Aayushkamiy Panchkarma
- Home
- India
- Ahmednagar
- Aayushkamiy Panchkarma
Ayurvedik Panchkarma Treatments By Professional Our Doctors.
Address
Branches At Vasai, Virar, Boriwali, Dadar, Ahmednagar And Shrigonda
Ahmednagar
414001
Opening Hours
Monday | 9am - 5pm |
Tuesday | 9am - 5pm |
Wednesday | 9am - 5pm |
Thursday | 9am - 5pm |
Friday | 9am - 5pm |
Saturday | 9am - 5pm |
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Aayushkamiy Panchkarma posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Practice
Send a message to Aayushkamiy Panchkarma:
Shortcuts
Category
पंचकर्म आणि आयुर्वेद
पंचकर्म ही आयुर्वेदाची एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली ही उपचार पद्धती आहे. यामध्ये रोग बरा करण्यासाठी एखादे औषध देऊन शरीरातच तो रोग जिरवून न टाकता तो रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे रोग समूळ नष्ट होतो. अर्थात तो रोग पुन्हा डोके वर काढत नाही व रोग समूळ नष्ट होतो. अशा रीतीने रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेला शोधन क्रिया म्हटले जाते. मात्र त्याचबरोबरच बृहन, लंघन, स्नेहन, रुक्षण, स्वेदन व स्तंभन हे सहा उपक्रमही केले जातात. परंतु पंचकर्म उपचारात वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण हे प्रमुख व अत्यंत महत्त्वाचे असे उपचार आहेत. प्रत्येक रुग्णाला हे पाचही उपचार केलेच पाहिजे, असे आवश्यक नाही. रुग्णाची प्रकृती, आतापर्यंत झालेली मोठमोठी आजारपणे, वय, कुठला ऋतू सुरू आहे या सर्वांचा विचार करून वैद्य रुग्णाला नेमका कुठला उपचार द्यायचा हे ठरवितात. पंचकर्मामध्ये वात, पित्त आणि कफ या तीन दोषांचे शोधन करायचे असते. वात, पित्त व कफ हे तीन दोष संतुलित असतील तर कोणताही रोग होत नाही. मात्र यांच्यापैकी एखादाही दोष वाढला असेल तर, शरीरात रोग निर्माण होत असतो. हे तीन दोष वाढण्याच्यादेखील वेगवेगळ्या श्रेणी असतात. त्यानुसार उपचार निश्चित केला जातो. साधारणतः अन्न पचन न होणे, तोंडाला चव नसणे, स्थूलपणा, ऍनिमिया, जडत्व, अंग गळून जाणे, अंगावर पित्त उठणे, सर्वांगास कंप सुटणे, सर्व अंग जखडणे, कामात लक्ष न लागणे, अतिशय आळस येणे, थोडे श्रम करताच दम लागणे, अकारण अशक्तपणा येणे, सर्वांगास दुर्गंधी येणे, वारंवार कफ होणे, वारंवार पित्त होणे, निद्रानाश किंवा अतिशय झोप येणे, नपुंसकता येणे, वाईट स्वप्ने पडणे, शरीराचा वर्ण काळवंडणे ही लक्षणे दिसलीत तर पंचकर्म उपचार देणे अतिशय लाभकारक असते. पंचकर्म उपचार करताना रोग्याची शक्ती पाहिली जाते. हे उपचार सोसण्याची ताकद रुग्णामध्ये असली पाहिजे. वात, कफ व पित्त हे तीन दोष शरीरात वाढले असतील. सर्व शरीरात पसरले असतील व ते साम अवस्थेत असतील तर ते दोष वाढलेले असूनदेखील पंचकर्माद्वारे तसेच्या तसे बाहेर काढता येत नाहीत. साम अवस्थेतील रोग्याचे शोधन केल्यास रोग्याला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी पाचन, स्नेहन व स्वेदन हे तीन पूर्व उपचार केले जातात व तद्नंतर पंचकर्म उपचार केले जातात.