Vidarbha Medical Laboratory Technologist Association of Akola

  • Home
  • India
  • Akola
  • Vidarbha Medical Laboratory Technologist Association of Akola

Vidarbha Medical Laboratory Technologist Association of Akola Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vidarbha Medical Laboratory Technologist Association of Akola, Sarode Clinical Laboratory, Akola.

मा. श्री. संजयजी सरोदे सर यांची महाराष्ट्र परावैद्यक परिषदेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!! 💐💐
12/05/2022

मा. श्री. संजयजी सरोदे सर यांची महाराष्ट्र परावैद्यक परिषदेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!! 💐💐

आमचे विदर्भ मेडीकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन (VMLTA)चे सह सचिव, मा.श्री.आशिष मदनलालजी लटुरिया तसेच प्रसिद्ध होम्य...
07/08/2020

आमचे विदर्भ मेडीकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन (VMLTA)चे सह सचिव, मा.श्री.आशिष मदनलालजी लटुरिया तसेच प्रसिद्ध होम्योपँथी तज्ञा मा.डॉ.सौ.प्रगती आशिष लटुरिया यांची सुपुत्री *कु.पुर्वा आशिष लटुरिया वर्ग १० वा* हिला नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत परिक्षे च्या निकाला मधे *९९.६०* % गुण मिळाले आहेत त्या मुळे माऊंट कारमेल हायस्कुल च्या सर्व शिक्षक वृदांमार्फत तिचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे...विदर्भ मेडीकल टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन ऑफ अकोला कडुनही कु.पुर्वा चे संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.संजय सरोदे सर यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचाली करिता हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत, कु.पुर्वा ने केलेली मेहनत ही तिने मिळविलेल्या *९९.६०*% गुणांवरुन दिसुन येते....सर्व VMLTA संघटने कडुन कु.पुर्वाचे अभिनंदन करण्यात आले आहे....कु.पुर्वा शी चर्चा करते वेळी तिने तिच्या या यशाचे श्रेय आई डॉ सौ प्रगती आशिष लटुरिया वडील श्री आशिष मदनलाल लटुरिया व शिक्षक वृंदांना दिले असुन दररोज शाळेत जाणे व घरी ७-८ तास सतत अभ्यास केल्यामुळे यश मिळाल्याचे कु.पुर्वा ने सांगितले .......

19/10/2019

👆👆 *मतदान कराच* 👆👆
*आपणास नम्र विनंती आहे की , कृपया आपण दिनांक २१ अक्टोंबर २०१९ सोमवार ला आपण कुणालाही मतदान करा ....मात्र मतदान कराच* ...

*लोकशाही मजबूत व स्थिर करण्यासाठी आपल्या मतदानाच्या अधीकाराचा निर्भीडपणे व निस्पृह वापर करा .१०० % मतदान*

*आम्ही मतदान करणार आपणही करा*

🙏👆 *विनीत*👆🙏

*विदर्भ मेडिकल लेबोरेटरी टेक्नोलॉजिस्ट एसोसिएशन,अकोला*
👆🙏👆🙏👆🙏👆🙏👆🙏👆

16/10/2019

मित्रांन्नो नमस्कार, काल दिनांक १४/१०/२०१९ ला मुंबई येथे पी एम सी द्वारे आयोजित नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले ज्या आमच्या बंधु भगिनींना मिळाले त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन तसेच आनंद याचा होतो कि सर्वप्रथम रजिस्ट्रेशन मिळण्याचा मान आमच्या अकोला संघटना VMLTA च्या सदस्या अर्चना गायकवाड वाघमारे यांना मिळाला... ज्या बंधु भगिणी यांना या कार्यक्रमात बोलाविण्यात आले होते त्यांना काही तांत्रिक कारणांमुळे नोंदणी प्रमाणपत्र वितरित करण्यात नाही आले.... काही मंडळी थोडी नाराज जरुर झाली होती परंतु MSBTE मधे शिक्षण घेणारी सर्व मंडळी यांना स्वतःहुन समजले कि काय अडचन येणार पुढे एवढी मँच्युरिटी दिसली...काल कोणत्या तरी ४ संघटनांचा मेल आला व तुर्तास ही प्रक्रिया थांबवावी असे त्या मधे नमुद असल्याचे सांगितले एक तर होवु घातलेली निवडणुक त्या मधे विनाकारण कॉन्ट्राव्हर्सी व विरोधकांना आयता मुद्दा मिळु नये म्हणुन काही दिवस थांबावे असे सुचविले.... ..ज्या चार संघटनेने आक्षेप मेल करुन नोंदविले ते वास्तविक पाहता संचालक वैद्यकिय शिक्षण व संशोधन यांना कदाचित समजले नसावे त्यांनी आपल्या पी एम सी सदस्यांना विनंती केली कि आपण काही दिवस थांबा...कारण त्यांचे कडे या पदाचा अतिरिक्त कारभार आहे व निवडणुक काळात कोणतीही कॉन्ट्राव्हर्सी होवु नये हा मुख्य उद्देश होतै तसेच संबंधित विभागाचे सचिव सुद्धा लॉंग लिव्ह वर आहेत तसेच तेथेही प्रभारी सचिव कार्यरत आहेत....त्या मुळे सर्वांनी विचार करुन निर्णय घेतला कि ज्या MSBTE च्या लोकांना नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी बोलाविले परंतु काही तांत्रिक अडचन आहे त्यांनी ही बाब स्वतः हुन समजावुन घेतली एवढा समजुतदारपणा काल दिसुन आला.काही लोकांना हे वाटत होते कि बोलाविलेल्या लोकांना बोलावुन नोंदणी प्रमाणपत्र दिले नाहीत तर खुप वाद विवाद किंवा राडा होईल व त्याचा हे लोक असुरी आनंद घेतील परंतु MSBTE मधे शिकलेले लोक कायदेशिर लढाई लढतात रस्त्यावरील टपोरी पोरांसारखी नाही कारण आपला पेशा हा अगदी नोबल आहे याची जाणीव आहे अर्थात *कमकुवत लोक सुड घेतात, मजबुत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात* याप्रमाणे MSBTE मधे शिक्षण घेणारे आहेत जर ध्येय गाठायतचे आहे तर त्यावर लोक टिका, मस्करी किंवा हसणार त्यांना हसु द्यावे *लोक तुमच्या ध्येयांवर हसत नसतील तर तुमची ध्येयं खुप लहान आहेत* या प्रमाणे राहुन विरोधकांचा पहिला डाव हानुन पाडला येथेच निम्मी लढाई जिंकलो आहोत.... तसेच काल जर डॉ.शिणगारे सर असते तर फटाफट निर्णय घेतला असता कारण सर्व आपला कायदाच मा.डॉ.शिणगारे साहेबांनी ड्राफ्ट बनवितांनाच बारीक बारिक अडचनी समजुन घेतल्या होत्या तो अभाव निश्चितच काल जाणवला.... हरकत नाही निवडणुकीनंत्तर MSBTE, YCMOU चे BScMLT व इतर सरकार मान्य पदवी, पदविका धारकांना मिळतील यांना काहीही अडचन येणार नाही...म्हणुन काहीही टेंशन घेवु नये सर्व नोंदणी प्रमाणपत्र रेडी आहेत त्यावर नंबर पण टाकले आहेत....ज्या लोकांना असुरी आनंद घ्यायचा त्यांनी अवश्य घ्यावा कारण असा आनंद आयुष्यभर टिकत नसतो...काही लोकांना वाटत होते कि बोलावुन नोंदणी पत्र दिले नाही तर नक्कीच वाद होतील वादाचे रुपांत्तर हे हाणामारित होईल परंतु त्यांना हे समजले नाही कि MSBTE मधे शिकलेले लोक दुसऱ्याच्या घराच्या विटा कधीच मोजत नाहीत व दुसऱ्यांवर जळत पण नाही...श्रद्धा व सबुरी खुप आहे ..जर का वाद झाला तर कॉन्सिलची बदनामी होईल अर्थाच आपलीच बदनामी होईल याची जाणीव आहे व काही लोकांना असेच आपसात भांडणे पाहीजे जेणे करुन हा मुद्दा प्रलंबितच राहीला पाहीजे... ज्या लोकांनी मेल करुन आक्षेप नोंदविले त्यांनी अद्याप व्हेरिफिकेशनचा ऑनलाईन अर्ज सुद्धा भरलेला नाही ....वास्तविक पाहता हा आक्षेप फेटाळायला पाहीजे होता परंतु कोणताही निर्णय हा सामुहीक घेतला तर बरे असते असे DMRE यांचे म्हणणे होते...पी एम सी तील सर्व मेंबर हे उत्कृष्ट काम करत आहेत...असे एक वेळा नाही तर तब्बल १२-१३ वेळा DMRE यांनी संबोधित करतांना सांगितले....तसेच शासन स्तरावर सहीच्या अधिकाराबाबत स्वतः जातीने लक्ष घालुन न्याय मिळवुन देण्यासाठी कटीबद्ध आहो असे सुद्धा म्हणाले...कारण निव्वळ नोंदणी प्रमाणपत्रच घेवुन काय करणार? सहीचा ही अधिकार महत्त्वाचा आहे असे म्हणाले पुर्वी ऑप्टिकल टेक्निशियन हे चष्म्याचे नंबर काढत होते सर्व त्यांना समजतही होते परंतु त्यांना ऑप्थँलमिक सर्जन ची सही घेणे आवश्यक होते परंतु कालांतराने त्या मधे बदल घडवुन आणला व आता त्यांना नंबर काढण्यासाठी ऑप्थँलमिक सर्जनच्या सहीची आवश्यकता नाही त्याच प्रमाणे तुमच्या लँब धारकांना ही असाच अधिकार मिळावा जेणे करुन कोणाच्याही काऊंटर सहीची आवश्यकता नसावी करिता शासनस्तरावर योग्य पाठपुरावा करु असे ही म्हणाले कारण ऑप्थँलमिक टेक्निशियन यांना सहीचा अधिकार मिळवुन देण्यात डॉ लहाने साहेबांचे मोठे योगदान आहे तसाच ड्राफ्ट लँब धारकांना करिता बनवुन याच विभागामार्फत पाठवुन देवु असे ही म्हणाले....एवढे सगळे पॉजिटीव्ह एक जबाबदार अधिकारी बोलतो व विनंती करतो तर पी एम सी मेंबरांनी सुद्धा त्यांचे विनंतीला मान दिला ....सर्वांनी उपस्थितांमधे शांतपणे ऐकुण घेतले...रजिस्ट्रेशन १५ दिवसांनी मिळो किंवा २ महिन्यांनी मिळो MSBTE च्या मंडळींना मिळणार आहे व सोबत BScMLT तसेच सरकारमान्य विद्यापिठातुन व बोर्डातुन परावैद्यक क्षेत्रात पदवी किंवा पदविका धारकांनाच मिळणार आहे...तसेच काही कालावधी देवुन शिक्षण अपग्रेड बाबतही बोलले....व जे नोंदणी करणार नाहीत त्यांचेवर कारवाई पण होणार परावैद्यक परिषदेमधे नोंदणी करण्यासाठी प्रायव्हेट कोर्स किंवा अभ्यासक्रम पात्र नाहीत फक्त सरकार मान्य बोर्ड किंवा विद्यापिठ ते सुद्धा महाष्ट्रातील फक्त...म्हणुन जे काही तर्क वितर्क लावले गेले ते सर्वांनी आपापल्या नुसार लावले....काल एकंदरीत असा घटनाक्रम झाला.....

आपला
रवि गजानन येवले पाटील
अकोला

17/11/2018

महाराष्ट्र परावैद्यकीय परिषद नोटीस

श्री संजयजी सरोदे सर...सदस्य, महाराष्ट्र परावैद्यक परिषद, महाराष्ट्र राज्य;अध्यक्ष, विदर्भ मेडिकल लॅबॉरेटरी टेक्नॉलॉजिस्...
24/07/2018

श्री संजयजी सरोदे सर...
सदस्य, महाराष्ट्र परावैद्यक परिषद, महाराष्ट्र राज्य;
अध्यक्ष, विदर्भ मेडिकल लॅबॉरेटरी टेक्नॉलॉजिस्ट अससोसिएशन, अकोला;
अकोला जिल्हाध्यक्ष, एम एल टी ए एम, महाराष्ट्र;
कुशल नेतृत्व... अकोल्याचे नावलौकिक पूर्ण महाराष्ट्रात करणारे....; डी एम एल टी चा लढा मागील २५ पेक्षा जास्त वर्षांपासून लढणारे...; फक्त अकोलाच नाही तर राज्यात कुठेही कोणालाही काही प्रॉब्लेम आल्यास त्वरित धावून जाणारे...; आणि फक्त डी एम एल टी च नाही तर पूर्ण समाजा साठी झटणारे आपल्यातील खरे लोक नेते, आमचे मार्गदर्शक...खंबीर आणि सर्वांना सांभाळून घेणारे... अश्या आमच्या काकांना वाढदिवसाच्या कोटि कोटी शुभेच्छा...!!

18/04/2018
12/02/2018
04/02/2018
03/02/2018

**** अत्यंत महत्त्वाचे***
माझ्या सर्व तमाम विदर्भ तथा उर्वरित महाराष्ट्रातील लँब धारक टेक्नोलॉजिस्ट बंधु व भगीनींना नम्र विनंती आहे कि महाराष्ट्र राज्याचे गृह,न्याय व विधी ,संसदिय कार्य, कौशल्य विकास,तथा नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अकोलामा.ना.डॉ.श्री.रणजितजी पाटील साहेब ( मिनि मुख्यमंत्री विदर्भ) यांना आपल्या सर्वांतर्फे निवेदन द्यायचे आहे...मा.मंत्रिमहादयांचे अकोल्यातील आपल्या बाधवांवर विषेश लक्ष आहे तसेच आज रोजी सुद्धा त्यांच्या हॉस्पिटलमधील सँम्पल हे आपल्याच बांधवाकडे जातात...आपल्या समस्ये बाबत त्यांना पुर्ण माहीती आहे..मा.मुख्यमंत्री यांचे अत्यंत निकटवर्तीय असुन मा.मुख्यमंत्री यांची पुर्ण खाती ते सांभाळतात...आमची सर्वांना नम्र विनंती आहे कि सोमवार दिनांक ०५/०२/२०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे त्यांना निवेदन देवुन न्याय हक्कासाठी आपले आंदोलन तीव्र करायचे आहे व या करिता अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ , अमरावती येथील सर्व बांधवांनी उपस्थित रहावे ४००-५०० बांधव व भगिणी समक्ष उपस्थित राहीले तर मोठे यश मिळेल कारण मा.मंत्रीमहोदय हे आपल्या पाच जिल्ह्याचे प्रतिविधित्त्व करतात तसेच हिंगोली, नांदेड, जळगांव, वर्धा व ईतर ठिकाणाहुन आपल्या बांधवानी उपस्थित राहल्यास मोठी क्रांती घडुन येईल....मा.मंत्रीमहोदयांनी आम्हाला वेळ दिली आहे सर्व ईलेक्ट्रॉनिक्स व प्रिंट मिडीया ला सुद्धा निमंत्रण दिले आहे.....आपण फक्त आपला हक्क व अधिकार मिळावा करिता एकत्र येत आहोत...सर्वांनी याची दखल घ्यावी व संपुर्ण गृप मधे मेसेज फॉरवर्ड करुन माहीती द्यावी....
धन्यवाद!
दिनांक ०५/०२/२०१८
वेळ सकाळी ११.०० वाजता
ठिकाण :- जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला..

आपला
रवि गजानन येवले पाटील
सचिव
विदर्भ मेडीकल लेबॉरेटरी टेक्नोलॉजीस्ट असोशिएशन ऑफ अकोला..

Address

Sarode Clinical Laboratory
Akola

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidarbha Medical Laboratory Technologist Association of Akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share