13/02/2024
ताकाला आयुर्वेदात पृथ्वीवरील अमृत म्हणतात. चवीला जितके छान असते तितकेच त्याचे गुणधर्मही शरीरासाठी उपयुक्त आहेत. अनेक रोगांमध्ये ताक आणि त्यापासून तयार केलेल्या औषधांचा वापर होतो. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. त्यामुळेच आपल्या आहारात ताकाचे महत्त्व खूप आहे. म्हणूनच ताक का घ्यावे हे आपण पाहणार आहोत.
ताकात विटामिन ” B 12 ”, कॅल्शियम, पोटेशियम आणि फाॅस्फरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि त्यांनी ताक पिल्याने फायदा होतो . शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते.
ताक दही किंवा लोणी पासुन घरी तयार केलेले असावे
रेडीमेड ताकामध्ये नैसर्गिकपणे तयार होणारे बॅक्टेरिया नसतात त्यामुळे त्याचा फायदा होत नाही म्हणून टाके नेहमी घरी तयार केलेले असेल तरच त्याचा जास्तीत जास्त शरीरास फायदा होतो
ताक पचनास हलके असते. व ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते पण हा नियम सर्वांना लागू होईलच असे नाही बऱ्याच लोकांना ताप ताकाने कफ तयार होतो अशा लोकांनी ते टाळावे त्याऐवजी त्यांनी गरम दूध घेतले तर उत्तम साधारणपणे थंडीच्या दिवसात असा त्रास होऊ शकतो
शेवटी नेहमी प्रमाणे आपल्या शरीराला जे मानवेल ते खावे प्यावे हे नेहमी लक्षात ठेवा.