
26/03/2025
*सिटी हॉस्पिटलमध्ये 5 वर्षांच्या मुलीवर ASD शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली**
सिटी हॉस्पिटलमध्ये 5 वर्षांच्या मुलीवर ऍट्रियल सेप्टल डिफेक्ट (ASD) क्लोजर प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. कुशल हृदयरोग तज्ञांच्या टीमने केलेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, हृदयाच्या वरच्या कप्प्यांमधील भिंतीतील छिद्र दुरुस्त करते.
ही हृदयाची शस्त्रक्रिया उच्च दर्जाची हृदय रोगाची काळजी पुरवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा एक नवीन अध्याय आहे.
रुग्णाला ASD( हृदयात छिद्र )चे निदान करण्यात आले होते.शस्त्रक्रियेची गरज ओळखून, आमच्या समर्पित टीम ने, मान्यवर डॉ. अंबरीश खाटोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली,महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ASD closer शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली.
रुग्णाला चांगल्या आरोग्य स्थितीत रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.