Swastik Clinic - Dr Dnyanesh Aitalwad

Swastik Clinic - Dr Dnyanesh Aitalwad General Physician and Surgeon

14/11/2022

29/07/2022

सर्दी, खोकला, ताप, जुलाब, डेंगू,
चिकनगुनिया, मलेरिया लहान मुलांच्या आजारांसाठी
आता दररोज संध्याकाळी
अनुभवी बालरोग तज्ञ उपलब्ध

सवलतीच्या दरात तपासणी वेळ : सायं. 6 ते 9

उपलब्ध सुविधा : -
• सर्व प्रकारचे लसीकरण सुविधा
• ऑटीझम (स्वमग्न) मुलांसाठी मार्गदर्शन ,
• किशोरवयीन मुला-मुलींचे समस्या निवारण
• नवजात शिशु व बालरोग व स्तनपान विषयक समस्यांवर विशेष उपचार ,
• कमी वजनाच्या मुलांसाठी विशेष उपचार व मार्गदर्शन
• बालदमा, झटके (मिरगी), गतिमंद, कुपोषित,
लठ्ठपणा आदि बालरोगांवर विशेष उपचार



Dr Nirmala Palekar
(M.B.B.S. DCH)
(नवजात शिशू व बालरोग तज्ञ)

🏥 Swastik Clinic
Vijay Nagar, Alamgir Road, Bhingar, Ahmednagar
Contact : 📱 9823133127

General Physician and Surgeon

Happy Guru Pournima 💐💐💐
13/07/2022

Happy Guru Pournima 💐💐💐

10/07/2022

Happy Doctors Day 💐💐💐
01/07/2022

Happy Doctors Day 💐💐💐

15/06/2021

पांढरे शुभ्र दातांसाठी ३ घरगुती उपाय..एका रात्रीत दात मोत्यांसारखे चमकतील..आयुष्यभर दात सुंदर व मजबूत बनतील !

पांढरे शुभ्र आणि चमकदार असतील तर आपले सौंदर्य अधिकच खुलते बोलताना सर्व प्रथम आपले लक्ष दातांकडे जाते आणि दात जर पिवळे असतील आणि दातावर जर घाण साचलेली असेल तर तुमचे इंप्रेशन पूर्णपणे निघून जाते. तर अशा या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आणि तंबाखु गुटखा पान मसाला यामुळे जे दात रंगले आहेत किंवा दातावर जी घा ण साचलेली आहे,
ही सर्व घा ण काढून टाकण्यासाठी व दातावरील पिवळेपणा घालवण्यासाठी किंवा रंगलेले दात पुन्हा स्वच्छ किंवा पांढरेशुभ्र करण्यासाठी काही अतिशय सोपे आणि सर्वांना करता येण्यासारखे घरगुती आयुर्वेदिक उपाय आहेत. ज्याचा कोणताही साईड इ फे क्ट नाहीये.
दात हे पिवळे का होतात किंवा त्यांचा रंग का बदलतो याचे कारण म्हणजे तुम्ही जर जास्त चहा, कॉफी घेत असाल तर त्याचा परिणाम दातांवर होत असतो, तसेच जर तुम्ही धूम्रपान करत असाल तरीही तुमचे दात खराब होतात इतकेच नव्हे तर जर तुम्ही दातांची निगा राखत नसाल, दातांची स्वच्छता करत नसाल तर त्यामुळे देखील दातांवर थर साचतो.
त्यामुळे दातांची वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी घरच्या घरी उपाय करुन तुम्ही दातांची काळजी घेऊ शकता. यासाठी बेकिंग सोड्याचा वापर फायदेशीर ठरतो. बेकिंग सोड्यामध्ये अँ टी बॅ-क्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या दातांवरचा पिवळा थर निघून जाण्यास मदत होते.
इतकेच नव्हे तर यामुळे दातांना एक वेगळीच चकाकी येते. त्यामुळे बेकिंग सोडा खाण्याचा सोडा घेऊन तुम्ही ब्रश करायचा, जर रोज असे केलं तर उत्तमच नाहीतर तुम्ही एक दिवस आड एक दिवस करू शकता. त्यामुळे तुम्हाला फरक नक्की जाणवेल.
दुसरा उपाय जो आहे आपल्या अंगणातील तुळस, जी तुळस आपल्याला अनेक औ-षधी गुणधर्म देते. तुळशीमध्ये सुद्धा अँ टी फंगल , अँ टी बॅ-क्टरीयल गुण असल्याने दातांवरील थर दूर होतो. त्यामुळे तुम्ही काही तुळशीची पाने घेऊन ती उन्हात वाळवून ठेवा व नंतर त्याची पावडर बनवून त्या पावडरने रपज ब्रश करत रहा.
किंवा त्याहूनही सोपा उपाय म्हणजे रोज तुम्ही तुळशीची 3 ते 4 पाने चावून खा. त्यामुळे दातांवरील थर निघून जातो. तिसरा घरगुती उपाय म्हणजे मीठ. मिठामध्ये सुद्धा जं तू ना-शक गुणधर्म असल्याने दात घासण्यासाठी मिठाचा वापर केला जातो.
हा उपाय करताना जर तुम्ही फक्त मीठ वापरलं तर लवकर परिणाम दिसणार नाहीत पण जर तुम्ही मिठासोबत राई चे तेल वापरले तर त्याचा परिणाम दिसून येईल. हे सर्व घरगुती, आ यु र्वे दि क उपाय तुमच्या दातांना निरोगी ठेवतीलचं सोबत तुमच्या दातांना चमकदार सुद्धा बनवतील..

26/11/2020

Think Healthy Thoughts
25/11/2020

Think Healthy Thoughts

21/11/2020

*व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं!!!*

आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक 'लाटा' उसळत असतात व कालांतराने
त्या ओसरतात... त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने
लाटा जरा जोरकस वाटतात...

पूर्वी गव्हांकूराची
प्रचंड लाट होती...
प्रत्येक बाल्कनी - टेरेस -
अंगणात गव्हांकुर
पिकू लागले...
कॅन्सर, डायबेटीस.. बी.पी...
गायब होणार आणि
एकदम तंदुरुस्त होणार..

कैक टन गव्हांकुर संपले...
मानसिक समाधानापलीकडे
विशेष काही घडले नाही
व लाट ओसरली !

अल्कली WATER...
ह्याची लाट तर जणू अमृतच
मिळाले अशी होती....
म्हणाल तो रोग समूळ
नष्ट होणार...
२० हजार - ३० हजार
मशीनची किंमत...
मशीन्स धूळ खात पडली...
लाट ओसरली !!

सकाळी उठल्या उठल्या
मध-लिंबू-पाणी..
वजन घटणार ...
बांधा सुडौल होणार..
हजारो लिटर मध संपले...
हजार मिलीग्राम पण
वजन नाही घटले...
लाट ओसरली !!!

मग आली नोनी फळाची लाट
नोनीने नानी आठवली
पण,
तीही लाट नानी व नाना पार्क
मधून वैकुंठाला घेऊन गेली

अलोव्हेरा ज्यूस...
सकाळ संध्याकाळ प्या..
डायबेटीस, बी.पी. एकदम
नॉर्मल होणार..
हजारो बाटल्या खपल्या...
विशेष काही बदलले नाही...
लाट ओसरली !!!!

मग रामदेव बाबांची
बिस्किटे आली.
५००० करोड चा
व्यवसाय झाला .
परिस्थिती आहे तीच.

मग माधवबागवाले आले.
तेल मसाज पंचकर्म करा,
हृदयाचे ब्लॉक घालवा.
राहता ब्लॉक विकायला लागला
पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही.
(आता माधव बाग जाहिरात करतात
की डायबिटीस पूर्ण घालवतो.)

मग आली दिवेकर लाट
मग आली दीक्षित लहर

आता तर जग दोन भागात विभागले आहे

दार उल दिवेकर
आणि
दार उल दीक्षित
.. ही लाट आता उसळ्या घेतेय...
ओसरेल लवकरच !!!!!

लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही,
पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय !!

डोकं वापरा आणि
Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा.

आणखी थोडं डोकं लावा,
आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद
म्हणजे नियम शास्त्र.
रोजचे शाकाहारी जेवण पालेभाजी, वेलवर्गीय भाजी, फळभाजी, मोडआलेली कडधान्य, सँलड, साजुक तूप, बदलते गोडेतेल, गहूँ, ज्वारी, बाजरी व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम
पहा काय फरक पडतो.
लोकांना शिस्त नकोय..
जीभ चटावलीय..
पैसा बोलतोय...
"स्वयंपाक नकोय..."

आता तर घरपोच...
पंधरा मिनीटात...
....आली लाट मारा उड्या

*हसत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!!!*

सकाळी लवकर उठणं,
रात्री लवकर झोपणं,
दुपारी थोडीशी विश्रांती
घेणं आवश्यक आहे.

*आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे.*

*आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर सुरुवात करायला काय हरकत आहे ?*

दिर्घायुष्य लाभावं, आरोग्याच्या
कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत,
या करीता आपला आहार,
आपलं राहणीमान योग्य
असणं महत्वाचं आहे.

*आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात.*

*या व्यायामात नियमितता व सातत्य असावं. दर दोन-तीन महिन्यांनी*
*व्यायाम प्रकारात बदल जरूर करा.*

आणि हो :-
या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा.
ताणतणा विरहित जीवन जगा.
*ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल....*
*आजपासून सर्वांनी व्यायाम सुरू करून त्यात सातत्य ठेवावे व सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे हीच सदिच्छा, हार्दिक शुभेच्छा..*
Swastik Clinic - Dr Dnyanesh Aitalwad

21/11/2020

Address

Vijay Nagar, Alamgir Road, Bhingar
Ahmednagar
414002

Opening Hours

Monday 10am - 2pm
6pm - 10pm
Tuesday 10am - 2pm
6pm - 10pm
Wednesday 10am - 2pm
6pm - 10pm
Thursday 10am - 2pm
6pm - 10pm
Friday 10am - 2pm
6pm - 10pm
Saturday 10am - 2pm
6pm - 10pm
Sunday 11am - 2pm

Telephone

+919823133127

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swastik Clinic - Dr Dnyanesh Aitalwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Swastik Clinic - Dr Dnyanesh Aitalwad:

Videos

Share