06/01/2026
आमच्या सर्व रुग्ण आणि हितचिंतकांसाठी महत्त्वाची सूचना
एका थर्ड पार्टी लिस्टिंग प्लॅटफॉर्मवर (Just Dial), रुधिरा डायग्नोस्टिक्स, अहिल्यानगर हे केंद्र “बंद झाले” असे चुकीचे दर्शविले जात आहे तरी आम्ही सर्वांना स्पष्टपणे कळवू इच्छितो की रुधिरा डायग्नोस्टिक्स सुरु झालेल्या दिवसापासून आजपर्यंत अव्याहतपणे व्यवस्थित सुरू आहे आणि नेहमीप्रमाणे सर्व तपासण्या व सेवा सुरू आहेत.
आम्ही Just Dial च्या पेड सब्स्क्रिप्शनची योजना न स्वीकारल्यामुळे आमच्या केंद्राबद्दल हा चुकीचा संदेश दर्शविला जात असल्याचे आमच्या लक्षात आलेले आहे.
अशा प्रकारे दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती आमच्या रूग्णांना देणे हे कुठल्याही नैतिकतेत बसणारे नसून प्रामाणिक व निष्पक्ष व्यावसायिक आचारसंहितेच्या विरोधात आहे, असे आम्ही मानतो.
आमचा प्राधान्यक्रम हा नेहमीच सत्य, पारदर्शक संवाद आणि रुग्णांचे कल्याण हेच राहिलेले आहे आणि यापुढेही राहील.
आमच्या वेळा, सेवा आणि लोकेशनबाबत योग्य व अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी कृपया केवळ खालील अधिकृत माध्यमांवर विश्वास ठेवा:
✅ आमचा Google Business Profile आणि Google Maps वरील अधिकृत लिस्टिंग
✅ आमची अधिकृत सोशल मीडिया पेजेस
✅ आमचे नोंदणीकृत संपर्क क्रमांक आणि प्रत्यक्ष रिसेप्शन डेस्क
आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक रुग्ण, डॉक्टर आणि शुभेच्छुकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.
तुमचा विश्वास हेच आमचे बळ आहे, आणि त्याच प्रेरणेने रुधिरा डायग्नोस्टिक्स, पारदर्शकता, सचोटी आणि दर्जेदार डायग्नोस्टिक सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.
सदैव आपल्या सेवेत...
— टीम रुधिरा डायग्नोस्टिक्स, अहिल्यानगर.