेरके नसल्यास संबंधीत घटकांचे विघटन न झाल्याने तो पेशीत साचत जातो व रुग्णाला विविध त्रास दिसू लागतात. हे आजार अनूवानशिक असतात व त्यामूळे यांचे प्रमाण जरी लाखात एक असे असले तरी त्या कूटूंबात अशा आजारचे अनेक रूग्न असू शकतात.
आजार जरी दुर्मिळ असला तरी त्याची सूरवातीची लक्षने ही इतर सर्वसामान्य आजारासारखीच जसे, थोराड चेहरा, डोळ्यातील टिक, वारवार सर्दी, कानातून पानी जाणे, बहीरेपणा, कमी ऊंची, लिव्हर व पानथडी (स्पीलीन) ची वाढ, सांध्यातील कडक अथवा लूझपणा,पाठीतील मनक्यातील दोष, गतीमंदता चंचलता ई. पैकी कोणताही एक अथवा अनेक त्रास दिसून येतात. सूरवातीला अशा आजाराचे चूकीचे निदान होऊन त्याला सांधेदूखीचा आजार, मासपेशीचा अथवा प्रतिकार क्षमता कमी असण्याचा आजार सूदधा समझल्या जाते.
More details can be get on https://lsdssindia.org/, https://www.huntersyndrome.in/ ,
*D