14/03/2025
U CAN WIN
#वरून चक्रवतीचा संघर्षमय जीवन प्रवास
#वरून कित्येक वेळा सिलेक्शनसाठी गेला. एकाही ठिकाणी सिलेक्ट झाला नाही. कधी गोलंदाजीत अपयशी ठरल्यावर फलंदाज बनण्याचा निर्णय घेतला तर कधी पराभव स्वीकारून यष्टिरक्षक (विकेटकीपर) होण्याचा निर्णय घेतला. अशा गोंधळल्या परीस्थितीत निर्णय घेणे खूप अवघड झालं होतं..
#नशीब त्याला काय बनवू इच्छित होतं हेच समजत नव्हतं. अखेर एका दिवशी स्वप्नांच्या खेळपट्टीवर बोल्ड झाल्यावर त्याने निश्चय केला की आता कायमस्वरूपी क्रिकेट सोडून अभ्यास करायचा.
#पाच वर्ष शिक्षण घेऊन आर्किटेक्चरची पदवी घेतली. त्यानंतर तीन वर्षे नोकरी देखील केली. पण क्रिकेटचा पिंड असल्याने नोकरीतही मन रमले नाही. शेवटी वडिलांना फोन करून म्हणाला, "पप्पा, ही नोकरी माझ्याकडून होत नाही. फक्त एकदा परत प्रयत्न करू द्या. यावेळी अपयशी झालो तर नक्की क्रिकेट सोडून देईन."
वडिलांनी संमती दिली. त्याने नोकरी सोडली आणि भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज बनण्याचे स्वप्न पाहिले. पण नेहमीप्रमाणे त्यातही अपयशी ठरला. इतक्या अपयशानंतर शेवटचा निर्णय घेतला—"आता ऑफस्पिन गोलंदाजी करतो. जर यावेळी काहीच घडले नाही तर कायम क्रिकेटला अलविदा!"
#प्रयत्न केले की जीवनात अशक्य असे काहीच नाही...अखेर तो जिंकला व भारतीय संघात त्याची निवड झाली...
#चॅम्पियन ट्राँफी मधील IND vs AUS सेमीफायनलमधील अप्रतिम कामगिरी...
#चार-पाच षटकांनंतर भयंकर फॉर्ममध्ये असलेला ट्रॅव्हिस हेड, शमी आणि पांड्याला त्यांच्या ओळखलेल्या शैलीत फटकेबाजी करत होता. कोट्यवधी भारतीयांचे श्वास थांबले होते. माझ्या आजूबाजूच्या काही लोकांनी भीतीपोटी टीव्ही बंदही केला. "हेडवा फार्ममध्ये आलाय बे! आता ऑस्ट्रेलिया ३०० रन करणारच!"
#अशातच कर्णधार रोहित शर्मा त्याच मुलाच्या हातात चेंडू सोपवतो—जो एकेकाळी क्रिकेटला हरून आर्किटेक्ट बनला होता.
#दुसऱ्याच चेंडूवर समोर ट्रॅव्हिस हेड!
#क्षणात या आर्किटेक्टने हेडला बाद केले आणि भारताच्या विजयाचा नकाशा तयार केला. टीव्हीवर नजर लावून बसलेल्या कोट्यवधी भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला!
#मी पुन्हा पुन्हा वरुण चक्रवर्तीबद्दल विचार करतो आणि वाटतं—ही गोष्ट त्या मध्यवर्गीय मुलांचीच नाही का जे आपल्या स्वप्नांसाठी झगडतात आणि एक दिवस नोकरीच्या खेळपट्टीवर क्लीन बोल्ड होतात? मग आयुष्यभर त्याच पिचवर संघर्ष करत राहतात.
#आज जर वरुण नोकरी करत असता तर कदाचित कुठे तरी गमावलेला असता... पण त्याच्या त्या एका निर्णयामुळे तो आज आपल्या सर्वांसमोर उभा आहे..
#पण ज्या देशात गरीबातील गरीब मुलगाही एक चेंडू आणि बॅट घेण्याची जुगाड करतो लाकडाचे स्टम्प बनवतोत्या देशाला वरुण चक्रवर्तींसारखे खेळाडू नेहमीच लागतील.
#काही प्रसंग आपल्याला हेच शिकवतात अपयशानंतरही स्वप्न पहा नुकतीच पाहू नका तर त्यांना पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करा,कष्ट करा कोणत्याही परिस्थितीत आपले स्वप्न पूर्ण करा!
Source Credit - iqbal Choughule