
22/07/2025
सुवर्ण म्हणजे सोनं, प्राशन करणे म्हणजे खाणे. सुवर्णप्राशन म्हणजे सोनें असलेलं औषध खाणे.
सुवर्ण प्राशनाचा अंतर्भाव, आयुर्वेद शास्त्रात लेहन या प्रकारात होतो. लेहन म्हणजे चाटवणे. यावरून सुवर्णप्राशनाच्या दिवशी औषधांसोबत सोने बालकांना चाटावने म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार करणे होय.
आचार्य काश्यप यांच्या काश्यपसंहितेत सुवर्णप्राशन कसे बनवले जाते त्यासाठी कुठली पद्धती वापरावी याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. साधारणत: दर महिन्यात येणाऱ्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन केले जाते. बाळाच्या जन्मापासून म्हणजे जन्म झालेल्या दिवसापासून त्याचे वय १६ वर्ष होईपर्यंत बालकास सुवर्णप्राशन दिले जाते. याच काळात म्हणजे वय ० ते १६ वर्षात बाळाच्या मेंदूची संपूर्ण वाढ १००% पूर्ण होते यामुळेच मेंदूला चालना देण्यासाठी सुवर्णप्राशन याच काळात द्यावे. तसेच गर्भसंस्कार करणाऱ्या मातेला गरोधरपणात गर्भाच्या ६ महिन्यापासूनच सुवर्णप्राशन मातेला सुरू केले जाते आणी बाळच्या जन्मानंतर बाळाला सुरू केले जाते
सुवर्णप्राशन केल्याने बालकाची बुद्धी वाढते, त्याला चांगली भुक लागते, त्याची शारीरिक शक्ती वाढते, शरीराची कांती वाढते आणि लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढून त्यांचे अनेक रोगांपासून संरक्षण होते, असे महर्षी काश्यप म्हणतात. हे सुवर्णप्राशन बालकांसाठी मंगलकारक आणि पुण्यकारक आहे. सुवर्णप्राशन नियमितपणे १२ महिने केल्यास बालक बुद्धीमान आणि निरोगी होते. तसेच ३६ महिने नियमितपणे केल्यास त्याची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होते.
Ayurva Multispeciality Ayurveda & Panchkarma Hospital, Cosmetic & Dental Care, Mental Healthcare,
Pune - Bangalore Highway, Narhe, Pune - 411041
1800-210-1873 I www.ayurva.com
WhatsApp 088888 60971
Instagram https://www.instagram.com/ayurvahealthcare
Facebook https://www.facebook.com/ayurva
Twitter https://twitter.com/ayurvahealth
LinkedIn https://www.linkedin.com/company/ayurva/