
08/12/2022
*पवार बापूंचा सत्कार*
*आरोग्यविषयक गंभीर समस्यांवर मात करीत सहीसलामतपणे त्यांना सहस्त्र चंद्रदर्शन घडले*.
आज सकाळी माझ्या कक्षात जेष्ठ नागरीक संघाचे माजी अध्यक्ष व होऊ घातलेल्या जेष्ठ नागरीक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष श्री पुंडलिकरावजी पवार सर अचानकपणे ऊपस्थित झाले. ते आनंदी दिसत होते. त्यांची प्रसन्न मुद्रा व स्वच्छ आकर्षक भारतीय वेश परिधान केलेले बापू पाहून मीही खूप आनंदी झालो. अंबाजोगाईला ज्येष्ठ नागरिक संघाचे मराठवाडा पातळीवरचे एकदिवसीय अधिवेशन 12 डिसेंबरला संपन्न होणार असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी आमच्या कार्यालयात मागच्या आठवड्यापासून दररोज बैठकांची घाई आहे.
आज पर्यंत पवार सर बैठकीला उपस्थित नव्हते. पण आज त्यांनी Surprise दिले. नुकतेच त्यांचे बायपास ॲापरेशन व दोनदा पोटाच्या आतड्याचे ऑपरेशन झाले असल्याने ते घरीच असायचे. व्याधीमुक्त होऊन आज ते बैठकीला आले असल्यामुळे मी त्यांचा सत्कार करायचे ठरविले. योगायोग असा जुळला की त्यांचे सध्या ८२ वे वर्ष चालू असल्याने त्यांचे सहस्त्र चंद्र दर्शनही झालेले आहे.
बैठकीत सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुष्पगुच्छ व महावस्त्र देऊन त्यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला व त्यांना मिठाई भरवण्यात आली. आणि शंभर वर्षापेक्षाही जास्त निरोगी व आनंदी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.