
23/10/2019
वारंवार होणारे आजार व होमिओपॅथी:-
अनेक आजार असे आहेत की जे वारंवार होत असतात. औषधे घेतल्यानंतर ते काही काळापुरते नाहीसे होतात किंवा त्रास कमी होतो. परंतु, काही दिवसांनंतर पुन्हा उद्भवतो दिवसेंदिवस अशा आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे व असे त्रास, आजार वाढण्याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या कारणाचे कमी होत चाललेली शरीराची प्रतिकार शक्ती.
वारंवार होणा-या आजारांची बाह्य कारणे वेगवेगळी असतात. उदा. काही मुलांना केळी, पेरू खाल्लयाने खोकला होतो. तर काही जणांना आंबट खाल्लयाने सांधे दुखतात किंवा अॅसिडीटीचा त्रास होतो. तर काही जणांचे उन्हात गेल्यावर डोके दुखते. वातावरणातील बदलाने सुध्दा अनेक जण आजारी पडतात. सर्वसामान्य माणसास आजाराची बाह्य कारणे हीच मुळ कारणे वाटतात व त्यापासूुन ते दूर राहण्याचा प्रयत्न करतात. व त्रास झाल्यास अॅलोपेथीची औषधे घेऊन तात्पुरते बरे होतात.
वरील बाह्य कारणाने जरी आजार होतो असे असले तरी मूळ कारण हे वेगळे असते व ते म्हणजे त्या व्यक्तीतील विशिष्ट पदार्थ वातावरण सहन न होण्याची ‘प्रवृत्ती’ जसे पून्हा पुन्हा तोंड घेण्याची प्रवृत्ती अर्धशिशी, वातप्रवृत्ती इत्यादी. बरेच आजार मुळापासून बरे न होता ते वारंवार त्रास देतात. थोडे दिवस बरे वाटल्यानंतर ते पुन्हा उद्भवतात हे अनुभव अॅलोपॅथीमध्ये एम.डी. झालेल्या डॉ.सॅम्युअल हानिमान यांच्या लक्षात आले, त्यानंतर त्यांनी असे आजार होण्याची मुळ कारणे शोधून काढली. व त्यावर उपचार केल्यानंतर असे वारंवार उद्भवणारे आजार होमिओपॅथीने कायमस्वरूपी बरे होतात असे अडीचशे वर्षांपुर्वी सिध्द केले. आजही हीच होमिओपॅथीची औषधे वापरून अनेक रूग्ण ‘रोगमुक्त’ होतात.
ब-याच लोकांना तसेच इतर पॅथीमधील अनेक डॉक्टरांनासुद्धा कल्पना नसते. असे वारंवार उद्भवणारे आजार बरे होतात. एका दम्याच्या पेशंटला एका डॉक्टरांनी असे सांगितले की तुमचा दमा बरा होणार नसून दमा आणि तुम्ही बरोबरच जाल. माझ्या 28 वर्षांच्या प्रॅक्टीसमध्ये असे अनेक लोक मला भेटले कि ज्यांना असे आजार कायम स्वरूपी बरे होऊ शकतात, हे माहितीच नव्हते व ते होणारा त्रास वर्षानुवर्ष सहन करत होते. परंतु, योग्य होमिओपॅथीच्या उपचाराने ते रोगमुक्त झाले.
काही जणांना किडनीमध्ये स्टोन होतात व ते परत परत होण्याची प्रवृत्ती अनेक जणांमध्ये असते. अशा लोकांमध्ये स्टोनचा आकार मोठा असल्यास होमिओपॅथिक डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देतात. परंतू, अशा पुन्हा पुन्हा स्टोन होण्यांची प्रवृत्ती असलेल्या रूग्णांना मात्र इतर पॅथीचे डॉक्टर होमओपॅथिक औषधे घ्या असता सल्ला देतांना दिसत नाहीत. पुन्हा पुन्हा स्टोन होण्याची प्रवृत्ती होमिओपॅथिक औषधाने कायमस्वरूपी घालविता येते. अनेकजण बद्धकोष्टतेसाठी चुर्ण गोळ्या घेत असतात व ते रोज घेण्याची सवय लागते. पोट साफ न झाल्यास ते अस्वस्थ होतात. परंतू, चुर्ण व गोळ्या रोजरोज घेतल्यामुळे त्याचे दुष्परीणाम आतड्यांवर होतात व वय वाढते तसतसे मल पुढे ढकलण्याची आतड्यांची क्षमता कमी होत जाते. अशी बध्दकोष्ठतेची प्रवृत्ती योग्य होमिओपॅथिक इलाजाने कायमस्वरूपी जाते. ब-याच जणांना अॅलर्जीचा त्रास असतो. असे अॅलर्जीचे त्रास कायमस्वरूपी घालविण्यासाठी होमिओपॅथिची औषधे अतीशय गुणकारी आहेत. असे अॅलर्जीचे रूग्ण वारंवार उद्भवणा-या त्रासाचे रूग्ण एका डॉक्टरांकडून दुस-या डॉक्टरांकडे जात असतात. परंतू, एकाच पॅथीच्या वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन रूग्ण बरा तर होत नाही परंतू, आपला आजार बरा होऊ शकतो. हा आत्मविश्वास सुध्दा गमावून बसतो. अशा पेशंटसाठी डॉक्टर बदलून नाही तर पॅथी बदलून व होमिओपॅथीक डॉक्टरांच्या सल्लयाने योग्य औषधे घेऊन कायमस्वरूपी आजाराचे मुळापासून उच्चाटन करावयास हवे.
अनेक वर्षांपासून वारंवार उद्भवणारे व अॅलर्जीचे रूग्ण होमिओपॅथिक डॉक्टरांकडे येतात व अशा अपेक्षेने औषधे घेतात की त्यांचा त्रास, आजार त्वरीत बरा व्हावा. परंतू , अनेक वर्षांपासून असलेला आजार होमिओपॅथिक औषधाने समुळ जाण्यास काही कालावधि लागतो. याचे भान रूग्णांनी ठेवायला हवे. जे आजार कधीच बरे होणार नाहीत असे इतर डॉक्टर सांगतात. असे आजार होमिओपॅथीने बरे होतात. पण त्यास वेळ द्यायला हवा. उदा. सोरायसिस, दमा, जुनी सांधेदुखी, जुनाट अर्धशिशी इत्यादी.
काही जणांना ठराविक पदार्थ, अन्नघटक सहन होत नाहीत. हे पदार्थ सेवन केल्यानंतर विशिष्ट त्रास होतो. उदा. दुध प्यायल्यावर मळमळ, मेथी, तूरडाळीमुळे अॅसिडीटी, अंडी खाल्लयावर पोटदुखी, आंबट खाल्लयावर त्वचेवर पित्त इत्यादी अशा वेगवेगळ्या पदार्थांचा त्रास खूप जास्त प्रमाणात होत नसल्याने तो पदार्थ खाणे टाळतात. परंतू, होमिओपॅथिक औषधाने असे पदार्थ सहन करण्याची शरीराची शक्ती वाढते व भविष्यात असे पदार्थ खाल्लयानंतर त्रास होत नाही.
वातावरणाच्या बदलांमुळे होणारे विकार, वर्षातून ठराविक ऋतुंमध्ये होणारे त्रास, धुळ, धुर, उग्र वासांमुळे उद्भवणारे त्रास तसेच प्रवास, जागरण, मानसिक ताणामुळे उद्भवणा-या विकारांवर होमिओपॅथि अतिशय गुणकारी आहे. एखादा रूग्ण अॅलोपॅथीच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यास बरे न वाटल्यास तो दुस-या अॅलोपॅथिक डॉक्टरांकडे जातो. व त्यापण उपाचाराने बरे न वाटल्यास अॅलोपॅथीच्या वेगवेगळ्या डॉक्टरांकडे उपचार घेत असतो. त्याउलट होमिओपॅथिक डॉक्टरांकडे एखादा रूग्ण गेल्यानंतर त्यास बरे न वाटल्यास तो सरसकट होमिओपॅथिलाच दोष देतो. परंतू, अॅलोपॅथिक डॉक्टरांकडून बरे न वाटल्यास तो अॅलोपॅथिकला दोष न देता त्याच पॅथिच्या वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जात रहातो. रूग्णास होमिओपॅथीच्या एका डॉक्टरांकडे जावून बरे न वाटल्यास सरसकट होमिओपॅथीला दोष न देता त्यांनी दुस-या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
होमिओपॅथिक उपचाराने
* रोगप्रतिकार शक्ती वाढते.
* वारंवार होणा-या आजाराची शारीरिक प्रवृत्ती घालविते.
* वारंवार होणारे आजार, त्रास कायमस्वरूपी बरे होण्यास मदत.
* होमिओपॅथिक औषधांची सवय लागत नाही.
* विशिष्ट वातावरणात, पदार्थ सहन करण्याची शारीरीक क्षमता वाढते.
* उपचार घेतल्यास कोणतेही दुष्परीणाम शरीरावर नाहीत.