Yogayog ayurveda

Yogayog ayurveda योग �आणी आयुर्वेदिक�� औषधी वनस्पती ब?

06/02/2025

शेवग्याच्या शेंगा ( drumsticks )
Moringa oleifera

थंडीच्या दिवसांमध्ये खासकरुन शेवग्याच्या शेंगाची भाजी केली जाते. लांब काठीसारख्या दिसणाऱ्या या हिरव्यागार शेंगा अनेकदा सांबारमध्ये दिसून येतात.
अनेक मराठी कुटुंबांमध्ये शेंगांची किंवा त्याच्या पानांची भाजी करतात. तसंच आमटीमध्येदेखील शेंगा वापरल्या जातात.
या शेंगामध्ये मोठ्या प्रमाणावर मिनरल्स आणि प्रोटीन्स असतात.
त्यामुळे आहारात शेवग्याच्या शेंगाचा वापर हमखास करायला हवा.
शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह असतं त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.
शेवग्याचा पाला डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला असतो. या पाल्याची भाजी केली जाते.
कॅल्शिअमचं प्रमाण पुरेपूर असल्यामुळे हाडे मजबूत होतात.
पचनक्रिया सुधारते.
वजन नियंत्रणात राहते.
थकवा दूर होतो.

06/02/2025

*रात्री झोप येत नसेल तर हे काही उपाय नक्की करून पहा.*

१) झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध घेतल्याने शांत झोप लागते. दुधामधील अमिनो ऍसिड मुळे झोप शांत लागण्यास मदत होते.

२) दिवसभरात दह्याचे सेवन होत असेल तर शांत झोप लागते.

३) रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा असल्यास झोपेत व्यत्यय येत नाही.

४) झोपण्याआधी गरम पाण्यात तुळशीची आणि पुदिन्याची पाने घालून अंघोळ केल्यास अतिशय छान झोप लागते.

५) झोप नाही आधी प्राणायाम केल्यास शांत झोप लागण्यास मदत होते.

६) रात्रीच्या जेवणात फळांचा रस ताज्या भाज्या आणि सारा असावा. झोपण्यापूर्वी खूप पाणी पिऊ नये तसेच उत्तेजक द्रव्य पदार्थ टाळावेत. विशेषत साखरेचा वापर असलेली पेय टाळावे. कारण साखरेमुळे त्वरीत ऊर्जा मिळते. आणि झोपेवर परिणाम होतो साखरेऐवजी मधाचा वापर करावा.

७) झोप येत नसेल तर डोक्याला रात्री तेल लावूण तसेच तळपायावर तेल चोळून लावा.

८) रात्री झोपतांना गरम दूधात व खडीसाखर टाकून घ्यावी.

९) रात्री अंथरुणात पडल्यावर दिवसभराचे मेसेज, गेम्स आणि सोशल नेटवर्क चेक करण्याची आता आपल्याला सवय लागली आहे. पण खरे तर या गोष्टी टाळायला हव्या. झोपण्याच्या २० मिनीटे आधी टेलिव्हीजन, कॉम्प्युटर किंवा कोणत्याही स्क्रीनकडे पाहू नका. झोपताना डोळे ताणविरहीत ठेवा.

१०) झोपण्याच्या आधी रात्री हात-पायांना कोमट पाण्याने मालीश करा. झोप येण्यासाठी हे अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे तुमच्या शरीरालाही कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

पुरेशी झोप न मिळाल्यामुळं आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होते त्यामुळे साधारपणे सात ते आठ तास आराम हा नक्की करावा.

06/02/2025

बडिशेप

1. उत्तम औषध
रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते ( जेवणानंतरच खावी. ). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते.

2. पोटात चिकटपणा/आमांश दूर करते.

3. अपचनाच्या सर्व तक्रारींत
आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे , सर्व पचनसंस्थेसाठी उपयोगी आहे. जेवणानंतर एक चमचा बडिशेप रोज दोन वेळा खावी.

*हिवाळ्यात का खावी ज्वारीची भाकरी* थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. हिवाळा सुरु झाला की हवामानातील बदलामुळे...
28/12/2024

*हिवाळ्यात का खावी ज्वारीची भाकरी*
थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. हिवाळा सुरु झाला की हवामानातील बदलामुळे अनेक जण आजारी पडतात. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. हिवाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत होते. ज्याचा रोगप्रतिकार शक्तीवर देखील प्रभाव पडतो. त्यामुळे हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल केला पाहिजे.

बरेच लोकं गव्हाच्या पिठाच्या चपात्या खातात. पण हिवाळ्यात ज्वारीची भाकर खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. ज्वारीची भाकर खाल्ल्याने पचनक्रिया तर मजबूत राहते. तसेच अनेक आजारांपासून देखील लांब राहता. अनेक लोकं हिवाळ्यात बाजरी किंवा मक्याची भाकर देखील खातात. हिवाळ्यात ज्वारीची भाकर खाण्याचे फायदे

*अनेक आजारांपासून बचाव*
ज्वारीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, व्हिटॅमिन-बी, कॉम्प्लेक्स असे महत्त्वाचे घटक आढळतात. जे शरीराला आजारांपासून लांब राहण्यासाठी मदत करतात.

*हाडे मजबूत करते*
ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपली हाडेही मजबूत होतात. ज्वारीमध्ये असलेले प्रोटीन स्नायू आणि हाडे मजबूत करतात. ज्वारी ही ग्लुटेन मुक्त आहे. त्यामुळे ग्लुटेन मुक्त अन्न खाणाऱ्यांसाठी देखील ती आरोग्यदायी ठरते.

*रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते*
हिवाळ्यात ज्वारीची भाकर आपल्या रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात ठेवते. डायबिटीजच्या रुग्णांनी हिवाळ्यात ज्वारीची भाकर खालली पाहिजे.

*पचनशक्ती वाढवते*
ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. जे पचनसंस्था मजबूत करते. त्यामुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्येपासून देखील आराम मिळतो.

वजन नियंत्रित ठेवण्यास मदत
ज्वारीची भाकर खाल्ल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे तुम्ही सारखे सारखे खाणे टाळता. यामुळेच वजन नियंत्रित राहण्यात मदत होते.

25/11/2024
Namami Dhanwantari 😇🌼💫
29/10/2024

Namami Dhanwantari 😇🌼💫

कोजागिरी पोर्णिमा आणि आपले आरोग्य                   आज कोजागिरी पोर्णिमा... अश्विन पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा असे म्हट...
16/10/2024

कोजागिरी पोर्णिमा आणि आपले आरोग्य
आज कोजागिरी पोर्णिमा... अश्विन पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा असे म्हटले जाते. संपूर्ण देशभरात कोजागिरी पोर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. अनेक ठिकाणी असं मानलं जातं की, या दिवशी खुल्या आकाशाखाली तयार करण्यात आलेली खीर खाल्याने अनेक रोगांपासून सुटका होते आणि आपलं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. यामागील कारण असं सांगितलं जातं की, या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांनी पूर्ण असतो. त्यामुळे रात्री 12 वाजल्यानंतर खीर किंवा मसाला दूध घेणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.



1. असं मानलं जातं की, कोजागिरी पोर्णिमेला तयार करण्यात आलेली खीर अस्थमा असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असते.

2. अस्थमाच्या रूग्णांसोबतच कोजागिरी पोर्णिमेची खीर स्किनच्या प्रॉब्लेम्सनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर ठरतं. असं म्हटलं जातं की, कोणी स्किन प्रॉब्लेम्सनी त्रस्त असाल तर कोजागिरीला खुल्या आकाशाखाली तयार करण्यात आलेली खीर खाणं त्याच्यासाठी फायदेशीर ठरतं.

3. त्याचप्रमाणे अशीही मान्यता आहे की, ही खीर खाल्याने डोळ्यांशी निगडीत असलेले सर्व आजार दूर होण्यास फायदेशीर ठरतात. यामागे अशी मान्यता आहे की, कोजागिरी पोर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश जास्त असतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमजोर असणाऱ्या लोकांनी या चंद्राकडे एकटक पाहणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे त्यांची दृष्टी चांगली होण्यास मदत होते.

4. डोळे, दमा आणि त्वचेचे रोगांवर गुणकारी ठरणारी कोजागिरी पोर्णिमेला खुल्या आकाशाखाली तयार केलेली खीर .

01/10/2024

भारतीय आहारामध्ये डाळींचं फार महत्व असतं. लोक रोज वेगवेगळ्या डाळींचं सेवन करतात. डाळींची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच डाळींमधून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. डाळी शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहेत.

*१) मसूरची डाळ ,मसूरच्या डाळीचं सेवन करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. प्रोटीनसाठी मसूरची डाळ तुम्ही सालीसोबत किंवा सालीशिवायही सेवन करू शकता. मसूरच्या डाळीमध्ये प्रोटीनसोबतच फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन बी२, फोलिक अ‍ॅसिड, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम भरपूर असतं.

*२) चण्याची डाळ ,चण्याच्या डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतं. तसेच याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. प्रोटीनसोबतच या डाळीमध्ये फायबरही भरपूर असतं, ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि पोटही साफ राहतं. इतकंच नाही तर चण्याच्या डाळीचं सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत मिळते. चण्याच्या डाळीचं सेवन करून शरीरात लाल रक्तपेशी वाढण्यासही मदत मिळते.

*३) मूग डाळ ,तूर डाळीनंतर मूग डाळ ही सगळ्यात फायदेशीर मानली जाते. या डाळीच्या सेवनाने शरीराला प्रोटीन तर मिळतंच, सोबतच तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. या डाळीच्या सेवनाने पोटाच्या अनेक समस्याही दूर होतात. तसेच या डाळीने शरीरात ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं.

*४) उडीद डाळ ,उडीद डाळ अनेक दृष्टीने शरीरासाठी फायदेशीर मानली जाते. या डाळीमध्ये प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन बी सुद्धा भरपूर असतं. जर प्रोटीनची कमतरता दूर करायची असेल तर या डाळीचा रोजच्या आहारात समावेश करावा. तसेच या डाळीमध्ये फोलिक अ‍ॅसिड, आयर्न, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक तत्वही भरपूर असतात. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र मजबूत राहतं.

*५) तूर डाळ , तूर डाळीमध्येही प्रोटीन भरपूर असतं. इतकंच नाही तर या डाळीमध्ये फायबर फोलिक अ‍ॅसिड, आयर्न आणि कॅल्शिअमही भरपूर असतं. ही डाळ रोज खाल्ल्याने शरीरातील प्रोटीन वाढतं. तसेच तूर डाळीच्या सेवनाने डायबिटीस आणि हृदयरोग कंट्रोल करण्यासही मदत मिळते. तसेच तूर डाळीचं पाणी सेवन केल्याने शरीराला एनर्जी मिळते.

Address

Akola

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogayog ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share