16/02/2024
स्पर्धा आहे ,ताणतणाव आहेत पण जगणं त्याहून सुंदर आहे. शरीराला सर्दी पडसं येतं ,आजारपण येतं काही दुखतं तसं मनातही काहीतरी खुपत असतं, अप्रिय गोष्टी,घटना घडत असतात, खचायला होतं... आपण शरीरासाठी तात्काळ इलाज करतो पण मनाच्या दुखऱ्या बाजू नकळतपणे दुर्लक्षित होतात आणि मग एक दिवस भावनांचा मेळ लागत नाही.स्ट्रेस,एंक्झायटी,डिप्रेशन कधी चिटकतं कळत नाही...कोशात जातो आपण,चिडचिड होते आतल्या आत ! माणसं तुटतात ,नाती बिघडतात, हुरूप जातो जगायलाच उत्साह राहत नाही ...जे करायचं ते बाजूला पडतं ...मुळात काय चाललंय हे सगळं कळत असतं पण 'वळत' काहीच नाही!
कोवळी पोरं अभ्यासाच्या ताणातून,तरुण -तरुणी कधी करिअर तर कधी प्रेमभंगाच्या धक्क्यातून,व्यासायिक लोक व्यवसायाच्या तोट्यातून,कर्जातून संपवताहेत स्वतःला... आत्महत्येच्या बाबतीत अग्रेसर बनत चाललाय आपला देश...हे थांबायला हवं किमान कमी व्हायला हवं...आत्महत्या सोडा पण रोज थोडं थोडं मरणच अनुभवत असतो आपण त्यापेक्षा जगणं सुसह्य होईल असे उपाय का शोधू नयेत??
गेली बारा-चौदा वर्षे मी व्यक्तिशः या क्षेत्रात काम करतोय...समस्या आहेत आणि त्यावर उपायही आहेत..फक्त बोललं पाहिजे ...योग्य व्यक्तीशी बोललं पाहिजे ...आम्ही 'स्वयंप्रेरणा'च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकार लोकांना सोबत घेऊन बारामतीत पूर्णवेळ समुपदेशन केंद्र सुरू केलेले आहे.ऑनलाइन/ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही आमच्याशी संवाद साधू शकता.वेळेनुसार समुपदेशक आपल्याला उपलब्ध होतील.अर्थात ही सेवा विनामूल्य नाही.
खाली दिलेल्या नंबर्सवर फोन करून/किंवा व्हाट्स अप मेसेज करून आपण (सशुल्क) अपॉइंटमेंट घेऊन आम्हाला भेटू शकता.
आनंदी राहणं,तसं जगणं आपला हक्क
आहे तेव्हा हक्काने फोन करा आम्ही सोबत आहोत.
-दिनेश आदलिंग
&टीम स्वयंप्रेरणा.
संपर्क-7798082219/ 9623966000
Mubin Tamboli Yuvaraj Patil Sonali Khade Jyoti Kanchan