26/10/2018
खरत्वं स्तब्धता रौक्ष्यम् श्रम; सुप्तिश्र्च पदयो:! सद्य एवोप शाम्यंती पदाभ्यग निषेवणात !!
जायते सौकुमाऱ्यमच बलं स्थर्यम् च पादयो:! दृष्टि: प्रसदनम् लभते मारुत: च उपशाम्यति !!
न च स्यात गृद्रसीवात: पादयो: स्फुटनं
न च!
न सिरा स्नायू संकोच: पादाभ्यंगेन पादयो:!! च. सु.
निश्चितच वरील श्लोकाचा अर्थ माहित झाला की प्रत्येकालाच आनंद होईल. दैनंदिन जीवनात आपण खूप धावपळ करतो तेव्हा संध्याकाळी आपण घरी येऊन खुर्चीवर बसलो की बरं वाटतं. कारण आपले पाय दिवसभर काम करून दमलेले असतात. अशा वेळी वाटतं कुणी तरी आपले पाय दाबून द्यावेत आणि २० वर्ष मागे गेलो तर प्रत्येकाने च आपापल्या आईवडिलांचे पाय दाबलेही असतिल आज जेव्हा थकून घरी येतो तेव्हा आठवत माझ्या कुटुंबासाठी काम करणारे आईवडील का पाय दाबायला लावत असतील.
दैनंदिन जीवनात काम करताना आपल्या पायाला stiffness येतो पाय कडक वाटतो खरबरीत वाटतो, सकाळी उठताना फ्रेश वाटतं नाही. कारण पायांमध्ये एक प्रकारचा नैसर्गिक आळस आलेला असतो. अशावेळी आपण आयुर्वेदात सांगितलेले तेल वापरून पादाभ्यग केले तर काय होते त्याचे वर्णन चरक आचार्यांनी पुढे केले आहे. सुकुमारता प्राप्त होते पायाला बल आणि स्थिरता मिळते. दृष्टि ला आनंद मिळतो agrivated वात शांत होतो.sciatica चा pain होत नाही पायांमध्ये भेगा पडत नाहीत. कुठल्याही प्रकारचे स्नायूंचे आकुंचन होत नाही सारखे सारखे cramps येत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे ज्या तळव्यावर आपण रोज चालतो त्याला निदान आठवड्यातून अथवा पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरि हे पादाभ्यांग नको का करायला.
कुणी करावे ---- लहानांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनी करावे.
कुठे करावे -- आपल्या जवळच्या आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक मध्ये.
ह्याला जास्त वेळही लागत नाही आणि पैसे सुद्धा जास्त लागत नाहीत
(चरक आचार्यांनी आपला एवढा बारीक विचार करून ठेवलाय तर आपण थोडफार तरी आपल्या शरीराची काळजी घ्यावी एवढाच निस्वार्थ हेतू.)
वैद्य प्रमोद ठोंबरे
दीर्घायू क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर
संतनगर सेक. न. ४ मोशी प्राधिकरण. साईनाथ हॉस्पिटल मागे.
मोब. 7768082111
www.dirghayuclinic.com
Home Welcome to Dr. Pramod Thombare’s Dirghayu Ayurvedic Clinic and Panchakarma Centre. We are here to provide you an authentic and scientific treatment of Ayurveda. Dirghayu Clinic is having its own identity in honesty as well as love and appreciation. Dirghayu Clinic is also thankful to lord Kri...