Vishwankur Ayurveda

Vishwankur Ayurveda शतामृत गरोदरपणात पहिल्या महिन्यापास?

01/09/2022
🔴शातामृत ग्रँनुल्स🔴👆FSSAI certify✅ गरोदरपणात व बालनातपणानंतर उपयोगी  टॉनिक सप्लिमेंट उपयोग👇✅ गर्भपोषक ✅ दूग्धवर्धक ✅ रक्...
13/07/2022

🔴शातामृत ग्रँनुल्स🔴
👆FSSAI certify✅
गरोदरपणात व बालनातपणानंतर उपयोगी टॉनिक सप्लिमेंट

उपयोग👇
✅ गर्भपोषक
✅ दूग्धवर्धक
✅ रक्तवर्धक
✅ पित्तशामक
✅ गरोदरपणात पहिल्या महिन्यापासून उपयोगी
✅ बाळंतपणानंतर दूध वाढीसाठी उपयोगी

👇नैसर्गिक घटक 🍃🍃
✅ Protein
✅ Fibre
✅ Iron
✅ Calcium

✅🥛मात्रा
५ ते १० ग्रॅम
दिवसातून २ वेळा
गायीचे दूध किंवा पाण्यासह

✅ पॅकिंग साईज
२०० ग्रॅम

✅ MRP
575 रुपये फक्त (Per Unite)

🙏🙏संपर्क
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D., आयुर्वेद
विश्वांकूर आयुर्वेद
#पुणे:- पॅन कार्ड रोड, बाणेर, पुणे
#औरंगाबाद:- निराला बाजार
औरंगाबाद
#फोन :- 8237523722 / 9420270785

https://www.facebook.com/662923337378678/posts/1799772370360430/
17/06/2022

https://www.facebook.com/662923337378678/posts/1799772370360430/

🔴शातामृत ग्रँनुल्स🔴
👆FSSAI certify✅
गरोदरपणात व बालनातपणानंतर उपयोगी टॉनिक सप्लिमेंट

उपयोग👇
✅ गर्भपोषक
✅ दूग्धवर्धक
✅ रक्तवर्धक
✅ पित्तशामक
✅ गरोदरपणात पहिल्या महिन्यापासून उपयोगी
✅ बाळंतपणानंतर दूध वाढीसाठी उपयोगी

👇नैसर्गिक घटक 🍃🍃
✅ Protein
✅ Fibre
✅ Iron
✅ Calcium

✅🥛मात्रा
५ ते १० ग्रॅम
दिवसातून २ वेळा
गायीचे दूध किंवा पाण्यासह

✅ पॅकिंग साईज
२०० ग्रॅम

✅ MRP
575 रुपये फक्त (Per Unite)

🙏🙏संपर्क
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D., आयुर्वेद
विश्वांकूर आयुर्वेद
निराला बाजार
औरंगाबाद
फोन :- 8237523722 / 9420270785

#व्यंध्यत्व








🔴शातामृत ग्रँनुल्स🔴👆FSSAI certify✅ गरोदरपणात व बालनातपणानंतर उपयोगी  टॉनिक सप्लिमेंट उपयोग👇✅ गर्भपोषक ✅ दूग्धवर्धक ✅ रक्...
14/05/2022

🔴शातामृत ग्रँनुल्स🔴
👆FSSAI certify✅
गरोदरपणात व बालनातपणानंतर उपयोगी टॉनिक सप्लिमेंट

उपयोग👇
✅ गर्भपोषक
✅ दूग्धवर्धक
✅ रक्तवर्धक
✅ पित्तशामक
✅ गरोदरपणात पहिल्या महिन्यापासून उपयोगी
✅ बाळंतपणानंतर दूध वाढीसाठी उपयोगी

👇नैसर्गिक घटक 🍃🍃
✅ Protein
✅ Fibre
✅ Iron
✅ Calcium

✅🥛मात्रा
५ ते १० ग्रॅम
दिवसातून २ वेळा
गायीचे दूध किंवा पाण्यासह

✅ पॅकिंग साईज
२०० ग्रॅम

✅ MRP
575 रुपये फक्त (Per Unite)

🙏🙏संपर्क
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D., आयुर्वेद
विश्वांकूर आयुर्वेद
निराला बाजार
औरंगाबाद
फोन :- 8237523722 / 9420270785

31/03/2022

#अध्यशन
ार_घेण्याची_सावयी

डॉक्टर सारखे, सारखे अपचन, अजीर्ण मलाचा का होते? मी तर सर्व काळजी घेतो. हे खात नाही, ते खात नाही, मग मलाचा का अपचनाचा त्रास होतो? असे प्रश्न विचारणारे अनेक रुग्ण भेटतात.

अपचन, अजीर्ण होण्यासाठी अनेक कारणे आहेत, त्यापैकी "अध्यशन" हे महत्वाचे कारण. तुम्ही म्हणाल अध्यशन म्हणजे काय? भूक लागल्यावर घेतलेला आहार पचण्यापूर्वी परत आहार घेणे म्हणजे अध्यशन.
आहार पचण्यासाठी साधारण ४ ते ६ तास लागतात. आहार जड आहे की पचण्यास हालक यावर हे अवलंबून असते.

आहार घेतल्यावर पोटामध्ये आहाराची पचनक्रिया सुरु होते. पचनाचे तीन टप्पे आहेत. सुरवातीला आहाराचे बारीक मिश्रण तयार होऊन, यामध्ये पाचक पित्त मिसळले जाते, पाचक पित्ताची अन्नावर प्रक्रिया होऊन त्यातून पोषक आहाररस शरीरात शोषला जातो. मलभाग मोठ्या आतड्यामध्ये साचवला जातो. योग्य वेळी हा मलभाग शरीराच्या बाहेर टाकन्याची क्रीया होते.

परंतु आपण काय चूक करतो, हे लक्षात घ्या! एकदा आहार घेतला की तो पचण्याच्या आत परत आहार घेतो, थोड्या वेळाने परत आहार घेतो. असा सतत आहार घेतल्यामुळे पाचक पित्ताची पचन शक्ती व यकृताची कार्यक्षमता कमी होते. आपली पचन प्रक्रिया मंदावते.
पुढे अपचन अजीर्ण होण्याची शक्यता वाढते. हा प्रकार असाच चालू राहिल्यास आम्लपित्त, गॅसेस,मलावरोध, मूळव्याध, मधुमेह(Daibetes) रक्तात चरबी सटाने(Cholestrol) उच्च रक्तदाब ( Blood pressure) यासारखे जीवनशैली जन्य आजार मागे लागण्याची शक्यता वाढते. या सर्वांचा परिणाम हृदयावर देखील होऊन हृदयाची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते.
तुम्ही म्हणाल साध्या अपचानाने येवढे काय होईल? तर अपचन ही साधी घटना नाही. अपचनामुळे अपक्व (अपचीत) असा रस धातू तयार होतो. हा अपक्व रस धातू शरीरात शोषला गेल्यामुळे शरीरातील सर्व घटक प्रदूषित होण्याची शक्यता असते. या प्रदूषित धातू मुळेच वरील आजारांची शक्याता वाढते.

आपली एक छोटीशी चुकीची सवयी आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.
हे सर्व टाळण्यासाठी एकच उपाय आहे, भूक लागल्यावर जेवणे म्हणजे अध्यशन टाळणे आणी आपली पचन शक्ती सुधारणे.

#पचनशक्ती_सुधारण्यासाठी_आयुर्वेदीय_औषोपचार_पंचकर्म_उपचारांचा_अतिशय_फायदेशीर_ठरतात.
शरीर शुध्दी पंचकर्मामुळे पचन संस्थेतील दोष पूर्णपणे बाहेर पडून पचन संस्था अधिक मजबूत होते.

तज्ञ आयुर्वेदिय डॉक्टरांच्या सल्ल्याने चुकीच्या आहार पद्धती विषयी जाणून घ्या आणि काळजी पूर्वक त्या टाळा.
पचनासंबंधित काही तक्रारी असेल तर आजचा आयुर्वेदीय डॉक्टरांचा सल्ला घ्या.

#अधीक_माहितीसाठी_संपर्क
डॉ. सचिन गायकवाड - पाटील
(M.D.),आयुर्वेद -पुणे
#विश्वांकुर_आयुर्वेद
पुणे:- Pan Card road, बाणेर

औरंगाबद:- मंजिरी निवास,
हॉटेल लालाजी समोर,
स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी रोड
संपर्क:- 8237523722 /
9420270785



#आयुर्वेद #पंचकर्म

 #तुम्ही_बाळासाठी_प्रयत्न_करत_आहेत? #तुमचे_वजन_कमी_आहे..? #पोषण_संबंधित_काही_समस्या_आहे.? #अपुऱ्या_पोषणामुळे_गर्भ_धारणेस...
24/03/2022

#तुम्ही_बाळासाठी_प्रयत्न_करत_आहेत?
#तुमचे_वजन_कमी_आहे..?
#पोषण_संबंधित_काही_समस्या_आहे.?
#अपुऱ्या_पोषणामुळे_गर्भ_धारणेसाठी_काही_अडचणी_येत_आहेत.?
ुमच्यासाठी_आम्ही_घेऊन_आलोय

#शतामृत_ग्रॅन्युल्स

गर्भधारणेसाठी, गरोदरपणासाठी व बाळंतपणानंतर महिलांसाठी उपयोगी टॉनिक सप्लिमेंट.

Two days Offer Prize:-
1) 20 % सूट दोन किंवा अधिक पॅक खरिदेवर (पार्सल चार्जेस अतिरिक्त लागतील) मर्यादित दिवसासाठी ऑफर लागू.

गर्भधारणेसाठी, गरोदरपणामध्ये आणि बाळंतपणानंतर पोषक आहार घेणे, अतिशय आवश्यक आहे. पोषक आहारा शरीर धातूंचे पोषण करून गर्भपोषणास मदत करतो. रोजचा आहार हा पोषणमूलयुक्तच असेल असे नाही. अपोषक अयोग्य आहार व आहाराच्या कमतरतेमुळे शरीर धातू कमजोर होऊन गर्भपोषणावर विपरीत परिणाम करतात. यामुळे गर्भपोषण व्यवस्थित होत नाही, बालकाचे वजन कमी राहू शकते, विकास होण्यास अडथळे येऊ शकतात.

गरोदरपणामध्ये व बाळंतपणामध्ये पोषक व दूध वर्धक असा आहार न मिळाल्यास बाळंतपणामध्ये दूध कमी निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच गरोदर अवस्थेत शरीरावर पडणारा अतिरिक्त ताण , शरीर धातूंची होणारी झीज यांचा देखील दूध निर्मितीवर विपरीत परिणाम दिसून येतो.

हीच अडचण लक्षात घेऊन विश्वांकुर आयुर्वेद चे डॉ. सचिन गायकवाड पाटील M.D. (आयुर्वेद) यांनी आजवरच्या आपल्या आयुर्वेदिक प्रॅक्टिस, अनुभवातून व संशोधनातून या फूड सप्लिमेंट ची स्वतः निर्मिती केली आहे.
शरीर धातूंचे बळ वाढवणारे, गर्भपोषण करणारे, दूध वाढवणारे, पित्तशामक, रक्तवर्धक रसाने युक्त असे शातामृत ग्रँनुल्स आहे. यात नैसर्गिक स्वरूपाचे कॅलसिम(Ca), लोह(Hb), प्रोटीन(Protein) फायबर(Fiber) देखील उपलब्ध आहेत.

रस धातुवर्धक, गर्भपोषण, दूध वर्धन, पित्तशामक, रक्तवर्धक असे शातामृत गरोदर आणि बाळंतपणामध्ये पोषक आहाराची गरज सहजपणे पूर्ण करू शकते.

शतामृत Granules च्या निर्मिती साठी अत्युच्य दर्जाचे घटक आणि दर्जेदार निर्मिती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रयत्नातून अतिशय परिणामकारक व गुणकारी सप्लिमेंट किफायतशीर दरात महिलांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

महिलांनी गरोदर असतानी पाहिल्या माहिन्यापासून आणि बाळंतपणा नंतर दूध वाढवण्यासाठी शातामृत चा अवश्य लाभ घ्यावा.

अधीक माहितीसाठी संपर्क
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D.आयुर्वेद
विश्वांकूर आयुर्वेद
स्वतंत्र सैनिक कॉलनी
औरंगाबाद
Phone No:- 8237523722 / 942027078

18/03/2022

कंबरदुखीसाठी आयुर्वेदीय पंचकर्म उपचार !

सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, सर्वांमध्ये हा त्रास आढळतो कंबरदुखी नेमकी कशामुळे होत आहे याचे कारण शोधणे प्रामुख्याने आवश्यक असते. ते न शोधताच स्वतःचे स्वतः उपचार केले तर ते तापदायक ठरू शकते. म्हणून सर्वप्रथम कंबरदुखीची विविध कारणे लक्षात घेतली पाहिजेत.

पाठीच्या मणक्यांच्या काही विकृतीमुळे कंबरदुखी होते. स्पॉण्डयलोसिसी(Lumbar Spondylosis / Spondylitis) या आजारामध्ये पाठीच्या मणक्याचे हाड, कार्टिलेज आणि डिस्क वर विपरीत परिणाम होतो. यामध्ये हाडांची झीज होते, गादी सरकते(Disc Bulge),नस दबते(Nerve Compression), सांध्यांना सूज येते(Arthritis). यामुळे कंबरेत हालचाल करतानी देवांना होतात. कडकपणा जाणवतो. या मणक्यांच्या बाजूला असलेली स्नायूबंधने दुखावल्यास देखील तीव्र स्वरूपाची कंबरदुखी निर्माण होते, म्हणून कंबरदुखी अस्थीमधील विकृतीमुळे आहे की, स्नायूंतील विकृतीमुळे आहे हे समजणे आवश्य असते.

सायटिका मज्जातंतूमध्ये ही शरीरातील सर्वात मोठी मज्जातंतू आहे, जी कमरेखालील भागातून सुरू होऊन नितंबाद्वारे तुमच्या टाचांपर्यंत पोहोचते. यामुळेच सायटिका मज्जातंतूमध्ये समस्या निर्माण झाल्यास कमेरखालील संपूर्ण भाग प्रभावित होतो. सुरुवातीला केवळ कमरेमध्ये वेदना जाणवतात. पण यानंतर होणाऱ्या वेदना असह्य ठरू शकतात. कमरेनंतर हळूहळू तुमचे नितंब (Hips) त्यानंतर पायापर्यंत दुखणे वाढत जाते. या समस्यांमुळे कमरेखालील भागात दुखण्याव्यतिरिक्त अशक्तपणा किंवा मुंग्या आल्यासारखं वाटू शकतं.तसंच दोन्ही पायांऐवजी एकाच पायात हा त्रास जाणवू शकतो.

शरीरातील चरबीचे प्रमाण वाढून त्यामुळे शरीराची जाडी वाढल्यानेही कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.
स्त्रीवर्गामध्ये या त्रासाचे प्रमाण फार मोठे आहे असे दिसते. गृहिणीला घरकामाचा पडणारा ताण तसेच गर्भाशयाशी संबंधित काही तक्रारी या कंबरदुखीस कारणीभूत ठरतात. यामध्ये मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावर पांढरे जाणे (ज्यास श्वेतप्रदर म्हटले जाते.) अशा तक्रारी स्त्रियांमध्ये कंबरदुखी निर्माण करतात. अशाप्रकारे यापैकी कोणत्याही एक किंवा अनेक कारणांनी निर्माण झालेली कंबरदुखी मनुष्याला अस्वस्थ करते. बसताना किंवा उठताना कंबरेच्या ठिकाणी तीव्र किवा सौम्य अशा वेदना जाणवतात.

लक्षण
कंबर दुखणे, सकाळी उठताना बसताना त्रास होणे , कंबरेत एक प्रकारचा कडकपणा असणे , जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, कंबर, नितंब आणि पायांमध्ये हलक्या स्वरुपात दुखणे, कमरेच्या तुलनेत पायांमध्ये अधिक वेदना होणे, एकाच पायात तीव्र वेदना जाणवणे, पायांसह पायांचीही बोटेही दुखणे, कंबर आणि पायांमध्ये मुंग्या येणे, पायांमध्ये जीव नसल्याची जाणीव होणे

पाठ-मान-कंबर दुखी हा हाडांशी व पर्यायाने वाताशी सबंधीत आजार आहे, यासाठी वात दोष कमी करणारी बस्ति पंचकर्म, वेदनाशामक कटीबस्ती, रक्तमोक्षण, जलोका, आग्निकर्म, स्नेहन-स्वेदन यांचा प्रभावी उपयोग होतो. त्याचप्रमाणे इतर आयुर्वेदिय ओषधाने या आजारावर प्रभावी व गुणकारी उपचार होऊ शकतात. यासाठी आजाराच्या सुरुवातीच्या आवस्थेत आयुर्वेदिय उपचार व शरीर शुध्दी पंचकर्म केल्यास आजार लवकर आटोक्यात येऊ शकतो

पंचकर्म
बस्ती पंचकर्म:- आयुर्वेदानुसार वाढलेला वात कमी करण्यासाठी बस्ती चिकित्सा लाभदायक ठरते. मोठे आतडे म्हणजे पक्वाशय हे वाताचे स्थान आहे, या भागात तैल काधायुक्त औषधी सोडल्यास वातशमन होते, यामुळे बस्ती चिकित्सा वातदोषासाठी, वाताच्या आजारासाठी, कंबरदुखीसाठी अतिशय गुणकारी ठरते. यात मालीश शेक करुन संडासच्या मार्गात विविध औषधी, तैल काढे सोडले जातात.

कटीबस्ती:- पिठाची पाळ करुन औषधीयुक्त तैल कंबरेच्या ठीकाणी जीरवणे होय. यामुळे वेदना, सुज, हाडाची झीज, कमकुवतपणा कमी होऊन सांध्याना मजबुती मिळते. स्पॉण्डयलोसिसी, हाडांची झीज होते, गादी सरकते, नस दबते, सांध्यांना सूज येते. यासाठी अतिशय फायदेशीर दिसून येते

रक्तमोक्षण:- सांध्याच्या आजारामध्ये वातदोषासह रक्तदोष देखील वेदना व सुज निर्माण करण्यास कारणीभुत असतो. सांध्यातील हा रक्तदोष कमी करुन वेदना शमन करण्यासाठी जलोकावचारण (जळुच्या साहय्याने रक्त काठणे) उपयोगी ठरते. वेदना व सुज कमी करुन सांध्याना मजबुती मिळते.

धन्यवाद
डॉ सचिन गायकवाड - पाटील (M.D.)आयुर्वेद
श्री विश्वांकूर आयुर्वेद
स्वतंत्र सैनिक कॉलनी
निराला बाजार
औरंगाबाद
८२३७५२३७२२ / ९४२०२७०७८५

17/03/2022

होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख, आजारपण, चिंता जळून जावो, गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि, रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचे जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख, शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…

होळी पौर्णिमेच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!

05/03/2022

#अन्नपचन_प्रक्रिया ( )

मानवी शरीरात घडणारी अन्नपचन प्रक्रिया मोठी रहस्यमय व गूढ आहे. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी अनेक संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले, परंतु यातील बेसिक म्हणजेच मूलभूत सिद्धांत काही समजू शकले नाही.
भारतीय वैद्यकाचे मूळ असणारा आयुर्वेद मात्र अन्नपचन प्रक्रिया, याविषयी सविस्तर सांगतो.

#रोगा_सर्व_अपी_मंदाग्नो!!
म्हणजे शरीरातील सर्व आजार अग्निमांद्य किंवा अपचनामुळे होतात, असे आयुर्वेद सांगतो.

सर्व रोगामध्ये/ आजारामध्ये अग्निमांद्य किंवा अपचन यास कारण मानले असेल तर नक्कीच अन्नपचन प्रक्रिया व पचन संस्था याविषयी सविस्तर माहिती देखील आयुर्वेद ग्रंथकाराना असेल.

अन्नपचन प्रक्रियेमध्ये ३ घटकांचा समावेश होतो.
#यकृत(Liver),
#आमाशय(Stomach + Instetine),
#मज्जासंस्था(Nervous System).

अन्नाचे योग्य व वेळेत पचन झाल्यावर भुकेची संवेदना होते. पोटातील मज्जासंस्थाने यकृताला उत्तेजना दिल्यामुळे, यकृतातील पाचक पित्त पोटात उतरल्यामुळे भुकेची जाणीव होण्यास सुरवात होते.
भूक लागल्यावर घेतलेला आहाराचे आमाशयामध्ये (पोटामध्ये) व्यवस्थित मिश्रण तयार होते. हे मिश्रण अन्नपचनासाठी छोट्या आतड्यामध्ये (Small Instestine)ढकलले जाते. याठिकाणी यकृतातून आलेल्या पाचक पित्ता(Digestive Jiuce) बरोबर याची प्रक्रिया होऊन यातून सार भाग (उपयोगी) व मलभाग वेगवेगळा केला जातो. सार भाग शरीरात शोषला जातो, व मलभाग मोठ्या आतड्यामध्ये(Large Instestine) ढकलला जातो. मलभाग योग्य वेळी शरीराबाहेर टाकला जातो. अशा पध्द्तीने निरोगी शरीरात अन्नपचन प्रक्रिया चालू असते.

साधारणतः आहाराच्या गुणवत्तेनुसार ४ ते ६ तासांचा वेळ पचनासाठी लागतो. पचायला हलका आहार लवकर पाचतो, जड आहार साठी जास्त वेळ लागतो.

या ठिकाणी अपचन का होते हे समजून घेणे देखील महत्वाचे आहे. अन्नपचन क्रियेमध्ये यकृताचे आरोग्य कसे आहे? हे सर्वात महत्वाचे. यकृत क्रियात्मक (Physiologically) चांगले असेल तर उत्तम प्रतीचे पाचक पित्त(Digestive Juice) पोटात येऊन अन्नपचन नीट होऊ शकते. परंतु यकृत जर निरोगी नसेल म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या आजारांचा परिणाम यकृतावर येऊन यकृताचे कार्य मंदावले असेल तर पाचक पित्ताची गुणवत्ता कमी होते. असे पाचक पित्त अन्नाचे नीट पचन करू शकत नाही. यामुळे अपचन, अजीर्ण, अम्लपित्त, गॅसेस, मलावरोध, मूळव्याध होण्याची शक्यता अधिक असते.

तसेच पाचक पित्ताच्या पचन शक्तीपेक्षा जास्त मात्रेत आहार पोटात गेला तर त्यापासून देखील अपचन होण्याची शक्यता असते.

मानसिक ताणतणावामुळे भुकेची संवेदना वेळेत होत नाही. त्यामुळे देखील वेळेत आहार न घेतल्यामुळे अपचन होते.

अन्नपचन क्रिया सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो हे पाहुयात?
आयुर्वेदीय डॉक्टरांच्या सल्ल्याने आपली प्रकृती काय आहे हे जाणून घ्यावे. त्यानुसार आहार विहार दिनचर्या पथ्यपालन करावे.

शरीरावरील आजाराचा परिणाम कमी करण्यासाठी प्रकृतीनुसार पंचकर्म अवश्य करून घ्यावे. कफासाठी वमन पंचकर्म, पित्तासाठी विरेचन पंचकर्म, वातासाठी बस्ती पंचकर्म, मानसिक ताणतणावासाठी शिरोधारा पंचकर्म, नस्य पंचकर्म. यामुळे शरीरात वाढलेले दोष सामावस्थेत येतात, पचन क्रिया सुधारते, आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

मित्रानो अन्नपचन क्रिया हि निसर्गाची सर्वात उत्तम निर्मिती आहे, हे लक्षात घ्या. या अन्नपचन प्रक्रियेमुळेच आपल्या शरीराची रोज होणारी झीज भरून निगत असते.

#पचनासंबद्धती_एक_हि_तक्रार_असेल_तर_त्याकडे_दुर्लक्ष_करू_नका.
#सावध_राहा
#काळजी_घ्या

#अधीक_माहितीसाठी_संपर्क
डॉ सचिन गायकवाड पाटील
MD आयुर्वेद
विश्र्वांकुर आयुर्वेद
हॉटेल लालाजी समोर,
स्वतंत्र सैनिक कॉलनी
निराला बाजार
औरंगाबाद
शाखा:- औरंगाबाद- पुणे- नेवासा - देवगड
फोन नं:- 8237523722/9420270785

 #शतामृत_ग्रॅनुल्स   Two days Offer Prize:- 1) 20 % सूट दोन किंवा अधिक पॅक खरिदेवर (पार्सल चार्जेस  अतिरिक्त लागतील) * म...
05/03/2022

#शतामृत_ग्रॅनुल्स
Two days Offer Prize:-
1) 20 % सूट दोन किंवा अधिक पॅक खरिदेवर (पार्सल चार्जेस अतिरिक्त लागतील) * मर्यादित दिवसासाठी ऑफर लागू.

गरोदरपणामध्ये आणि बाळंतपणानंतर पोषक आहार घेणे, अतिशय आवश्यक आहे. पोषक आहारा शरीर धातूंचे पोषण करून गर्भपोषणास मदत करतो. रोजचा आहार हा पोषणमूलयुक्तच असेल असे नाही. अपोषक अयोग्य आहार व आहाराच्या कमतरतेमुळे शरीर धातू कमजोर होऊन गर्भपोषणावर विपरीत परिणाम करतात. यामुळे गर्भपोषण व्यवस्थित होत नाही, बालकाचे वजन कमी राहू शकते, विकास होण्यास अडथळे येऊ शकतात.

गरोदरपणामध्ये व बाळंतपणामध्ये पोषक व दूध वर्धक असा आहार न मिळाल्यास बाळंतपणामध्ये दूध कमी निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच गरोदर अवस्थेत शरीरावर पडणारा अतिरिक्त ताण , शरीर धातूंची होणारी झीज यांचा देखील दूध निर्मितीवर विपरीत परिणाम दिसून येतो.

हीच अडचण लक्षात घेऊन विश्वांकुर आयुर्वेद चे डॉ. सचिन गायकवाड पाटील M.D. (आयुर्वेद) यांनी आजवरच्या आपल्या आयुर्वेदिक प्रॅक्टिस, अनुभवातून व संशोधनातून या फूड सप्लिमेंट ची स्वतः निर्मिती केली आहे.
शरीर धातूंचे बळ वाढवणारे, गर्भपोषण करणारे, दूध वाढवणारे, पित्तशामक, रक्तवर्धक रसाने युक्त असे शातामृत ग्रँनुल्स आहे. यात नैसर्गिक स्वरूपाचे कॅलसिम(Ca), लोह(Hb), प्रोटीन(Protein) फायबर(Fiber) देखील उपलब्ध आहेत.

गर्भपोषण, दूध वर्धन, पित्तशामक, रक्तवर्धक असे शातामृत गरोदर आणि बाळंतपणामध्ये पोषक आहाराची गरज सहजपणे पूर्ण करू शकते.

शतामृत Granules च्या निर्मिती साठी अत्युच्य दर्जाचे घटक आणि दर्जेदार निर्मिती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रयत्नातून अतिशय परिणामकारक व गुणकारी सप्लिमेंट किफायतशीर दरात महिलांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

महिलांनी गरोदर असतानी पाहिल्या माहिन्यापासून आणि बाळंतपणा नंतर दूध वाढवण्यासाठी शातामृत चा अवश्य लाभ घ्यावा.

अधीक माहितीसाठी संपर्क
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D.आयुर्वेद
विश्वांकूर आयुर्वेद
स्वतंत्र सैनिक कॉलनी
औरंगाबाद
Phone No:- 8237523722 / 942027078

https://www.facebook.com/662923337378678/posts/1722708841400117/
04/03/2022

https://www.facebook.com/662923337378678/posts/1722708841400117/

वसंत ऋतुचर्या : कालावधी (February ते April)वसंतऋतूत सुर्याकीरनांची प्रखरता वाढल्यामुळे सृष्टीत सर्वत्र तीक्ष्ण, उष्ण, रुक....

26/02/2022

#वसंत_ऋतुचर्या : कालावधी (February ते April)

वसंतऋतूत सुर्याकीरनांची प्रखरता वाढल्यामुळे सृष्टीत सर्वत्र तीक्ष्ण, उष्ण, रुक्ष गुण वाढीस लागतात. त्यामुळे शरीरातील सौम्य घटक कमी होत जातात. त्यामुळे शरीरबल कमी होत जाते. त्याचप्रमाणे आधीच्या ऋतूतील (हेमंत शिशिर) शीत सिंग्ध असे वातावरण व या ऋतूत केलेला जड, मधुर, सिंग्ध अशा आहारामुळे शरीरात कफ दोष वाढलेला असतो. हा कफ वसंत ऋतूत सुर्याकीरणाची प्रखरता वाढल्यामुळे पातळ होतो व हा पातळ कफदोष जठराग्नीला मंद करून कफ दोषामुळे होणारे रोग निर्माण करतो उदारणार्थ ताप, सर्दी, खोकल, दमा, संधिवात, कांजण्या, गोवर, भूक कमी होणे, आळस येणे इत्यादी. कफ दोष वाढल्यामुळे शरीराचे बळही कमी होते. त्यामुळे शरीराची प्रतिकारक शक्ति कमी होते. प्रतिकार शक्ति कमी झाल्यामुळे शरीर वेगवेगळ्या संसर्ग ला(infection)बळी पडते, त्यामुळे वरवर वाटणारे आजार गंभीर स्वरूप धारण करतात. त्यामुळे या ऋतूत प्रथम कफदोष नाशक व आग्नीमांद्यचा विचार करून उपचार व आहार विहार करावा.
या विषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

#व्यायाम: प्रकृतीनुसार व्यायाम करावा.

#आहार: कडू तिखट तुरट रसाचा व उष्ण रुक्ष अशा गुणांचा असावा. हा आहार कफ कमी करून अग्नि वाढवणारा असल्यामुळे हितकार ठरतो. परंतु आहार कमी प्रमाणातच असावा, जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात वात व पित्त वाढू शकतात.

#पाणी: तहान लागल्यास कोमट पाणी प्यावे व जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळावे.

#झोप: दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपू नये. त्यामुळे कफ व पित्त वाढतात. ह्यामुळे पडसे, शिंका येतात, शरीर जड पडते, उत्साह कमी होतो, आळस येतो, भुक कमी होते. विशेषत: सर्दी, खोकला, दमा,ताप, आम्लपित्त, संधिवात, वजन वाढणे असे विविध कफाचे व पिताचे आजार होतात.

#वर्ज्य: गोड आंबट तेलकट तुपकट पचण्यास जड व कफदोष वाढवणारा आहार घेऊ नये. लस्सी, दही, श्रीखंड, फ्रीजमधील पाणी व कोल्ड्रिंक्स अजिबात घेऊ नये. AC व प्रत्यक्ष पंख्याच्या वाऱ्याखाली बसू नये.

#उपचार: डॉक्टर च्या सल्ल्याने वसंत ऋतूत वमन (उलटी करून कफला बाहेर काढणे), प्रकृती दोषानुसार अन्य आयुर्वेद चिकित्सा करून घ्यावी.

#अधीक_माहितीसाठी_संपर्क
डॉ सचिन गायकवाड पाटील
MD आयुर्वेद
विश्र्वांकुर आयुर्वेद
हॉटेल लालाजी समोर,
स्वतंत्र सैनिक कॉलनी
निराला बाजार
औरंगाबाद
शाखा:- औरंगाबाद- पुणे- नेवासा - देवगड
फोन नं:- 8237523722/9420270785
#विश्वांकुर_आयुर्वद
#शातामृत_ग्रॅनुल्स

https://www.facebook.com/662923337378678/posts/1713793615624973/
20/02/2022

https://www.facebook.com/662923337378678/posts/1713793615624973/

#वसंत_ऋतूतील_शरीरशुध्दी_वमन_पंचकर्म

शिशीर ऋतुमधील थंडी कमी होऊन वातावरणात गरमी वाढायला सुरुवात झाली की वसंत ऋतु सुरु झाला असे समजावे. शिशीर ऋतुमध्ये थंडीमध्ये शरीरात साचलेला कफ वसंतातील सुर्याच्या उष्णतेने वितळतो. यामुळे या ऋतुमध्ये कफदोष व कफदोषामुळे होणारे सर्दी(Allergy), खोकला, श्वसनाचे विकार, दमा(Asthma) सर्दीताप हे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात.

वसंत ऋतुमध्ये कफाचे आजार असणा-या व्यक्तीने विशेष काळजी घ्यावी. वसंतात वाढलेला कफदोष वेळेत कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. यासाठी आयुर्वेदिय औषधी,पंचकर्म,पथ्य व ऋतुचर्याचे पालन करणे उपयुक्त ठरू शकते.

ंचकर्म
आयुर्वेदानुसार वसंत ऋतुमध्ये वाढलेला कफदोष तोंडावाटे शरीराबाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे वमन पंचकर्म. आयुर्वेद सिध्दांतानुसार वाढलेला कफदोष जवळच्या मार्गाने बाहेर काढल्यामुळे कफदोषाचे आजार मुळापासुन बरे होण्यास मदत मिळते. वमन पंचकर्मामध्ये रुग्णाच्या प्रकृतीनुसार व आजारानुसार विशिष्ट औषधीतुप तीन त पाच दिवस योग्य मात्रेत दिले जाते. सर्वांगाला मालिश शेक केला जातो. सातव्या दिवसी सकाळी उलटीचे औषध देऊन डॉक्टरांच्या निगराणीखाली वमन पंचकर्म करण्यात येते. सर्व प्रक्रिया ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे आवश्यक आहे, अन्यथा त्रास होऊ शकतो. यानंतर तीन ते पाच दिवस आहारात पथ्ये पाळावी लागतात.

वमन कर्मामुळे उरः कंठ, फुफ्फुस, आमाशय(पोट), नाक, डोके, रस धातु, मेद धातु या सर्वांची शुध्दी होऊन या ठिकाणी साचलेला अशुध्द कफदोष शरीराबाहेर पडतो.

वमन पंचकर्मामध्ये आपल्या पोटातील, फुफ्फुस, छाती, व नाकातील सायनस मधील बारीक रचनेमध्ये साचलेला, रुक्ष झालेला, चिकटलेला, कुजलेला, कफ स्निग्ध करून मालिश-शेक करून मोठ्या प्रमाणावर बाहेर काढण्यात येतो. यामुळे छाती हलकी होते, फुफ्फुसाची स्वच्छता होते, नाकातील सायनस मोकळे होतात, सायनसचा त्रास, डोकेदुखी, डोके जड पडणे, सतत सर्दी होणे, ॲलर्जी होणे कमी होते.

ंचकर्म_कशासाठी_करावे?
१) वसंत ऋतुत वाढलेला कफदोष कमी करण्यासाठी
२) सतत होणारी ॲलर्जी, सर्दी कमी करण्यासाठी
३) ऋतु बदलल्यावर होणारा सर्दी, खोकला, तापेचा त्रास कमी करण्यासाठी
४) सायनस व त्यामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी
५) दमा (अस्थमा), श्वासाचा त्रास कमी करण्यासाठी
६) सतत होणारे अपचन, अजीर्ण, आम्लपित्त, जीर्ण आम्लपित्त कमी करण्यासाठी
७) त्वचारोग, सोरियासिस, पांढरे कोड कमी करण्यासाठी
८) स्थुलपणा कमी करण्यासाठी
९) प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

आपण जर वरील आजारांनी त्रस्त असाल तर आजच क डॉक्टरांचा सल्ला घेऊन वमन पंचकर्म करुन घ्यावे.

श्री विश्वांकुर आयुर्वेद व पंचकर्म केंद्रामध्ये वसंत ऋतुतील वमन पंचकर्म शिबीर सुरू आहे, तरी आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

#अधिक_माहितीसाठी_संपर्क
डॉ. सचिन गायकवाड पाटील
MD Ayurveda
श्री विश्वांकुर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
लालाजी हॉटेल समोर
नागेश्वरवाडी रोड
स्वतंत्र सैनिक कॉलनी
निराला बाजार
औरंगाबाद
Mob No. 8237523722
9420270785

 #शतामृत_ग्रॅनुल्स by   👆FSSAI certify✅  आता  #श्री_क्षेत्र_देवगड_संस्थान_नेवासा येथे उपलब्ध.*🤰🤱गरोदरपणात व बालनातपणानंत...
13/02/2022

#शतामृत_ग्रॅनुल्स by
👆FSSAI certify✅ आता #श्री_क्षेत्र_देवगड_संस्थान_नेवासा येथे उपलब्ध.

*🤰🤱गरोदरपणात व बालनातपणानंतर उपयोगी टॉनिक सप्लिमेंट*

*उपयोग👇*
1) गर्भपोषक
2) दूग्धवर्धक
3) रक्तवर्धक
4) पित्तशामक
5) गरोदरपणात पहिल्या महिन्यापासून उपयोगी
6) बाळंतपणानंतर दूध वाढीसाठी उपयोगी

*👇नैसर्गिक पणे उपलब्ध🍃🍃*
Protein
Fibre
Iron
Calcium

*🥛मात्रा*
५ ते १० ग्रॅम
दिवसातून २ वेळा
गायीचे दूध किंवा पाण्यासह

*पॅकिंग साईज*
२०० ग्रॅम

*MRP*
575 रुपये फक्त (Per Unite)

🙏🙏संपर्क
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D., आयुर्वेद
विश्वांकूर आयुर्वेद
निराला बाजार
औरंगाबाद
फोन :- 8237523722 / 9420270785

https://www.facebook.com/662923337378678/posts/1708339926170342/
12/02/2022

https://www.facebook.com/662923337378678/posts/1708339926170342/

#सावधान
#तुम्ही_जास्त_प्रमाणात_पाणी_पिताय_का?

खरोखरच पाणी पिण्याचे व जेवणाचे काही नियम आहेत का? असे नियम असावेत का? खरे तर खोलवर विचार न करता आपल्या आजूबाजूची माणसे जसे सांगतील त्या पद्धतीने आपले खाण्यापिण्याचे नियम सतत बदलत असतात. असे सतत बदलणारे नियम लगेचच आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारे नसले तरी कालांतराने या नियमबदलांचे परिणाम शरीरावर दिसून येतात. उदा. सकाळी तोंड धुतल्यावर तांब्याभर पाणी पिल्याने पोट साफ होते असे ऐकून बरेचजण सकाळी पाणी पित राहतात व कालांतराने सर्दी अथवा बद्धकोष्ठतेचे शिकार होतात. म्हणून प्रत्येक आहार आणि विहाराच्या गोष्टींचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन ती गोष्ट करायची की नाही याचा निर्णय घ्यावा.

#पाणी_पिणे_याविषयीही_बरेच_समज_गैरसमज_समाजात_प्रचलित_आहेत.
पाणी केंव्हा प्यावे? किती प्यावे? जेवणाच्या सुरवातीला, जेवणात, जेवणानंतर लगेच की जेवणानंतर अर्ध्या तासाने, असे विचारमंथन माणसामाणसांमध्ये सतत चालू असते. खोलवर विचार केला तर जेवण करत असताना मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी पिणे अत्यंत लाभदायक असते. अन्न जठरामध्ये गेल्यानंतर अन्न घुसळण्याची क्रिया जठरात सुरू होते. थोडे अन्न थोडे पाणी एकाआड एक जठरात आले तर अन्न घुसळण्याची क्रिया अधिक चांगली होवून एकजीव असा अन्नरस तयार होण्यास खूपच मदत होते. जेवणाच्या सुरवातीला पाणी पिल्याने भूक मंदावते व अजीर्ण होण्याची शक्यता असते. जेवण संपल्यानंतर पाणी पिल्याने अन्न व्यवस्थित घुसळले जात नाही व अपचन होण्याची शक्यता वाढते. लगेचच या गोष्टीचा परिणाम जाणवत नाही पण कालांतराने दुष्परिणाम दिसून येतात. म्हणून जेवताना मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी पिणे अधिक योग्य आहे.

#पाणी_किती_प्यावे?
एका वेळी साधारणतः शंभर ते दीडशे मिली पाणी प्यावे. यापेक्षा जास्त पाणी पिल्याने मूत्रसंस्थेवर ताण येवू शकतो कारण पाणी शरीरात साठवण्यासाठी कोणतीच नैसर्गिक व्यवस्था मानवी शरीरात नाही. आपण पिलेले व जास्त झालेले पाणी लगेच मूत्रमार्गाने शरीराच्या बाहेर टाकले जाते. पाणी थोड्या वेळाने व थोड्या प्रमाणात सतत प्यावे. पाणी पिण्याचे प्रमाण ऋतूनुसार कमी जास्त होते. आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत की नाही हे ओळखण्यासाठी साधी खूण म्हणजे लघवीचा रंग. लघवीचा रंग जर पिवळसर असेल तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे लागेल. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार प्रत्येक माणसाच्या पाणी पिण्याचे प्रमाण हे कमी अधिक असू शकते.

#अधिक_महितीसाठी_संपर्क:
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D.आयुर्वेद
विश्वांकूर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
स्वतंत्र सैनिक कॉलनी
औरंगाबाद
Phone No:- 8237523722 / 9420270785

Address

Nirala Bazar Aurangabad
Aurangabad

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm
Sunday 10am - 3pm

Telephone

+918237523722

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwankur Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vishwankur Ayurveda:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram