07/03/2023
आज कलचा ट्रेंड प्रमाणे सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. महिला दिन देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, कॉलेज मध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.ह्या दिवशी महिलांचा योगदान लक्षात घेऊन त्यांचा गौरव केला जातो.या दिवशी मुली, महिला यांचा सन्मान केला जातो. घरात ही या दिवशी आई, बहीण यांना मान दिला जातो. मग गिफ्ट्स, ग्रीटिंग, सेलेब्रेशन केले जातात. एक प्रश्न होता हा मान फक्त एक दिवसपुरता असतो का??
महिला दिनाला त्या महिलांचे कर्तृत्व दिसते का?? बाकी दिवस त्या महिलाचं काहीच नाही का.. रोज ती स्त्री सकाळी लवकर उठते, मुलांचं शाळेचं आवरते, सकाळचा नाश्ता, घरातली कामे, वर्किंग वूमन असेल तर ऑफिसची कामं करते, घरच्यांचं करते ती स्त्री नसते का??
एक अपेक्षा असते माहिलांनी घरातलं बघितलं पाहिजे, तिनं बाहेर ही काम केलंच पाहिजे, तिनं मुलांना सांभाळायला पाहिजे, घरच्याचं केलंच पाहिजे.. का फक्त महिलांकडून अपेक्षा असतात ह्या??
तिनं एकटीने का करावं हे सगळं..किती दिवस करावं.. तिला स्वतःच अस्तित्व नाही का??
ती स्त्री आजारी असली तरी तिनं काम करायचं, तिच्या मासिक पाळीच्या दिवसात ही जेव्हा तिला असह्य वेदना होत असतात अपेक्षा असते की तिनं सगळी कामे केली पाहिजे...नऊ महिने गरोदर राहते.. स्वतः मध्ये शारीरिक बदल घडवून बाळाला जन्म देते.. लहानचं मोठा करते आजारी पडले की त्याच्या उषाशी राहते.. हीच स्त्री जेव्हा जाड होते मग तिला नाव ठेवली जातात.. ती हिरोईन किती बारीक आहे, ती किती बारीक आहे आणि तू बघ..कारण ती स्त्री स्वतःला विसरून जाते..
आज ही स्त्री कडे बघायचा दृष्टीकोण बदलेला नाही?? आज ही लोक स्त्रीला वाईट नजरेने बघतात. अशी आज काल ची समज की घरातल्या बाई माणूस आणि बाहेरचा बायका.. घरीच्या महिला, मुली, बहीण यांना सन्मान आणि बाहेर बायकांना नाव ठेवणे, त्रास देणे, त्यांचा मागे बोलणे, टीका करणे.. का बाहेरच्या महिला कोणाच्या आईबहीण नसतात का?? आज आपण म्हणतो की पुरुषांच्या कर्तृत्वाच्या मागे स्त्री चा हात आहे किंवा महिला पुरुषाच्या बरोबरीने काम करते किंवा चालते पण तीच स्त्री किती सुरक्षित आहे??
आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने सगळी कामे करते पण जर तीच स्त्री दिसायला छान असेल तर किंवा ती स्त्री हसून बोलली किंवा छान राहत असेल तर तिला नावं ठेवायचे ती आशीच आहे, ती लूस कराक्टर आहे. का त्या स्त्रीने कामच केला पाहिजे तिला बोलायला हक्क नाही का?? तिनं छान राहावं नाही का?? तिनं मोकळ्या मनानं हसावं नाही का?? का तिला कायम नावं ठेवले जातात.. आज आपण एका येणे महिलादिन साजरा करतो.. तिचा गौरव करतो व दुसऱ्या क्षणी आपण तिला कमी लेखतो किंवा नाव ठेवतो... स्त्रीचा सन्मान करा घरी व बाहेर दोन्हीकडे करा.. फक्त एक दिवसापूरता मान न देता कायम तिचा सोबत रहा तिला मदत करा, पाठीशी रहा कारण जन्म देणारी आई असते, हातात राखी बांधणारी बहीण असते, आयुष्यभर सोबत असणारी बायको असते, आपली मुलगी असते.. तर नक्की स्त्रीचा सन्मान करा व आदराने वागवा
परत एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
डॅा. आदिती पानसंबळ
आहारतज्ञ