Punde's Naturopathy & Yoga Consultancy

Punde's Naturopathy & Yoga Consultancy nadi pariksha,free advice Ayurveda medicines & health with proper medicines sealing

24/10/2022
15/09/2022

केंद्र सरकारने `अत्यावश्यक` यादीतून 26 औषधं काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅसिडिटी आणि पोटाशी संबंधित इतर आजारांसाठी ranitidine हे सहसा लिहून दिलं जातं. हेच औषध Rantac, Zinetac आणि Aciloc सारख्या वेगवेगळ्या ब्रँड नावाने विकलं जातं. पण, आता कॅन्सर होण्याच्या चिंतेमुळे ही औषधं अत्यावश्यक यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.
अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत इवरमेक्टिन, मुपिरोसिन आणि निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी यांसारख्या विशिष्ट संसर्गविरोधी औषधांसह 34 औषधांचा समावेश केल्याने, औषधांची एकूण संख्या आता 384 झाली आहे. यादीत समाविष्ट केलेली अनेक एंटीबायोटीक्स, लस आणि कॅन्सरविरोधी औषधं अधिक परवडणारी होतील.
रेनिटिडाइन, सुक्रॅफेट, व्हाईट पेट्रोलॅटम, एटेनोलॉल आणि मिथाइलडोपा यांसारखी 26 औषधं सुधारित यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. किंमत परिणामकारकता आणि उत्तम औषधांची उपलब्धता 'या' मापदंडांच्या आधारे ही औषधं यादीतून बाहेर काढण्यात आली आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केलंय की, “आवश्यक औषधांची राष्ट्रीय यादी 2022 जाहीर झाली. त्यात 27 श्रेणीतील 384 औषधांचा समावेश आहे. अनेक एंटीबायोटीक्स, लस, कॅन्सरविरोधी औषधं आणि इतर अनेक महत्त्वाची औषधं अधिक परवडणारी बनतील आणि रुग्णांच्या खर्चात घट होईल."
छातीतील होणारी जळजळ तसंच ॲसिडिटीचा त्रास नाहीसा करणारं रॅन्टॅक हे औषध आता अत्यावश्यक सेवेतून वगळण्यात आलंय. अमेरिकेत या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीये. तर अमेरिकेनंतर आता भारतानेही या औषधांबाबतीत मोठा निर्णय घेतलाय. भारतीय आरोग्य मंत्रालयाने झेन्टॅक, रॅन्टॅक यांच्यासह एकूण 26 औषधांना अत्यावश्यक औषधांच्या यादीतून वगळलंय.
माहीती करीता प्रसारीत....

आरोग्यम धनसंपदा
04/09/2022

आरोग्यम धनसंपदा

22/07/2022

हिमोग्लोबिन वाढवायचे तर आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याविषयी

हिमोग्लोबिन कमी झालं आहे? नियमित खा ५ पदार्थ, आहारतज्ज्ञ सांगतात रक्तात लोहाचं प्रमाण कमी असेल तर..

ठळक मुद्दे
बाजरीची भाजणी, बाजरीची खिचडी अशा पदार्थांच्या माध्यमातून बाजरी खाता येते.
शरीरात लोह किंवा हिमोग्लोबिन कमी असेल तर विविध समस्या निर्माण होतात.
शरीराचे कार्य सुरळीत होण्यासाठी शरीराला विविध घटकांची आवश्यकता असते. लोह हे एक महत्त्वाचं खनिज असून लोहामुळे शरीराला ताकद मिळते. लोहाचे शरीरातील प्रमाण कमी झाले तर शरीरातील लाल पेशी कमी होतात. याबरोबरच आरोग्याच्या इतरही अनेक समस्या निर्माण होतात. हिमोग्लोबीन हा शरीरातील महत्त्वाचा घटक लोहापासूनच तयार होतो. शरीरात लोहाची कमतरता आहे हे जर आपल्याला वेळीच ओळखा आलं तर त्यावर उपचार घेऊन पुढील धोके टाळता येतात. हिमोग्लोबीन आपल्या पूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते. हिमोग्लोबीन हे फुप्फुसातून ऑक्सिजन घेतं आणि रक्ताद्वारे शरीरभर पोहोचवतं. हेच लोह कमी पडलं तर शरीराला ऑक्सिजन पुरवणं, शरीरातील कार्बन डायऑक्साइड बाहेर काढणं यावर परिणाम होतो. लोह कमी पडलं तर अॅनिमिया होतो. अॅनिमियाचा धोका टाळण्यासाठी लोह आणि हिमोग्लोबिन यांचे आहारातील प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. आता हिमोग्लोबिन वाढवायचे तर आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याविषयी आहारतज्ज्ञ काही महत्त्वाच्या टिप्स देतात

लोहाच्या कमतरतेची लक्षणे

खूप थकवा जाणवणं हे रक्तातील लोह कमी असल्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. लोह कमी असेल तर आपली विचार करण्याची शक्ती कमी होते. शिवाय चिडचिडेपणाही वाढतो. शरीराची त्वचा निस्तेज किंवा पांढरी पिवळी पडते तेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते. श्वास घेण्यास त्रास होणं हे लक्षण पटकन लक्षात येतं. जर जिने चढताना किंवा काही हालचाल करताना, काम करताना जर धाप लागत असेल तर शरीरात लोहाची कमतरता असू शकते हे लक्षात घ्यायला हवे. केस गळणे हे लोहाची कमतरता असण्याचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे.

१. खजूर

खजूरामध्ये लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, फोलिक अॅसिड असे आरोग्यासाठी उपयुक्त असणारे सर्व घटक असतात. खजूरामुळे लाल रक्तपेशी वाढतात आणि अॅनिमिया होण्यापासून आपली होण्यास मदत होते.

२. तीळ

तीळही आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात हे आपल्याला माहित आहे. तीळामध्ये लोह, फोलेट, फ्लेवोनाइडस, तांबे हे घटक भरपूर प्रमाणात असतात. अॅनिमिया कमी होण्यासाठी आणि हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आहारात तीळाचा वापर जरुर करावा. तिळाचा कूट, तीळाचे लाडू, तीळाची चटणी किंवा काही पदार्थांमध्ये आपण तीळाचा वापर करु शकतो.

३. राजगिरा

ही एकप्रकारची पालेभाजी असून ती चवीलाही खूप छान लागते. आपण साधारणपणे मेथी, पालक यांसारख्या भाज्या खातो. मात्र त्याशिवायही बऱ्याच पालेभाज्या महाराष्ट्राच्या विविध भागांत मिळतात. या पालेभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असे गुणधर्म असतात. त्यामुळे त्या भाज्या आवर्जून खायला हव्यात. राजगिऱ्याची परतून केलेली भाजी खूप छान लागते. या भाजीमुळे लाल रक्तपेशी तर वाढतातच पण हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

४. मनुके

आपण सुकामेवा म्हटलं की साधारणपणे काजू आणि बदाम खातो. पण किशमिश किंवा मनुकांना आपण फारसे महत्त्व देत नाही. नैसर्गिकरित्या गोड असलेल्या मनुकांमध्ये लोह आणि तांबे चांगल्या प्रमाणात असल्याने लाल पेशी तयार करण्यासाठी तसेच आरोग्याच्या इतरही अनेक तक्रारींवर मनुके फायदेशीर असतात.

५. बाजरी

आपण रोजच्या आहारात साधारणपणे गहू, तांदूळ फारतर ज्वारी ही धान्ये खातो. मात्र त्याशिवायही बाजरी, नाचणी, मका, राजगिरा ही धान्ये असतात. ही धान्ये शरीरासाठी अतिशय उपयुक्त असून त्यांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्याने शरीराला बाजरीतून उष्णता तर मिळतेच पण हिमोग्लोबिनसाठी बाजरी उपयुक्त ठरते. ज्वारीमध्ये बाजरी मिक्स करुनही त्याची भाकरी करता येते. बाजरीची भाजणी, बाजरीची खिचडी अशा पदार्थांच्या माध्यमातून बाजरी खा.
मस्त खा...स्वस्थ राहा...
पुंडे आयुर्वेद भांडार

15/07/2022

रक्त पातळ करतात रोजच्या आहारातील ५ गोष्टी

हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी काही वैद्यकीय स्थिती तसेच रक्त पातळ करणाऱ्या औषधांची आवश्यकता असू शकते. रक्त पातळ करणारे अँटीप्लेटलेट्स रक्त पेशींना एकत्र चिकटून राहण्यापासून रोखतात ज्यामुळे त्यांना गोठण्यापासून प्रतिबंध होतो. जेव्हा शरीरात रक्त घट्ट होऊ लागते, तेव्हा तुमचे शरीर अनेक प्रकारे त्याचे संकेत देऊ लागते.
यामध्ये चक्कर येणे, मासिक पाळी दरम्यान रक्त प्रवाह वाढणे, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, त्वचेला खाज सुटणे, अंधुक दृष्टी, संधिवात यांचा समावेश होतो. (5 Natural Blood Thinning Foods To Reduce Blood Clots) शरीरात रक्त घट्ट होण्यापासून आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या नैसर्गिक गोष्टींचाही वापर केला जाऊ शकतो. या पदार्थांचा वापर करण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लसून
लसूण, फ्लेवर फूडमध्ये जोडले जाते, त्यात नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात.फूड सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी मधील 2018 च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की लसूण पावडरमुळे उंदरांमध्ये अँटीथ्रोम्बोटिक क्रिया झाल्याचे दिसून आले आहे. अँटीथ्रोम्बोटिक एजंट हा एक पदार्थ आहे जो रक्त गोठण्यास प्रतिबंध करतो.

व्हीटामीन ई
व्हिटॅमिन ई रक्तातील गोठण्याची क्रिया कमी करते. हे परिणाम एखाद्या व्यक्तीने घेतलेल्या व्हिटॅमिन ईच्या प्रमाणावर देखील अवलंबून असतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ऑफिस ऑफ डायटरी सप्लिमेंट्सने शिफारस केली आहे की जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत त्यांनी व्हिटॅमिन ई ओव्हरडोज घेणे टाळावे

हळद
लोक हळदीचा वापर औषधी म्हणून फार पूर्वीपासून करत आहेत. हळदीतील कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी आणि रक्त पातळ करणारे किंवा अँटीकोएगुलंट गुणधर्म असतात. जे शरीरात रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्याचे काम करतात. EPMA जर्नलमधील2019 चा रिपोर्ट सुचित करतो की हळद रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यास मदत करू शकते. परंतु रक्त पातळ करणाऱ्यांसाठी हळद थेट घेण्याची शिफारस केलेली नाही. तुम्ही स्वयंपाकात, सूपमध्ये आणि गरम पाण्यात मिसळून हळद खाऊ शकता.

आले
आले हा एक दाहक-विरोधी मसाला आहे जो रक्तातील गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करतो. त्यात सॅलिसिलेट नावाचे नैसर्गिक आम्ल असते. ऍस्पिरिन सॅलिसिलेट, ज्याला एसिटिलसॅलिसिलिक ऍसिड म्हणूनही ओळखले जाते, हे सिंथेटिक गुणधर्मांसह शक्तिशाली रक्त पातळ करणारे आहे. नैसर्गिक सॅलिसिलेट्सचे प्रभाव मिळविण्यासाठी, लोक नियमितपणे ताजे किंवा वाळवलेले आले स्वयंपाक करताना वापरू शकतात.

लाल मिरची
लाल मिरचीमध्ये भरपूर गुणधर्म असतात जे आपले रक्त पातळ करण्यास मदत करतात. लाल मिरचीमध्ये सॅलिसिलेट्स जास्त प्रमाणात आढळतात. ज्यामुळे ते शक्तिशाली रक्त पातळ करण्याचे होते. आहारात लाल मिरचीचा समावेश केल्यास तुमचा रक्तदाब कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.
(रक्त पातळ करणारे हे नैसर्गिक घटक आहेत परंतू शरीरातील व्याधींमुळे रक्ताला आलेल्या घट्टपणावर औषधोपचार नाही.)

14/07/2022

पावसाळ्यात मिळणारा ओला खजूर खा भरपूर, फायदे ५ ; वाचा ओला खजूर खाण्याची योग्य पद्धत
ओला खजूर पावसाळ्याच्या दिवसांत आवर्जून खायला हवा..
ठळक मुद्दे
फायबर आणि अँटीऑक्सिडंटस रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात.
हाडांच्या ठिसूळपणाची समस्या असेल तर खजूराचा चांगला उपयोग होतो.
आपण अनेकदा खजूर खातो. खजूर हे फळ असलं तरी ते वाळवलेले असल्याने ते सुकामेव्यामध्ये मोडतं. खजूर आरोग्यासाठी अतिशय चांगला असल्याने हिमोग्लोबिन वाढण्यासाठी, लोह वाढण्यासाठी किंवा विविध खनिजे आणि व्हिटॅमिन्स मिळण्यासाठी खजूर फायदेशीर असतो असे आपण ऐकतो (Diet Tips). आहारतज्ज्ञही अनेकदा लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्याना आवर्जून खजूर खाण्याचा सल्ला देतात. खजूरामध्येही काळा खजूर, लाल खजूर, खूप कोरडा खजूर, चिकट खजूर असे बरे प्रकार पाहायला मिळतात. (Monsoon Special) यातही आणखी एक प्रकार जो खास पावसाळ्यात बाजारात येतो, तो म्हणजे ओला खजूर, साधारण पिवळा, तांबूस रंगाचा दिसणारा हा ओला खजूर पावसाळ्याच्या दिवसांत आवर्जून खायला हवा असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे (5 Benefits of Eating fresh Dates in Monsoon)
ओला खजूर खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. हा खजूर ताजा असेल तर त्याचे आणखीनच फायदे होतात. मात्र आरोग्यासाठी उपयुक्त असणारी कोणतीही गोष्ट आपण चुकीच्या स्वरुपात खाल्ली तर त्याचा फायदा तर होतच नाही पण तोटा होण्याचीही शक्यता असते. अशावेळी ओला खजूर खाण्याची योग्य पद्धत कोणती हे माहित असणे आवश्यक आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजिकल इन्फर्मेशनने प्रकाशित केलेल्या एका माहितीनुसार, खजूर अँटीऑक्सिडंट विशेषत: कॅरोटीनॉयड आणि फेनोलिक्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. तसेच खजूरात फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, मँगनिज, लोह, व्हिटॅमिन बी १२ यांसारखी पोषक तत्त्वे असतात.
पावसाळ्यात होणाऱ्या विविध अॅलर्जी किंवा इन्फेक्शनसाठी हा खजूर फायदेशीर ठरतो. अॅसिडीटीवरील रामबाण उपाय असून एनर्जी टिकून राहावी यासाठीही या खजूराचा फायदा होतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाणे फायद्याचे असते. आतड्यांशी निगडित समस्या, हार्ट आणि लिव्हरशी निगडीत समस्या दूर करण्यास याचा चांगला फायदा होतो. महिलांमध्ये साधारणपणे हिमोग्लोबिन कमी असण्याची समस्या असते. अशावेळी जेवण झाल्यानंतर ओला खजूर खाणे फायदेशीर ठरते.
ओल्या खजूराचे फायदे

१. नैसर्गिक गोडवा

खजूर हे फळ असल्याने त्यामध्ये फ्रुक्टोज असते. साखरेपेक्षा हा नैसर्गिक गोडवा केव्हाही चांगला. त्यामुळे साखरेला उत्तम पर्याय ठरु शकतो. यामध्ये असणारे फायबर आणि अँटीऑक्सिडंटस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.
2. मेंदूचे कार्य चांगले होण्यास उपयुक्त
खजूराचे नियमित सेवन केल्यास भविष्यात मेमरी लॉस किंवा मेंदूशी निगडीत समस्या होण्यापासून आपण वाचू शकतो. खजूरात मेंदूला बूस्ट करणारे घटक असतात. तसेच सूज कमी करण्यासाठीही याचा उपयोग होत असल्याने मेंदूच्या एकूण कार्यासाठी खजूर चांगला असतो.

३. हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर

खजूरात फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ही खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. हाडांचे कार्य सुरळीत व्हावे यासाठी ही खनिजे उपयुक्त असल्याने हाडांच्या मजबुतीसाठी खजूर उपयुक्त असतो. हाडांच्या ठिसूळपणाची समस्या असेल तर खजूराचा चांगला उपयोग होतो.
4. गर्भवतींसाठी फायदेशीर

गर्भवती महिलांचे पोषण चांगले झाले तरच अर्भकाचे चांगले पोषण होते. तसेच कळांचा कालावधी कमी करण्यासाठी खजूर फायदेशीर असतो.

५. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण

खजूराचा ग्लायसेमिक इंडेक्स अतिशय कमी असतो. यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंटस रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे डायबिटीसचे प्रमाण एकीकडे वाढत असताना ओला खजूर खाणे फायद्याचे ठरते.
(जनहितार्थ:- पुंडे आयुर्वेद भांडार, अकोला.)

02/07/2022

फुटाण्याचे आरोग्यदायक फायदे

फुटाणे म्हणजेच रोस्टेड ग्राम (Roasted Gram) साधारणपणे लोक स्नॅक्सच्या स्वरूपात खातात. मात्र या फुटण्याचे अनेक आरोग्यवर्धक (Health Benefits Of Roasted Gram) फायदे आहेत. फुटण्याच्या सालीमध्ये फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे फुटाणे खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. फायबर असल्यामुळे ते पचायला जास्त वेळ लागतो त्यामुळे लवकर भूक लागत नाही. आज आपण फुटण्याच्या काही फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.

वजन कमी करण्यासाठी
फुटाण्यांमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे अनेकदा वजन कमी करण्यासाठी फुटाणे खाण्याचा सल्ला दिला (Roasted Gram Helps To Loose Weight) जातो. वजन कमी करण्यासाठी फुटण्याचा आहारात समावेश केला जातो. त्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात. फुटण्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. याशिवाय फुटाणे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि हृदयासाठीही ते फायदेशीर आहे

पचन क्रिया सुधारण्यासाठी
फुटाण्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात (Roasted Gram Strengthens Digestive System And Boosts Immunity). यामुळे पोटातील गॅस आणि अपचनाची समस्या दूर होते. फुटाण्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीदेखील आढळतात. त्यामुळे फुटण्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि अनेक आजारांना प्रतिबंध होतो.

मधुमेही रुग्णांसाठी...
फुटाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. म्हणजे यामुळे रक्तातील साखर अधिक वाढत नाही. यामुळेच मधुमेहींना फुटाणे खाण्याचा सल्ला दिला जातो (Roasted Grams Are Good For Diabetics). त्याचबरोबर ताप आल्यावरही फुटाणे खाणे फायदेशीर ठरते.
(इथे दिलेली माहीती ही सामान्य स्वरुपाची आहे..हा औषधोपचाराचा सल्ला अथवा रोगमुक्तीचा कुठलाच दावा आम्ही करत नाही. आपल्या आरोग्यतज्ञांचा सल्ला घ्यावा)

27/06/2022

तुम्ही देखील मान्य कराल की लिव्हर (liver) हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. याचे काम पचन तंत्रातून येणारे रक्त फिल्टर करणे आहे. यासोबत लिव्हरच रसायनांना डिटॉक्सिफाई करते आणि औषधांना मेटाबॉलाइज्ड करते. याशिवाय फॅट कमी करणे, कार्बोहाइड्रेट स्टोर करणे आणि प्रोटीनच्या निर्मितीत मदत करणे ही कामे देखील लिव्हरमुळे सुलभ होतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या लिव्हरची खूप जास्त काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकांना वाटते की मी बरोबर जेवण करतो, स्वत:ची काळजी घेतो त्यामुळे मला काही होणार नाही किंवा माझ्या लिव्हरला काही होणार नाही.पण गैरसमज असून लिव्हर कमजोर होण्यास अनेक घटक कारणीभूत असतात. अनेकांचे असेही मत असते की दारू मुळेच लिव्हर खराब होते, पण हा सुद्धा एक गैरसमज आहे आणि तोच आम्ही आज दूर करणार आहोत. आज आम्ही तुम्हाला दारू शिवाय अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमचे लिव्हर अशक्त अथवा योग्य कार्य करु शकत नाही. लिव्हर रोग अनुवांशिक देखील असू शकतो. लिव्हर मध्ये अनेक कारणांमुळे समस्या निर्माण होऊ शकते आणि लिव्हर कायमचे निकामी देखील होऊ शकते. जसे की व्हायरस, दारूचे सेवन आणि लठ्ठपणा होय. कालांतराने, लिव्हरला हानी पोहोचवणा-या परिस्थितीमुळे सिरोसिस होऊ शकतो. लिव्हर खराब झाल्याची काही सामान्य लक्षणे आहेत जी दिसू लागल्यावर तुम्ही उपचार सुरु करायला हवेत. दिवसभर थकवा जाणवणे, शरीरात सुस्ती राहणे, उलट्या होणे, झोप न येणे, भूक न लागणे, वेगाने वजन कमी होणे, लिव्हरमध्ये सूज निर्माण होणे यांसारखी लक्षणे प्राथमिक स्वरुपात दिसून येतात. आता पाहुया दारू व्यतिरिक्त कोणते पदार्थ आहेत जे लिव्हर खराब करू शकतात.
बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राई तुमच्या लिव्हरला निरोगी राखायचे असेल तर या तीन पदार्थांपासून खास करून दूर रहा. खूप सारे असे पदार्थ खाणे ज्यामध्ये सेच्युरेटेड फॅट आहे, ते पदार्थ तुमच्या लिव्हर फंक्शनिंगला धोका पोहचवू शकतात. शिवाय तुम्ही वेळीच या पदार्थांना आवर घातला नाही तर लिव्हरला सूज देखील येऊ शकते. याची परिणीती म्हणून लिव्हर निकामी देखील होण्याचा धोका उद्भवतो. त्यामुळे असे कोणते पदार्थ खात असाल तर त्यांचा नाद लवकरात लवकर सोडा.
पॅक्ड फूड
फास्ट फूड सारखेच पॅक्ड फूड देखील तुमच्या लिव्हरला मोठी हानी पोहचवू शकते. चिप्स आणि प्रोसेस्ड फूडचा प्रॉब्लेम असा असतो की यामध्ये साखर आणि मीठ मोठ्या प्रमाणावर वापरले असते. याच गोष्टी तुमच्यासाठी हे असले पदार्थ अनहेल्दी बनवतात आणि त्यांचे सेवन लिव्हरला समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे जर लिव्हर नीट राखायचे असेल तर या पदार्थांनच वेळी टाटा बाय बाय करा.
रेड मिटचे सेवन
रेड मीट हे प्रोटीनयुक्त मानले जाते. म्हणजे शरीराची प्रोटीनची गरज रेड मीट मधून सहज पूर्ण होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की याचे अतिसेवन हे लिव्हरसाठी मात्र हानिकारक ठरू शकते. लिव्हर या रेड मिटच्या प्रोटीनचे सहज विघटन करू शकत नाही आणि यामुळेच प्रोटीनचे निर्माण विषारी पदार्थांत होऊन जाते. याचा थेट परिणाम लिव्हर आणि शिवाय मेंदूसाठी सुद्धा हानीकारक परीस्थिती निर्माण करू शकतो. त्यामुळे रेड मीट जर अति प्रमाणात खात असाल तर वेळीच आवर घाला आणि लिव्हरची काळजी घ्या.
अति गोड पदार्थ
बर्‍याच गोड गोष्टी तुमच्या लिव्हरवर परिणाम करू शकतात. याचे कारण म्हणजे लिव्हर साखरेचे फॅटमध्ये रूपांतर करण्याचे काम करते. जर तुम्ही जास्त साखर खाल्ले तर लिव्हर शरीरात खूप चरबी तयार करते. यामुळे तुम्हाला दीर्घकाळ फॅटी लिव्हर आजाराची समस्या होऊ शकते. त्यामुळे त्याचे नियमित सेवन करा. जास्त गोड न खाण्याचा सल्ला डॉक्टर सुद्धा आपल्याला देतातच. अर्थात गोड न खाणे हे संपूर्ण शरीरासाठीच चांगले असते. यामुळे लिव्हर सुद्धा हेल्दी राहते.
ड्रायफ्रुट्स
याशिवाय लिव्हर सुदृढ राखण्यासाठी ड्रायफ्रुट्स सुद्धा प्रमाणतच खावेत. आता तुम्ही म्हणाल ड्रायफ्रुट्स हे हेल्दी असतात, त्यांचा काय प्रॉब्लेम? तर मंडळी प्रॉब्लेम असा आहे की यामध्ये फ्रुक्टोज असते. ही सुद्धा एक शुगरच समजली जाते. मोठ्या प्रमाणात याचे सेवन केल्यास रक्तातील चरबीचे प्रमाण असामान्य होऊ शकते. यामुळे शरीरावर सूज आणि फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. त्यामुळेच गोड पदार्थांसोबतच ड्रायफ्रुट्ससेही मर्यादित प्रमाणतच सेवन करा.

टीप : ही एक सामान्य माहिती असून कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात योग्य ते बदल करा.
जनहितार्थ, पुंडे आयुर्वेद भांडार

24/06/2022

आरोग्य उत्तम ठेवायचं?
मग रात्रीच्या जेवणात पुढील पाच वस्तु टाळा...
१) गव्हाची पोळी
२) मैद्याचे पदार्थ
३) गोड पदार्थ
४) दही अथवा योगार्ट
५) कच्चे सलाद
हे खाल्ले तर शरीरात आम वाढेल यामुळे लठ्ठपणा, डायबिटीस, त्वचेच्या तक्रारी, पोटाच्या तक्रारी, हार्मोन्सचे असंतुलन अशा तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते.
रात्रीच्या वेळी शरीरातील अग्नी मंद झालेला असतो, अशावेळी जड पदार्थ खाल्ले तर आरोग्याच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते.
म्हणून स्वस्थ राहा, मस्त पण सकस आहार घ्या!!

29/05/2022

कधी तरी गोड खाण्याचा मोह होणे नैसर्गिक असते. मात्र दररोज साखरयुक्त गोड पदार्थाचे सेवन आरोग्यासाठी नक्कीच चांगले नाही. साखरेच्या या मोहावर मात करण्यासाठी आपला आहार समजून घेऊन, त्याचे विश्लेषण करणे गरजेचे असते. आपण काय खातो, याविषयी सजग राहणेही अत्यंत गरजेचे आहे.

भोजनानंतर तुम्हाला गोड खाण्याचा मोह होत असेल. तर आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारात थोडा बदल केल्यास त्यावर मात करता येईल. जर तुमच्या आहारात पिष्टमय पदार्थाचा समावेश जास्त असेल व त्या तुलनेत प्रथिने किंवा चरबीयुक्त घटक कमी असतील, तर तुमच्या आहारात अधिक शेंगा, पनीर, टोफू (सोया दुधापासून केलेला पदार्थ) यांचा समावेश करावा. लोह, िझक, क्रोमियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम हे क्षारयुक्त घटक पुरेशा प्रमाणात आपल्या आहारातून मिळत नसतील, तर आपल्याला साखर खाण्याचा मोह होऊ शकतो.l
जर मॅग्नेशियमची कमतरता जाणवत असेल, तर त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. चिया बियाणे, तीळ, पिस्ता आणि फळांचे आहारातील प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी केळी खाणे उपयुक्त ठरते. ड जीवनसत्त्व व ब-१२ जीवनसत्त्वाच्या अभावाने शरीर पोषक घटक शोषून घेऊ शकत नाही. ड जीवनसत्त्वाच्या शरीरातील स्तराची तपासणी करावी. जर ते कमी असल्यास सारखी भूक लागत राहते. त्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.

सारखा तणाव असणे. त्याचे नीट व्यवस्थापन न केल्याने भुकेवर विपरीत परिणाम होऊन गोड पदार्थ खाण्याचा मोह होऊ शकतो. त्यामुळे स्थूलत्व वाढण्याचा धोका असतो. पुरेशी झोप न घेतल्याने संप्रेरकांच्या असंतुलनाने भूक अकारण लागते. त्यात गोड खाण्याचाही मोह होतो. साखरेचे आहारातील प्रमाण कमी करण्यासाठी पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे पचनक्षमता वाढल्याने शरीरात निर्माण झालेली विषद्रव्ये प्रभावीपणे बाहेर टाकली जातात. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन आपली आहार व जीवनशैली बदलल्यास गोड म्हणजे साखर खाण्याच्या मोहावर मात करता येते, असा आहारतज्ज्ञांचा सल्ला आहे.

22/05/2022

मधुमेह हा झपाट्याने वाढणारा आजार आहे. अशा परिस्थितीत, टाईप-2 मधुमेह असलेले लोक पौष्टिक आहाराचे पालन करून आणि त्यांच्या रक्तातील साखरेचे नियमित निरीक्षण करून स्थिती सहजपणे नियंत्रित करू शकतात.
डायबिटीजच्या रूग्णांनी हे पदार्थ खाल्ले तर कधीच वाढणार नाही रक्तातील साखर, लंचमध्ये चपातीसोबत खा ‘ही’ डाळ..!
काही लोक खूपच फूडी असतात. जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्याला खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. कारण काहीही अनहेल्दी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. साधे घरगुती जेवण बनवून आणि योग्य आहाराची निवड करून मधुमेह नियंत्रित करणे सोपे होऊ शकते. फक्त साखरच नाही तर रोजच्या खाण्यातील पदार्थांमुळेही रक्तातील साखर वाढू शकते.

त्यामुळे प्रत्येक पदार्थ खाण्यापूर्वी खूप काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची आहे त्यांनी दुपारच्या जेवणात अधिक काळजी घ्यावी. दुपारच्या जेवणात त्यांनी अशा पदार्थांचा समावेश करावा, जे त्यांच्यासाठी आरोग्यदायी असतात. लंच किंवा दुपारच्या जेवणासाठी येथे काही पर्याय दिले आहेत, जे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची वाढ रोखण्यासाठी उपयुक्त ठरतील.
लंचमध्ये खा हेल्दी चपाती

मधुमेहींनी भातापेक्षा चपातीची निवड करावी. कारण भातामुळे अनेकदा रक्तातील साखर वाढते. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे भाताशिवाय जगू शकत नाहीत, तर अशा लोकांना तज्ञ मंडळी पोर्शन कंट्रोलवर लक्ष देण्याचा सल्ला देतात. अशा लोकांनी भाताचे सेवन हळूहळू कमी करावे. भाताऐवजी तुम्ही क्विनोआ खाऊ शकता. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खरोखरच सुरक्षित आहे. जर तुम्ही दुपारच्या जेवणात चपाती खात असाल तर गव्हाऐवजी ज्वारी, ओट्स, नाचणी, बाजरी, मूग आणि हिरवे वाटाणे याची चपाती निवडा.

स्टार्चयुक्त पदार्थ मधुमेहींसाठी खूप चांगले मानले जातात. बटाटे आणि रताळ वगळता सर्व प्रकारच्या भाज्या हे लोक खाऊ शकतात. भेंडी, कारलं, दुधी, वांगं, पालक, बीन्स, मशरूम, शिमला मिरची, वाटाणे, गाजर,लेट्यूस, फ्लॉवर या काही उत्तम भाज्या आहेत, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, मधुमेहींनी त्यांचा रोजच्या आहारात या भाज्यांचा अवश्य समावेश करावा.
कांदा, टोमॅटो व काकडीचं सॅलेड खा
जेवणाच्या ताटात सॅलेड ठेवणे हा मधुमेहींसाठी कायमच एक उत्तम पर्याय आहे. सॅलेड देखील असं ज्यामध्ये जीआई कमी आणि फायबर जास्त असते. दुपारच्या जेवणासोबत तंतुमय सॅलड तुमच्या जेवणाचा समतोल राखण्यास मदत करू शकते. एवढेच नाही तर रक्तातील साखरेची वाढ रोखू शकते. रक्तातील साखर कायम नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि काकडीचं सॅलेड, कांदा, शिमला मिरची, कोबी, गाजर आणि पालक सॅलेड किंवा इतर कोणतेही सॅलेड खाऊ शकता, परंतु मर्यादित प्रमाणातच.
खा या प्रकारची डाळ
मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्यांच्या प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डाळी खाणे हा एक चांगला मार्ग आहे. प्रोटीन हा एक अत्यावश्यक घटक आहे, ज्याबाबत रुग्णाने थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. मधुमेही लोक दुपारच्या जेवणात हरभरा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, पालक डाळ, राजमा आणि अगदी छोले देखील खाऊ शकतात.
एक वाटी स्प्राउट्स खाल्ले पाहिजेत
स्प्राउट्स हे एक लो कॅलरी मील आहे, ज्याचा मधुमेहाच्या रूग्णांनी आहारात समावेश केला पाहिजे. खरं तर, मोड येण्याच्या प्रक्रियेमुळे डाळीतील स्टार्चचे प्रमाण कमी होते आणि त्यातील हाय फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, लिंबाचा रस, चाट मसाला आणि मीठ एक वाटी स्प्राउट्समध्ये घाला. इच्छित असल्यास स्प्राउट्स शिजवून घ्या किंवा ते कच्चे देखील खाऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्ही स्प्राउट्स टिक्की, स्प्राउट्स चपाती, स्प्राउट्स पोळा अगदी स्प्राउट्स करी देखील खाऊ शकता.

Address

Patil Market Umari
Akola
444005

Opening Hours

Monday 9am - 2pm
4pm - 9pm
Tuesday 9am - 2pm
4pm - 9pm
Wednesday 9am - 2pm
4pm - 9pm
Thursday 9am - 2pm
4pm - 9pm
Friday 9am - 2pm
4pm - 9pm
Saturday 9am - 2pm
4pm - 9pm
Sunday 9am - 2pm

Telephone

+919850074129

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Punde's Naturopathy & Yoga Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Punde's Naturopathy & Yoga Consultancy:

Share

Category