
22/08/2024
पुणे येथे नॅशनल न्युरो ट्रॉमा कॉन्फरन्स मध्ये डॉ. योगेश सावदेकरांचे नवीन संशोधनावर मार्गदर्शन
अमरावती येथील सुयश हॉस्पिटलचे संचालक व प्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. योगेश सुरेश सावदेकर यांनी मागील सप्ताहात पुणे येथील नॅशनल न्युरो ट्रॉमा कॉन्फरन्स मध्ये प्रायमरी मेष रिपेयर फॉर कमिन्युटेड फ्रँटल डिप्रेस्ड फ्रॅक्चर स्कल या विषयावर अतिशय मोलाचे संशोधन करून त्यावर उपस्थित समुदायासमोर मार्गदर्शन केले. मागील १५ वर्षांपासून डॉ. योगेश सावदेकर हे सुयश हॉस्पिटलचे संचालक आहेत. यादरम्यान त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करतांना या संशोधनाचा उपयोग केलेला आहे. यात महत्वाचे रुग्णाला दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्याची गरज राहत नाही त्यामुळे रुग्णांचा वेळ, पैसा यांची बचत होते. अशा शस्त्रक्रिया डॉक्टरांनी आत्तापर्यंत अनेक केलेल्या आहेत. त्याचा अनेक रुग्णांना फायदा झालेला आहे.
याकरिता डॉ. योगेश सावदेकरांचे मुख्यतः त्यांच्या शिक्षकांकडून व सहकाऱ्यांकडून कौतुकाचा व अभिनंदाचा वर्षाव होत आहे. डॉ. योगेश सावदेकरांच्या या नवीन संशोधनाचा फायदा रुग्णांना व नवीन डॉक्टरांना होईल यात तिळमात्र शंका नाही.