08/04/2026
Thanks Lokmat
Patient education article
*काय आहेत दुर्बीण शस्त्रक्रिया?*
पारंपारिक पद्धतीने मोठा काप न घेता सूक्ष्म छिद्रातून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया म्हणजे दुर्बीण शस्त्रक्रिया
*पारंपारिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत फायदे*
१. काप छोटा, त्यामुळे वेदना नगण्य
२. आधुनिक दुबिणीद्वारे अवयवाचे मोठे चित्र दिसल्याने अधिक अचूक शस्त्रक्रिया
३. गुंतागुंत आणि रक्तस्राव होण्याची शक्यता नगण्य
४. जखम न भरण्याची, जखमेत पाणी होण्याची शक्यता नगण्य
५. जखम छोटी असल्याने भविष्यात हर्निया होण्याची शक्यता कमी
६. काप छोटा असल्याने सौंदर्यास कमीत कमी बाधा पोहोचते
७. रुग्ण कमीत कमी दिवस दवाखान्यात भरती राहतो त्यामुळे कुटुंबाची ओढाताण कमी. हॉस्पिटल मधून होणाऱ्या जंतुसंसर्गाचे प्रमाण कमी
८. महिला म्हणजे कुटुंबाचा आस..अशी व्यक्ती जास्त काळ अंथरुणाला खिळून राहिल्यास कुटुंबाची आबाळ होते...दुर्बीण शस्त्रक्रियेनंतर लवकर कौटुंबिक जबाबदाऱ्या घेता येतात, परिणामी कुटुंबाची आबाळ कमी होते
९. सामाजिक दृष्ट्या विचार केल्यास काम करणाऱ्या महिला वेगाने दुरुस्त झाल्यास अधिकचे मानवी तास वाया जात नाहीत परिणामी समाजाचे आणि देशाचे जास्तीचे नुकसान टाळते
*या शस्त्रक्रिया कशा केल्या जातात?*
पारंपरिक मोठा छेद न घेता पोटावर ३-४ छोटे काप घेतले जातात, प्रगत दुर्बीण पोटात सोडून अवयवांचे चित्र मोठ्या पडद्यावर घेतले जाते आणि या पडद्यावर बघून डॉक्टर पोटातल्या जटिल आजाराचे उपचार करतात.
अवयवाचा भाग अथवा अवयव काढावयाचा असेल तर तो नैसर्गिक पोकळीद्वारे म्हणजेच मायांगाद्वारे बाहेर काढला जातो. म्हणून अगदी १.५-२ किलोची गाठी केवळ गव्हाच्या दाण्याएव्हड्या टाक्याच्या मदतीने काढता येते.
गाठ अगदी मोठी असल्यास मोर्सेलेटर नावाची मशीन त्याचे रिबीनसारखे तुकडे काढते
*महिलांच्या कुठल्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात*
गर्भाशय काढणे, गर्भाशयाच्या गाठी काढणे, अंडकोशाच्या गाठी काढणे, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, गर्भधारणेत समस्या असल्यास शस्त्रक्रिया, नलिका गर्भ काढणे, गर्भाशयाच्या गर्भाशयातील पडदा व गाठी काढणे, अंग बाहेर येत असल्यास गर्भाशय न काढता ते पुनर्स्थापित करणे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया उलटवणे, पीळ पडलेल्या गाठींच्या शस्त्रक्रिया, कुमारिका मुलींच्या पोटाच्या शस्त्रक्रिया, जननमार्गाच्या अवयवाच्या काही कॅन्सर शस्त्रक्रिया, इंडोमेट्रीओसिस शस्त्रक्रिया
आधुनिक औजारे, आधुनिक भुलेचे मशीन, आधुनिक निर्जंतुकीकरण यंत्रणा असणारे शस्त्रक्रियागृह आणि अनुभवी डॉक्टर यांचा मिलाप असल्यास रुग्णाची प्रगती आणि शस्त्रक्रियेचा अनुभव अगदी आल्हाददायक होतो...
समाज प्रगत होत असताना आज स्त्रीही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून घरगाडा हाकण्यासाठी झोकून देत आहे..कौटुंबिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आघाड्या सांभाळताना मग कधी आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात....यात आजाराच्या समूळ नाशासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास कुटुंबात वातावरण तणावपूर्ण होते..अशा वेळी दुर्बीण शस्त्रक्रिया हाच सर्वोत्तम पर्याय ठरतो...
भगिनींनो.....
*यात आहे कमी त्रास आणि मिळे झटपट आराम...*
*म्हणूनच दुर्बीण शस्त्रक्रिया आहेत.. आधुनिक युगात जणू वरदान....*