Sinare hospital and Gayatri Dental clinic

Sinare hospital  and Gayatri Dental clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sinare hospital and Gayatri Dental clinic, Hospital, near shahar bank, nagar manmad Road, nagapur, Ahmednagar.

19/02/2022
प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे *राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडू साहेब* यांनी अहमदनगर दौऱ्यावर असताना *सिना...
14/10/2021

प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे *राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडू साहेब* यांनी अहमदनगर दौऱ्यावर असताना *सिनारे हॉस्पिटलला* भेट दिली तसेच करोना काळात *डॉ. प्रशांत सिनारे* यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. विनोद परदेशी व आमचे मित्र, स्नेही, मार्गदर्शक उपजिल्हाध्यक्ष मा. पप्पूशेठ येवले (किनारा हॉटेल) व हॉस्पिटलचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

डाॅ. प्रशांत सिनारे( सिनारे हॉस्पिटल ) यांनी भाळवणी येथील मा.शरदचंद्र जी पवार साहेब कोविड सेंटर ला सदिच्छा भेट दिली.तसेच...
24/05/2021

डाॅ. प्रशांत सिनारे( सिनारे हॉस्पिटल ) यांनी भाळवणी येथील मा.शरदचंद्र जी पवार साहेब कोविड सेंटर ला सदिच्छा भेट दिली.तसेच या ठिकाणी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्यांची घेतली जाणारी काळजी, तसेच डॉक्टर, नर्स, स्टाफ यांचे असणारे योगदान यांचे त्यांनी कौतुक केलं. अशा विविध गोष्टी संदर्भात त्यांनी माहिती घेतली.

So visit your dentist every six months
06/03/2021

So visit your dentist every six months

राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (मुंबई) व शिवभक्त श्री सुनील क्षिरसागर यांच्या  तर्फे  *कोरोना योद्धा* पुरस्कार  अहमदनग...
06/01/2021

राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (मुंबई) व शिवभक्त श्री सुनील क्षिरसागर यांच्या तर्फे *कोरोना योद्धा* पुरस्कार अहमदनगर शहराचे *आमदार मा.श्री.संग्रामभैय्या जगताप* यांच्या हस्ते *डॉ.प्रशांत दिलीप सिनारे* यांना देण्यात आला.याप्रसंगी अहमदनगर महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते व नगरसेवक श्री. संपत दादा बारस्कार, श्री.डॉ.सागरजी बोरुडे (नगरसेवक), तसेच हमाल माथाडी पंचायत समिती चे अध्यक्ष श्री. अविनाश (तात्या) घुले व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

09/10/2020

वस्तुस्थिती -
डॉक्टरने आपल्याला फुकट तपासावे किंवा फुकट उपचार द्यावे असं आपल्याला का वाटतं?
तो तुम्हाला तुमचा हक्क वाटतो की ती डॉक्टरची ड्युटी वाटते?
डॉक्टरांकडून मोफत अथवा माफक दरात सेवेची अपेक्षा ठेवणाऱ्या समाजाच्या कोणत्या घटकाने त्यांचीपण सेवा ऐच्छिक ठेवली आहे?
उदा. आयटीवाले, बँकर्स, इंजिनिअर,वकील, कापडदुकानदार, बेकरी, पुस्तक दुकानदार, शोरूम, मॉलवाले किंवा इतरही किती लोक सामाजिक बांधिलकी जोपासत सवलतीच्या दरात वा मोफत सेवा देतात?
"सेवा" या शब्दाचे दोन अर्थ होतात. पहिला म्हणजे, गरिबांची, दिन दुबळ्यांची वगैरे.. हि सेवा मानवतावादी असते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती 'केली' जाते.
दुसरी सेवा म्हणजे, अर्थव्यवस्थेच्या सेवा.. कृषी, उद्योग, वैद्यकीय इ.
इथे सेवा 'केली' जात नाही, तर 'दिली' जाते, पुरविली जाते. अर्थातच योग्य तो मोबदला घेऊन..
वैद्यकीय सेवा हि दुसऱ्या प्रकारातली सेवा आहे.
वैद्यक व्यवसाय हा अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्रातील एक 'व्यवसाय'आहे. कुठलीही वस्तू किंवा सेवा फुकट मिळत नाही, तर त्यासाठी मोबदला द्यावा लागतो, म्हणून वैद्यकीय सेवा देखील फुकट मिळणार नाही हे समाजाला अजून पटतच नाहीये..
गोची इथेच होते. सेवांच्या या दोन प्रकारांमध्ये गल्लत होते. आणि हि गोची समाजात, सरकारमध्ये, आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमध्ये पण पाहायला मिळते..

कुठलाही इंजिनिअर समाजासाठी डिजाईन्स फ्री बनवून देत नाही (अगदी म्हातारपणात सुद्धा..), वकील कुणाचंही सरसकट फ्री कन्सल्टेशन करत नाही, सीए समाजातील कोणाचेही फ्री मध्ये ऑडिट करून देत नाहीत, शिक्षक रिटायर झाल्यावरसुद्धा फ्री क्लासेस घेत नाहीत..

मग डॉक्टरकडूनच समाज अशी अपेक्षा का करत असावा बरं..?

बर.. समाज डॉक्टरला कोणत्या गोष्टी मोफत अथवा कमी रेट ने देतो..?
समोरचा डॉक्टर आहे म्हणून, एखादा वकील त्याच्याकडून कमी फी घेतो का? एखादा जागा कमी भावात डॉक्टरला विकतो का? एखादा फ्लॅट किंवा हॉस्पिटलचे कमी भाडे घेतो का? एखादा त्याच्या मुलाला फ्री शिकवतो का? एखादी शाळा कमी फिस घेते का? एखादा दुकानदार ना नफा ना तोटा दराने वस्तू विकतो का? एखादा शेतकरी डॉक्टरला कमी दरात धान्य किंवा भाजी विकतो का?

मग डॉक्टरने कमी दरात समाजाला उपचार द्यावेत ही अपेक्षा समाज का बाळगून असतो..?

उलट, समोरचा डॉक्टर आहे असं समजल्यावर वकीलापासून प्लम्बर पर्यंत सगळे त्याच्याकडून फी जास्त घेतात.. डॉक्टर आहे म्हणलं की जागेचा भाव पण त्याच्यासाठी जास्त असतो..

डॉक्टरांना सेवा करण्याचे डोस पाजणारे सरकार डॉक्टरांना वीज, पाणी, जागा, वाहतूक, मशिनरी यातल्या कुठल्या गोष्टीत कन्सेशन तर देत नाहीच, पण उलट "ग्राहक संरक्षण कायद्यात" हा व्यवसाय आणून सगळाच घोळ घालून ठेवते..

**

समाजात एकंच गोष्ट वेगवेगळ्या दर्जाची मिळत असते.. पैसे देऊन आपल्याला जास्त दर्जाच्या सेवा घेता येतात.. चहा पाच रुपयाला पण मिळतो, आणि पाचशे रुपयाला पण मिळतो..! आपण आपल्या शौकनुसार आणि खिशानुसार ठरवायचे की टपरीवरचा प्यायचा की ताज मधला प्यायचा..

ताजला चहा पिऊन तुम्ही ओरड करू शकत नाहीत की आम्हाला लुटले म्हणून..
तसंच, ब्रीचकँडी किंवा रुबी मध्ये जाऊन तुम्ही ओरड करू शकत नाही की आम्हाला लुटले म्हणून..

कुठल्याही ठिकाणी संभाव्य बिलाची साधारण पूर्वकल्पना देतात.. तुमच्या खिशाला परवडत नसेल तर जाऊ नका.. इतकं साधं गणित आहे..!

जसं स्वतःच हायफाय हॉस्पिटलमध्ये जाऊन, आपल्याला लुटल्याची तक्रार करू नये, तसंच, छोट्या आणि कमी दरात सेवा पुरविणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन हायफाय अपेक्षाही करू नये..

सरकारी हॉस्पिटलमध्ये अगदी पाच रुपयांत कसलेही ऑपरेशन होते.. इतरही सेवाभावी संस्था आणि ट्रस्टची अनेक हॉस्पिटल अत्यल्प दरात उपचार देतात..

डॉक्टरांच्या अनुभवानुसार किंवा उपलब्ध सोयीसुविधांनुसार खाजगी हॉस्पिटलचे दर ही कमी अधिक असतात.. त्यानुसार आपल्याला निवड करता येते..

पण लोकांना डॉक्टरही अनुभवी आणि बेस्ट पाहिजे असतो.. तो सहज आणि हवा तेंव्हा उपलब्धही पाहिजे असतो.. हॉस्पिटलमध्ये एसी पासून गरम पाण्यापर्यंत आणि नर्सपासून स्वीपरपर्यंत सगळ्या सोयी अपटुडेट हव्या असतात.. सगळ्या मशिनरी आणि तपासण्यांच्या सोयी एकत्र पाहिजे असतात.. आणि बिल मात्र कमी पाहिजे असतं..!!
कसं जुळणार हे गणित.?

सरकारी नॉर्मस् प्रमाणे हॉस्पिटल बांधायचे, सरकारी नॉर्मस् प्रमाणे स्टाफ आणि मशिनरी ठेवायच्या म्हणलं तर उपचाराचा खर्च किती जातो, याची काहीही कल्पना जनसामान्याला नसते.. आणि त्यांना हे समजून घ्यायची इच्छाही नसते..

असो..

डोक्याला जास्त ताण देऊ नका..
या सगळ्याची उत्तरे तुम्हाला माहिती आहेत, पण तरी पण "डॉक्टरने समाजाचा विचार करून सेवाच केली पाहिजे", हे तुमचे पालुपद कायम राहणार आहे हे ही मला माहिती आहे..

पण निदान एक कृपा तरी करा..
एखाद्या डॉक्टरला सेवाव्रती व्हावं वाटलं तर तो त्याचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे.. पण म्हणून इतर डॉक्टर लुटारू किंवा कमी दर्जाचे ठरवू नका..

धन्यवाद.

महाराष्ट्राचे *नगर विकास राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे* साहेब यांनी सिटी केअर COVID हॉस्पिटल ला भेट देऊन *डॉ. प्रशांत ...
24/08/2020

महाराष्ट्राचे *नगर विकास राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे* साहेब यांनी सिटी केअर COVID हॉस्पिटल ला भेट देऊन *डॉ. प्रशांत सिनारे* यांच्याकडून कामकाजाची माहिती घेतली तसेच रुग्णांची विचारपूस केली. कोरोना जागतिक महामारी मध्ये सेवा दिल्याबद्दल सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व पाठबळ दिले. सोबत व्यवस्थापक राजेंद्र पगार.

Golden smile Sinare hospital and Gayatri Dental clinic
04/07/2020

Golden smile
Sinare hospital and Gayatri Dental clinic

A talk on safety and first aid in 'Sun Pharmaceutical' SCON project.  on occasion of '49th National Safety week'
13/03/2020

A talk on safety and first aid in 'Sun Pharmaceutical' SCON project. on occasion of '49th National Safety week'

शिवजयंती निमित्त राजमुद्रा ग्रुप व सिनारे हॉस्पिटल तर्फे हॅन्ड वॉश व मास्कचे वितरण.मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबीर संपन्न...
13/03/2020

शिवजयंती निमित्त राजमुद्रा ग्रुप व सिनारे हॉस्पिटल तर्फे हॅन्ड वॉश व मास्कचे वितरण.

मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबीर संपन्न.

अहमदनगर (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी शिवजयंतीचे औचित्य साधून राजमुद्रा ग्रुप (बालाजीनगर) आणि सिनारे हॉस्पिटल (नागापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने हॅन्ड वॉश व मास्कचे वितरण व मोफत आरोग्य तपासणी शिबीर, दंत तपासणी शिबीराचे आयोजन सकाळी ११ वा. आनंद गुरुकुल प्रायमरी स्कुल येथे करण्यात आले होते.

सिनारे हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत सिनारे, गायत्री डेंटल क्लिनिकच्या डॉ. गायत्री सिनारे, (आयकॉन मॅनेजर) विनोद सॅन्डिंम, (एस.एस. फर्निचरचे) संतोष भोसले, अशोक भंडारी, रुपाली भंडारी, अनिल आव्हाड, विनय साळवे, राजू लोखंडे, विक्रांत दिघे, दादासाहेब चौधरी, राजू शेख, निखिल सिनारे, सिनारे हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स यांच्यासह आनंद गुरुकुल प्रायमरी स्कुल चे विद्यार्थी व पालक यावेळी उपस्थित मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, गरजूंना हॅन्ड वॉश, मास्कचे वितरण व मोफत आरोग्य तपासणी, दंत तपासणी, रक्त तपासणी व ब्लड प्रेशर यांची तपासणी करण्यात आले.

यावेळी डॉ. प्रशांत सिनारे यांनी कोरोना व्हायरस विषयी घ्यावयाची दक्षता याबद्दल मार्गदर्शन करतांना म्हणाले की, वारंवार साबण अथवा हॅन्ड वॉश ने हात धुवत राहणे, सर्दी, ताप, खोकला सदृश्य झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, हस्तांदोलन करणे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे, अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर आजबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजमुद्रा ग्रुपचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

फोटो ओळी :- शिवजयंती निमित्त राजमुद्रा ग्रुप व सिनारे हॉस्पिटल तर्फे हॅन्ड वॉश व मास्कचे विद्यार्थ्यांना वितरण करतांना डॉ. प्रशांत सिनारे, डॉ. गायत्री सिनारे, अशोक भंडारी, अनिल आव्हाड, विनय साळवे, विक्रांत दिघे, सुहास पवार व इतर

Opening ceremony of Sinare hospital.... 16/03/2020
13/03/2020

Opening ceremony of Sinare hospital.... 16/03/2020

Address

Near Shahar Bank, Nagar Manmad Road, Nagapur
Ahmednagar
414111

Telephone

+918605323797

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sinare hospital and Gayatri Dental clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category