Sono-Fitz

Sono-Fitz Sono Fitz is a specialized fetal medicine and prenatal imaging clinic led by Dr. Pooja Pol.

The clinic provides advanced pregnancy scans, early detection of fetal conditions, and expert guidance for normal and high-risk pregnancies, ensuring safe care.

मातृत्व म्हणजे केवळ एका जीवाला जन्म देणे नव्हे, तर एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे! बाळाच्या पहिल्या श्वासाआधीच आईच्या क...
10/05/2026

मातृत्व म्हणजे केवळ एका जीवाला जन्म देणे नव्हे, तर एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे!

बाळाच्या पहिल्या श्वासाआधीच आईच्या काळजात मायेचा पाझर फुटतो.

तुमच्या या नऊ महिन्यांच्या सुखद प्रवासात, तुमच्या बाळाची पहिली हालचाल आणि पहिले दर्शन सुरक्षितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवताना आम्हाला अभिमान वाटतो.

सर्व मातांना आणि लवकरच आई होणाऱ्या मातांना 'सोनोफिट्झ' (Sono-Fitz) परिवारातर्फे जागतिक मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!

#मातृदिन२०२६ #आई #मातृत्व #सोनोफिट्झ #प्रेग्नन्सी #अहिल्यानगर

08/05/2026

प्रेग्नन्सी स्कॅनला इतका वेळ का लागतो? | Why Some Pregnancy Scans Take Longer Than Others? | Dr.Pooja Pol

प्रेग्नन्सीमध्ये काही सोनोग्राफी स्कॅन पटकन होतात, तर काहींना जास्त वेळ लागतो. साधारणपणे अर्ली प्रेग्नन्सी, ग्रोथ आणि डॉपलर स्कॅन कमी वेळात होतात. पण NT स्कॅन, एनॉमली स्कॅन आणि फेटल इको हे स्कॅन खूप डिटेलमध्ये केले जातात, त्यामुळे त्यांना जास्त वेळ लागू शकतो.

स्कॅनमध्ये बाळाचे वेगवेगळे अवयव आणि मोजमाप ठराविक पोजिशनमध्येच पाहता येतात. बाळाची पोजिशन बदलत राहिल्यास डॉक्टरांना थोडा वेळ वाट पाहावी लागू शकते.

म्हणून प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये स्कॅनला लागणारा वेळ वेगळा असू शकतो.

During pregnancy, some ultrasound scans take less time while others take longer. Early pregnancy scans, growth scans, and Doppler scans are usually quick.

However, NT scan, Anomaly scan, and Fetal Echocardiography require more time because they involve detailed evaluation of the baby.

Certain measurements and organs can only be examined when the baby is in a specific position. If the baby is not in the right position, the doctor may need to wait for movement, which can increase the scan time.

That’s why the duration of pregnancy scans can vary in every pregnancy.



प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असतो, पण 'अ‍ॅनोमली स्कॅन' हा एक असा टप्पा आहे जो तुमच्या बाळाच्या भविष्यातील ...
06/05/2026

प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असतो, पण 'अ‍ॅनोमली स्कॅन' हा एक असा टप्पा आहे जो तुमच्या बाळाच्या भविष्यातील आरोग्याचा पाया ठरतो. बाळ सुदृढ जन्माला यावं, हे प्रत्येक आई-बाबांचं स्वप्न असतं आणि आमचा प्रयत्नही तोच असतो.

या स्कॅनमध्ये आपण काय पाहतो?
मेंदूचा विकास
हृदयाची रचना
हाडांची आणि स्नायूंची वाढ

अहिल्यानगरमध्ये तुमच्या बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

डॉ. पूजा पोळ
फेटल मेडिसिन स्पेशालिस्ट
📍 सोनो-फिट्झ, सावेडी, अहिल्यानगर.
📞 +91 9763 006 006

05/05/2026

स्पायना बायफिडा म्हणजे काय? कारणे, प्रकार आणि प्रतिबंध | What is Spina Bifida? Causes, Types & Prevention | Importance of Folic Acid in Pregnancy | सोनाग्राफी (Ultrasound) रिपोर्टमध्ये Spina Bifida (स्पायना बिफिडा) | बाळाला याचा धोका असतो का ?
Dr Pooja Pol

स्पायना बायफिडा हा बाळाच्या पाठीच्या कण्याशी संबंधित एक कॉमन जन्मजात दोष (Congenital Defect) आहे. या व्हिडिओमध्ये सोनोफिट्झ, अहिल्यानगर येथील फेटल मेडिसिन स्पेशालिस्ट डॉ. पूजा पोळ स्पायना बायफिडा म्हणजे काय, तो कसा तयार होतो, त्याचे प्रकार आणि त्यापासून बचाव कसा करता येतो हे सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत.

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये बाळाचा मेंदू आणि पाठीचा कणा न्यूरल ट्यूब नावाच्या संरचनेपासून तयार होतो. साधारणतः गर्भधारणेच्या चौथ्या आठवड्यात ही न्यूरल ट्यूब पूर्णपणे बंद होते. जर ही ट्यूब योग्य प्रकारे बंद झाली नाही तर स्पायना बायफिडा हा दोष निर्माण होऊ शकतो.

हा दोष पाठीच्या कण्याच्या कोणत्याही भागात होऊ शकतो.

स्पायना बायफिडाचे मुख्यतः दोन प्रकार असतात:
क्लोज्ड स्पायना बायफिडा – या प्रकारात दोष बंद असतो आणि प्रॉनोसिस साधारणतः चांगला असतो.
ओपन स्पायना बायफिडा – या प्रकारात बाळाच्या नसा उघड्या राहतात आणि त्या अॅम्नियोटिक फ्लुइडमुळे डॅमेज होऊ शकतात.

काही गंभीर प्रकरणांमध्ये नर्व्ह डॅमेजमुळे बाळाच्या मेंदूमध्ये पाणी साचू शकते (Hydrocephalus) ज्यामुळे बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

परंतु चांगली गोष्ट म्हणजे हा दोष सोप्या पद्धतीने टाळता येऊ शकतो. त्यासाठी फोलिक ॲसिडच्या गोळ्या घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ज्या महिलांना गर्भधारणा प्लॅन करायची आहे किंवा ज्या गर्भवती आहेत त्यांनी पाळीच्या पहिल्या दिवसापासून फोलिक ॲसिड घेण्यास सुरुवात करावी, असे डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे.

#स्पायनाबायफिडा #गर्भधारणा #फोलिकअॅसिड #गर्भातीलदोष #फेटलमेडिसिन #गर्भसंरक्षण #आईआणिबाळआरोग्य #डॉपूजापोळ

01/05/2026

1 Year of Care, Trust & Precision | तुमच्या विश्वासाने घडलेलं 1 वर्ष | Sono-Fitz Clinic | Dr. Pooja Pol

एक वर्ष… स्वप्नांपासून वास्तवापर्यंतचा सुंदर प्रवास
Sono Fitz Clinic चा पहिला वर्धापन दिन
तुमच्या विश्वासामुळेच हा प्रवास शक्य झाला.
मनापासून धन्यवाद!
– डॉ. पूजा पोळ

29/04/2026

जुळ्या बाळांना लेझर थेरपीच्या मदतीने पोटातच कसं वाचवलं जातं? | Laser Therapy for TTTS

नमस्कार! मोनोकोरियोनिक डायम्निओटिक (MCDA) म्हणजे एकाच वारेवर वाढणाऱ्या जुळ्या बाळांच्या बाबतीत कधीकधी Twin-to-Twin Transfusion Syndrome (TTTS) ही समस्या उद्भवू शकते. अशा वेळी लेझर थेरपी (Laser Therapy) हा एक अत्यंत प्रभावी उपचार मानला जातो.

या व्हिडिओमध्ये डॉ. पूजा (Fetal Medicine Specialist) आपल्याला खालील गोष्टी समजावून सांगणार आहेत:
TTTS म्हणजे नक्की काय?
एका बाळाकडून दुसऱ्या बाळाकडे रक्ताचा पुरवठा का आणि कसा होतो?
लेझर थेरपीद्वारे वारेमधील रक्ताच्या वाहिन्या कशा वेगळ्या केल्या जातात?
या उपचाराने बाळांच्या जगण्याची शक्यता कशी वाढते?

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी जुळ्या मुलांच्या गर्भधारणेचा (Twin Pregnancy) अनुभव घेत असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप माहितीपूर्ण ठरेल!

27/04/2026

मेडिकल रिपोर्टसाठी 'ChatGPT' वापरताय? थांबा... आधी हे नक्की ऐका!
आजकाल आपल्याला काहीही झालं की आपण लगेच 'Google' किंवा 'ChatGPT' ला विचारतो, बरोबर ना? अगदी मेडिकल रिपोर्ट्स सुद्धा!

पण, काय तुम्हाला माहितीये की हे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी किती घातक ठरू शकतं?

या व्हिडिओमध्ये डॉ. पूजा (Fetal Medicine Specialist) काय सांगत आहेत पहा:
AI कसं काम करतं? ते फक्त रिपोर्टमधले काही शब्द पकडतं आणि त्याचं स्वतःचं एक इंटरप्रिटेशन देतं.

विनाकारण भीती: अनेकदा रिपोर्ट्समध्ये काही 'Normal Variations' असतात (उदा. Echogenic Foci किंवा Nasal Bone बाबतच्या काही गोष्टी), जे सामान्य असतात. पण AI मात्र तुम्हाला गंभीर आजारांची मोठी लिस्ट दाखवून घाबरवून सोडू शकतं!

मानसिक ताण: एकदा का मनात शंका आली की मग कितीही डॉक्टरांनी सांगितलं तरी ती भीती जात नाही.

मग काय करावं?
सर्वात आधी तुमच्या डॉक्टरांना भेटा. त्यांना हक्काने विचारा- "मॅडम, या शब्दाचा अर्थ काय?" "बाळ सुरक्षित आहे ना?" डॉक्टरांकडून खात्री करून घेतल्यावर, फक्त अधिक माहितीसाठी तुम्ही AI ची मदत घेऊ शकता, पण 'डॉक्टर' म्हणून नाही!

बाळाची काळजी घेताना गुगलपेक्षा तज्ज्ञांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवा!

Many people have started using tools like ChatGPT or Google to understand their medical reports. But is it reliable? Especially during pregnancy, interpreting fetal reports through AI can lead to unnecessary panic and misinformation. In this video, Dr. Pooja Pol explains the risks involved and why a professional medical consultation should always be your first step.

23/04/2026

गर्भाशयात काही बाळांची वाढ कमी का होते? why some babies grow slower in the womb (FGR) - Dr. Pooja

गरोदरपणात काही बाळांचे वजन अपेक्षेपेक्षा कमी का असते? फिटल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. पूजा यांनी या व्हिडिओमध्ये 'फिटल ग्रोथ रिस्ट्रिक्शन' (FGR) मागची कारणे स्पष्ट केली आहेत.

अनुवांशिक कारणे असोत किंवा वारेतील (Placenta) रक्तपुरवठा, बाळाच्या वाढीवर परिणाम करणारे घटक कोणते आणि जन्मानंतर त्यांची वाढ कशी होते, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा!

Ever wondered why some babies are smaller than expected during pregnancy? Dr. Pooja Pol, Fetal Medicine Specialist, breaks down the reasons behind Fetal Growth Restriction (FGR). From genetic potential to placental health, learn about the factors that influence your baby's growth and what happens after birth.

#गरोदरपण #बाळाचीवाढ #स्त्रीआरोग्य #प्रेग्नन्सीटिप्स #डॉपूजा #मराठीआरोग्य

आई होण्याचा प्रवास हा सुंदर असतो, पण कधीकधी त्याला विशेष काळजीची गरज असते. 'हाय रिस्क प्रेग्नन्सी' म्हणजे नक्की काय आणि ...
21/04/2026

आई होण्याचा प्रवास हा सुंदर असतो, पण कधीकधी त्याला विशेष काळजीची गरज असते. 'हाय रिस्क प्रेग्नन्सी' म्हणजे नक्की काय आणि अशा वेळी फेटल मेडिसिन स्पेशालिस्ट तुम्हाला कशी मदत करू शकतात?

या पोस्टमध्ये आम्ही हाय रिस्क प्रेग्नन्सीची महत्त्वाची लक्षणे आणि तज्ज्ञांच्या भूमिकेबद्दल माहिती दिली आहे. लक्षात ठेवा, योग्य वेळी घेतलेला तज्ज्ञांचा सल्ला गुंतागुंत टाळून आई आणि बाळ दोघांनाही सुरक्षित ठेवू शकतो.

तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काही शंका असल्यास आजच डॉ. पूजा यांच्याशी संपर्क साधा.
गर्भधारणा सुरक्षित व्हावी आणि बाळ सुदृढ जन्माला यावे, यासाठी फेटल मेडिसिन स्पेशालिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

✅ नियमित स्कॅन आणि तपासण्या
✅ गुंतागुंतीचे वेळेत निदान
✅ सुरक्षित डिलिव्हरी प्लॅन

जर तुम्हाला पोस्टमध्ये दिलेली लक्षणे जाणवत असतील, तर त्वरित सल्ला घ्या.

📍 सोनो-फिट्झ, सावेडी, अहिल्यानगर.
📞 +91 9763 006 006

#अहिल्यानगर #प्रेग्नन्सी #आरोग्यसल्ला #मातृत्व #फेटलमेडिसिन

20/04/2026

स्कॅन्समध्ये मोस्ट कॉमन बर्थ डिफेक्ट्स कोणते दिसतात? | Common Birth Defects Seen in Pregnancy scan

गर्भातील बाळाचे कॉमन शारीरिक दोष | Most Common Birth Defects Seen in Pregnancy Scans | Dr Pooja Pol
प्रेग्नन्सी दरम्यान केलेल्या स्कॅन्समध्ये काही जन्मजात शारीरिक दोष (Congenital Defects) लवकर ओळखता येतात. भारतीय लोकसंख्येमध्ये साधारणतः 2–3% बाळांमध्ये जन्मजात दोष आढळू शकतात.

या व्हिडिओमध्ये Sonofitz, अहिल्यानगर येथील Fetal Medicine Specialist Dr. पूजा पॉल प्रेग्नन्सी स्कॅन्समध्ये दिसणाऱ्या सर्वात कॉमन जन्मजात दोषांबद्दल माहिती देतात.

साधारणपणे दिसणारे दोष:
हृदयाचे जन्मजात दोष (Congenital Heart Defects)
ओपन न्युरल ट्यूब डिफेक्ट्स – ज्याचा संबंध ब्रेन आणि स्पायनल कॉर्डशी असतो
कंजेनिटल टॅलेपस (Clubfoot) – पायांच्या संरचनेशी संबंधित दोष
ब्रेन, स्पाईन, हात किंवा पायांशी संबंधित शारीरिक दोष
डाउन सिंड्रोम आणि इतर क्रोमोसोमल समस्या

प्रेग्नन्सी दरम्यान नियमित अनॉमली स्कॅन आणि इतर तपासण्या केल्यास हे दोष लवकर ओळखता येतात आणि योग्य उपचार व मार्गदर्शन मिळू शकते.
गर्भावस्थेत बाळाच्या आरोग्यासाठी नियमित स्कॅन्स खूप महत्त्वाचे आहेत.

#प्रेग्नन्सीस्कॅन #जन्मजातदोष #गर्भावस्था #बाळाच्यारोग्य #डाउनसिंड्रोम #फेटलमेडिसिन

अक्षय तृतीया म्हणजे कधीही क्षय न होणाऱ्या सुखाचा आणि समृद्धीचा दिवस. जसे हे मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मानले ज...
19/04/2026

अक्षय तृतीया म्हणजे कधीही क्षय न होणाऱ्या सुखाचा आणि समृद्धीचा दिवस.
जसे हे मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मानले जाते, तसेच आई होण्याचा प्रवास हा देखील स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आणि शुभ काळ असतो.

या मंगलदिनी, आपल्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि अक्षय आनंद लाभो, हीच सदिच्छा!

सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

Dr. Pooja Pol - Fetal Medicine Specialist
Sono-Fitz: Fetal Imaging & Therapy Studio
In front of Mahalaxmi Udyana, Savedi - Ahilyanagar.
📞 +91 9763 006 006

Address

4P8H+459, Balikashram Road, Near Nucleus Hospital, Savedi, Ahilya Nagar, Ahmadnagar
Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sono-Fitz posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share