
25/05/2023
**जागतिक थायरॉईड दिवस निमित्त*
*थायरॉईडला घाबरू नका, योग्य उपचार करा*
*थायरॉईड म्हणजे काय?*
थायराईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी माने च्या पुढील भागात असते. ही ग्रंथी सर्व लोकांमध्ये राहते.तिचे काम महत्वाचे हार्मोन्स तयार करने आहे, जे संपूर्ण शरीरावर काम करते.
*थायरॉईड हा आजार कसा होतो ?*
जेव्हा थायराइड गरजेपेक्षा कमी किंवा गरजेपेक्षा जास्त काम करते तेव्हा हा आजार होतो.
*थायरॉईड हा आजार कोणाला होतो ?*
नवजात बाळापासून वृध्द व्यक्ती पर्यंत थायरॉईडचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो
*थायरॉईड या आजाराचे किती प्रकार आहे*
*या आजाराच तिन प्रकार आहेत
1) *हायपोथायरॉईडीजम*
2* ) *हायपरथायरॉईडीजम*
?3) *युथायरॉईड गॉयटर*
(Euthyroid goitre)
*हायपोथायरॉईडीज्म*
(Hypothyroidism)
हा सर्वांत जास्त आढणारा थायरॉईडचा आजार आहे.यामध्ये थायरॉईड ग्रंथीचे काम गरजेपेक्षा कमी होते. त्यामुळे वजन वाढते व शरिरावर ,गळ्यवर सूज येते, सुस्तपना व जास्त झोप
येणे ,पोट साफ न होणे, केस गळणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळीची समस्या, लहान मुलांची उंची न वाढणे या समस्या होतात.थायराईड ची औषध सुरु केल्याने हि लक्षणे कमी होतात .या थायरॉईड चे औषध आयुश्यभर घ्यावे लागते
** *हायपरपथायरॉईजम**
( Hyperthyroidism)
जेव्हा थायरॉईड ग्रंथी गरजेपेक्षा जास्त काम करू लागते त्या अवस्थेला हायपरथायराईडीजम असे म्हणतात. यामध्ये वजन कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, गळ्याला सुज येणे, जास्त घाम येणे.डोळे मोठे होणे, हात थरथरणे, वारंवार भुख लागणे. शौचास लागणे, चिडचिड होणे , केस गळणे हि लक्षणे येऊ शकतात.
या थायरॉईड आजारामध्ये कधीकधी रेडीओअॅक्टीव आयोडीन किंवा ऑपरेशनची गरज पडू शकतो
*गॉयटर*
कधी कधी गळ्यावर सूज येते व रक्त तपासणी नॉर्मल असते याला युथायरॉईड गॉयटर या नावाने ओळखल्या जाते. यामध्ये घशाची सोनोग्राफी / FNAC thyroid हि चाचणी करण्याची गरज पडू शकते
*औषधी घेतल्याने कोणते दुष्परिणाम होतात काय?*
जर योग्य प्रमाणात औषध घेतले तर दुष्परिणाम होत नाहीत.
*थायराइडची औषध आयुष्यभर घ्यायची असते का?*
बहुतेक थायराईडच्या रुग्णाला आयुष्यभर घ्यावी लागते.
*थायरॉईड असलेल्या रुग्णांना गर्भाधरने मध्ये समस्या येऊ शकते.?*
जर तुमची थायराईची रिपोर्ट नॉर्मल आहे आणि तुम्ही नियमित औषधी घेत असाल तर गर्भधारणा होण्यास अडचण येणार नाही.थायराईडच्या रुग्णांना गर्भधारणा ठेवण्यापूर्वी थायरॉईडच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. व गर्भ धारणा झाल्यावर तज्ञांना वेळे वेळेवर दाखवावे.गर्भधारणामध्ये थायरॉईडची औषधाचे प्रमाण वाढते गर्भ अवस्थे नंतर औषधाचे प्रमाण कमी होते.
*थायरॉईड लहान मुलांना होऊ शकतो का?*
नवजात शिशू पासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत कुणालाही थायरॉईड होऊ शकतो. जर लहान मुलांना थायरॉईड झाला तर त्याच्या शरीरावर आणि मानसिक विकासावर परिणाम होतो. त्यामुळे नवजात बालके जन्म झाल्या नंतर तीन दिवसानी तपासणी करावी आणि नंतर आपल्या तज्ञांचा सल्लानुसार गरज पडल्यास तपासून घ्यावे.
*थायराईडचा ड्रोज कमी करण्यासाठी काय करावे?*
बरेच लोक असे विचार करतात की थायरॉईड चे औषधाचा डोज
हळुहळु कमी करून काही दिवसाने बंद होणार.परंतू असे होत नाही.
हायपोथायरॉईडिस्म चे औषध बंद होत नाही,
प्रत्येक व्यक्तीला आवश्यक डोज तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावा.
प्रत्येक व्यक्तिला औषधाचा डोज हा त्याचे वजन, लक्षण, थायरॉईडचे रिपोर्ट, औषधाचे शरिरावर होणारे असर या सर्वावर अवलंबुन असते.
प्रत्येक व्यक्तिचा आवश्यक डोज हा वेगळा असतो. हा डोज वेळे नुसार थोडाफार बदलतो सुद्धा. औषधाचा डोज आवश्यकते पेक्षा कमी घेतल्यास त्रासमध्ये वाढ होऊ शकते.योग्य प्रमाणात घेतल्यास कोणतेही वाईट परिणाम होत नाही.
*मला थायरॉईड आहे व माझे रिपोर्ट नॉर्मल आहेतरी सुद्धा मला थायराईडचे लक्षण येत आहे यासाठी काय करावे?*
अशा लोकांना थायरॉईडची नवीन औषध ( **T3)* चा फायदा होऊ शकतो. यासाठी आपल्या थायरॉईड च्या तज्ञांना दाखविले पाहिजे.
*थायरॉईडच्या औषधचा दुष्परिणाम किंवा चुकिचा परिणाम होतो का?*
थायराइड चे औषध कृत्रिम केमिकल नसून नैसर्गिकपणे शरीरात तयार होणारे हार्मोन असते. योग्य प्रमाणात घेतल्यास त्याचे काही दुष्परिणाम होत नाही.
*थायरॉईडचा व्यक्तिला किती दिवसानी दिवसानी तपासणी करावी ?*
हायपोथायराईडच्य व्यक्तीला तीन ते सहा महीन्यामध्ये तपासणी करायला सांगितली जाते.काही कोणत्या व्यक्तिला याच्या आधी तपासणी करण्याची गरज पडते हायपोथारॉईड व्यक्तिला १ ते 2 महिन्यामध्ये तपासणी करावी लागते.
उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखी हि एक आयुष्यभर राहणारी स्थिती आहे.
थायरॉईड हा एक अनुवांशिक आजार आहे.ती प्रतिकार शक्ती ( *Immunesystem* )ने चुकीचे काम केल्याने
होते.अयोग्य आहार किंवा जिवनशैली मुळे थायरॉईड होत नाही आणि त्याला
प्रतिबंध करण्याचा कोणताही उपाय सध्यातरी उपलब्ध नाही परंतु योग्य वेळेवर चाचणी व उपचार करून यावर नियंत्रण शक्य आहे .
डॉ. विनीत सुभाष साबु
डायबेटॉलॉजिस्ट, थायरॉईड, व
हार्मोन तज्ञ
साबू डायबिटीज, थायरॉईड, डेंटल सेंटर,
देवरनकर नगर, अमरावती
मो. *9423423422*