Morya Hospital

Morya Hospital Since 2012
15bed
Appropriate diagnosis with cure
proper counseling

धुतल्या तांदळलाही लाजवेल इतकं स्वछ ज्यांच चारित्र्य आहे,कधीही न हरणारा व तह करून मागे न हटणारा जगातील एकमेव योद्धा, मराठ...
14/05/2024

धुतल्या तांदळलाही लाजवेल इतकं स्वछ ज्यांच चारित्र्य आहे,कधीही न हरणारा व तह करून मागे न हटणारा जगातील एकमेव योद्धा, मराठ्यांचा पहिला युवराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, क्षात्रवीर, संस्कृतपंडित, स्वराज्यसंरक्षक, रणमर्द संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त शंभूराजेंना मानाचा मुजरा.....🚩

आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो,हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना...
10/05/2024

आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,
धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो,
हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा..!"

क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. एकेकाळी या रोगाचा समावेश हा दुर्धर आणि कधीही बरा न होणाऱ्य...
24/03/2024

क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. एकेकाळी या रोगाचा समावेश हा दुर्धर आणि कधीही बरा न होणाऱ्या रोगांमध्ये होत होता. मात्र आता या आजारांवर अनेक औषधोपचार (Medication) निघाल्याने हा रोग पूर्ण पणे बरा होतो.

World TB Day : 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो?

क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. एकेकाळी या रोगाचा समावेश हा दुर्धर आणि कधीही बरा न होणाऱ्या रोगांमध्ये होत होता. मात्र आता या आजारांवर अनेक औषधोपचार (Medication) निघाल्याने हा रोग पूर्ण पणे बरा होतो. या आजाराबाबत लोकांच्या मनात आजही अनेक गौरसमज आहेत. या आजाराला टीबी म्हणून देखील ओळखले जाते. हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. या आजारात 75 % रुग्णांच्या फुफ्फुसांना बाधा होते. तर काही रुग्णांच्या इतर अवयवांवर देखील याचा परिणाम होतो. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.

क्षय रोगाची लक्षणे
क्षय रोगाचे सर्वात महत्त्वाचे आणि प्राथमिक लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, क्षय रोगाचे जिवाणू थेट व्यक्तीच्या फुफ्फसांवर परिणाम करतात. त्यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. भूक न लागणे, भूक न लागणे हे देखील क्षय रोगाचे लक्षण आहे, क्षय रोगामुळे तुमची भूक मंदावते. वजन कमी होणे तुम्हाला जर भूक लागत नसेल आणि वजन कमी झाले असेल तर क्षय रोग असू शकतो अशा स्थितिमध्ये डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. थकवा जाणवणे क्षय रोगात भूक लागत नाही, वजन कमी होते त्यामुळे आपोआपच थकवा जाणवतो. ताप येणे क्षय रोग असलेल्या रुग्णाला श्वास घेण्याच्या त्रासासोबच ताप देखील येते. अंगात ताप असल्याने घाम अधिक येतो. यापैकी काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

उपलब्ध उपचार
क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही प्रतिजैविक औषधे आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दीड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. खोकला कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे जीवाणू शरीरात तयार होतात. व त्यामुळे औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो.

22/03/2024
मोरया हॉस्पिटल 12वर्ष पूर्णटाकळी काझी या छोट्याश्या गावामध्ये ई वि 2012मध्ये मेडिकल सुविधा सुरू करण्याचे ठरवले. शक्यतो ख...
14/01/2024

मोरया हॉस्पिटल 12वर्ष पूर्ण
टाकळी काझी या छोट्याश्या गावामध्ये ई वि 2012मध्ये मेडिकल सुविधा सुरू करण्याचे ठरवले. शक्यतो खेड्या पाड्यात young generation व डॉक्टर जाण्याचे टाळाटाळ करतात याचे कारणे म्हणजे उधारी पेशंट चा रिस्पॉन्स, अत्यावश्यक सुविधा न मिळणे,(emergency healp) व शहरातील जीवनशैली या सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात..
या सर्व गोष्टीचा अट्टाहास सोडून मी व माझे मित्र डॉ. जयदीप लवांडे यांचा बॅकअप घेऊन २०१२ साली घरच्यांच्या व सर्व टाकळी करांच्या आग्रहाखातर एक ४००sp ft जागे मध्ये opd व ipd आसे ५ bed चे मोरया क्लिनिक नावाने मेडिकल सुविधा देणारे क्लिनिक सुरू केले.
२०१४ मध्ये जयदीप सरांचा नगरच्या opd करिता टाईम आपुरा पडत असल्या कारणाने मी पूर्ण वेळ देण्यास ठरवले.
पेशंट चा विश्वास व डॉक्टरांचे योग्य निदान व उपचार या मुळे जागा कमी पडू लागली. या मुळे पर्यायी नवीन जागे मध्ये शिफ्ट झालो.
यानंतर कोरोना सारख्या महामारी मध्ये हॉस्पिटल मधील डॉक्टर्स आणि स्टाफ ने चांगली कामगिरी बजावली.
आज मोरया हॉस्पिटल १२ वर्ष कम्लिट होत आहेत.आज हॉस्पिटल मध्ये १५बेड चे सुसज्ज असे स्पेशल रूम , सेमिस्पेशल रूम, मेडिकल सुविधा, अत्याधुनिक लॅबोरेटरी तसेच कॅशलेस पॉलिसी type आहेत.
त्याच प्रमाणे आयएसओ २००९-२०१५ आसे मानांकन मिळाले आहे.
या पुढील काळामध्ये या पेक्षाही आणखी जास्तीत जास्त सुविधा ग्रामीण भागामध्ये कश्या पुरवता येतील या बाबत प्रयत्न चालू राहतील.
आपलाच
डॉ. रोहित मनोहर करांडे

डायबेटिक फूट1 महिन्या पुर्वी एक शेतकरी कुटंबातील बाबा हॉस्पिटल मध्ये आले त्यांच्या पायाला खूप मोठी जखम होती जखमेतून उग्र...
29/08/2023

डायबेटिक फूट
1 महिन्या पुर्वी एक शेतकरी कुटंबातील बाबा हॉस्पिटल मध्ये आले त्यांच्या पायाला खूप मोठी जखम होती जखमेतून उग्र वास आणी खराब पाणी ( pus formation) येत होते.
बाबांना विचारले कसे झाले त्यांनी सांगितले रोज दारे धरायचो चिखलात पाय जाऊन जाऊन जखम कधी झाली समजले नाही. आणि जखम निट करायला खर्च पन खूप सांगितला म्हणून उपचार घेतले नाही.
बाबांचे रक्तातील साखरेचे प्रमाण (५६०) अधिक वाढले होते
पांढरा पेशी (२८६००) वाढल्या होत्या . जखम पण मोठी होती ५ दिवसा पासून ताप होता.
जखम स्वच्छ करून (amputation of dead surface)
उपचार सुरू केले.
रक्तातील साखरेचे प्रमाण व पेशींचे प्रमाण व्यवस्थित करून १५ ते २० दिवसाच्या कालावधी मध्ये बाबांना पूर्णपणे बरे वाटले.
रक्तातील साखरेचे प्रमाण निंत्रणात असणे खूप गरजेचे असते.
बाबांना त्याचे महत्त्व पटवून सांगितलें.

Address

Ahmednagar
414201

Telephone

+919860675730

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Morya Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Morya Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category