20/11/2024
*100 % मतदान होण्यासाठी एक सर्व समावेशक उपाय*
कधी नव्हे ती आता मतदारांमध्ये शंभर टक्के मतदान करण्यासाठी जनजागृती झालेली आहे त्यामुळे मतदानाची टक्केवारी नक्की वाढेल यात काही शंका नाही त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. तरीही या सर्वांपेक्षा आणखी जास्त रिझल्ट येईल असा एक उपाय मनात येतो आहे. तो म्हणजे आज टेक्नॉलॉजीचा वापर एवढा सफाईदारपणे सर्वत्र चालू आहे की, जर तिची आपण थोडी मदत घेतली तर आपण नक्कीच 100% मतदानाचे उद्देश गाठू शकू. जसे आज लाखो रुपये एकाही रुपयांचा त्यामध्ये फेरफार न होता इंटरनेट द्वारे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर एका क्षणात पोहोचतात. त्याच प्रकारची काही एक इलेक्ट्रॉनिक व्यवस्था जर उभी केली ज्याद्वारे बाहेरगावी राहणारे मतदार आपले मत तिथूनच नोंदवू शकतील तर हे परसेंटेज खूप जास्त वाढेल. प्रथम दर्शनी असे जमणार नाही असे कुणाला वाटेल आणि सहज जमू शकते असेही कुणाला वाटेल. त्यासाठी एक पायलेट प्रोजेक्ट बनवायचा जसे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एका मतदान केंद्रावर एक ऑनलाइन बुथ बनवायचे जिथे नेहमीसारखी मतदाराची ओळख पटवली जाईल आणि तिथून मग त्या मतदाराचे ज्या यादीमध्ये नाव असेल तिथे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने मत नोंदवायचे. आज कोणत्याही एटीएम मध्ये कोणतेही एटीएम कार्ड चालते. कुठून कुठेही लाखो रुपये आपण सहज पाठवू शकतो अशा वेळेस ही अत्यावश्यक गोष्ट जमने शक्य नाही असे नाही फक्त त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे.
निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल मतदानाची व्यवस्था सध्या कार्यरत आहे त्याचेच हे पुढचे व्हर्जन होईल. ट्रायल बेसिस वर एक बूथ जिल्ह्याच्या जागी करणे किंवा मग पोस्ट ऑफिस अथवा बँकेमध्येच ओळख पटवण्याची आणि मत देण्याची व्यवस्था करणे असे आपण करू शकतो. तसेच आपल्या पॅन कार्ड व इलेक्शन कार्डद्वारे जसं पेमेंट गेटवेला लॉगिन होते तसे लॉगिन करून आपल्या रजिस्टर मोबाईल वर ओटीपी पाठवून त्यात आपले मत नोंदवणे असेही करता येईल...👍🏻
डॉ हरीष ऋषि, औंढा नागनाथ