Vishwasiddhi Ayurvedic panchakarma centre

Vishwasiddhi Ayurvedic panchakarma centre Vishwasiddhi Ayurvedic & Panchakarma Centre.... trusted name for panchakarma & ayurvedic treatments....
(1)

*PCOS/PCOD*   हा आजार समजण्याची पहिली पायरी म्हणजे  *मासिक पाळी उशिरा येणे* इथून झाली.Poly म्हणजे भरपूर आणि Cyst म्हणजे ...
31/07/2025

*PCOS/PCOD*

हा आजार समजण्याची पहिली पायरी म्हणजे *मासिक पाळी उशिरा येणे* इथून झाली.Poly म्हणजे भरपूर आणि Cyst म्हणजे फुगा तर आपल्या O***y (अंडाशय) मध्ये खूप साऱ्या पाण्यानी भरलेल्या गाठी/फुगे होणे म्हणजे PCOS.
आधी हा आजार केवळ एका सिस्टीम/शरीरातील एकाच अवयवापर्यंत (O***y-अंडाशय) मर्यादित होता,केवळ जनानेंद्रियांचा आजार म्हणून ओळखल्या जायचा,पण आता तो ह्या जनानेंद्रियांची सिस्टीम सोडून इतर पण सिस्टिम्स वर परिणाम करतो म्हणून *सिन्ड्रोम* (PCOS)म्हंटल्या जातं,
आपल्या सध्याच्या जीवनशैलीतील *ताण* हा तात्पुरता राहावा ह्यासाठी शरीर,मन प्रयत्न करत असतं पण हल्ली ताण हा *कायमचा* राहतो कारण शरीरात adaptation येतं त्या adaptation लाच Pcos असं म्हणू शकतो
याचे प्रमाण एके काळी २ ते ५ टक्के असे होते,आज ते प्रमाण *३०* टक्क्यांवर गेले आहे.हे निश्चितच भयावह असे आहे.प्रत्येक ३ री मुलगी ही ह्या आजाराने ग्रासित आहे असं म्हंटलं तरी चालेल.
ह्या आजाराची उत्पत्ती ही लोकसंख्येच्या भस्मासुरातून झाली असे म्हंटले तरी चालेल,लोकसंख्येच्या भस्मासुरातून *जगण्याची स्पर्धा* तयार झाली,त्यांतून cut-throat,म्हणजे कापा,चिरा,आणि पुढे जा असा नकळत युक्तिवाद तयार झाला,आणि त्यांतून *संघर्ष,ताण,जीवघेणी स्पर्धा* सुरू झाली. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे (Physiological Reaction).
ताण हा दोन प्रकारे हाताळल्या जाऊ शकतो एक म्हणजे fight mechanism आणि दुसरा म्हणजे flight mechanism.पुढे आपण ते पाहू.
ताण हा दोन गोष्टींतून येतो एक म्हणजे अपेक्षा आणि दुसरा म्हणजे Practical Situation (मानवी जीवनातील सद्यस्थिती) ह्यामध्ये निश्चितच सगळ्यांमध्ये तफावत असते,असलीच पाहिजे,त्यामधील ह्या फरकामुळे जीवनात एक अगतिकता (Helplessness) तयार होते.अगतिकता म्हणजेच ताण होय.ही अगतिकता एकदा निर्माण झाली की बरेच जण त्यांतून रडणे,जोरात ओरडणे,राग करणे ह्यांमधून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतांना दिसतात.पण काही जण ते आतल्या आंत सहन करतात त्याला way out किंवा बाहेर काढत नाहीत,तात्पुरता *ताण* बाहेर काढायची काळजी निसर्ग करतो,पण हाच *ताण* जर जास्त काळ राहिला आणि *कायमस्वरूपी* राहिला तर मानवी शरीर त्याला Adaptation *समरूपता* आणण्याची व्यवस्था करते ,It is called as Permanent Adaptation,कायमस्वरूपी ताणाचे कायमस्वरूपी शरीरातील बदल/adaptation म्हणजेच PCOS होय.
फार पूर्वी पुरुषांचा काळ हा Hunting & Gatherings म्हणजे *फिरा,गोळा करा,आणि एकत्र आणा* असा जायचा.त्या फिरण्याने आणि इतर कष्टकरी कामांमुळे माणसाचे/पुरुषाचे शरीर हे Robust म्हणजे *मांसल* राहिले,आणि ह्याउलट स्त्रिया ह्या अवलंबून,अशक्त राहिल्या. कामाचे भाग झाले,पुरुष जास्त सशक्त,पिळदार शरीरयष्टी चे राहिले आणि स्त्रिया ह्या नाजूक राहिल्या. आणि साहिजकच सत्ता ही Physically And Mentally Strong अशा पुरुषांकडे राहिली.त्यामुळे पुरुष माणसे ही स्वभावाने थोडी रांगट, वागण्यात बिनधास्तपणा,बेधडकपणा,शरीर थोडे मजबूत,(robust) झाले, Androgens नावाचे हार्मोन्स हे पुरुषांत प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात तयार झाले,आढळले.अंगावर केस, आदी गोष्टी पुरुषांत आल्या,स्वतःच्या पायांवर उभे राहणे हे पुरुषांना जमले.पण स्त्रिया ह्या ह्यांमध्ये मागे राहिल्या (त्या काळात)
हा इतिहास सांगणे मला इथे आवश्यक असे वाटते,

तर आपण अपेक्षा आणि आपल्या आयुष्यातील प्रात्यक्षिक अवस्था (Practical Situation) ह्यांमध्ये तफावत असल्याने त्या दोन्ही गोष्टींत एक *युद्ध* सुरू होते; कारण अपेक्षा कधी संपत नाहीत,त्या न संपणाऱ्या असतात,
कुठे थांबायला हवे आणि कुठे प्रतिकार करावा हे ज्याला जमले नाही, व ह्या अज्ञानातून च हा *ताण* जन्माला आला व हा *PCOS* हा आजार जन्माला आला,
मग स्त्रियांना जेंव्हा उमगले त्या देखील पुरुषांच्या तोडीने काम करायला लागल्या,आज किंबहुना त्या पुरुषांच्या तुलनेने अधिक *सबळ*,ताकदीने लढतांना आढळतात.हे करत असतानाच स्त्रियांना *ताणाला* सामोरे जावे लागले,
जर अपेक्षा आणि वस्तुस्थिती ह्यामध्ये तफावत आली की *ताण* येतो
ताण आलेला घालवण्यासाठी मी सुरवातीला सांगितल्याप्रमाणे २ Mechanism आढळतात १) fight (लढा) २)flight(आलेल्या ताणापासून पळून जा)अपेक्षा सोडून द्या,
आपण बऱ्याच अंशी मध्यमवर्गीय पालक आपल्या पाल्ल्यांना fight(लढा) देण्याचा सल्ला देत असतो,fight मध्ये आपल्याला आपले वेळापत्रक बदलावे लागते, अथवा काम/ऊर्जा/शक्ती वाढवावी लागते,
ह्या लढ्यासाठी अधिक कार्य,ऊर्जा लागत असते, ती ऊर्जा आणायला अधिक कार्य करावं लागतं,
आपल्या ऊर्जेचे स्रोत हे आपल्या यकृत (Liver),आतड्यामध्ये (Intestines)मध्ये असते,तिथे ती ऊर्जा साठवलेली असते,ती गरज पडल्यास आपण सगळे ती वापरतो,
पण *ताणामध्ये*,*तनावामध्ये*संघर्षामध्ये* आपल्याला गरजेची असलेली जास्त ऊर्जा वापरण्यासाठी ही यकृतामधील अथवा आंतड्यामधील साठलेली ऊर्जा पुरेशी नसते ,आपल्या रक्तामध्ये देखील ऊर्जा,ग्लुकोज पाहिजे असते,त्यावेळी आपल्याला रक्तात ऊर्जा,एनर्जी पुरवायला एक हमाल आपल्याला मदत करत असतो तो म्हणजे (insulin) इन्सुलिन,आपल्या गावाकडे एक म्हण आहे ती म्हणजे (दुःखाला भूक जास्त लागते) ह्या extra(अतिरिक्त) ताणाला जी शुगर,जी ऊर्जा,लागते ती आपल्याला पुरवण्याचे काम इन्सुलिन करत असते,हे *इन्सुलिन* आपले स्वादुपिंड तयार करत असते,ह्या ताणाचा परिणाम म्हणून आपले इन्सुलिन *अतिरिक्त शुगर* तयार करत आपल्याला पुरवते,त्याचा परिणाम म्हणून रक्तातील शुगर वाढते, खरे पाहिले तर ताणाला क्षमविण्यासाठी आपल्याला रक्तातील शुगर वाढवणे फायद्याचे नसते आपल्याला खरी शुगर तर आपल्या मेंदूला,आपल्या मसल्स (मांसपेशी) साठी पाहिजे असते.
परंतु ह्याचा अपाय असा होतो की आपल्या शरीरातील रक्तातील साखर वाढते, व गरज नसतांना आपल्याला इतर विकार होण्याची शक्यता बळावते,
आपल्या शरीरात स्निग्ध पदार्थ (fat store),प्रथिने (protein Store)असते, Insulin is a *lipoprotective* Harmone म्हणून तर ते fat/स्निग्ध स्टोअर करते/साचवते.
आपल्या अतिरिक्त ताणाचा परिणाम म्हणून इन्सुलिन त्याचे कार्य करत राहते व शुगर वाढवते पण गरज नसलेल्या रक्तात वाढवते, आणि परिणामी एक वेळ अशी येते की आपण त्या stress ताणामध्ये खात जातो व आपली सगळी सिस्टिम बिघडते,
कालांतराने इन्सुलिन resistance तयार होतो व इन्सुलिन आपले काम नीट करत नाही,एकीकडे ताण वाढतोय एकीकडे इन्सुलिन वाढते,आणि आपण जास्त खातो,आणि आपली व्यायाम करण्याची इच्छाशक्ती कमी होते व आपले/स्त्रियांचे शरीर हे अजूनच पिळदार/Muscular/रोबस्ट बनते,
गरोदरपणात काय घडते ते पाहू या :
आपल्या मेंदूमध्ये Pituitary नावाची ग्रंथी असते तिचा एक भाग १)FSH(Folicle Stimulating Harmone) २) LH (Luteinizing Harmone) तयार करत असतो,हे इन्सुलिन वरील दोन्ही हार्मोन्स पैकी FSH चे प्रमाण कमी करते व LH चे प्रमाण वाढवते,त्यामुळे स्त्री बीज तयार करणारे FSH हे कमी झाल्याने स्त्रीबीज तयार होत नाहीत,FSH हार्मोन ची पातळी कमी झाल्याने स्त्रीबीज लवकर तयार होत नाही व पाळी उशिरा उशिरा यायला लागते, आणि LH चे प्रमाण वाढल्याने, त्याचा थेट परिणाम ovaries वर होऊन अँड्रॉजन्स ची पातळी-adrogens levels वाढते व स्त्रियांमध्ये पुरुषांसारखे केसांची वाढ व्हायला सुरुवात होते. स्त्रियांमध्ये १)केसांचे प्रमाण वाढते,२)पुरुषांसारखे केस यायला सुरुवात होते ३)शरीर पुरुषांसारखे robust मजबूत बनते,४)केसांची लाईन (Hair line )मागे जाते,५)अंगावर,चेहऱ्यावर,ओठांवर केस दिसू लागतात,
ह्या प्रतिकूल परिस्थितीत आपला निसर्ग आपली/अशा स्त्रियांची इतकी तर नक्कीच काळजी घेतो की अशा वेळी (गरोदरपणा) देत नाही, it is called as *mother nature*
म्हणजे अतिरिक्त ताण न देण्याची काळजी दस्तरखुद्द निसर्ग घेतो,
हा सगळा घोळ *insulin* नावाचा हार्मोन जो की अतिरिक्त ताणामुळे आपले स्वादुपिंड त्याला ऑर्डर करते की तुला जायला पाहिजे *ताण* वाढला आहे,
ह्यावेळी आपली fasting insulin level fasting BSL level ह्या वाढलेल्या आढळतात...
ह्या सगळ्या गोष्टी *इन्सुलिन* च्या मुळे होतात..
व *ताणामुळे* होतात हा माझ्या लेखाचा मुख्य भाग आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
आता ह्या आजारांवरील उपायांकडे नजर मारू या:
१)ताण टाळावा
२)वजन कमी करावे.
३)८ तासांची शांत झोप घ्यावी. जेणे करून १) Serotonin २) endorphins ३) dopamine ४) Oxytocin हे Happy Harmones आपल्या शरीरातील वाढावे, व आपली sleep cycle ही चांगली असावी,त्यामध्ये जास्त बदलाव असू नये,
४) शारीरिक व्यायाम :
१) दीड तास Physical Exercise ,५ किमी चालणे,जिम लावावीच असं काही नाही, २) अर्धा तास हा मेडिटेशन,प्राणायाम,योगा, आणि इतर व्यायामासाठी द्यावा,
५)आपल्या कामात आनंद शोधावा,
६) सत्ता,संपत्ती,संतती,प्रतिष्ठा,आरोग्य,मानमर्यादा,आपले इतरांशी संबंध ह्यामध्ये जास्त गुरफटून जाऊ नये,
७)आनंद,समाधान,इच्छा, आकांशा,ह्यांना वेळीच मुरड घालावी..
आपण जर असं वेळीच केलं नाही तर
आपल्याला पुढे ह्या insulin व ताणामुळे बऱ्याच metobolic सिन्ड्रोम्स ला सामोरे जावे लागते उदा;
१) लठ्ठपणा २)डायबिटीज ३)उच्च रक्तदाब ४)स्ट्रोक ५)ताण-इतर आजार,मानसिक आजार ६)कोलेस्टेरॉल वाढणे ७)हार्ट अटॅक ८)कॅन्सर ९)अपघात
हे सगळे आघात हे केवळ इन्सुलिन, व ताण करते ,
त्याचा तात्पुरता परिणाम आपल्याला आपल्या स्त्रियांच्या ovaries वर दिसतो म्हणून आधी ह्याला PCOD म्हणायचे पण आता त्याचा परिणाम बऱ्याच इतर systems आपल्या शरीरातील इतर अवयांवर देखील दिसतो म्हणून (PCOS) Polycystic Ovarian Syndrome असं म्हंटल्या जातं,
त्यामुळं stress/ताणाला करा राम राम 🙏🏻
आणि निरोगी आरोग्यशैलीला घ्या सोबत ☝🏼✔️ असे मी म्हणेन..
लेखक : *डॉ.अविनाश किशनराव गोरे*

*श्रावणमास*   श्रावण महिन्यामध्ये *नागपंचमी ,श्रावण सोमवार, शुक्रवार, मंगळागौरी ,नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी* असे अनेक स...
29/07/2025

*श्रावणमास*

श्रावण महिन्यामध्ये
*नागपंचमी ,श्रावण सोमवार, शुक्रवार, मंगळागौरी ,नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी*
असे अनेक सण साजरे केले जातात.हे सण साजरे करण्याच्या पद्धतीमागे सुद्धा काहींना काही शास्त्रीय विचार आहे .

पूर्वीच्या काळी स्त्रियांचे घराबाहेर पडणे खूपच कमी होत असे.
वटपौर्णिमा, नागपंचमी अशा सणांच्या निमित्ताने, गावाबाहेर असलेल्या वडाला किंवा नागाच्या वारुळापर्यंत जाऊन, नागाची पूजा केली जात असे. अन्नाची नासधूस करणाऱ्या उंदरांपासून, आपल्या धनधान्याचे संरक्षण करणाऱ्या नागाविषयी ,आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची ती एक सुंदर प्रथा आहे.

सगळ्या मैत्रिणी मिळून त्यानिमित्ताने झिम्मा, फुगडी,झोका यांसारखे वेगवेगळे खेळ खेळण्याची पद्धत ही अशीच शरीर व मन दोघांना उल्हासित करणारी !
*वर्षाऋतुपासून आदानकालाची सुरूवात झाल्यामुळे, शरीराची शक्ती वाढायला लागते , त्यामुळे हळुहळू व्यायामाला सुरुवात करायला हरकत नाही*.

श्रावणात येणाऱ्या सणांच्या निमित्ताने मंगळागौर, नागपंचमीचे वेगवेगळे खेळ , गोकुळाष्टमिला
दहीहंडीसारखा सामूहिक क्रीडा प्रकार खेळला जातो . त्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना व्यायाम होतो, मंद झालेला अग्नी
हळूहळू प्रज्वलित होण्यास मदत होते.

वर्षा काळामध्ये आहारावर भाष्य करणारी एक अतिशय मार्मिक म्हण आहे
*आषाढ तळावा* ,
*श्रावण भाजावा*
*भाद्रपद उकडावा*

श्रावणात वातप्रकोपाबरोबरच , हळूहळू पित्त दोषाचा संचय सुरू होतो.
अनेक व्रतवैकल्यांच्या निमित्ताने
*उपवास* (खराखुरा)
*व्यायामाची सुरुवात*
*मोजके पाणी*
*कमी मीठ*
*भाजके पदार्थ*
या पंचसूत्रीचा श्रावण महिन्यात आरोग्यरक्षणसाठी अवलंब करावा .शरीराचे बल व मनाचा सत्वगुण त्यामुळे वाढीला लागतो .

श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणातील नैवेद्य हा वैशिष्ट्यपूर्ण आहे.
*नागपंचमीचा नैवेद्य आहे भाताच्या लाह्या आणि दूध, श्रावण* *शुक्रवारला भाजके चणे आणि गुळ आणि दूध तर मंगळागौरीला मुगाची डाळ व तांदूळ भाजून केलेली खिचडी* *भाजलेल्या डाळींपासून बनवलेल्या भाजणीचे वडे, तर गोकुळाष्टमीच्या दहीकाल्यामध्ये दही, दूध त्याच्याबरोबर पोहे*, *लाह्या ,डाळे यांचा काला अशा पोषक व पित्तशमन होईल अशा गोष्टींचा समावेश त्यात असतो*.

श्रावण महिन्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे *पूरण*
चण्याची डाळ आणि गूळ यापासून बनवलेल्या
*पुरणपोळीशिवाय* श्रावण शुक्रवारचे व्रत पूर्ण होत नाही.
चणा डाळ ही पचायला जड ,परंतु अतिशय पौष्टिक असते. आता हळूहळू वाढू लागणारा अग्नी व सुरु केलेला व्यायाम , यादृष्टीने थोडे पौष्टीक खाणे आवश्यक असते. डाळीला गुळाची जोड देऊन , शिजवून त्याचे पूरण बनवायचे. हे पूरण नीट पचावे म्हणून , खरपूस भाजून त्याची पुरणपोळी करायची. मग पित्तशामक अशा दूध आणि तुपाबरोबर, विशेषतः स्त्रियांना आणि लहान मुलांना खाऊ घालायची, अशी श्रावण शुक्रवारची प्रथा..

आपल्याला श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏

https://wa.me/918767352580?text=Hello%20I%20am%20at%20Shri%20Vishwasiddhi%20Ayurvedic.

"*पाठीच्या मणक्याचे आजार व बस्ती उपचार* "बस्ती म्हणजे ऐनिमा असा व्यवहारातील भयंकर मोठा गैरसमज आहे. कृतीतील साधम्र्यामुळे...
13/07/2025

"*पाठीच्या मणक्याचे आजार व बस्ती उपचार* "

बस्ती म्हणजे ऐनिमा असा व्यवहारातील भयंकर मोठा गैरसमज आहे. कृतीतील साधम्र्यामुळे हा गैरसमज झालेला आहे परंतू संपूर्ण अंगाला विशिष्ट पद्‌धतीची तैले लावून पोटामध्ये विशिष्ट पद्‌धतीचे स्नेह पदार्थ देऊन आणि संपूर्ण अंगाला विशिष्ट पद्‌घतीचे शेक (स्टीम बाथ) करून बस्ती उपचार करावयाचा असतो. हे करण्यापूर्वी, शरीरातील अजीर्ण आणि अग्निमांद्य नष्ट करायचे असते.

आयुर्वेदानुसार आपल्या मोठ्या आतड्यामध्ये वात दोष उत्तम पद्‌धतीच्या मलातून (पुरीषातून) उत्पन्न होत असतो त्यावर शरीरातील अवयवांचे तसेच मेंदुचे देखील काम अवलंबून असते. त्यामुळे योग्य वेळी जेवण, योग्य आहार,शरीर आणि मनस्वास्थ्य राहील असा आचार-विचार यावर सर्वच आजार अवलंबून असतात।

शरीरातील वात दोष हा कफ व पित इतर दोन दोषांना काम करण्यास प्रवृत्त करत असतो वात दोषासाठी तीळाचे तैले हे अंतबाह्य वापरणे गरजेचे असते त्याबरोबरच पंचकर्माची बस्ती उपचार ही प्रत्येक आजाराची निम्मी उपचार प‌द्धत आहे. पाठीचा मणका आणि त्यावर परिणाम करणारे शरीर , शरीरातील सर्व घटक आणि म्ह‌णून पर्यायाने सर्व वातविकार जसे- कंबरदुखी,मानदुखी, खांदेदुखी हातापायाला मुंग्या येणे, कॉर्ड कॉम्प्रेशन, स्लिप डिस्क, गृध्रसी (सायटिका). Spondilosis, हात पाय वाळणे किंवा सुकणे,फ्रोझन शोल्डर, टेनिस एल्बो, डिस्क bulge, डिस्क सरकणे, सर्व आजारांत बस्ती उपचार उत्तम उपयोगी पडतो.

मुस्तादी यापन बस्ती, धान्वंतर बस्ती, बला गुडूच्यादी बस्ती, तैलाचा बस्ती असे निरानराळे बस्ती शरीरातील अनेक व्याधीसाठी आयुर्वेदाने सांगितले आहेत.

बस्ती उपचाराचा दुसरा फायदा म्हणजे कोणत्याही, आजारात बस्ती उपचार केल्यामुळे हृदय, मस्तिष्क आणि वृक्क या तीन मर्माचे आरोग्य आपोआपच सुधारले जाते. या गोष्टीची गरज कमी जास्त प्रमाणात पस्तीशीनंतरच्या प्रत्येक व्यक्तीस भासतेच. या बस्तिमुळे हार्ट अॅटॅक, मेंदुत रक्तस्त्राव, अर्थागवायु ,किडनी फेल्यूअर यासारख्या दुर्धर व्याधी भविष्यात उत्पन्न न होण्याची व्यवस्था उपचारांनी मिळू शकते.

बस्ती उपचारांमध्ये दुखण-खुपन, आत्यंतिक पथ्यपाणी आणि वेळेचा प्रचंड अपव्यय या गोष्टी फारश्या घडत नाहीत आहे, नियोजून मात्र आवश्यक आहे आणि रुग्ण बस्ती इतर आजारांसाठी बस्ती घ्यायला येतो व त्याच्या बल, वर्ण, स्मृती तसेच इतर शरीर मानस भावांमध्ये आमुलाग्र बदल, होऊन शरीराचा कायाकल्प होतो त्यामुळे वैदयवर्गात एक म्हण रूढ झालेली आहे....

बस्ती द‌यावा, बस्ती घ्यावा
बस्ती जीवाचा विसावा?

*वैद्य प्रमोद पालवे*
(आयुर्वेदाचार्य)
9970346118.

Are you suffering from Constipation❓❓LET US HOW AYURVEDA & PANCHKARMA TREATMENTS CAN HELP YOU GET RELIEVED FROM CONSTIPA...
13/07/2025

Are you suffering from Constipation❓❓
LET US HOW AYURVEDA & PANCHKARMA TREATMENTS CAN HELP YOU GET RELIEVED FROM CONSTIPATION📢🔔
Let Us know about it✅

Experience the Benefits of Panchkarma Therapy with holistic treatment at Vishwasiddhi Ayurveda & Panchkarma Centre in Ahmednagar. Trust Dr. Pramod Palve’s 15+ years of expertise for effective & natural healing. Book an appointment today with us

सायटिका (Sciatica) आणि आयुर्वेदसायटिका ही एक सामान्य आणि त्रासदायक समस्या आहे, ज्यामध्ये कमरेपासून पायाच्या टोकापर्यंत व...
13/07/2025

सायटिका (Sciatica) आणि आयुर्वेद

सायटिका ही एक सामान्य आणि त्रासदायक समस्या आहे, ज्यामध्ये कमरेपासून पायाच्या टोकापर्यंत वेदना जाणवतात. ही वेदना मुख्यतः सायाटिक नर्व्हवर दबाव आल्यामुळे होते. आयुर्वेदामध्ये याला "गृध्रसी" असे म्हटले जाते.

🔍 सायटिकाचा आयुर्वेदीय दृष्टीकोन:

आयुर्वेदानुसार, गृध्रसी रोग हा वातदोषाच्या वाढण्यामुळे होतो. वात दोष वाढल्यास मज्जातंतूंवर दाब येतो आणि वेदना, कंबरदुखी, पायाला झणझणीत वेदना, चालण्यात अडचण होणे असे लक्षण दिसतात.

⚕️ आयुर्वेदीय उपचारपद्धती:

1. पंचकर्म थेरपी:

स्नेहन (तैल मालीश)

स्वेदन (स्टीम थेरपी)

बस्ती (औषधी एनिमा) – वात दोष शमवण्यासाठी अत्यंत प्रभावी

कटी बस्ती – कंबरेवर औषधी तेलाचे कुंड करून ठेवणे

पिंडस्वेद – औषधी बुटीने मसाज

2. औषधी उपचार (औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत):

रुग्णाचे वय, बल, असणारा ऋतू, रुग्णांची प्रकृती, त्यांचा व्यवसाय इत्यादी बघून डॉक्टरांकडून औषधे व पंचकर्म करून करणे

3. जीवनशैली व आहार:

थंड हवामान, थंड पाणी टाळा

आंबट, तेलकट, आणि जड पदार्थ टाळा

व्यायाम – सौम्य योगासने (मर्कटासन, भुजंगासन, पवनमुक्तासन)

झोपताना कठीण गादीचा वापर
---

🧘‍♂️ सायटिकासाठी उपयोगी योगासने:

भुजंगासन

शलभासन

अर्धमत्स्येन्द्रासन

वज्रासन

पवनमुक्तासन

📝 टीप:

सायटिका ही लक्षणांची आणि जीवनशैलीशी निगडित स्थिती आहे. स्वत: औषधे घेण्याऐवजी प्रमाणित आयुर्वेद चिकित्सकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण योग्य निदान केल्याशिवाय उपचार प्रभावी ठरणार नाहीत.

*पावसाळ्यातील आहार - विहार* 🌂🌧️ 🌈☘️🥣सगळेच ज्याची आतुरतेने वाट पाहतात , तो हिरवा- बरवा ऋतू म्हणजे *वर्षा ऋतू* .आषाढाची सं...
13/07/2025

*पावसाळ्यातील आहार - विहार*
🌂🌧️ 🌈☘️🥣

सगळेच ज्याची आतुरतेने वाट पाहतात , तो हिरवा- बरवा ऋतू म्हणजे *वर्षा ऋतू* .
आषाढाची संततधार सुरू झाली , की हवेत थोडा गारवा येतो. सगळी सृष्टी हिरवीगार होते .पहिल्या पावसात भिजण्याची मजा लुटून झाली , की मग मात्र दिसतो जिकडेतिकडे चिखल, दमट हवा, दूषित पाणी आणि त्यामुळे पसरणारी रोगराई...

आयुर्वेदात 'ऋतुचर्या' या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा ऋतू सामान्यपणे सांगितलेले आहेत. पण आपल्या दक्षिणेकडील भागात पावसाळा जास्त, म्हणून 'शिशिर' हा थंडीचा ऋतू वगळून प्राव्रुट् (जेष्ठ-आषाढ)
वर्षा (श्रावण - भाद्रपद )असे पावसाळ्याचे दोन ऋतू सांगितलेले आहेत.
आयुर्वेदाने मानवी शरीराला या विश्वाची छोटी प्रतिकृती मानलेले आहे ,त्यामुळे प्रत्येक ऋतूत बाह्य वातावरणात जसे बदल होतात ,तसेच शरीरातही बदल घडत असतात. या बदलांशी जुळवून घेतले ,तरच आपले आरोग्य टिकवून ठेवता येते. म्हणूनच आयुर्वेदशास्त्राने विशिष्ट ऋतूत अनुकूल ,असा विशिष्ट आहार-विहार सुचवलेला आहे, यालाच 'ऋतुचर्या' असे म्हटले जाते . विशेष म्हणजे यात सांगितलेल्या गोष्टी वेगवेगळ्या सण-उत्सव- परंपरांच्या रुपाने जपून ,आरोग्यरक्षण करण्याचा उत्तम प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केलेला दिसतो .

वर्षा ऋतुत हवेतला दमटपणा ,ओलावा वाढलेला असल्यामुळे पचनशक्ती (अग्नी) मंद झालेली असते. शरीरात प्रामुख्याने 'वातदोष' वाढलेला असतो. अशा काळात अत्यंत हलके ,गरम, भाजलेले अन्न खाण्याची गरज असते ,म्हणून या काळात आपल्याकडे 'चातुर्मास' पाळला जातो. वेगवेगळ्या व्रतांच्या रूपाने, उपवास केले जातात. काही उपवासात फक्त भाजलेले धान्य वापरले जाते ,तर काहीत फक्त उकळलेले पाणी. 'निर्जला एकादशी' ही याच सुमारास येते. वर्षा ऋतूत शरीरात ओलाव्याचे प्रमाण वाढते, पाण्याची गरज कमी झालेली असते, त्यामुळे निर्जला एकादशीच्या दिवशी पाणी बंद करणे, हे प्रतीकात्मक असून, या संपूर्ण वर्षा कालावधीतच, पाणी गरज असेल तेवढेच व अगदी मोजून मापून प्यावे . उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत आटतात व पावसाळ्यात गाळ पाण्यात वाहून आल्याने, पाणी दूषित झालेले असते.
या दूषित पाण्यामुळे जुलाब व जंत कृमी यांचा प्रादुर्भाव या काळात वाढतो. म्हणून वर्षा ऋतूमध्ये 'तप्तशीत' (तापवून थंड केलेले) किंवा 'अर्धावशिष्ठ' (उकळून अर्धे केलेले) किंवा सिद्धजल (सुंठ, ओवा इत्यादी घालून उकळलेले) पाणी प्रमाणात प्यावे.

जंत ,कृमी, आवेचा प्रतिकार करण्यासाठी औषधे ही निसर्ग स्वतःच उपलब्ध करून देतो . या काळात कोकणात कुडा ,भारंगी, टाकळा, शेवाळे ,फोडशी इत्यादी तर घाटावर तांदुळजा, घोळ अशा अनेक रानभाज्या दिसतात. या भाज्या कडू असल्या , तरी त्यातील पाणी न काढता शिजवल्यास, कृमी, जंत ,अतिसार यावर उत्तम औषध म्हणून त्या काम करतात .कुडा हे तर आयुर्वेदातील परम औषध ! कुड्याच्या शेंगा ,फुलाची भाजी उत्तम कृमिनाशक आहे .उन्हाळे लागणे, बारीक ताप, कृमी, अतिसार, पावसाळ्यात वात वाढल्याने होणारा संधिवात, यावर कुडा हे उत्तम औषध आहे. कुड्याची अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत, पण अर्थातच ती आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानेचं घ्यावी.

एकदा पाऊस पडला की ,उन्हाळ्यात चवदार लागणारी आंबा ,फणस, जांभळे ही फळे बेचव लागतात व झाडावरून गळून पडतात .पावसाळ्यात ती खाल्ल्यास त्यात किडी पडलेल्या आढळतात . म्हणून पाऊस पडल्यावर ही फळे खाणे बंद करण्याची पद्धत अनेक घरात आहे व ती योग्यही आहे. बाराही महिने सर्वच फळे खाणे , हे आरोग्यदृष्ट्या अयोग्य आहे. या काळात खाण्यासारखे फळ म्हणजे 'अननस'. मिरपूड लावून, सकाळच्या नाश्त्याच्या वेळी अननस खावा. त्यामुळे पचनशक्ती वाढते व जंत कृमी साठी तो उपयुक्त आहे.

पावसाळा म्हटला की गार -गार हवेमुळे ,काहीतरी चमचमीत, गरम- गरम खावेसे वाटते. अशा वेळेस भजी ,वडे खाल्ले जातात आणि तेही रस्त्यावर बनलेले. मंद झालेली पचनशक्ती ,अशा पदार्थांमुळे आणखीन मंद होते व ताप, जुलाब ,दमा ,खोकला अशा आजारांना आयतंच निमंत्रण मिळतं .आपल्याकडे एक म्हण आहे 'आषाढ तळायचा, श्रावण भाजायचा, आणि भाद्रपद उकडायचा'.
आषाढात होणाऱ्या वातप्रकोपाला शांत करण्यासाठी ,तळलेले थोडे जरूर खावे ,पण ते घरी करावे. वडे, भजी यापेक्षा तांदुळाच्या व साबुदाण्याच्या पापड्या, कुरडया, फेण्या असे हलके पदार्थ तळून खावे . भाजलेल्या शेंगा व मक्‍याची कणसे ही या काळात खायला चांगली.

ग्रीष्मात वातदोषाचा संचय होतो ,वर्षाऋतूच्या गारव्यामुळे या वाताचा प्रकोप होऊन त्यामुळे पोटात गुडगुड होणे, पोटफुगी, दमा, संधिवात असे वाताचे आजार जोर धरू लागतात . कांदा, वांगे, हरभरा ,बटाटा , कोबी, फ्लॉवर असे वातूळ पदार्थ या काळात खाऊ नये. म्हणूनच कांदेनवमी झाल्यावर चार महिने कांदा बंद करण्याची परंपरा आहे.

लसूण हा तामसी गुण वाढू नये म्हणून , धार्मिक कारणासाठी चातुर्मासात निषिद्ध असला ,तरी तो उत्तम वातशामक असल्याने, माफक प्रमाणात आहारात लसूण वापरण्यास हरकत नाही .लसणाच्या तेलाचा उपयोग कानात घालण्यासाठी, दुखऱ्या सांध्याना चोळण्यासाठी , दम लागल्यास छातीला लावण्यासाठी अवश्य करावा.

मंद झालेली पचनशक्ती हळूहळू वाढवायची आहे , म्हणून या ऋतूत फोडणीमध्ये मोहरी, हिंग ,मेथी अशा अग्निवर्धक पदार्थांचा सढळ वापर करावा. खाद्यपदार्थातही
पोटदुखी आणि वात कमी करणारा 'ओवा' जरूर वापरावा. छातीत कफ साठला किंवा सर्दी-पडसे, दुखणारे सांधे यात ओव्याच्या पुरचुंडीने शेक घेणे ही उपयोगी ठरते.

पावसात भिजून होणारी सर्दी ,जुलाब, पोटदुखी यावरचे आणखीन एक रामबाण औषध म्हणजे 'सुंठ' !
सुंठ पावडर, गूळ आणि तूप एकत्र करून छोट्या
बोराएवढ्या गोळ्या कराव्या व घरातील प्रत्येकाला सकाळी उठल्यावर पावसाळ्यात रोज ही एक आरोग्यरक्षक गोळी खायला द्यावी.

अशा तऱ्हेने वर्षाऋतुतील वातावरणाचा विचार करता, *भाजलेली धान्य ,पिण्यासाठी मोजून मापून पाण्याचा वापर, उकळून आठवलेले पाणी ,अल्प माफक प्रमाणात आहार* हे सूत्र आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

बाहेर फिरायला जाण्यावर पावसाळ्यात मर्यादा येतात ,म्हणून घरातल्या घरातच योगासने ,सूर्यनमस्कार असा माफक व्यायाम करावा. आठवड्यातून एक ,दोन वेळातरी सर्व अंगाला तिळाच्या तेलाचा मसाज करावा. स्नानासाठी गरम पाणी वापरावे आणि त्वचेचे रोग टाळण्यासाठी टाकळा, कडुलिंब याचे उटणे अंगाला लावण्यासाठी वापरावे. पंचकर्म उपचारापैकी, 'बस्ती' हे पंचकर्म , वर्षाऋतुत अवश्य करून घ्यावे. त्यामुळे वर्षाऋतूत होणारा वातप्रकोप शांत होतो व पुढे होणारे संधिवात, पोटदुखी, दमा, खोकला हे आजार टाळता येतात.

थोडक्यात काय तर विविध ऋतूंचा आनंद खऱ्या अर्थाने घ्यायचा असेल, तर निसर्गाच्या जवळ गेले पाहिजे. त्या त्या ऋतूत स्वतःचे रक्षण कसे करायचे, हे तो निसर्गच आपल्याला शिकवत असतो, येणाऱ्या अडचणीवरचे उपाय उपलब्ध करून देत असतो. गरज आहे या सगळ्या गोष्टींच्या डोळस निरीक्षणाची व त्यातील पटेल ते मनापासून आचरणात आणण्याची ...

*वैद्य उर्मिला पिटकर*,मुंबई
एमडी, पीएचडी (आयुर्वेद).

▫️*आषाढ तळावा.. श्रावण भाजावा..**भाद्रपद उकडावा..!* पण हे असंच का ??पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्य-योग ! पावसाळा हा क...
04/07/2025

▫️
*आषाढ तळावा.. श्रावण भाजावा..*
*भाद्रपद उकडावा..!* पण हे असंच का ??

पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्य-योग ! पावसाळा हा केवळ ऋतू नसून, निसर्गाच्या रसपूर्ण लीला अनुभवण्याचा एक सु-काळ होय. "तळणं, भाजणं आणि उकडणं.." या एकाच पावसाच्या तीन रुपांतरामागे लपलेलं आहे.. आयुर्वेदिय तत्वज्ञान, शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र! पण असं खाणं कितपत सुरक्षित आहे ? असं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं ??

१) *आषाढ* म्हणजे पावसाचा श्रीगणेशा.‌ आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधे- गुडघेदुखी, सर्दी- फडसे, थंडीताप, infections अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर *आषाढात "तळलेलं" खाणं हा अफलातून उपाय आहे !*

विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात. तळलेलं अन्न हेच त्यावेळी "औषध" बनते. आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडते !

म्हणूनच; मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील.

शिवाय; पावसाचा पहिला रोमॅंटिक स्पर्श.. कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदाभजी.. आणि कपातला उबदार चहा.. यासारखा _Instant Romantic_ अंतर्बाह्य "आषाढ डायट" जगात शोधूनही सापडणार नाही !

२) *श्रावण* म्हणजे सणांचा महिना. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. वात हळूहळू कमी होऊन शरीरावयावांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशावेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्त आटोक्यात ठेवणे महत्त्वाचे, म्हणून *श्रावणात "भाजलेलं" खाणं सर्वोत्तम आहे.*

आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मका, वाटाणा, वांग्याचं सुगंधी भरीत, मातीचा वास घेणारी भाजलेली ज्वारीची भाकरी, भाजलेले पापड,‌ तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इ. सर्व पित्ताचा राग थोपवतात. परिणामी ऍसिडिटी, मायग्रेन, हाय-बिपी, मुळव्याध ह्या तक्रारींचा जन्म होत नाही.

आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे _*"श्रावणमासी हर्ष मानसी..."*_ असं म्हंटलेलं आहे.

३) *भाद्रपद* म्हणजे ‌परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे उद्रेक उत्पन्न करतो (ie पित्ताचा प्रकोप होतो).

हाच तो काळ जिथे जरा चुकीचं खाल्लं, की हार्टअटॅक, पॅरालीसीस, तीव्र ताप, कोणताही शुल्लक आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी घडू लागतात. परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू ह्याच महिन्यात होताना दिसतात.

अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत. जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्त प्रकोप व्हायला वाव भेटणार नाही. याचसाठी *भाद्रपदात "उकडलेलं" खाणं अगदी योग्य आहे.*

जसे की, उकडलेल्या शेंगा, कंदमुळं, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेला भात इ. प्रयत्नपूर्वक खाल्ल्याने October HEAT चे रूपांतर आपण October HIT मध्ये नक्की करू शकतो.

कदाचित म्हणूनच गणपती, गौरी, दुर्गा या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपदाचाच आसमंत निवडतात. कारण उकडलेलं अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता व शांतीचा स्पर्शच ! नाही का ?

▫️
*डॉ. शिवानंद बासरे, दीर्घायु हॉस्पिटल, नांदेड*

मलावष्टंभ (बध्द‌कोष्ठता) आणि आयुर्वेदीय उपचारशौचाला साफ न होण्यालाच व्यवहरात मराठीत बध्द‌कोष्ठता, आयुर्वेदानुसार मलावष्ट...
07/06/2025

मलावष्टंभ (बध्द‌कोष्ठता) आणि आयुर्वेदीय उपचार

शौचाला साफ न होण्यालाच व्यवहरात मराठीत बध्द‌कोष्ठता, आयुर्वेदानुसार मलावष्टंभ, मलावरोध व आधुनिक शास्त्रानुसार कॉन्स्टिपेशन (constipation) असे म्हणतात.

मलावरोध हा विकार स‌माजामध्ये दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात दिसून येत आहे. हा विकार बहुतक सर्व रोगांचे मूळ आहे, म्हणून हा मलावरोधाची प्रवृत्ती व्यक्त होऊ लागली आहे हे असे ध्यानात येताच, ती प्रवृत्ती नाहीशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे... येताच आठवा एखादा दिवस की, ज्या ज्या दिवशी तुम्हाला शौचाला झाले नसेल, जवळ जवळ सर्वांनाच हा अनुभव येतो. किंबहुना ज्याने शौचाला साफ न होण्याचा अनु‌भव घेतला नसेल, असा माणुस विराळाच...
मलावरोध झाल्यास सर्वांग गळून जाते, पोट गुच्च होते, डोके दुखते, उत्साह वाटत नाही, झोपून रहावेसे वाटते. व ज्या दिवशी, शौचाला साफ होते, त्यादिवशी दिव‌साची सुरुवात उत्साताने होते, कितीही अवघड काम सहजतेने होते, मन प्रसन्स वाटते. थोड्क्यात दिवसभर "फ्रेश वाटते सकाळी उठल्याबरोबर शौचाला साफ होणे ही आरोग्याची पहिली गुरुकिल्ली होय.

* मलावरोधाची कारणे

अवेळी खाणे,
पहिले अन्न न पचताच पुन्हा खाणे, जास्त पाणी पिणे,
प्रमाणापेक्षा जास्त व कमी खाणे, अधिक पाणी अति थंड पदार्थ खाणे, जेवणानंतर व जेवणाबरोबर आईसक्रिम, थंड पाणी जास्त पिणे, शिळे पदार्थ खाणे, मां‌साहार, बेकरी पदार्थ, आंबवलेले पदार्थ जसे की इंडली, डोसा, फास्ट फुड, पाणीपुरी, भेळ, वडापाव, बिल्कुल व्यायाम न करणे अधीक प्रमाणात चहा घेणे, सतत बैठा व्यवसाय, रात्री जागरण, दिवसा झोपणे,
शौचास आली असताना दाबून ठेवणे, मानसिक कारणे, उपवास करणे, इत्यादी कारणामुळे मलावरोध/ बद्धकोष्ठता होते.

मलावरोधाची लक्षणेः

पोट जड व फुगणे पोटात गुड‌गुड आवाज होणे, भुक न लागणे, तोंडाला दुर्गंधी येणे, पोरात गॅसेस होणे, व है गॅसेस मुख्याद्वारे किंवा गुदद्वारे जाताना घाण वास येणे, संडास होऊन सुद्धा न झाल्याप्रमाणे वाटणे, संडासच्या वेळी फार जोर करावा लागणे (कुंथावे लागणे, मळमळ होणे, छातीत जळजळ होणे, तोंडाला पाणी सुटणे झोप न येणे यामुळे चिडचिडे‌पणा वाढणे, उत्साह कमी होणे, आळस येणे, इत्यादी लक्षणे दिसतात.

मलावरोधामुळे वरील लक्षणे होतात परंतु बरेच दिवयाचा म‌लावरोधाचा परिणाम म्हणून खालील लक्षणे होताना दिसतात

निद्रानाश
(झोप न येणे)
② मूळव्याध (Piles)
③ परिकर्तिका (Fissure) - संडासाच्या जागी चिरा पडणे.
4) भगंदर (Fistula)
⑤ पोट दुखणे
⑥ संडासांची जागा (अंग) बाहेर येणे.
७)गुदाचा कर्करोग (CA of Re**um)

या काही प्रमुख रोगांबरोबरच पुरुषांमध्ये स्त्री समागम
वेळी शुक्र लव‌कर बाहेर पडणे, लिंगाचे काठिण्य अधिक वेळ न राहणे, यामु‌ळे स्त्री सह‌वासात पुरुषाला आनंद न वाटता उलट निराशा येते, परिणामी स्त्री सहवासाविषयी पुरुषाच आत्मविश्वास कमी होतो तर काही वेळा मनोविकृती उदासीनता येते
मलावरोधामुळे स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरे जाणे पाळी येताना पोटात दुखणे, नियमित न येणे, असे लक्षणे
दिसून येतात.

*मलावरोध व आयुर्वेदीय उपचारः*

शौचाला साफ होण्यासाठी व्यक्ती वृत्तपत्रे, जाहिराती, औषध दुकान व स्वतःच्या ज्ञानाने औषध घेत राहिल्याने तेवढ्‌यापुरते शौचाला साफ होण्याचे समाधान करून घेतात परंतु यामुळे त्याचा बद्धकोष्ठता हा विकार वाढत जातो. त्यामूळे असे न करता आपण जवळच्या आयुर्वेदीय तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने आप‌ली प्रकृती परीक्षण करून घ्यावी व त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्या कारणाने बध्दकोष्ठता झाली असावी ते वैद्यांकडून समजून घ्यावी व त्यांच्या सल्ल्याने आयुर्वेदीय उपचार करून घेतल्यास मलावरोध कायमचा बरा होतो.

हे सर्व उपचार करून‌ही फरक न पडल्यास किंवा मलावरोध जास्त प्रमाणात असल्यास वैद्यांच्या सल्ल्याने पंचकर्म करून घ्यावीत पंचकर्मामध्ये स्नेहन, स्वेदन, बस्ती, विरेचन करून घ्यावे.

वैद्य प्रमोद पालवे
(आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वसिद्धी आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
प्रेमदान चौक, नोबल हॉस्पिटल शेजारी सावेडी अहमदनगर/अहिल्यानगर
मो-९९७०३४६११८

Address

VISHWASIDDHI AYURVED AND PANCHAKARMA CENTRE, PREMDAN CHOWK, NEAR NOBLE HOSPITAL, SAVEDI, AHMEDNAGAR
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 10:30am - 7pm
Tuesday 10:30am - 7pm
Wednesday 10:30am - 7pm
Thursday 10:30am - 7pm
Friday 10:30am - 7pm
Saturday 10:30am - 7pm

Telephone

+918999807775

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwasiddhi Ayurvedic panchakarma centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vishwasiddhi Ayurvedic panchakarma centre:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category